#झोपडी-(भयकथा) निशा सोनटक्के लिखीत
बालपणी आम्ही ज्या घरात रहात होतो.ते पाच,सहा खोल्यांचे घर होते.पण,सगळ्या खोल्या सलग रेल्वेच्या डब्यांसारख्या
एकापाठोपाठ एक... म्हणजे शेवटच्या खोलीतून सुध्दा बाहेर पर्यंतचे दिसत असे.आम्ही आठ भावंड,आईबाबा, घर गजबजलेले असे. आमच्या घरासमोर मोठे लोखंडी गेट होते.त्या गेटला एक लोखंडी गंजलेली सुरी लोखंडी साखळीत बांधलेली होती. ती का होती याचे कारण मला माहिती नव्हते.पण एकदा
मी आईसमोर त्या सुरीला हात लावला तर आई रागावली
मला मारले सुध्दा...माझ्यावरून उतारा ओवाळून टाकला.
आणि
त्या दिवसापासून मला घरासमोर रात्री एक झोपडी दिसायची
जी घरात कुणालाच दिसली नाही.सगळे मला वेड्यात काढायचे.
तिन्हिसांजेला आम्हाला सगळ्या मुलांना आई आत घेत
असे.तुळशीपुढे, देवापुढे सांजवात लावून आंम्ही शुभंकरोती
रामरक्षा म्हणत असू...आईने आम्हाला सांगितले होते.कधीही
तुमच्या कुणाच्याही नावाने हाक ऐकू आली तर "ओ"बोलू
नका.काळोख पडला की आम्ही सगळी गॅंग माजघरात
घोंगड्यावर बसून रामरक्षा म्हणत असू.मग आमचा अभ्यास
करत असू. आमची आई आमच्यासाठी अगदी गरमागरम पिठले,भाकरी,भात करायची..पण मला मात्र कांदा भाजल्याचा वास येई...तो समोरच्या झोपडीतून... गरम भाकरी,आणि
कांद्याची चटणी ...तो चटणीचा वास मला खूप खूप
आवडायचा..मीकधी आईला बोलले..तर ती मला मारायची.
रात्रीच्या वेळी कुठले वास आले तर बोलू नये....म्हणायची
आज मी शाळेत खूप मस्ती केली होती.शाळेतून तक्रार
आली होती.बाबांनी मला खूप मारले..आणि गेटपाशी
अंगठे धरून उभे केले...ती रात्रीची वेळ होती.मला जेवायला
पण दिलेले नव्हते.मी खूप रडतहोते...मी गेट पाशी लोखंडी
साखळीतील सुरी काढली.आमच्या घराची दारे उघडीच
होती.मला सगळेजण दिसत होते.पण,माझ्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते..मी ती सुरी बाजूला फेकून दिली...आणि
तो कांदाभाजलेला चटणीचा वास... खूप भुक लागलेली.
आणि माझ्याच नावाची हाक..रजनी ए रजनी ये बाळाss
मी हळूहळू चालू लागले...त्या झोपडीत गेले...तिथे खूप
काळोख होता...मीआत ओढले गेले...तिथे एक पांढरेशुभ्र
केस असलेली म्हातारी भाकरी करत होती.तो चटणीचा व
भाकरीचा वास...चुलीमुळे खूप धूर झाला असावा...मला
काहीच दिसेना... संपूर्णपणे काळोखच काळोख मी मागे
फिरू शकत नव्हते...
आता मी चुलीवरभाकरी करते... कुणाचीतरी प्रतीक्षा करतेय.
त्यांना भाकरीचा,चटणीचा वास येऊन माझ्याकडे खेचून
घेत आहे...हो मी वाट पहातेय...
××××××××××××××××××××
रजनीची आई...
सगळयांची जेवणे झाली होती.अहोंनी रजनीला शिक्षा केली
होती. मी बाहेर आले...गेट उघडे होते..त्या लोखंडी साखळीतील सुरी दिसत नव्हती. माझ्या काळजाचा ठोका
चुकला मी घरात येऊन अहोंना सांगितले...त्या रात्री आम्ही
रजनीला खूप शोधले... कुठेही सापडली नाही.पोलिसांत
कंप्लेंट केली....कुठेही सापडली नाही...मी खूप रडतेय..
काही वर्षांपूर्वी मांत्रिक बाबांनी सांगितले होते.समोर एक
म्हातारीची झोपडी होती. तिचा आत्मा तिकडे भरकट आहे.
हाक आलीओ देऊ नका.कसले वास आले तरी लक्ष देऊ
नका.त्यांनी ती सुरीमंत्रुन गेटला बांधली होती.हत्यारे बघून अतृप्त आत्मे त्या भागात फिरकत नाहीत...आताती सुरी
गायब होती आणि मांत्रिकबाबा पणगाव सोडून कुठे गेले
माहिती नाहीत.
आता
मलासमोर एक झोपडी दिसते जी कुणालाही दिसत नाही. तिन्ही साजेला....भाकरीचा,कांद्याच्या चटणीचा वास येतो. आणि" आई "हाक ऐकू येते....
समाप्त
निशा सोनटक्के