"काळीरात्र..अन् ती अपरिचित स्त्री.."
मित्रांनो खुप दिवस झाले मी या ग्रुप मध्ये आहे.आजवर खुप जनांच्या गोष्टी वाचल्या आहेत.लहान पानांपासूनच वाचण्याची आवड आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या ग्रुप मधील एका व्यक्तीने एक पोस्ट केली होती. त्या पोस्ट मध्ये त्याव्यक्तीने त्याचा सोबत घडलेल्या घटना आपल्या समोर मांडली होती.अन त्यांची पोस्ट हुबेहुब माझा सोबत घडलेल्या घटने सारखीच होती.मी ते सगळं लिखाण वाचून त्यावर कमेंट केली "लोक म्हणतात कि भुत-बीत काही नसतं भ्रम असत..पन खरं तर ह्या सगळ्यात ते म्हणतात ना की ज्याची जळती त्यालाच कळतं..माझा सोबत पन असंच काहीसं घडलेलय पण त्यावर कोणी विश्र्वास नाही ठेवला.."
त्या कमेंट मध्ये मला खुप जनांचे रिप्लाय आले होते कि तुमचा सोबत घडलेल्या घटना बदल सांगा मिञांनो खरंतर या दैनंदिनी जिवनात एवढा वेळ भेटत नाही कि मराठी मधे आपल्या सोबत घडलेल्या घटना बदल टाईप करुन सांगता येईल.
पन तरीही एक छोटासा प्रयत्न म्हणून मी आपला समोर माझा सोबत घडलेल्या घटना बदल आपनास सांगुईछीतो.पहिल्यांदाच एवढं सगळं लिखाण टाईप करतोय जर काही चुकलं तर समजून घ्या.

मित्रांनो ही गोष्ट आहे २०१५-१६ची उन्हाळ्याचे दिवस होते,अन् त्या वर्षी मी दहावीची परीक्षा दिली अन् मला सुट्या लागल्या होत्या.मग सुट्यात काय करायचे तर मग मी म्हणालो चला गावाकड घरच्याणी मला गावाकड जायला सांगितले ठरलेल्या प्रमाणे गावाकडून मोठा चुलत भाऊ मला घेऊन जायला आला अन् मी गावात राहायला गेलो.मोठा भाऊ शेती करायचा आणि सोबतच गावातील एका व्यक्तीच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर होता.दिवस भर शेतात काम करून रात्री तो नांगरट करायला ट्रॅक्टर वर जायचा. मला ट्रॅक्टर शिकण्याची खुप आवड होती मस्त पैकी रात्री चा त्या काळोख्यात ट्रॅक्टर वर जुने हिंदी गाणी लाऊन नांगरट करायची मजाच वेगळी.तो रोज रात्री नांगरणी करायला जायचा मला पन ट्रॅक्टर चालवायला शिकायचे होते त्यामुळे तो मला पण सोबत घेऊन जात असे.काही दिवसात मी पन ट्रॅक्टर चालवायला शिकलो.आम्ही दोघे रात्रभर ट्रॅक्टर एका पाठोपाठ चालवायचो त्याला झोप आली की मी चालवायचो अन् मला आली की तो..!
एक दिवस आम्ही एका आडराणात एका व्यक्तीच्या शेतात नांगरणी करायला गेलो. खरतर त्या दिवशी आमचा दिवस खराब होता अन् खुप वेळा नांगराने आम्हाला बेजार केलत अचानक आधुन मधुन नांगराची काॅटरपिन तुटायची त्यामुळ नांगर एक बाजुला कलायचा अन् आम्ही त्याला एका बाजुने उचलुन मोठ्या दगडाच टोचन लावून कसातरी उभा करून नवीन पिन बसवायचो असं आमचा सोबत ४ वेळेस घडल त्या मुळ दोघेही दमलो होतो.रात्रीचा आठ वाजल्यापासून आम्ही नांगरट करत होतो आता जवळपास साडेबारा वाजून गेले होते.दोघाना पन खुप तहान लागलेली होती जवळच बाटलीतल पाणी ही संपलं होतं.त्या शेतकर्यांचा शेतात जवळपास कुठेच पाणी नव्हते. तेव्हड्यात भाऊ म्हणला "जाऊदे थोडच तर नांगरायच राहिलय २तासाचा आत उरकुन घेऊ मग जाऊ ३ वाजेपर्यंत घरी "असं बोलून आम्ही परत कामाला लागलो अन् थोड्या वेळाने मला झोप येयला लागली होती .मी भावाला बोललो "आता तु चालव मी आराम करतो शेताता बांदाचा कडला जाऊन मी झोपतो नांगरट झाल्यावर मला ऊठव"असं बोलून मी ट्रॅक्टर चा खाली उतरनारच होतो की , तेवढ्यात एक थोडी थोडी हिरवी कलरची साडी घातलेली बाई समोरून बांधावरून पळत आली.मी परत ट्रॅक्टर मधे भावाचा बाजुला जाऊन बसलो.ती बाई पळत आली अन् ट्रॅक्टर च्या समोर काही अंतरावर समोरच येऊन बसली .खरंतर त्या दिवशी ना अमावस्या होती ना पोर्णिमा मला अजुन पन लक्षात आहे त्यादिवशी मंगळवार होता. ट्रॅक्टर चा समोर चा लाईट चालू होता ती आम्हाला स्पष्ट दिसत होती.तेवढ्यात मी भावाला म्हणलो "कोण आहे वावराची मालकीन आहे का?"भाऊ म्हनला येडाय का एवढ्या रात्रीच मालकीन कशी येईल."भावाने त्या बाईला आवाज दिला तो म्हनला "कोन आहेत ओ.."मी पन म्हनलो कोन आहात ओ..."तरी ही ती बाई काहीच बोलली नाही.आम्ही ट्रॅक्टर चा लाईट तिचा डोळ्यावर दोनदा चमकवला ती बाई उठली अन् ट्रॅक्टर चा थोड्या अंतरावर येऊन उभं राहिली,अन् बौलली कि,'पोरोहो कुठले आहात ? भाऊ म्हनला 'ईथलेच कारी गावचे..ती-ईथ काय करायलात? आम्ही म्हनलो नांगरणी चालू आहे ,पन तुम्ही कोण? तीने आम्हाला शेवटपर्यंत नाही सांगितलं नाही की ती कोण आहे.ती म्हणली मला पाणी द्या, भाऊ म्हनला आमच्या नाही ओ..मग ती बाई म्हणली बर जेवन द्या आम्ही म्हणलो सोबत डबा नाही ठेवत येतानीच जेवन करुन आलेलो आम्ही..! एवढ्या वर पण ती नाही थांबली तिने माझ्या भावाला शेवट तंबाखू पन मागितली, भावाकडे तंबाखू होती.टेप चा बाॅक्स मधे त्याने गायछाप ठेवलेली होती तो देणारच होता पन मी त्याला डवचल अन् म्हनलो देऊ नको. त्या बाईने माझ्या हातात घडी बघीतली होती बोलत बोलत ती ट्रॅक्टर चा मागे गेली मागचा लाईट चालू होता ती बाई मला म्हणाली 'ये पोरा किती वाजले रे'त्या वेळेस मी घडी मध्ये बघितलं तर बरोबर १२:५३ झालेले होते म्हनजे एक वाजणार होता.हवा पन खुप सुटलेली होती.खरतर एवढं सगळं होईपर्यंत माझा म्हनीना ध्यानी कि ती बाई भुत असलं.मला वाटलं पन नाही कि ती बाई म्हनजे कोण भुतं असलं. तेवढ बोलून ती बाई परत समोर जाऊन बसली.त्याक्षणी भावाचा मनात धाकधुक झालं त्याला आधिच भनक लागलेली होती. ज्या वेळेस ती समोर जाऊन बसली की त्या पक्क कळुन चुकलं होतं कि हे दुसच काहीतरी आहे.पन त्यान मला काही बोलला नाही.तेवढ्यात त्याने ट्रॅक्टर चालू केलं अन् नांगर वर ऊचलला अन् पटकन रिव्हर्स गियर टाकून ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन जायला लागला. तो खुप घाबरलेला दिसत होता . मी त्याला विचारलं आर काय झालं राहिलेलं नांगरायचसोडुन ईकड कुठं ? तो म्हणाला तु गप बस ही बाई नाही दुसरच काही तरी दिसतंय एवढ्या रात्री आडराणात एकटी बाई कशाला येईल.त्या वेळेस त्याचे शब्द ऐकून मला पन धसकी बसली मी पन घाबरलो... काही सुचेनासे झाले डोक्यात फक्त एकच विचार ऐत होता मला भुतं दिसलय...आता ते आपल्या ला लागत की काय... खरतर त्या वेळेस एक चुक केली मी ते म्हनतात ना की भुतांचे पाय उलटे असतात मी त्या वेळेस त्या बाईचे पाय बघितले पाहिजे होते पन आम्ही दोघांनी पन फारसं लक्ष नाही दिलं दोघेही घाबरलेले होतो तसंच भावाने कसाबसा ट्रॅक्टर तेथेन लांब आनला आम्ही आमचा गावापासून ४-५किमी लांब होतो. कच्या रस्त्याने भाऊ आदळत आदळत तसाच ट्रॅक्टर पळवत होता.थोड्या वेळाने आम्ही भावाचा ओळखीच्या व्यक्तिचा शेतात पोहोचलो एक वयस्कर तेथे बाज टाकून झोपलेला होता.ट्रॅक्टर चा आवाज ऐकून ते बाबा उठले आणि म्हनले 'कोण आहेत पोरांनौ 'भाऊ म्हनला मी बाळु..! आधी आम्हाला पाणी द्या ..बाबांकड पाण्याणे भरलेला एक हांडा होता. आम्ही पाणी डचा डचा पाणी पिलोत ... दोघांकडे बघत बाबा म्हनले काय झालय..?एवढे का भिलात...त्या वेळेस आमचा सोबत घडलेल्या घटना बदल त्यां बाबाना आम्ही सांगितल... बाबा म्हनले त्या बाईचे बोलन कसं होतं ती बाई कशी होती आम्ही म्हणालो एकदम साधी होती थोडी थोडी हिरवी कलरची साडी घातलेली होती.. आणि ती आम्हाला खुप वेळ बोलली पन, तिने तिच्या बद्दल काहीच नाही सांगितलं.त्यावर बाबांना पन वाटलं की ती एखादी येडी बाई असलं. दुसऱ्या दिवशी गावात पण सांगितले पण कोणालाच आमच्यावर विश्वास नाही आला. उलट घरचाणी आमचं रात्री नांगरणी करायला जायच बंद केलं. खरंतर माझा भाऊ चांगला धडधाकट आहे पण माझा आधी तो घाबरला..त्या वेळेस तरी मी त्याचा सोबत होतो नाहीतर तो नेहमी एकटाच जात असतो नांगरणी करायला कधीच न भिणारा तो.पण त्यावेळस मी त्याचा चेहर्यावर भय पाहिले.
आज पन मला प्रश्न पडतो की ती बाई कोन असलं? अन् ती एवढ्या रात्री आडराणात एकटी कशी फिरत होती?जर आपण ट्रॅक्टर पासून खाली उतरलो असतो तर ?
जाऊद्या काही का असेना तिने आम्हाला काही नुकसान तर नाही पोहचवल. आजही ते सगळं आठल्यावर अंगावर काटा येतो. असो रात गयी बात गयी..!
मित्रांनो माझ्या सोबत घडलेला अनुभव मी माझ्या शब्दात मांडला आहे, पहिल्यांदा च मी एवढं मराठी टायपिंग केलं अपेक्षा आहे की आपणास माझे शब्द समजले असतील.
.
लिखाण-अशोक सुरनर