सदर घटना साल 2014-15 मधे बांग्लादेश मधे घडली होती.
या गवर्मेन्ट शाळेत जे जूनं टॉयलेट बाथरूम होत त्यात लीकेज,चोकप वगैरे ची काम वारंवार निघत असत त्या मुळे ते बंद करून शाळेच्याच आवारात नव्याने टॉयलेट बाथरूम बांधण्यात आल आणि तेव्हा पासून ह्या रहस्यमयी घटना घडू लागल्या.
आता वापरा साठी हे बाथरूम तयार होत,
सुरवात एक मुलीपासून झाली जी या नवीन बाथरूम मधे गेली पण तिथून आल्या पासून तिची तब्येत अचानक बिघड़ली शेवटी तीला घरी पाठवण्यात आल ती मुलगी कित्येक दिवस आजारीच होती,पण नंतर च्या दिवसा पासून जी मूल मुलीं त्या बाथरूम मधे बाथरूम ला जात त्यांचे दूसऱ्या दिवशी रहस्यमय रित्या मृत्यु होत होते.
शाळा व्यवस्थापन,पोलिस डिपार्टमेंट,आणि प्रशासन ही या प्रकाराने चक्रावून गेल होत.
मुलांच्या अश्या रहस्यमयी मृत्युची कारण क़ाय व हे सर्व एकन्दरीत अचानक होण्यामागच ठोस कारण काही केल्या सापडत नव्हतं.
शेवटी शाळेला टाळ मारण्याची वेळ आली.
ही बाब हळू हळू बांग्लादेश मधे पसरत चालली होती कारण शाळा बंद केल्याने शाळेच्या रेप्यूटेशन वर त्याचा परिणाम होणार होता पण मुलांच्या होत असलेल्या मृत्युमुळे शाळा बंद केल्याशिवाय पर्याय ही नव्हता.
शाळा बंद करण्यात आली पण काही लोकांनी व शाळा व्यवस्थापकानी काही महीने शाळा बंद ठेवल्यावर पुन्हा उघड़ण्याचा निर्णय घेतला परंतु परत मुलांच्या जीवावर काही बेतल तर क़ाय हा एकमेव प्रश्न त्यांच्या पुढे होता काही जणांनी शाळा चालू करायच्या अगोदर काही अमानवीय शक्तिन विषयी जाणकार व्यक्तिला दाखवण्याच ठरवलं आणि काही अधिकृत झाडफ़ूंक करणाऱ्या बंगाली बाबाला त्या शाळेची व त्या जागेची पहाणी करण्यासाठी बोलावल....
त्याने त्याच्या परिने पाहणी केली असता शाळेच्या व्यवस्थापकांना एक प्रश्न विचारला की या नव्याने बांधलेल्या टॉयलेट बाथरूम च्या जागी एक झाड़ होत का??
आणि ते तोडून तुम्ही हे टॉयलेट बाथरुम बांधल असेल तर खूप चूकीच केलेल आहे.
सर्वानि मान्य केल की तिथे एक झाड़ होत पण ते तोडण्याचा व मुलांच्या मृत्युचा क़ाय संभंध.....
तेव्हा त्या बंगाली बाबा ने सांगितले की त्या झाड़ा वर एक चुड़ैल (जखीण )रहात होती,तीच घर म्हणजेच ते झाड़ होत आणि तुम्हीं ते तोडलत आणि वर त्या जागी टॉयलेट बाथरूम बांधलत....
या सर्व प्रकारा मुळे तीचा आत्मा अत्यंत क्रोधित झालेला आहे आणि त्याचा फ़टका मुलांना बसतोय.....
आता पुन्हा ते झाड़ इथे लावू शकत नाही व त्याचा काहीही फायदा होणार नाही अस सांगितले.
पुढे एक अनुष्ठान करून त्या क्रोधित चुड़ैल च्या आत्म्याला शांत करून मुक्ति देण्यात आली शाळेवर आलेल दुष्ट सावट दूर झाल आणि शाळा पुन्हा सुरु करण्यात आली..
पण घड़लेल्या प्रकाराने मुलं मुलीं व शाळा व्यवस्थापक इतके दहशतीत होते की त्या नविन टॉयलेट बाथरूम मधे जायला कोणाची हिम्मत होत नाही.