श्री स्वामी समर्थ
या ग्रुप मध्ये मी खूप काही अनुभव वाचलेत मलाही काही अनुभव आले आहेत ते मी तुमच्या सगळ्यां समोर मांडणार आहे. मी पहिल्यांदाच माझा अनुभव लिहीत आहे तरी कृपया काही लिहिण्यात चुकत असेल माफी असावी.
माझे नाव सुशील माने. राहणार पुणे.
मी मेडिकल फील्ड मध्ये काम करतो. हॉस्पिटल मध्ये night shift असते. तर हा अनुभव साधारण ८-९ वर्षापूर्वीचा आहे. मी पुण्या मधल्या एका नामांकित हॉस्पिटल ला जॉब ला होतो. त्या दिवशी माझी night shift होती आमची night shift one week असायची त्या दिवशी मी night shift ला hospital गेलो पण रात्री काय होणार आहे याची काही कल्पना नव्हती. मी आणि माझा सीनिअर असे आम्ही दोघे duty ला होतो सगळी कामे आटोपून थोडा वेळ मिळताच आम्ही झोपलो. झोपल्यानंतर काही वेळानंतर मला विचित्र अनुभव यायला लागला जसे की माझ्या अंगावरच कोणी तरी ओढत आहे, माझा श्वास गुदमरत आहे असं मला जाणवायला लागलं होतं. माझ्या अंगावरच हवेत उडत होतं आणि मी ते ओढून धरलं होतं ओरडण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण काहीच नाही आणि माझे सीनिअर माझ्या जवळच झोपले होते पण त्यांना काहीच जाणवत नव्हतं की माझ्या बाबतीत काय चालू आहे ते. मी खूप घाबरलो होतो पण उठता ही येत नव्हत. शेवटी माझ्या तोंडून अचानक स्वामी समर्थ चा जप चालू झाला. मी स्वामी समर्थ चा भक्त आहे. आणि हळू हळू सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या. मला आज पर्यंत कळले नाही की ते काय होतं. त्या नंतर वाटले की सगळं काही नॉर्मल झालंय पण दुसऱ्या दिवशी मी duty वर गेलो आणि नेहमी प्रमाणे सगळी कामे आटोपून आम्ही झोपलो पण मनात भीती होती की आज काय होणार. त्यासाठी मी आगोदरच स्वामी च दर्शन घेतलं माझ्या मोबाईल screensaver la स्वामी च फोटो आहे. परंतु त्या रात्री जो अनुभव आला तो खूपच भीतीदायक होता. आम्ही झोपलो होतो थोड्या वेळाने मला पुन्हा विचित्र अनुभव आवाज यायला लागले काही कळेना काय होतंय. स्वामी समर्थ चा जप चालू केला थोडी हिम्मत करून स्वामी समर्थ चं तारक मंत्र मी you tube var चालू केलं. पण ती जी अनामिक विचित्र शक्ती होती ती मला बोलवत होती की माझ्याकडे ये हे तुला वाचवू शकत नाही आणि ते भयाण हास्य आमच्या डिपार्टमेंट मध्ये AC च tempreture २२ होतं तरी मी दरदरून घामा घुम झालो होतो काही कळेना ती शक्ती मला ओढत होती मला बोलवत होती शेवटी मनापासून स्वामी ना हाक दिली स्वामी तुम्हीच वाचवा. त्यानंतर थोडा प्रकाश जाणवला आणि त्या भयानक शक्ती चा आवाज नाहीसा झाला आणि सगळं नॉर्मल झालं. आणि हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय याची माझ्या सीनिअर ला जरा सुद्धा कल्पना पण न्हवती. त्यानंतर मी night shift ला गेल्यानंतर पहिलं स्वामी समर्थ च तारक मंत्र लावायचो. त्या नंतर मला असे कधी जाणवलं नाही परंतु अधून मधून कधीतरी रात्रीचे भयानक स्वप्नं पडतात. पण मला आता सवय आहे की झोपण्या आधी आणि झोपुतून उठल्यावर स्वामी समर्थ च दर्शन घेतो.
आज ही हे अनुभव कुणाला सांगताना अंगावर काटा येतो. स्वामी समर्थ ची कृपा म्हणून यातून बाहेर आलो. म्हणून स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ