एडिनबर्ग : Capital of Ghosts
Chapter I : Bagpiper’s Ghost
जगभरात अशी कित्येक ठिकाणे आहेत जी आयुष्यात एकदातरी पाहावीच अशी आपल्यातील अनेकांची ईच्छा असते... कोणाला फ्रान्स... कोणाला स्पेन... कोणाला ग्रीस... कोणाला लंडन… तर कोणाला अजून काही... प्रत्येकाच्या आवडी-निवडीप्रमाणे ठिकाणे वेगवेगळी असू शकतात... पण एखाद्याने जर तुम्हांस म्हटले की मला ‘घोस्ट टूर’ करायची आहे... ऐकण्यास काहीसे विचित्र वाटत असेल ना? पण जगाच्या पाठीवर असे एक शहर आहे, जिथे ही 'घोस्ट टूर' उपलब्ध आहे... त्या शहराचे नाव आहे ‘एडिनबर्ग’.
एडिनबर्ग... युनायटेड किंग्डम (U.K.) च्या ‘स्कॉटलंड' या घटक देशाची राजधानी... या शहरास 'एडिनबरा' असेही म्हटले जाते... स्कॉटलंडची राजधानी म्हणण्यापेक्षा या शहरास 'भूतांची राजधानी' असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही... त्यास एडिनबर्गचा रक्तरंजित इतिहास कारणीभूत आहे... एडिनबर्गच्या इतिहासात बरीच भीषण युद्ध झाली...महामारीने कित्येकांचे प्राण गेले... तर कित्येकजण रहस्यमयीरित्या मृत्युमुखी पडले… इतक्या वर्षांनंतरही या शहरात अशा अनेक जागा आहेत, जिथे या प्रेतात्म्यांचे अस्तित्व आजही जाणवते... येशील घोस्ट टूरमध्ये तुम्हांला यातील अनेक ठिकाणे दाखवण्यात येतात... या टूरविषयी अधिक माहीती आपण पुढील लेखात जाणून घेऊ... पण आज मी तुम्हांला एडिनबर्गच्या बॅगपाईपरच्या भूताबद्दल माहीती देणार आहे…
‘एडिनबर्गचे कॅसल’ हे तेथील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे... हा किल्ला ज्या टेकडीवर आहे तिला ‘कॅसलरॉक’ असे म्हणतात...इतिहासात अनेकदा या किल्ल्यावर हल्ले झाले... बऱ्याचदा तो उध्वस्त झाला आणि बऱ्याचदा पुन्हा बांधला गेला.... या किल्ल्याखाली अनेक गुप्त भुयारांच जंजाळ पसरलेले आहे... जेमतेम रॉयल माईलपासून हॉलीरुड प्लेसपर्यंत हे भुयारी जाळे पसरले होते... पण त्यावेळच्या अधिका-यांना ही भुयार नक्की कुठून कुठवर जातात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती… त्यासाठीच या अधिका-यांनी बॅगपाइप वाजवणाऱ्या एका तरुणाला पकडले व त्यास बॅगपाइप वाजवत त्या भुयारांतून जाण्यास सांगितले...
आदेशानुसार तो तरुण बॅगपाइप वाजवत त्या भुयारांतून मार्गक्रमण करू लागला... वर जमिनीवर असलेले अधिकारी त्या आवाजाचा कानोसा घेत त्या भुयाराचा नकाशा तयार करू लागले… काहीवेळाने अचानक बॅगपाइपचा आवाज येणे बंद झाले... त्याला शोधण्यासाठी बचावपथक धाडण्यात आली... सगळी भुयारे पालशी घातली, परंतु तो तरूण काही सापडलाच नाही... त्याचा मृत्यु झाला म्हणावं तर मृतदेहही सापडला नाही... त्यानंतर या भुयारांना पूर्णतः बंद केले गेले.... पण एडिनबर्ग म्हटल्यावर हे सर्व इथेच संपत नाही…
ज्यावेळेस वाऱ्याची गती कमी असते... पर्यटकांची रेलचेल नसते, त्यावेळेस आजही त्या भुयारांतून बॅगपाइप वाजवण्याचा अस्पष्ट असा आवाज ऐकू येतो…
लेखन : अभिषेक शेलार
माहीती स्रोत : Google
तळटीप : हा लेख Google वर उपलब्ध असलेल्या माहीतीच्या आधारे लिहीण्यात आला आहे…तरी सदर लेखात काही चुका असल्यास क्षमस्व !!