( लिखाणात कुठे चूका असल्यास किंवा काही बदल असल्यास अवश्य सुचवा )
#हडळ…..
माझ्या लहान पण वात्र्य मुलाला थोडी भीती बसावी म्हणून आमच्या बिल्डिंग च्या समोर असलेल्या चिंचेच्या झाडावर खूप विद्रुप…. भयानक……हडळ राहते ही गोष्ट अगदी रंगवून सांगितली…. रात्री पाणी प्यायला उठलो….पाणी पीत पीत गॅलरी मध्ये आलो…..आता त्या चिंचेच्या झाडावरची तीच विद्रुप…. भयानक…..हडळ माझ्या कडे बघत बसली आहे…..
#उतारा…..
अस म्हणतात उतारा टाकला की मागे वळून पाहू नये…. ती ब्याद पाठीमागे येते म्हणे….. त्या विशिष्ट दिवशी उतारा ठेवायला सांगितला होता…. मी उतारा ठेवायला जाणार आहे ….. त्या शेतात चिंचेच्या झाडाजवळ मी उतारा ठेवला…. उतारा ठेवल्या ठेवल्या त्या वर कोणी तरी झडप घातली…. आणि तो उतारा मच मच खाल्याचा आवाज येतोय…. सहज म्हणून अर्धवट पाठीमागे पाहिले…. आता माझ्या पाठीमागून काही तरी केसाळ…. धूड येत आहे…. शेतातून बाहेर पडायची वाटच सापडत नाही आहे…..ब्याद खरंच पाठीमागे येते …
#अलवण….
स्वभावाने अतिशय मत्सरी…. मनात डुख धरून बसणाऱ्या…. पण चेहऱ्यावरून अतिशय सालस… सोज्वळ वाटणाऱ्या नमा च एकदा लग्न झालं…. बरीच वर्ष झाली तीच लग्न होत न्हवत…सगळी घोड नवरी बोलत…. अंगात अनेक गुण…. हाताला तर अप्रतिम चव… वाड्यातील आणि शेजारी पाजारी असणाऱ्या सगळ्या छोट्या चिल्या पिल्याना नमा खूप सुरेख बाहुल्या बनवून द्यायची…. पण नशीब येवढ वाईट की नवऱ्याच्या घरी जाऊन एक आठवडा पण झाला न्हवता की नमा चा नवरा देवाघरी गेला,.... नमा पांढऱ्या पायाची म्हणून परत माहेरी आली…. केस कापले…. अलवण नेसायला लागलं…. आता नमा फक्त राबणारी एक मोलकरीण झाली…. घरात फक्त रबाव लागत होतं… मान मिळत न्हवता….. शुभ कार्यात कोणी मिसळून घेत न्हवत……मनात राग…. मत्सर…. माझ्या नशिबात सुख नाही तर ह्या घरातील कुठल्याच बाईला संसार सुख मिळायला नको….. नमा च्या खोलीत सगळ्या बायकांच्या छोट्या छोट्या बाहुल्या आहेत…. नमा त्या बाहुल्या घेऊन कसलीतरी पूजा घालते……कुठल्याच बाई ला संसार सुख लाभले नाही.., हळू हळू त्या वाड्यातील सगळे पुरुष वारले…. सगळ्या बायका अलवण घालून असतात त्या वाड्यात…. त्या वाड्याला आता अलवण वाडा म्हणतात……..
Written By - सायली कुलकर्णी
