जळालेली मिल (भाग - ०४)
लेखक - समीर गडेकर
तो दोन्ही हातांनी जोर लावुन ते गेट ऊघडण्याच्या प्रयत्नात लागला. अंगाला घाम फुटल्याने त्याचे हात घसरत होते.
"कुठुन अवदसा सुचली हि? कशाला पैशाच्या मोहात पडलो? साळवेसाहेबांना हि बोनसची गोष्ट आताच कशाला सुचली? जिवापेक्षा पैसा मोठा आहे का?"
पश्चातापाच्या आगीत तो जळत होता. गेटवरती चढुन बाहेर उडी मारायचा त्याचा प्रयत्न ३ वेळा फसला. पाय घसरुन खाली आला. त्याचे सगळे प्रयत्न फसलेत. शेवटि दमुन ऊसासे टाकत तो गेटला पाठ टेकवुन बसणार ईतक्यात पहिल्या दिवशी सारखाच ऐक प्रकाश भपकन त्याच्या डोळ्यापुढे निर्माण झाला. त्याने ऐक हात डोळ्यापुढे धरला. तो म्हातारा विठ्ठलराव पुढ्यात ऊभा होता.
"त. . . . . . . त. . . . . . . .त. . . . . . . तुम्ही दुर व्हा. मला सोडा. मि काय बिघडवलं तुमचं?" रडवेल्या सुरात नारायणच्या तोंडुन शब्द बाहेर पडले.
"घाबरु नका मालक. आम्ही तुमास्नी काय बी नाय करणार"
"पण तुम्ही. . . . . . मला. . . . . . . . . . तुमच्याबद्दल. . . .. . . . . "
"मला माहीती आहे मालक तुम्हाला आमच्याबद्दल समदं कळलयं. ते खरं हाय. पण तुम्ही असे घाबरु नका. मी तुमच्यासंगत किती दिवस होतो पण काय ईजा केली का म्या तुमास्नी? एेक वेळ फक्त मायं म्हणन अायकुन घ्या."
त्या म्हातार्याबद्दलची भिती थोडि कमि होऊन थकलेल्या नारायणने दोन्ही पाय सरळ केले आणि खाली मातितच फतकल घालुन तो बसला.
"बोला विठ्ठलराव. आता न आयकुनहि माझं काय चालणार आहे. ईथं अडकलेला लाचार माणुस मी"
"तसं न्हाय मालक. जोरजबरदस्ती नाय पण ऐक विनंती म्हणुन सांगतो."
"बरं बोला" नारायण थोडा आता रिलैक्स झाला होता."
"मालक ह्या मिलची कथा काहि येगळिच हाय."
"म्हणजे? कशी?"
"हि मिल पेटली नव्हती तर पेटवली होती."
"काय?" नारायणने आ वासला. गेटला टेकवलेली पाठ ताठ करुन तो थोडा पुढे वाकला.
"मी समदं सांगतो मालक. वासुदेव वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या मालकीची हि मिल होती. लई देवमाणुस हो लई देवमाणुस. ह्या मिलमधुन त्याला जास्त नफा होत नव्हता. पण गडीमाणसांचा रोजगार जाईन म्हणुन तो हि मिल चालवत होता. चक्रधर साळवे नावाच्या राक्षसाचा डोळा ह्या जागेवर पडला. ईथे कोम्प्लेक्स काढुन बक्कळ पैसा कमवायचा त्याचा विचार होता. तो मिल विकण्यासाठि वाघमारे साहेबांस्नी बोलला. साहेबांनी स्पष्ट नकार दिला. मग तो साहेबांवर या ना त्या मार्गांनी दबाव आणायला लागला. निस्वार्थीपणाचा जिवंत नमुना वाघमारे साहेब मागे हटत नव्हते. शेवटि चक्रधर सैतानीपणावर उतरला.
१५ जुलैची रात्र होति. रात्रपाळिवर मिलमधे फक्त १४ लोक कामावर होते. जेवण झाल्यावर थोडा वेळ ते पत्ते खेळत बसायचे. मीही कधि कधि मन रमवण्यासाठी तास अर्धातास त्यांच्यात जावुन बसत होतो. त्यादिवशीहि मि त्यांच्यासोबत बसुन पत्त्यांचे डाव बघत होतो. अचानक धुरांचे लोट आतमधे यायला लागले. मिलला आग लागलि होती. लोक सैरावैरा पळायला लागले पण चारिबाजुन आग पेटलि होति. आम्हि खिडक्यांजवळ जमलो होतो. जिवाच्या अकांतान ओरडत होतो. पण त्याच वेळेस काहि लोक हातात तेलाच्या क्याना घेऊन मिल पासुन दुर पळतांना आम्हास्नी दिसले. अन चक्रधर साहेबांची गाडीबी मिलपासुन थोडि दुर ऊभी होति. आम्हाला सगळा डाव समजला होता पण आमच्यातला कुणीच जिवंत वाचला नसल्याने ती गोष्ट गुपितच राहिली.
वाघमारे साहेब तुटुन गेले. होतं नव्हतं ते गेलं होतं. आमचे फाटके संसार, रडणार्या बाया, फुटणार्या बांगड्या, लहान लेकरं, माजलेला आक्रोश सारं सारं पाहुन वाघमारेसाहेब आतमधे हालुन गेले होते. या सार्याला आपणच जबाबदार आहोत. लोकांचे रोजगार गेले असते पण जीव तरि वाचले असते या अपराधि भावनेतुनच वाघमारे साहेबांनी घरातच फाशी घेउन आत्महत्या केली."
सुन्न होऊन तोंडाचा आ वासुन नारायण ऐकत होता.
"वाघमारे साहेबांच्या आत्महत्येनं चक्रधरचा रस्ता आता पुर्णच मोकळा झाला होता. त्याची ओळख वरपर्यंत होती. पैसा होता. माणसं होती. त्यान त्या बळावर हि जागा बळकावली" मान खालि घालुन म्हातारा खिन्न बसला.
थोडा वेळ स्तब्ध असलेल्या म्हातार्याने मान वर केली.
"लई चांगला संसार होता मालक माह्या. पोरं, सुना काळजी घेत होते. नोकरि सोडा म्हणुन सांगत होते पण मी आयकत नव्हतो. रिकामं बसण माह्या अंगी नव्हतं. माहे नातु आबा-आबा करुन माह्या अंगाखांद्यावर खेळत होते. पगार झाल्यावर मी त्यायच्यासाठि भातकं नेत होतं. तेबी धावत येउन मले बिलगत होते. लहान पोराले पोरगी झाली होति. घरात लक्ष्मी आली होति. माह्या सर्व्यात लहान पोरिच लग्न जमलं होतं. तिचे हात पिवळे होतांना मले पाहायचं होतं. पण. . . . . . . . . . . . . . . . . . . सारं संपल मालक. सारं संपलं."
बोलुन तो म्हातारा खालि मान घालुन ढसाढसा रडु लागला.
खिन्न बसलेल्या नारायणच्या मनात पेटलेला भितीचा वणवा आता दया आणि सहानुभूतिच्या वर्षावाने विझला होता. चक्रधर साळवेंबद्दल रोषदेखील त्याच्या मनात निर्माण झाला. ज्या व्यक्तीला आपण देवमाणुस समजत होतो तो ऐवढा मोठा खलनायक असेल हे स्वप्नातही त्याला वाटणे शक्य नव्हते.
"तुम्ही मारला का नाहि मग त्या हरामखोराला?"
नारायण आता पेटुन ऊठला होता.
"तिच अडचण आहे ना मालक. आमची सिमा फक्त या मिलपुरतिच आहे. या जागेतुन बाहेर आम्ही जाऊ शकत नाहि. तो स्वत: ईथे आला तरच आम्ही त्याचा फडशा पाडु शकतो"
"पण तो ईथं कसा येणार?" नारायण बोलला.
"तेच काम तुमास्नी करायचं आहे. मालक"
"म्हणजे?"
"तुम्ही काहितरि युक्ति करा. काहितरि गेम खेळुन त्याला फक्त या गेटच्या आत आणा."
"हम्म्म्मंम. ते आता तुम्ही माझ्यावर सोडा विठ्ठलराव पण मि विचार करतोय की मी गरिब माणुस. मी जर यात फसलो तर माझ्या संसाराच वाटोळ होईल. संसार ऊघड्यावर येईल माझा"
"तुम्ही कायबी काळजी करु नका मालक. तुमचं सगळं बरोबर होईल. सगळं ठिक होईल. कायबी काळजी करु नका. फकस्त ऐवढं काम करा. हात जोडुन विनंती हाय".
"ठिक आहे. आता बाकि जबाबदारि माझी. पण आतातरि मला जाऊ द्याल की नाहि?"
त्या बरोबर ते गेट आपोआप ऊघडले आणि तो जायला निघाला. २ पावलं ऊचलुन मधेच थांबला.
"पण बाबा तुम्ही त्यादिवशी झाडावर बसला होता. बाजुला झोपुन हसत होता. किती घाबरलो होतो मी."
"माफ करा मालक पण तुमची परिस्थिती पाहुन मला हसु आवरलं नाहि आणि आम्हा लोकांची जागा कधि झाडावर तर कधि छपरावर. आम्ही फकस्त फिरत राहतो. आमचा ऐक ठिकाणा नाहि आता."
म्हातार्याचा निरोप घेऊन नारायण निघाला. त्याचा डोक्यात ऐक वेगळाच बेत आता शिजत होता.
क्रमश: