लिखाणात कुठे चूका असल्यास किंवा काही बदल असल्यास अवश्य सुचवा )
# वाचलास…..
त्या घाटात अमावस्येला हडळ दिसते म्हणे…. 
आणि अमावस्येला एक बळी घेते म्हणे…. 
काही पण काय…. जग कुठे जात आहे…. लोकांचे विचार अजून बुरसटलेले….. आज अमावस्या आहे… खरं खोटं करणारच…. रात्री 12 वाजायच्या आधी घाटा कडे जाण्यासाठी निघालो …पण घाटाच्या जरा अलीकडे बाईक बंद पडली…. 5-10 मिनिटाच्या प्रयत्नां नंतर चालू झाली…. शीट यार 12 चा मुहूर्त चुकला…. त्या घाटामधून निवांत बाईक चालवायला लागलो…. कसली हडळ…कसल भूत…. साध काळ कुत्र पण दिसलं नाही….मी गाडी थांबवली…. गाडीचे हेड लाईट चालू…..सिगरेट ओढणार होतो…..समोर च्या रस्त्यावरून माझ्या सारखाच माझ्या वयाचा एक मुलगा बाईक वरून येतोय… स्पीड एकदम कमी आहे गाडीचा….. त्याच्या मागे कुणी लेडीज बसल्या आहेत…. त्या लेडीज ला बघून परत डोक्यात हडळीचा विचार आला…. कुठे असेल बिचारी हडळ…. मला बघायचं होतं तुला…… 

त्या मुलाची गाडी हळू स्पीड मध्ये पास झाली…. त्या पाठीमागच्या लेडीज ने तिची मान पूर्ण उलटी फिरवली…. गाडीच्या हेड लाईट च्या उजेडात दिसला तो अतिशय विद्रुप आणि भयानक चेहरा.,... तोंडात सुळे…..डोळ्याच्या ठिकाणी पोकळ काळी जागा…..आणि ती म्हणाली…. मलाच बघायची हौस होती ना….. बरोबर 12 वाजता हा आला….. नाही तर तुझा नंबर होता….
आज वाचलास….
#बिल्डिंग…..
त्या अर्धवट बांधकाम राहिलेल्या 8 मजली बिल्डिंग मध्ये भूत आहे म्हणे…. 
मी विजय आणि मंदार आम्ही त्रिकुट …. कायम एकत्र…..मंदार विरुद्ध विजय व मी आमची पैज लागली आज रात्री त्या अर्धवट बांधकाम राहिलेल्या बिल्डिंग मध्ये रात्री 12 ते 1 फक्त 1 तास थांबून दाखवायचं…. 1000-1000 रुपये मंदार देणार होता आम्हाला …. रात्री 11.45 ला तिघे त्या बिल्डिंग च्या आवारात आलो…. मंदार बिल्डिंग पासून जवळच असलेल्या झाडाच्या पारावर आमची वाट बघत बसणार होता…. मी आणि विजय बिल्डिंग मध्ये 12 वाजता जाऊन 1 ला परत येणार…12 वाजता सातव्या मजल्यावर जाऊन मोबाईल ची फ्लॅश लाईट चालू करून मंदार ला सिग्नल द्यायचा….डन…मी आणि विजय बिल्डिंग च्या आवारात आलो…. किर्रर्र अंधार…. भकास…गूढ वातावरण…. वातावरणात एक प्रकारचा दबाव…. मोबाईल ची टॉर्च चालू करून…गप्पा मारत मी आणि विजय पायऱ्या चढत होतो…. आमच्या टॉर्च चा तेवढाच काय तो उजेड….. बोलत बोलत कधी सातव्या मजल्यावर आलो ते समजलंच नाही….. मोबाईल ची फ्लॅश लाईट चालू करून मंदार ला सिग्नल दिला…. त्यानी पण त्या पारा वरून मोबाईल ची फ्लॅश लाईट चालू करून आम्हाला दाखवली…. मी आणि विजय तिथंच गप्पा मारत बसलो…. ½ तास कसा गेला कळलंच नाही…. इतक्यात तिथे 2 माणसं आली…. त्यांच्या पायाचा आवाज आला नाही…. दोन मिनिट मी आणि विजय दचकलोच…. ती दोघ आमच्या समोर आली… त्यातील एक वॉचमन होता…. दुसरा त्याचा मित्र असेल….जरा विचित्र दिसत होता…..आमचे निम्मे टेन्शन गेले…. मला माहितीय अशा रिकाम्या बिल्डिंग मध्ये नको ते कारभार चालतात म्हणून नाईट साठी पण वॉचमन असतात…वॉचमननी आम्हाला ओरडण्या आधी आणि तिथून हकलून देण्याआधी आम्ही त्यांना ह्या बिल्डिंग मध्ये यायच कारण सांगितलं…..ठीक आहे म्हणून ते पण आमच्या बरोबर गप्पा मारत बसले…. आम्ही त्यांना विचारलं नक्की ह्या बिल्डिंग मध्ये काय झालं होतं???? त्यानी बोलायला सुरु केल…. रात्रीचा वॉचमन नेहमीप्रमाणे बिल्डिंग वर लक्ष देत होता…. बिल्डिंग अजून अंडर कन्स्ट्रकशन होती…. वॉचमन नेहमीप्रमाणे बिल्डिंग मध्ये चक्कर टाकत होता…. पायऱ्या चढत चढत सातव्या मजल्यावर आला….. अचानक त्याला एका कोपऱ्यात खुडबुड ऐकू आली…. टॉर्च घेऊन तो त्या दिशेने गेला…. इथे एक माणूस गांजा ओढत बसला होता….तो तिथे कधी आला कसा आला त्या वॉचमन ला माहिती न्हवत…..एकंदरीत त्याचा अवतार जरा भयानक दिसत होता…. लाल झालेले तारवटलेले डोळे…विस्कटलेले केस…. गबाळा अवतार…...वॉचमन आणि त्याची झाटापट सुरु झाली….. भांडता भांडता दोघ एकदम कडेला आली…. त्या गांजा ओढलेल्या माणसाने एकदम चाकू काढला आणि त्या वॉचमन च्या पाठीत खुपसला…. पण वॉचमन ने त्याला घट्ट पकडून ठेवले असल्याने त्या गांजा ओढलेल्या माणसाला सुटता येईना त्यातच वॉचमन चा पाय घसरला…. आणि दोघे सातव्या मजल्यावरून खाली पडले…. ऑन द स्पॉट गेले दोघे…. त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता… आणि त्या दिवसा पासून ह्या बिल्डिंग च बांधकाम असंच अर्धवट पडल…. मी आणि विजय कान देऊन ती गोष्ट ऐकत होतो…. 1 तास संपायला 10 मिनिट बाकी होते…. चला निघूया आपण सगळी…. खाली जास्त पर्यंत 10 मिनिट लागतीलच…. विजय म्हणाला…..वॉचमन आणि त्याचा मित्र पुढे होते मी आणि विजय पाठीमागे होतो… मोबाईल च्या फ्लॅश लाईटमध्ये जमिनीवर उजेड टाकून चालायला लागलो…. खूप साहित्य पडलं होतं…. जिना उतरत असताना सहज मोबाईल चा उजेड वॉचमन वर पडला…. मी आणि विजय इथेच थिजलो….. वॉचमन च्या पाठीत चाकू होता…. वॉचमन आणि त्याच्या बरोबर असलेल्या माणसाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता…
Written By - सायली कुलकर्णी
