पिंपळ....
सुंदरबन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण. अस ठिकाण की जे संपूर्ण जगात कुठं नसेल. तिथं चोवीस तास अंधार असतो. इतकं घनदाट ते जंगल जिथं सूर्यप्रकाश देखील पोहचू शकत नव्हता आणि माणूस तर अजिबात च नाही. गेले सव्वीस वर्ष सुंदरबन कोर्टाच्या आदेशामुळे पर्यटकांना कायमचं बंद झाल होतं. पण सुंदरबन खरंच खूप जास्त सुंदर होतं. घनदाट हिरवीगार झाडी आणि दोन डोंगरामधून खळखळ वाहणारी नदी त्याच नदीच पाणी साचून खाली तयार झालेला छोटासा बंधारा. पावसाळ्यात हे ठिकाण आणखी च सुंदर दिसते. इथे जंगली प्राणी पण भरपूर असायचे. लोक पण भरपूर पर्यटनासाठी इथे यायचे आणि जंगलाच्या प्रेमात पडायचे. होत च ते नावाप्रमाणे सुंदर. पण या जंगलाला नजर लागली आणि ही सव्वीस वर्षांपूर्वी हे जंगल न्यायालयाने Restricted Area म्हणून जाहीर केले. तिथे कोणाला जायला परवानगी नव्हती आणि मुळात तिथे कोणी जाऊ च शकत नव्हता कोणाच्यात एवढी हिम्मत नव्हती की कोण तिथं जाऊन परत येऊ शकेल म्हणून.....1994 साली या जंगलात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.....
नमस्कार मी सौरभ घाडगे स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलो आहोत सुंदरबन जंगलाच्या सफरीवर नुकतेच हे जंगल सरकारने पर्यटकांसाठी खुले केले आहे आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत,सौरभ मोबाईलवर च्या selfie camera मध्ये त्याचा नवीन vlog चा व्हिडिओ बनवत होता. सौरभ कोठारे engineering च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थी अभ्यासात पण तसा जेमतेम च होता त्याला फारसे मित्र नव्हते च आणि जे होते ते कामापूरते होते याचा वापर करून झाला की याला सोडून जाणारे. तो आयुष्यात खूप एकटा होता पण खुश होता कारण त्याला फिरायची भयानक आवड होती. महाराजांचे गडकिल्ले फिरणे,आणखी कुठली मंदिरे फिरणं त्याचा माहितीपर व्हिडिओ बनवून social media वर टाकणं हे त्याच सुरू असायचं. तरीपण त्याला कोण खास असा जवळचा मित्र नव्हता. नवलच म्हणावं लागेल ते!!!
तर मंडळी इथं खूप धुकं आहे आणि आणि आपल्याला पन्नास फुटावर च पण नीट दिसत नाहीये. तसा त्या जंगलात जायला लोक तिथल्या गावातला सुंदरवाडी मधला एक गाईड घ्यायचे तसे पण लोक इथं यायला धास्तावायचे, पण ह्या हिरो ला गाईड नको होता. तो एकटाच आला होता आणि त्याला एकट्यालाच फिरायचं होत. तो निघाला मोबाइलला फुल चार्जिंग केलं होतं त्याने फोटो काढत,व्हिडिओ बनवत तो निघाला पुढे जाऊ लागला. त्याच्या चारही बाजूने फक्त धुकं होत आणि हा आला होता गुरुवारी. आठवडी वाराला चुकून पण कोण इकडे फिरकत नसे कशाला कोण येतंय कामधंदा सोडून फिरायला. हा आपला आला निघाला निघाला आणि आता मुख्य जंगल सुरू झालं. त्याने गर्द जंगलात पाऊल ठेवलं पावसाची रिपरिप सुरूच होती. आजूबाजूला धुकं आणि डोंगरावर दिसणारे धबधबे सार काही विलोभनीय दृश्य होत तो ह्या सगळ्या आठवणी आपल्या कॅमेरा मध्ये कैद करत पुढे एकटाच चालला होता सोबती फक्त त्याच्या पाऊस आणि धुकं होतं. आणि मुख्य जंगलात सौरभ आल्यापासून त्याचा पाठलाग करणारा तो......
आरं बबन्या ये हिकडं ई लौकर लौकर,तसा बबन्या पावसात पळत रामाप्पा च्या दिशेने आला. ही पग हित गाडी हाय मजी कोणीतरी एकलच जंगलात गेल्याल असणार, रामाप्पा म्हणाला.लका हुडकाय पायजे त्याला नाहीतर आणखी एक बळी घ्यायचा तो मुंजा,घाबरत घाबरत बबन्या उत्तरला.
आर पर मुंजा तर मारला की कवाचा त्या कुठल्या मांत्रिकान म्हणून तर कोर्टाने आदेश दिला ना की जंगल उघडा म्हणून,रामाप्पा तस म्हणताच बबन्या गप्प बसला...
इकडे सौरभ ची मज्जा चालली होती तो मस्त सेल्फी घेत वातावरणात समरसून गेला होता त्याला कल्पना पण नव्हती की त्याचा पाठलाग सुरू आहे.
हा पण जस जसे तो जास्त घनदाट जंगलात जायला लागला तशी त्याला थंडी वाजायला लागली. थंडी पण साधी नव्हती हाड गोठवणारी थंडी होती ती,अचानक च वातावरणात बदल झाला होता. त्याला आता भीती वाटायला लागली होती आणि त्याला सारख वाटत होतं की आपल्यावर कोणीतरी लक्ष्य ठेऊन आहे. मदतीला आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं फक्त आजूबाजूला होत ते धुकं,पाऊस आणि घनदाट जंगल. मोबाईल मध्ये नेटवर्क नाही कोणाला बोलवावं त्याला काहीच कळत नव्हतं. माघारी फिरावं तर जायचं कुठून आणि कसं धुक्यात काहीच थांगपत्ता लागत नव्हता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता आता त्याला भीती वाटू लागली होती आणि सूक्ष्म जाणीव पण होत होती की कोणीतरी आहे जो आपला पाठलाग करत आहे,कोणीतरी आहे इथं जे आपल्यावर लक्ष्य ठेऊन आहे.....
इकडे रामाप्पा आणि बबन्या ने सरपंचाला सांगितले कोणीतरी जंगलात गेलंय ते...
आर माझ्या कर्मा आता कुंची ब्याद जंगलात मरायला गेली एवढ्या पावसाची, सरपंच चिंताग्रस्त होत म्हणाले.
आर एखादा गावातला माणूस न्यायला काय हुत लोकांना आता तिथं पिपळाला निवदं कोण दावायचं??? आज बी हकनाक एक बळी जाणार आणि जंगल परत येकदा बंद पडणार......
पावसाची रिपरिप सुरूच होती. सौरभ पुढे चालत होती. तो पूर्ण भिजला आणि त्यात हाड गोठवणारी थंडी त्याला सहन होत नव्हती. अचानक त्याला समोर एक दृश्य दिसलं. झाडांच्या दुतर्फा एक रस्ता गेलाय आणि त्या रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक पिंपळाच झाड होत आणि ते झाड अश्या ठिकाणी होत ज्याच्या आजूबाजूला एकपण झाड नव्हतं. तो त्या झाडाच्या दिशेने चालू लागला तो जसजसा जवळ जाऊ लागला तस त्याला ते झाड स्पष्ट दिसू लागलं आणि त्या झाडाखाली बसलेली व्यक्ती सुध्दा.......त्याला तिथे कोणा माणसाला पाहून बर वाटल. तो झपाझप पावले टाकत झाडाच्या दिशेने निघाला आणि त्याला तिथे एक स्त्री दिसली. ती बाई मांडीत डोकं खुपसून रडत होती. तीच ते रडणं भेसूर होत खूप जास्त भेसूर तरी हा हिम्मत करून तिथे गेला आणि त्याने आवाज दिला ताई....अहो ताई....ताई. ती बाई एक नाय दोन नाय ती फक्त रडत होती. मग तो भीतभित हळूच त्या बाई जवळ गेला आणि त्याने हलकेच तिच्या खांद्याला हात लावला ताई...ऐका ना ताई मदत हविये तुमची....
ती अचानक रडायची थांबली आणि तिने मान वरती केली. त्या बाईच तोंड बघून सौरभ ची भीतीने बोबडी वळाली. त्या बाई ला डोळे नव्हतेच डोळ्याच्या जागी काळ्या मिट्ट खोबण्या होत्या,कपाळावरून रक्त पडत होत,केस पिंजारलेले या सगळ्यात एक च गोष्ट चांगली होती ती म्हणजे त्या बाईंची साडी. लाल रंगाची ती साडी होती.
का आलास इथं??? काय पाहिजे तुला????
तिच्या तोंडून त्याच भेसूर आवाजात तिचे हे शब्द ऐकताच तो तिथून वाट दिसेल तिकडे धावत सुटला आणि मागे ही बाई पिंपळाखालून हसत ओरडत होती...
एवढ्या सहजासहजी नाही सोडनार तुला......
२६ वर्षे वाट पाहतेय मी,किती २६ वर्षे,ती जोरात ओरडली....
भाग 2 लवकरचं ( काय घडलं सव्वीस वर्षांपूर्वी)