जळालेली मिल (भाग - ०३)
लेखक - समीर गडेकरसकाळी नारायण शुध्दीवर आला तेंव्हा ५ वाजले होते. त्याने बाजुला पाहिले. म्हातारा नव्हता. त्याची खाटहि नव्हती. डोकं गरगरायला लागलं. कुठलहि सामान सोबत न घेता त्याने गेटबाहेर धाव घेतली. सायकल काढलि. पायडल मारुन पाय टाकला. थोडि पुढे जात नाहि तर चेन पडलि. तो रागाने भडकला. चेन बसवायला खालि ऊतरला. तो सैरभैर झाला होता. हात थरथरत असल्याने चेन बसत नव्हती. शेवटि दोन हातांनी धरुन तो सायकल लोटत पळत निघाला. कुणितरि सायकल मागुन ओढत असल्यासारखं वाटत होतं. पुर्ण ताकद तो पणाला लावत होता. शेवटि कसाबसा तो मुख्य रस्त्यावर आला. तो ऐवढा थकला होता कि सायकल सोडुन रस्त्याशेजारिल दगडावर बसला. सायकल खडकन खाली आदळली. तो ऊसासे टाकत बसला. बराच वेळ बसल्यानंतर तो शेवटि घराकडे निघुन गेला.
दुसर्यादिवशी तापाने फणफणलेला नारायण कामावर गेला नाहि. त्या धक्क्यातुन सावरायला त्याला ३ दिवस लागले. आता तो दिवसभर विचारात मग्न राहत होता. काय करावे ते सुचेना. "कामावर का जात नाहि हे?" हे घरचे विचारयचे. त्यांना तोंड देतांना त्याला चिड येत होती. काम सोडणे अनिवार्य होते. पण काम केलेल्या दिवसांचा पगार तरि घ्यावा. तेवढाचं संसाराला आधार म्हणुन त्यांने मालकाची म्हणजेच चक्रधर साळवेंची भेट घ्यायचे ठरविले.
. . . . . . . . . .
शनिवारि सकाळि १०.०० वाजताची वेळ. नारायण साळवे साहेबांच्या साईटवरिल ऐका तात्पुरत्या स्वरुपाच्या चौकोनी छोटेखानी ओफिसमधे बसला होता.
"बोल नारायण. असा ऐकदम अचानक कसा काय प्रगटलास आज? कशी चालु आहे डयुटि?"
"अं. . . . . . . .ते थोडे पैसे पाहिजे होते. बायकोची तब्येत बरि नाहि".
"अरे पण महिना भरायला अजुन १५ दिवस बाकि आहेत"
"हो म्हणुनतर मधेच भेटायला आलो ना? बघा काहि थोडि रक्कम. . . . . "
"अरे मि चेकबुक, कैश आज काहिच सोबत आणलं नाहि. तुला महिना भरला कि पगार आणि दिवाळिचा बोनस सोबतच देईन. आता मला थोड काम आहे. ठिक आहे? भेटुया नंतर".
नारायणचा नाईलाज झाला. जड पावलांनी ऊठुन तो दाराकडे जात असतांनाच त्याला काहितरि आठवलं. तो वळला आणि. . . .
"पण साहेब ऐक विचारायच होतं."
"बोल" बुकं चाळत असलेल्या साळवे साहेबांनी मान वर करत विचारलं. आणि पुन्हा नजर खाली नेऊन बुक चाळायले लागले.
"मला राखणदार नेमल्यानंतरहि त्या म्हातार्या विठ्ठलरावला तुम्ही तिथे कशाला नेमलयं?"
"कोण विठ्ठलराव?" विचारुन लगेच बाजुल्या बसलेल्या कारकुणाशी बोलण्यात साळवे साहेब व्यस्त झाले.
आता खरि गोम नारायणला कळली होति. तो पटकन बाहेर आला. घराकडे निघाला. काहि पावलं चालताचं त्याला मागुन आवाज आला….
"वो साहेब"
नारायणने वळुन बघितले.
ऐक खुर्ची टाकुन बसलेला त्या साईटचा चौकिदार त्याला आवाज देत होता. नारायण त्याच्याकडे गेला.
"कोण विठ्ठलराव बोलत होते साहेब तुम्ही. साहेबांना सांगत होते तेंव्हा मि ऐकत होतो."
"तो जुन्या मिलवरचा म्हातारा चौकिदार"
ते ऐकुन तो व्यक्ति खदाखदा हसायला लागला.
"२ वर्षांपुर्वी ती मिल जळाली तेंव्हा त्या आगित तोहि मरण पावला. दिसला का तुम्हाला?" आणि तो पुन्हा हसायला लागला.
नारायण बधिर डोक्याने घरि परतला. आता ऐक यक्षप्रश्न त्याच्यापुढे ठाण मांडुन बसला होता. नोकरि सोडलि तर पैसा जाणार. केली तर पगार आणि बोनस दोन्ही मिळणार पण पुन्हा त्या जळालेल्या लोकांच्या हाति पडलो तर जिवंत सुटणार नाहि. काय करायचं? फाटक्या संसाराला पैशाची गरजपण आहे. दुसरि नोकरिहि लवकर मिळणार नाहि. तो विचाराने सुन्न झाला.
रात्रि अंगणात खाटेवर अंग टाकुन पडला असता त्याच्या डोक्यात ऐक विचार आला.
"तसंहि कुणि मिलकडे फिरकत नाहि. आपण गेलो काय अाणि नाहि गेलो काय कुणाला कळणार नाहि. महिना भरला कि सरळ पगार घेऊन यायचा. मग थातुर मातुर कारण सांगुन नोकरि सोडायची."
थोडं हायसं वाटुन त्याने कड फेरला. दोन दिवस आरामात काढुन तिसर्या दिवशी सकाळि मात्र त्याला फोन आला. रात्री मिलवरती दुसर्या साईटवरुन काहि सामान शिफ्ट होणार होतं. त्यामुळे ते लोक येतिल तेंव्हा त्याला तिथे हजर राहणे अनिवार्य होते.
हम्म्म्म्म. डोकं गरगरायला लागलं. आता आभाळ फाटलं होतं. कितीहि पळायचा प्रयत्न केला तरि नियती पाठ सोडायला तयार नव्हती. हतबल होऊन त्याने रागाने हात भिंतीवर आपटला. त्याची बायको संशयित मुद्रेने त्याच्याकडे बघत होती.
. . . . . . . . . .
मंगळवारि नारायण मिलवर पोहचला पण मिलपासुन थोड्या दुर अंतरावर थांबुन तो ट्रकची वाट पाहत बसला. तिन तास गेले. अंधार गर्द व्हायला लागला. भितीने हळुहळु त्याच्या मनात जागा घ्यायला सुरुवात केलि. त्याने मन मजबुत केले. ऐखादि जळलेलि आक्रुति आपल्या मागे ऊभी असेल का असा संशय येउन तो मधे मधे मागे तर कधि आजबाजुला पाहत होता. तेवढ्यात त्याला दुरुन ट्रक येतांना दिसला.
त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्यापुढुन ट्रक पुढे निघुन गेला. तो ट्रकमागुन सायकल दामटत निघाला.
ट्रकमधुन ऐक जाडजुड भैय्या खालि ऊतरत होता.
नारायण सायकलला कुलुप घालत होता. नारयणकडे पाहुन तो भेय्या बोलला. . .
"अरे किधर गये थे चौकिदार?"
अचानक प्रश्नाने नारायण भाबांवला.
"वो. . . . .मै. . . . . . .मुतनेको गया था"
भैय्याने आ वासला.
"मुतनेको? वो भी सैकल लेके? ईतना सारा जगह तो है यहा पे"
नारायणाला थोडा गांगरला. त्याने लगेच विषय बदलवला.
"वो छोडो ना. ये सामान रखनेका है ना?" वो बाजु सब सामान है. ऊधरहि सब रख दो."
भैय्या आपल्या लोकांना घेऊन सामान ऊतरवायच्या कामात लागला. नारायणची नजर ईमारतीवर भिरभिरं फिरत होति. बाल्कनीकडे जात होती. सामान ठेवायची जागा आत असल्याने तो आता बराच आतमधे येऊन ऊभा होता.
काम आटोपल्यावर भैय्याने पोचपावतीवर नारायणची सहि घेऊन तो ट्रककडे निघाला. चालता चालता मधेच थांबुन तो नारायणकडे परत आला.
"वैसे ईतनी सुनसान जगह मे रात गये डर नहि लगता आपको?" भैय्याने विचारले.
आधिच डोक्यात पेटलेल्या भयाच्या अग्निकुंडात भैय्याच्या प्रश्नाने राळ टाकली.
"वो. . . . .नहि. . . . . . . .अब आदत हो गयी है ना. ."
भैय्या हसला नी निघुन गेला.
ट्रक जाईपर्यत नारायण ऐक ऐक घटका मोजत होता. रुदयाचे ठोके पडत होते. ट्रक निघुन गेल्यावर तो घरि निघणार होता. ट्रक नजरेआड झाला आणि नारायणाच्या पावलांनी वेग पकडला. चालतांना त्याची नजर म्हातार्याच्या खोलिकडे गेलि. तिथे बराचसा कचरा आणि पालापाचोळा पडलेला होता. बर्याच वर्षापासुन ती भग्नावस्थेत असलेली दिसत होती. ईथेच आपण काहि दिवसांपुर्वी रात्री झोपलो होतो हे आठवुन त्याच्या अंगावर काटा आला. तो झपाझपा चालत गेटकडे निघाला. आणि. . . . . . .
गेटजवळ पोहचताच ते गेट खाडकन आवाज करत आपोआप बंद झालं. . . . .
क्रमश: