🔹 #म्रुत्युसाक्षी🔹
Ratris Khel Chale- marathi bhutachya goshti,bhutkatha,horror story marathi |
हाँस्पीटलमधील आय सी यु रुमच्या बाहेर काहीतरी हालचाल जाणवली आणी सारंगला अचानक दीर्घ झोपेतून जाग आली. डोळे न उघडताच एका कुशीवर वळण्याचा त्याने प्रयत्न केला पण शरीर खुपच जड झाल्यासारखे वाटले.. होणारच होते कारण गेल्या महिनाभरापासून आपण कोमामध्ये आहोत हे त्याला आठवले.. त्याचबरोबर महिन्याभरापुर्वी झालेला तो भयानक अपघात पण त्याला आठवला.😑
बर्याच वर्षापासून स्वताची कार घेण्याचे त्याचे स्वप्न तीन महिन्यापुर्वी पुर्ण झाले होते..मागील महिन्यात एका रविवारी ऑफिसच्या सुट्टी चे निमित्त साधून नवीन घेतलेली कार घेऊन तो एकटाच त्याच्या शहरापासून काहिशा अंतरावर असणाऱ्या नातेवाईकांकडे भेटायला गेला होता..रात्री परत निघताना उशीर झालेला होता, पण दुसर्या दिवशी ऑफिसला जायचे असल्याने नातेवाईकांचा “आजची रात्र ईथेच मुक्काम करून सकाळी लवकरच निघा “ हा प्रेमळ आग्रह नाकारत तो रात्रीच परत आपल्या घराकडे निघाला.🚗
त्या रात्री कारमधील MP3 प्लेयरवरची गाणी ऐकत आपल्या घराकडे परतत असताना त्या एकेरी मार्गावरील एका वळणावर अचानक समोरून एक मोठा ट्रक भरधाव वेगाने हेडलाईट्स चमकवत आणी कर्णकर्कश हॉर्न वाजवत आला..🚛
सारंगने धडकेपासून वाचण्यासाठी जोराने स्टेअरिंग फिरवले तरीपण ट्रकसोबत धडक झालीच..त्या धडकेचा आणी गाडीच्या काचा फुटण्याचा मोठा आवाज सारंगच्या कानावर आदळला त्यानंतर काय झाले हे समजण्याच्या आतच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणी तो बेशुद्ध पडला..💫

“बापरे..काय भयानक अपघात होता तो”..तरीपण आज आपण जिवंत असल्याचे पाहून त्याला हायसे वाटले..आणी त्याला आनंदही झाला..
“आज फिर जिने कि तमन्ना है | आज फिर मरनेका ईरादा है||”
हे त्याचे आवडते गाणे का कुणास ठाऊक पण आज त्याला मोठ्या आवाजात म्हणण्याची ईच्छा होत होती, पण त्याने ती आवरली..
आणी मनातल्या मनात गाणे गुणगुणत तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करु लागला पण खुप वेळ प्रयत्न करुनही डोळ्याची पापणी किंचितही उघडत नसल्याचे त्याला जाणवले, बहुतेक दीर्घ काळ बेशुध्दावस्थेत राहण्याचाच परिणाम असावा हा..😔

आई, बाबा, दादा,अंजली हे सगळेच आपल्या अपघातामुळे महिन्याभरापासून खूपच दूखी असतील नाही..पण आता मात्र आपल्याला बरा झालेला पाहुन किती खुश होतील ते..या विचाराने तो आंनदुन गेला होता..
इतक्यात त्याला दिपकदादा आणी डाँक्टरांचे पुसटसे बोलणे कानावर येऊ लागले. झोपल्याजागीच तो लक्षपूर्वक ऐकु लागला.👂
इतक्यात त्याला दिपकदादा आणी डाँक्टरांचे पुसटसे बोलणे कानावर येऊ लागले. झोपल्याजागीच तो लक्षपूर्वक ऐकु लागला.👂
“स्वाँरी दिपक, गेले महिनाभर सारंगला वाचवण्याचे आम्ही खुप प्रयत्न केले..पण मागच्या आठवड्यापासून त्याची प्रक्रुती हळूहळू ढासळत चालली आहे याचीही कल्पना आम्ही तुम्हांला दिली होतीच..
काल रात्रीपासून सारंगच्या शरीराने प्रतिसाद देने पुर्णपणे बंद केले आहे..स्वॉरी आम्ही त्याला वाचवू शकलो नाही..ही ईज डेड नाऊ"
काल रात्रीपासून सारंगच्या शरीराने प्रतिसाद देने पुर्णपणे बंद केले आहे..स्वॉरी आम्ही त्याला वाचवू शकलो नाही..ही ईज डेड नाऊ"
डाँक्टरांचे हे वाक्य सारंगच्या कानावर जणू वीज बनुनच कोसळले.
“दादा, डॉक्टरांचे काही ऐकू नकोस रे..मी अजूनही जिंवत आहे”
हे वाक्य त्याने मोठ्याने किंचाळून सांगण्याचा प्रयत्न केला खरा ..पण त्याच्या तोंडातुन किचिंतही आवाज बाहेर निघाला नाही. 😖
“दादा, डॉक्टरांचे काही ऐकू नकोस रे..मी अजूनही जिंवत आहे”
हे वाक्य त्याने मोठ्याने किंचाळून सांगण्याचा प्रयत्न केला खरा ..पण त्याच्या तोंडातुन किचिंतही आवाज बाहेर निघाला नाही. 😖
काही वेळ निघून गेला..त्याच्या रुममध्ये आणी बाहेर आता माणसे जमायला सुरूवात झाली.. त्याची पत्नी अंजली, आई, बाबा आणी इतर काही नातेवाईंकाचे हुंदके आणी आवाज त्याच्या कानावर पडु लागले तसा तसा तो मिटलेले डोळे उघडण्याचा आणी हात पाय हालवण्याचा जोरदार प्रयत्न करु लागला..पण सर्व व्यर्थ..स्वताच्या शरीरावरचा संपुर्ण ताबाच गमावून बसला होता तो..मनातील कोणतीही भावना कुठल्याच प्रकारे व्यक्त करु शकत नव्हता तो..
हे भगवान, हे नक्की होतय तरी काय? त्याला काहीच समजत नव्हते..🙌
हे भगवान, हे नक्की होतय तरी काय? त्याला काहीच समजत नव्हते..🙌
थोड्याच वेळात एका अँम्बुलन्समध्ये झोपवून त्याला घरी नेण्यात आले. नातेवाईक, आप्तेष्ट आणी मित्रमंडळी यांची कुजबूज त्याच्या कानावर आदळु लागली... कोणी हळहळत होते तर कोणी रडत होते..आजवर तोंडावर एकही चांगला शब्द न बोलणारे काही लोकपण त्यात सामील होते हे समजल्यावर त्याला काहीसे आश्चर्य पण वाटले..’आजवर मी जिवंत असताना कुठे गेले होते यांचे प्रेम?’असा एक निरर्थक प्रश्नही त्याच्या मनात आला.
स्वताच्या देहावर वांरवार बिलगणार्या अंजली व आईचे शरीराला होणारे स्पर्श त्याला जाणवु लागले, पण लाख प्रयत्न करूनही स्वताच्या चेहर्यावरची एक रेषसुद्धा तो हलवु शकत नव्हता..😑
सारंगच्या मनाची भयंकर घालमेल होत होती, लौकिकार्थाने बाहेरच्या दुनियेसाठी आपण खरोखरच मेलो आहोत हे त्याला एव्हाना समजून चूकले होते..पण म्रुत्युचा अनुभव असा असतो हे मात्र त्याला माहित नव्हते..कारण जरी म्रुत्यु सर्वाच्याच वाट्याला येत असला तरी म्रुत्यु नंतरचा हा अनुभव इतर जिंवत व्यक्तींना सांगण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही..ती फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे..इतरांना सांगण्याची नाही.👈
जगाच्या द्रुष्टीने आपला म्रुत्यु झाला हे तर खरे आहे..
पण.. मग म्रुत्युसोबतच आपली सर्व संवेदना का नाही संपली? आपल्या मनातले विचार का नाही संपले??
हे नक्की संपणार तरी केव्हा? का कधीच नाही?
असे प्रश्न त्याला हैराण करत होते.
पण.. मग म्रुत्युसोबतच आपली सर्व संवेदना का नाही संपली? आपल्या मनातले विचार का नाही संपले??
हे नक्की संपणार तरी केव्हा? का कधीच नाही?
असे प्रश्न त्याला हैराण करत होते.
आता तर स्मशानवाटेवर अंतयात्रा सुद्धा निघाली, आपल्या सोबत चाललेले हे लोक काही वेळातच स्मशानभूमीत नेऊन आपल्याला जाळणार हे त्याला समजत होते पण जे जे होईल ते फक्त अनुभवत राहणे ऐवढेच त्याच्या हातात उरले होते.., आपल्याला जाळल्यानंतर शरीराची राख झाल्यावर पुढे आपले नक्की काय होणार?? आपल्या विचारांचे काय होणार? हा प्रश्न त्याला अस्वस्थ करत होता..मनातल्या मनात स्वताशीच तो संवाद साधत होता..👤
माझी अंजली, आई, बाबा, दादा, सगेसोयरे , मित्रमंडळी सगळे आज अश्रु ढाळत आहेत.
स्वताच्या तरुण मुलाची अंतयात्रा पाहण्याचे भोग माझ्या आई बाबांच्या वाट्याला येतील असा विचारसुद्धा आपण कधी केला नव्हता..
अंजलीचे तर रडून रडून डोळे सुजले असतील..आजवरच्या संसारात तिने हसत हसत अनेक दुखाःचे घोट रिचवले होते.. त्यामानाने आपण तिला फारसे सुख देऊ शकलोच नाही..पण तिनेही आजवर कधी त्याविषयी तक्रार पण केली नाही..
खरच मोलाची साथ दिलीस तू अंजली..त्याबद्दल तुझे आभार मानायचे राहुनच गेले बघ..आजचा दिवस तू कधी विसरू शकणार नाहीस हे मला माहित आहे..😢
पण माझ्याशिवाय जगण्याची शक्ती परमेश्वर तुला देवो..

हे देवा, फक्त एकदाच या सर्वांना शेवटचे डोळे भरुन पाहुदे..काही क्षणापुरती तरी डोळ्याची पापणी उघडण्याचे सामर्थ्य दे..
पण नाही उघडु शकणार मी, निसर्ग म्रुत्यु नंतर कोणालाही ती परवानगीच देत नाही ना..
‘म्रुत्युसाक्षी’… हो.. म्रुत्युसाक्षी बनलोय आपण ..स्वताचे मरण स्वता अनुभवणारा..
पण हा भयकंर अनुभव प्रत्येकाच्याच वाट्यास येतो का??का फक्त माझ्यासारख्या अकाली म्रुत्यु झालेल्या अभागी जीवांनाच??👤

अशा विचारात दंग असताना सारंगला आता सरणावर झोपवले असल्याचे त्याला समजले..म्रुतदेहाला अग्नी देण्यापुर्वीची प्रकिया लगबगीने चालू होती.
बापरे, म्हणजे आता आपल्यापण जाळणार तर..
बापरे, म्हणजे आता आपल्यापण जाळणार तर..
सरणावरून ऊठण्याची , स्मशानातून पळून जाण्याची तीव्र ईच्छा त्याला होत होती , पण फक्त क्रुतीशुन्य..कारण तो आता त्याच्या शरीराचा मालक राहिला नव्हता..त्यामुळे त्याचे शरीर त्याची कोणतीही आज्ञा पाळत नव्हते..
एव्हाना सर्व सोपस्कार पुर्ण होऊन सारंगच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.🔥
एव्हाना सर्व सोपस्कार पुर्ण होऊन सारंगच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.🔥
अग्नी..जाळ..साधा चटका बसला तरी शरीर आपोआप त्यापासुन दुर जाते ना, मग आजपण तसेच व्हावे.. अशी वेडी आशा त्याच्या मनात डोकावली...
पण संपुर्ण शरीराला अग्नीदाह होत असतानाही आणी धुराने नाक गुदमरून गेले तरीही त्याच्या शरीराची किंचितही हालचाल होऊ शकली नाही..सरणावर आगीचे बसणारे तीव्र चटके तो जागेवरच सहण करत राहिला..
संपले.. सगळे काही संपले..निदान माझ्यापुरते तरी हे जग खरोखरच संपले..🌍

खूप वेळ उलटून गेला..त्याच्या शरीराला पुर्णपणे भस्म करून अग्नीपण आता शांत झाला होता..आता त्याच्या शरीराचा दाह हळुहळु कमी होत चालला आहे असे त्याला वाटले..
आतापर्यंत होत असलेली मनाची घालमेल,अकाली म्रुत्युचे दुखः, स्वजनांची आसक्ती हळूहळू विरळ होत चालली होती...
त्याच्या चितेतील निखारे जसे हळूहळू विझत चालले होते,🔥
तसेच स्वताचे अस्तित्व, बाहेरचे जग पुसट पुसट होत चालल्याचे सारंगला जाणवले..मनातील विचारही हळूहळू कमी कमी होत पुर्ण नाहीसे झाले होतेे..

थोड्याच वेळानंतर एक पारदर्शक ,हवासद्द्रुश, भावनारहित प्राणशक्ती हळूहळू त्या सरणातुन बाहेर पडली..आणी भोवतालच्या वातावरणात विरघळून अद्रुश्य होत गेली..
निखारे आता पुर्णपणे विझले होते...🍃
निखारे आता पुर्णपणे विझले होते...🍃
🔹समाप्त🔹
© लेखक-Dnyanesh W.