WITCH
(लघुकथा)
लेखन :- शशांक सुर्वे
(लघुकथा)

सकाळची वेळ होती.....माधवने अक्षरशः खाटकाला लवकर उठवून एक बकरं कापायला लावून मटण खरेदी केलं होतं.....तेच घेऊन एका धुंदीत तो लगबगीने चालला होता त्याचे लक्ष सतत घड्याळाकडे होते.....वेळ झाल्यावर ती भडकते आणि तिचा राग माधवला परवडणारा नव्हता....चालता चालता त्याने शिल्लक राहिलेले पैसे पाकिटात ठेवण्यासाठी पाकीट उगडले आणि त्याची नजर उजव्या कोपऱ्यात गेली....त्या कोपर्याकडे बघून तो प्रचंड संतापला तिथे त्याने लावलेला गणपतीचा फोटो त्याने जवळपास ओढूनच बाहेर काढला आणि टराटरा फाडून फेकून दिला...काही क्षण त्याला प्रचंड राग आला होता...काही महिन्यांपूर्वी माधव गणपतीचा मोठा भक्त होता पण आता परिस्थिती वेगळी होती......वेळ लक्षात घेऊन माधवने बाईकचा स्पीड वाढवला होता त्याच्या मनातली भीती वाढत होती शहराला त्याने मागे टाकले होते आणि एका छोट्या डांबरी रस्त्यावर त्याची बाईक धावत होती....दुतर्फा झाडे,अंधुक धुके ह्यामुळे समोरच स्पष्ट काही दिसत नव्हतं तरी माधवच्या मनात जी धाकधूक होती ती धाकधूक कश्याचीही पर्वा न करता आदेशाचे पालन करण्यास वेगाने सरसावत होती.....शहरापासून आणि मानवी वस्तीपासून दूर असलेल्या दुमजली बंगल्याजवळ तो पोहोचला....त्या बंगल्याजवळ आल्यावर माधवचे मन थोडे स्थिर झाले...गेट जवळ येऊन तो दीर्घ श्वास घेऊ लागला.....आजूबाजूला जरी हिरवळ असली तरी तो बंगला आणि आजूबाजूचा परिसर तसा भकास वाटत होता....झाडांची आणि खुरट्या गवताने सुद्धा आपल्या मर्यादा आखून "तिथं जायचं नाही" अस ठरवलं होतं कदाचित म्हणून तर त्या बंगल्याच्या परिसरात एक गवताचे पाते सुद्धा उगवले नव्हते गेट ढकलून तो आत पोहोचला....वास्तविक ते घर कुण्या सामान्य व्यक्तीच्या राहण्यालायक नव्हतेच.....नकारात्मकतेचे एकत्रित भांडार म्हणजे ते घर होते..पृथ्वीवरचा नरक...ह्या बंगल्याच्या भिंती मानवी देह जसा उन्हात काळा होतो तश्या ह्या बंगल्याच्या भिंती इथली नकारात्मकता ओढून घेऊन काळ्या झाल्या होत्या....भिंतीला भेगा पडल्या होत्या....एक उग्र दर्प त्या घरातून येत होता जणू तो बंगला नसून एखादा कत्तलखाना आहे.....न जानो कसं पण त्या घरात काहीतरी गूढ होतं त्या घराच्या बाजूला एक मोठं पण कडक वाळलेले वडाचे झाड दिवसाही भयानक वाटत होते....एखादा सामान्य माणूस तिथे क्षणभर सुद्धा थांबला नसता इतकं कोंदट वातावरण त्या घराभोवती होतं पण माधव आता त्या बंगल्याचा एक भाग होता त्यामुळे त्याला हे सगळं नवीन नव्हतं एव्हाना तो ह्या भयाण आणि नकारात्मक वातावरणात खुश होता........त्याने घड्याळाकडे बघितले 5 मिनिटे लेट झाला होता हातात ती मटणाची पिशवी घेऊन माधव दार ढकलून बंगल्यात शिरला त्याच बरोबर सगळीकडून चित्कार सुरू झाले पिंजऱ्यातले पोपट,कबुतर,लव्हबर्डस आपल्या पिंजऱ्यात फडफडू लागले.....दरवाज्याच्या बाजूला कुत्र्यांचे जवळपास 10 पट्टे एकत्र एका लोखंडी ग्रीलला बांधले होते.....त्या पट्ट्यात 10 गावठी कुत्री बांधली होती जी अशक्त होऊन निपचित पडली होती.....त्यांना कितीतरी दिवस उपाशी ठेवलं गेलं होतं.....त्यांच्या शरीरात फक्त हाडे दिसत होती आणि जो काही थोडाफार जीव शिल्लक होत्या त्या जिवामुळे त्यांच्या पोटाची हलकीशी हालचाल होत होती......त्यातली दोन तीन कुत्री तर केव्हाच मरून गेली होती बाकीची अन्नपाण्याविना ओरडून ओरडून शेवटच्या घटका मोजत होती.....पक्षांच्या पिंजऱ्यात सुद्धा तीच परिस्थिती होती काही पक्षी पाण्या अभावी मरून गेले होते.....मेलेल्या प्राण्यांचे देह सडत चालले होते प्रचंड दुर्गंधी पसरली होती......आजूबाजूला एक दोन मांजरी सुद्धा मरून सडत चालल्या होत्या....सगळीकडे भयाण असा उग्र दर्प पसरला होता.....सामान्य माणसाला श्वास घेणे सुद्धा मुश्किल झाले असते पण माधव त्या भयानक अश्या हॉल मध्ये एकदम आरामात वावरत होता त्या अमानवी अश्या खोलीच्या वातावरणाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता......तिला ह्या घरात आपली साधना करायला नकारात्मक वातावरण हवं होतं आणि आजूबाजूला त्या प्राण्यांच्या प्रचंड वेदना,किंचाळ्या वातावरणात नकारात्मकता निर्माण करत होत्या.....माधव अश्या त्या हॉल मध्ये उभा होता आत अजून एक हॉल आतल्या बाजूला होता तिथे त्याला जायला मज्जाव होता त्या हॉल ला एक भलंमोठं लाकडी दार आणि एक मोठं कुलूप लावलं होतं.....माधव जवळपास 2 महिने ह्या बंगल्यात राहिला होता पण ह्या दुसऱ्या सिक्रेट हॉल मध्ये यायला त्याला मनाई होती पण त्याने एक दोनदा त्या लाकडी दरवाज्याला कान लावले होते....आतून विविध प्राण्यांच्या बरोबर काही पुरुषी विव्हळण्याचा आवाज सुद्धा स्पष्ट येत होता....आत बरच काही भयानक चालू असायचं....विव्हळण,आगीचे लोट,धूर,विचित्र मंत्रोच्चार अश्या बऱ्याच घटनांचा तो हॉल साक्षीदार असेलही पण आत काय चालू आहे हे विचारायचं धाडस माधवचे कधीच झाले नाही....कारण तो तिच्या वश होता तिचा गुलाम होता.....तिचा प्रत्येक हुकूम तो विनाअट बजावायचा....माधव हॉलच्या बाहेर होता घड्याळाकडे बघत त्याने दरवाजा नॉक केला....आतून एका बकरीचा विव्हळण्याचा आवाज येत होता आणि आत असलेली ती मंत्र म्हणत होती.....अचानक सगळं शांत झालं आणि दरवाजा उघडला गेला......समोर ती उभी होती हातात मोठा कोयता मोकळे केस आणि अंगावर सगळीकडे लागलेलं रक्त.....तिने दुसऱ्या हातात त्या बकरीचे कापलेले शीर पकडले होते....ती पूर्णपणे नग्न होती.....तिचा तो देह गोरापान आणि उठावदार होता अंगावर सगळीकडे रक्त लागून सुद्धा तिचा तो कमनीय बांधा अजूनही आकर्षक वाटत होता.....तिचे निळेशार डोळे खूपच जादुई होते....आणि कुणालाही वश करायला पुरेशे होते.....माधवने तिच्याकडे वरून खाली बघितले आणि स्मितहास्य केले ती काहीतरी चघळत होती माधव ला जवळ ओढून तिने त्याच्या ओठावर आपले ओठ घट्ट टेकवून चुंबन घेतले आपल्या तोंडातील बळीचे रक्त ती माधवच्या तोंडात सोडू लागली तसा माधव तिला मागून पकडून आधाश्या सारखे तिच्या तोंडातील रक्त पिऊ लागला...त्याला जणू ह्या रक्ताळलेल्या चुंबनाची सवयच लागली होती....चुंबन घेतच त्याने तिला डायनिंग टेबलवर आणले आणि समोरच्या प्लेट मध्ये पिशवीतले मटण ओतू लागला....त्या मांसाच्या वासाने तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुलले आणि ते कच्चे मांस ती आधाश्या सारखी खाऊ लागली......माधव सुद्धा तिच्या बाजूला बसून त्या कच्च्या मांसावर ताव मारू लागला....
दोन वर्षांपूर्वी माधव तसा जॉबसाठी ह्या मोठ्या शहरात आला होता.....तो तसा साधा सरळ सिंगल मुलगा.....आईवडील गावी होते आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी ह्या शहरात येऊन मेहनतीने चांगला कमावता झाला होता.....सरळमार्गी आणि गणपतीवर नितांत श्रद्धा असलेला हा मुलगा आपल्या आयुष्यात खूपच खुश होता.....काही दिवसांपासून त्याचे ते दिवस आनंदाचे झाले होते.....फेसबुकवर त्याला प्राची नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.....तशी ती त्याला अनोळखीच पण तिचे सौन्दर्य,निळे डोळे असे होते की सुरवातीला माधवला ती कुणी फेक id च वाटली पण एका व्हिडिओ कॉल नंतर त्याचा सगळा संशय दूर झाला.....प्राची सुद्धा त्याच शहराची होती.....अनपेक्षित मैत्री होती.....संशय घ्यायला खूप वाव होता पण प्राचीच्या निळ्या डोळ्यात अशी काही जादू होती की सगळे तर्क वितर्क माधवच्या डोक्यातून गायब झाले होते.....मेसेज फोन आणि नंतर एक दिवस भेट......कमालीची सुंदर होती प्राची.....कुणालाही मोहित करेल अस तिचं सौन्दर्य होतं......माधव सोबत सुद्धा तेच झालं.....कॉफी शॉप,डिनर सगळं काही चालू होतं.....हातात हात सुद्धा येऊ लागले होते.....एके दिवशी मुव्ही बघून येताना रात्री एका निर्मनुष्य रस्त्यावर प्राचीने माधवला बाईक थांबवायला सांगितली होती. खाली उतरताच....प्राची काहीतरी वेगळं वागत होती ... खाली बघून कसले तरी मंत्र पुटपुटत होती......तिचा नेहमीचा तो मधुर स्वर थोडा विचित्र वाटत होता........तिचे लांब केस विखरून तिच्या तोंडावर आले होते......अनपेक्षित होत हे सगळं...माधव प्रचंड घाबरला होता....ती मानेला झटका देत काहीतरी बडबडत होती.....अचानक ती शांत झाली.....माधव अजून घाबरला......"प्राची.....प्राची.....काय होतंय तुला??" अस बोलून माधवचा हात खांद्यावर पडताच प्राचीने डोळे उघडले तिचे डोळे थोडे हिरवट वाटत होते....ती काहीतरी चघळत होती.....तिने माधव कडे बघितले आणि त्याला आपल्या जवळ खेचून त्याचे एक दीर्घ चुंबन घेतले......आपल्या तोंडातील द्रव ती माधवच्या तोंडात सोडत होती...काही क्षणात माधवचे डोके आणि डोळे जडजड वाटू लागले.....माधव जागेवरच स्तब्ध झाला होता.....रात्रभर तो एकाच जागी डोळे बंद करून उभा होता.....कुणीतरी वाटसरूने हलवल्यानंतर त्याला जाग आली आणि तो घरी आला होता.....त्याला काहीच कळत नव्हते...त्याच डोकं प्रचंड दुखत होतं..डोळ्यासमोर प्राची आणि एक जुनाट काळ्या रंगात रंगवलेला बंगला दिसत होता.....त्याचे डोके सुन्न झाले होते.....कानात कुणीतरी काहीतरी कुजबुजत होते......माधवचे डोके प्रचंड दुखत होते.....त्याचे पाय आपोआप थरथरत होते त्या दिवशी रात्रभर चालून तो ह्या जंगलाजवळच्या बंगल्यासमोर आला होता......दार उघडच होतं तो जसा जसा ह्या बंगल्याजवळ येत होता तसतस त्याची डोकेदुखी कमी होऊन त्याला बर वाटत होतं.....तो आत शिरला तसा आजूबाजूला बघून त्याचे डोळे विस्फारले.....असंख्य गळ्यात पट्टा बांधलेले पाळीव प्राणी,पिंजऱ्यातील पक्षी अनोळखी माणसाला बघून रडत,ओरडत,भुंकत मदत मागत होती काहीजण मरून हाडे होऊन पडली होती.....भयानक उग्र दर्प माधवच्या नाकात गेला तो इथून बाहेर पडण्यासाठी मागे वळला दारात प्राची उभी होती.....माधव कडे बघत तिने स्मितहास्य केले ती काहीतरी चघळत उभी होती....माधव पळायच्या प्रयत्नात होता इतक्यात तिने त्याला पकडले आणि त्याला जवळ ओढून एक दीर्घ चुंबन घेतले......काहीतरी कडवट माधवच्या तोंडात जात होतं......त्याचे डोळे जडजड होत होते.....जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो प्राचीच्या बेडरूममध्ये नग्न झोपला होता.....एखाद्याला वश करून त्याच्याकडून आपली कामे आपली वासना पूर्ण करणारी आधुनिक अस "प्राची" नाव धारण केलेली ही मांत्रिक स्त्री कित्येक वर्षे ह्या जंगलात राहत होती......माधव तिचे कितवे शिकार किंवा गुलाम होता हे तिलाही माहीत नव्हतं.....पण माधव मध्ये असे काय होत काय माहित??प्राचीने त्याला खूप दिवस आपल्या जवळ आपल्या घरात ठेवलं होतं.....नाहीतर काहींना तर ती आपलं काम झाल्यावरच संपवून त्याचं रक्त सैतानाला अर्पण करून ते रक्त पिऊन अजून तरुण होत असे.....रोज रात्री माधव बरोबर संभोग करताना त्याच्या केसातून हात फिरवून ती त्याला नेहमी म्हणायची की
" तू खूप खास आहेस.....तुझ्यामुळे माझं एक मोठं काम पूर्ण होईल"
माधव फक्त तिचा गुलाम बनला होता.....तिच्या आधीन झाला होता.....त्या घरचे भयाण वातावरण आता त्याला प्रसन्न वाटत होतं आणि इथून बाहेरच्या वातावरणात त्याचा जीव गुदमरत होता.....आज महिन्याची तेरा तारीख होती माधव सकाळी उठून प्राचीच्या त्या सिक्रेट रूम जवळ बसला होता.....प्राचीने दार उघडलं....नेहमीप्रमाणे तिच्या हातावर रक्त आणि हातात सुरा होता.....तिच्या दुसऱ्या हातात एक पुस्तक होत.....ती येताच माधव तिच्या समोर मान झुकवून उभा राहिला.....ती त्या जुन्या पुस्तकात काहीतरी शोधत होती....तिचे थोडे लांबलचक रक्ताळलेले बोट त्या पुस्तकाच्या पानांवर फिरत होते....."ठक ठक " असे आपले नख वाजवून ती माधवला म्हणाला
"ससा"
पुस्तकातील सैतानी तिथी प्रमाणे आज प्राचीला ससा बळी देऊन त्याच रक्त प्यायचं होतं.....तसा माधव ताडकन निघाला एक जाळे थोडं प्राण्यांचे खाद्य घेऊन तो जंगलाच्या दिशेने निघाला....."ससा....ससा...ससा" मनात तोच शब्द सतत घोळवत हा गुलाम शिकारी घनदाट जंगलात शिरला होता.....सकाळची दुपार झाली....तरीही हा जंगलातला कॉमन प्राणी माधवला कुठेच दिसत नव्हता.....आपल्या मालकीनीचा हुकूम पुरा करण्यात आपण अयशस्वी होत आहोत ह्या विचाराने माधव प्रचंड अस्वस्थ झाला होता.....रात्र व्हायच्या आत त्याला ससा शोधून प्राचीला द्यायचा होता....6 वाजत आले होते सकाळपासून उपाशी राहून माधव शिकार शोधत होता अंधार पडत चालला होता अखेर रागाची एक जोरदार किंकाळी फोडून माधवने जंगल दणाणून सोडले आणि परत वेग पकडला.....अचानक माधव सावध झाला त्याला समोर त्याला एक ससा दिसला.....त्याच्या डोळ्यात एक चमक आली.....अस्वस्थपणे झपझप पडणारी पावले अचानक सावध झाली आपल्या हातातील जाळे नीट करत तो त्या सशाच्या मागे जाऊ लागला....सश्यासुद्धा चाहूल लागली आणि तो धावू लागला.....माधवची शिकार हातची जात होती माधव त्या सश्याच्या मागे बेभान होऊन धावत होता.....धाप लागत होती....घामाने शरीर भिजल होतं.....त्या जंगलात झाडाझुडुपांतून दगडधोंड्यातून वाट काढत माधव त्या सशाच्या मागे धावत होता.....बेभान झाला होता....त्याच्यात आणि त्या सश्याच्यात फक्त काहीच अंतर होते अंधार पडला होता त्या अंधुक अंधारात तो शुभ्र ससा मात्र उठून दिसत होता....माधवची नजर फक्त त्या शुभ्र सश्यावर होती अखेर त्याने पळतापळताच एक झेप घेतली...सश्याने सुद्धा डाव्या बाजूच्या झाडीत झेप घेतली....माधवचा शेवटचा प्रयत्न वाया गेला त्याचं डोकं एका दगडावर आपटलं होतं......डोक्यातून रक्त वाहत होतं....माधवची शुद्ध हरपली होती.....तो तिथेच बेशुद्ध झाला होता
सकाळचे दवबिंदू पानावरुन तो ज्या दगडावर आपटलं होता त्या दगडावरून ओघळत त्याच्या चेहऱ्यावर येत होते......आजूबाजूचे गवत ओले झाले होते....त्या घनदाट जंगलात एक धुक्याची चादर पसरली होती.....माधव आपलं डोकं धरून उठला....एक बारीक खोच त्याच्या डोक्यात पडली होती.....तिथले रक्त वळले होते.....त्याने आसपास बघितले....."तो इथे कस काय आला ?" हे त्याला पुसट से आठवत होते....त्याचे डोके आधीपेक्षा थोडे हलके वाटत होते.....सगळं विचारचक्र फिरत होत....त्या घरातील सगळे क्रूर प्रसंग त्याला आठवत चालले होते...आपण एका भयानक कृत्यात सहभागी होतो हे त्याला जाणवू लागले.....अचानक त्याची नजर खाली गेली.....त्याचे डोके जिथे ज्या दगडावर आपटलं होतं तो दगड माधवने निरखून पहिला एखाद्या सुंदर शिल्पासारखा तो नक्षीदार दगड होता.....त्या दगडाला पायाचा आकार होता त्यावर त्याचे रक्त लागले होते......बाकीचा सगळा भाग झाडाझुडपात गवतात झाकलेला होता.....माधव लगबगीने तिथली छोटी झाडेझुडपे वेली बाजूला करू लागला....जसजसे ती झुडपे हटत होती एक वेगळीच ऊर्जा माधवच्या अंगात संचारत होती त्याला आता थोडं बर आणि प्रसन्न आतून वाटत होतं.....त्याच्या शरीरातून ती नकारात्मकता,ती काळी शक्ती नष्ट होत होती.....माधवने सगळी झुडपे बाजूला केली.....त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.....माधवने त्याच्यासमोर गुडघे टेकली....तो त्याच्यासमोर हात जोडून हुंदके देत रडत होता.....वाईट शक्तीमुळे जरी माधव त्याच्या पासून दूर गेला असला तरी त्याने आपली ताकत दाखवली होती.....त्याला परत त्या काळ्या शक्तींपासून परत आणले होते......गणपतीचे पुरातन शिल्प होते ते.....त्याच्याच पायावर डोकं आपटून माधव बेशुद्ध झाला होता.....त्याचीच रचना असलेला निसर्गाने त्याच्यावर प्रेमाने अतिक्रमण केले होते....कित्येक वर्षे ती मूर्ती झाडाझुडपात होती.....सगळीकडून वाढलेल्या झाडांमुळे ती मूर्ती सगळीकडून भंगली होती तिचे काही तुकडे खाली पडले होते...त्या दगडी गणेशमूर्तीचे हात झाडाझुडपांच्या वाढीमुळे तुटून वेगळे झाले होते तरी त्या पुरातन मूर्तीच्या चेहऱ्यावरील हजारो वर्षांपूर्वीपासूनचे तेज तसेच्या तसे होते.....त्या मूर्ती समोर माधव कितीतरी वेळ गुढघे टेकून बसला होता त्या मूर्तीकडे बघून तो देहभान हरपला होता.....त्याच्या मनाची चलबिचल शांत झाली होती......एक कमालीची ऊर्जा त्याच्या अंगात संचारली होती
रात्र झाली होती.....ज्या वशिकरणामुळे माधव घनदाट अरण्यात गेला होता तिथून यायला त्याला रात्र झाली होती.....तो प्राचीच्या बंगल्यात आला होता...इथून पळून जाण्याचा विचार त्याच्या मनात आला होता पण प्राचीची अघोरी ताकत माधवला माहिती होती...तिने माधवला सोडले नसते...त्यामुळे काहीतरी टोकाचं ठरवून तो इथे परत आला होता.....आता हॉल मधील त्या विव्हळणार्या प्राण्यांचे निस्तेज देह त्याला अस्वस्थ करत होते सडलेल्या देहातून येणारा उग्र वास माधवला भयानक उग्र वाटत होता......समोर प्राची बसली होती एका मानवी कवटीवर ब्रशने काहीतरी रेखाटण्यात ती व्यस्त होती माधवला बघून तिला प्रचंड राग आला होता पण आपल्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव तसेच ठेवून ती त्याला म्हणाली
"कुठे गेला होतास??....मिळाली का शिकार??"
माधव गप्प उभा होता....प्राचीला त्याचे वागणे विचित्र वाटत होते....त्याचे झुकलेले खांदे आता वर आले होते तो तिच्यासमोर छाती फुगवून नजरेत नजर घालून काहीतरी चघळत उभा होता....माधवच्या अंगातून एक हलकासा धूर येत होता जो फक्त प्राचीला दिसत होता.....प्राचीच्या मंत्र विद्येला हे एक आव्हान वाटत होतं....प्राची माधवच्या जवळ गेली.....माधव ने तिचे डोके पकडले आणि आपले ओठ तिच्या ओठावर टेकवून तिचे चुंबन घेऊ लागला सगळं काही उलट होत होतं..माधवच्या ओठांचा स्पर्श होताच प्राची तळमळु लागली....माधवच्या तोंडातून आलेला हिरवा द्रव प्राचीचे ओठ जाळत चालला होता....प्राची वेदनेने तळमळत होती...तिचा मूळ राक्षसी आवाज दाबून बाहेर येत होता....काय होतं ते???प्राची प्रमाणे माधव सुद्धा काही तंत्र विद्या जाणत होता??....नाही....त्याची श्रद्धा होती गणपतीवर...त्याला जंगलात जी पुरातन गणपतीची मूर्ती दिसली होती....त्याच्या मूर्तीच्या आतून उगवलेल्या त्या मूर्तीला वेढलेल्या झाडांची पाने तो चघळत आला होता....हे काम करेल की नाही हे त्याला माहित नव्हतं....गणपतीच आपलं रक्षण करेल ह्या भावनेने त्याने त्या मूर्तीवर उगवलेल्या झाडांची पाने आणली होती....त्याच मूर्तीच्या पानांमुळे वाईट शक्तीला वेदना होत होत्या.....प्राचीच्या वेदना बघून माधवने तिला घट्ट पकडले होते....प्राची आपल्या नखांनी माधवला ओरबाडत होती....तिची तीक्ष्ण नखे माधवच्या पाठीत रुतत होती माधव वेदनेने अजून जोरात चुंबन घेऊन तिचीच ट्रिक तिच्यावर वापरत होता.....धूर निघत होता प्राचीला सहन झालं नाही आणि तिने सर्व ताकतीने स्वतःला माधवपासून सोडवून घेतलं.....तीच काळं रक्त गळत होत तिने हाताने चाचपून बघितले......माधवच्या तोंडातील हिरव्या द्रवामुळे तिचे राक्षसी ओठ चेहऱ्यापासून वेगळे झाले होते....माधव ने ते चघळुन चावून थुकुन टाकले.....प्राचीच्या तोंडातून अविरत तिचे काळे रक्त वाहत होते.....तिकडे माधवच्या पाठीतून रक्त वाहत होते.....प्राची थरथरत होती.....ती माधवच्या दिशेने झेपावली.....माधव तिचा प्रतिकार करत होता पण तिच्या राक्षसी शक्तीपूढे माधवचा टिकाव लागत नव्हता.....प्राचीने माधवला उचलून बाजूच्या भिंतीवर फेकले.....आपल्या तीक्ष्ण नखांनी ती माधवला ओरबाडू लागली.....प्राचीने एक घाव माधवच्या चेहऱ्यावर केला तसा माधव तीक्ष्ण नखांचे घाव घेऊन तळमळत बाजूला कोसळला....माधवच्या अंगातून रक्त वाहत होते....तो काहीतरी स्तोत्र पठण करत होता.....तिकडे प्राची भयानक संतापली होती.....तिचे ओठाविना विचकलेले दात अजून भयानक वाटत होते.....माधव तळमळत पडला होता.....प्राची रागाने आपल्या सिक्रेट रूम मध्ये गेली तिच्या हातात मोठा कोयता होता.....
"अजून दोन महिन्यानंतर कापणार होते तुला....पण तुला मरायची घाई झालेली दिसतेय "
अस बोलून तिने एक जोरदार वार खाली पडलेल्या माधववर केला.....एक जोराचा "ठननन" असा लोखंडी वस्तू दगडावर आपटण्याचा आवाज झाला....माधवचा दबका आवाज आता चढला होता....त्या वेदनेत सुद्धा त्याचे ते मंत्रोच्चार स्पष्ट होते
नमो गणपतये नमः । प्रमथपतये । नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय ॥ विघ्ननाशिने शिवसुताय ॥ श्री वरदमूर्तये नमः ॥
असे काहीसे अथर्वशीर्ष पूर्ण करून तो उभा राहिला....त्याने प्राचीच्या कोयत्याचा वार ज्याने आडवला होता तो त्याच गणेशमूर्तीचा वरदहस्त देणारा हात होता.....गणपती हा माधवचा आराध्य दैवत होते.....तो आपल्या सोबत आहे ह्या भावनेने माधव मध्ये प्रचंड ऊर्जा संचारली होती.....माधवने प्राचीचा हात झटकला आणि त्या काळ्या पाषाणाच्या हाताचा वार प्राची वर केला.....गणपतीच्यामूर्तीच्या त्या हातामध्ये जी सकारात्मक ऊर्जा होती....ती आग बनून प्राचीच्या नकारात्मक उर्जे वर बरसत होती.....माधवने तिच्या तोंडावर तो दगडी हात मारला तशी ती खाली कोसळली....तिच्या चेहऱ्यातून धूर येऊ लागला....तिने साठवलेली काळी ऊर्जा विघ्नहर्त्याच्या ऊर्जेने बाहेर पडत होती....प्राची खाली कोसळली तसा माधव तिच्यावर चढून त्या दगडी हाताचे वार प्राचीच्या चेहऱ्यावर करू लागला....प्राचीचे काळे रक्त उडू लागले....माधव त्वेषाने तो दगडी हात प्राचीच्या तोंडावर मारत होता प्राचीच्या अंगातून काळाधूर निघत चालला होता तशी प्राची निस्तेज आणि अशक्त होत चालली होती.....माधव रक्तबंबाळ झाला होता तरीही त्याचे वार चालूच होते.....प्राचीच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.....एक तीव्र किंचाळी प्राचीच्या तोंडातून बाहेर निघाली आणि प्राचीच्या शरीराची हालचाल बंद झाली.....माधवच्या तोंडावर,अंगावर प्राचीचे काळेरक्त उडाले होते....तिच्या डोक्याचा झालेला चेंदामेंदा बघून माधवने स्वतःला सावरले.....लडखडत जाऊन त्याने किचन मधला गॅसचा पाईप ओढून बाहेर काढला हॉल मधील प्राण्यांना,पक्षांना मोकळे केले घरात जाऊन सगळीकडे नजर फिरवली.....त्या बंगल्यातील एक एक दृश्य अंगावर शहारे आणणारी होती....प्राचीच्या सिक्रेट खोलीत दोन बिना शिराची मानवी प्रेते बघून माधव प्रचंड शहराला.....गॅस सगळीकडे पसरला होता....माधव मुख्य दाराजवळ आला आणि त्याने काडी पेटवली....ते घर सगळीकडून बंदिस्त होतं त्यामुळे गॅसगळती मुळे एक लहानसा स्फोट झाला तसा माधव बाजूला झाला.....सगळं घर पेट घेत होत आणि माधव बाहेर उभं राहून ते पेटतं घर बघून खुश होत होता....त्याच्या रक्ताळलेल्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं.....(समाप्त)