जळालेली मिल (अंतिम भाग)
लेखक - समीर गडेकर
सकाळी ११.०० वाजताची वेळ. नारायण साळवेसाहेबांच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या पुढ्यात बसलेला. साहेब मान खालि घालुन टेबलावरिल काहि फाईल्स चाळत बसलेले. ऐक क्षण त्यांनी मान वरुन करुन नारायणकडे ऐक धावता कटाक्ष टाकला. आणि लगेच बोलले.
"हा नारायण कसा आहेस? अरे मि बोललो ना महिना भरल्यावर पुर्ण पगार मिळेल."
"तसं नाहि साहेब. आज जरा दुसरं काम होतं"
"बोल"
"माझी मावस बहिण आलेली आहे माझ्याकडे. हुशार आहे पण शिक्षण पुढे चालु ठेवण्याची परिस्थिती नाहि घरच्यांची. मग मीच बोललो की साळवे साहेबांशी बोलुन ऐखादा जोब मिळवुन देतो."
आतापर्यंत कामात गढुन गेलेल्या चक्रधरने सटकन मान वर केली. हातातिल फाईल सपशेल बाजुला ठेवुन ते महत्वाची डिल चालु असल्याप्रमाणे ते नारायणकडे पहायला लागले.
"अरे मग सोबत नाहि का आणायच?"
"नाहि आई तीला जास्त बाहेर पडु देत नाहि. दिसायला सुंदर आहे ती म्हणुन जरा जास्तच जपते आई तिला."
आता साळवेचा ईंटरेस्ट अधिकच वाढला.
"मग भेटच झालि नाहि तर काम द्यायचं तरि कसं?"
"हो ते आहेच. आई तर घरि सुद्धा कुणाला येऊ देत नाहि." बोलतांना खिशातुन ऐक सुंदर तरुणीचा फोटो काढुन त्याने साहेबांना दाखवला.
फोटो बघुन लांडग्याच्या तोंडुन लाळ टपकायला लागली. बराच वेळ फोटो निरखत असलेला साळवे भाळला होता.
"नारायण माझ्याकडे जोब आहे. पण तुझ्या आईच्या अशा स्वभावाने ती ऐक चांगली संधि गमवुन बसेल."
"पण माझ्याकडे ऐक आयडिया आहे." नारायण बोलला.
"घरात तिला करमेनासं झालय. म्हणुन काल मी ऐका मित्राची स्कुटि तिच्यासाठि अरेंज केली. मि माझी सायकल घेऊन आम्ही दोघं तीला थोडं फ्रेश वाटावं म्हणुन मिलवर गेलो होतो. मिलवर कुणी परका माणुस येत नाहि म्हणुन आईनेही सम्मती दिली. बर्याच गप्पा झाल्या आमच्या. तिलाहि त्या मोकळ्या जागेत थोडं बरं वाटलं. मग थोड्यावेळाने स्कुटि घेवुन ती घरि निघुन गेली. तुम्ही तिकडे येऊ शकत असाल तर आजहि घेऊन येतो तिला."
"हो. हो. का नाहि? माझीही मिलवरती चक्कर झाली बरेच दिवस. जायचंच होत मला तिथे. दोन्हीही काम सोबत होतिल. मी पोहचतो तिथे"
साहेबांची रजा घेऊन नारायण निघाला. बाहेर येऊन दिर्घ सुस्कारा सोडला. काम झाले होते.
. . . . . . . . . . . . . . .
संध्याकाळी नारायण मिलच्या गेटवरचं थांबला. साळवे आज नक्की येणार याची त्याला खात्री होति. काहि वेळ ताटकळल्यानंतर दुरुन ऐक गाडि येतांना त्याच्या नजरेस पडली. थोडं हायसं वाटल पण ऐक भितीहि त्याच्या मनात अचानक निर्माण झाली. ऐनवेळेवर जर हे लोक नाहि आलेत तर आपण तोंडावर पडणार. साळवेसाहेबांना कुणाशी भेटवणार? नोकरि जाईल. पागारहि जाईल. साळवे सुड घेईल तो वेगळाच. त्याचं रुदय धडधडायला लागलं. त्या कल्पनेनेच त्याच्या कपाळावर घामाचे काहि थेंब जमा झाले. तो विचारात मग्न असतांनाच समोर ऊभ्या असलेल्या गाडिने होर्न दिला. नारायण खाडकन जागा झाला. साळवेसाहेब हसत होते. चक्रधरने "या साहेब" म्हणत आतला रस्ता धरला. गप्पा मारत दोघं निघाले. मुख्यद्वाराकडे जात असतांना नारायण आतमधुन घाबरलेला होता. धुकधुक वाढली होती तर साळवे मात्र नारायणच्या बहिणीविषयी विविध गोष्टी विचारत होता. अचानक मागुन कुणीतरी चालत असल्याची चाहुल नारायणला लागली. त्याने हलकेच मागे वळुन बघितले. म्हातारा विठ्ठलराव हातात कंदिल घेऊन मागे हजर झाला होता. त्याने तोंडावर बोट ठेवुन शु करुन गप्प रहायला नारायणला खुणावले. नारायणच्या जिवात जिव आला. सुटकेचा नि:श्वास त्याने सोडला. बोलत बोलत दोघं मुख्यद्वाराजवळ पोहचले. आतमधे पाय टाकणार तेवढ्यात म्हातार्याने धाडकन ऐक लाथ साळवेच्या मागुन घातली तसा साळवे खाली पडुन बराच आतपर्यंत घासत गेला. क्षणाचाहि विलंब न करता नारायण गेटच्या दिशेने पळत सुटला. गेटजवळ येऊन दम टाकत तिथेच ऐका दगडावर बसला.
ईकडे आतमधे साळवे जमिनीवर पडुन सैरभैर होऊन चोहोबाजुला नजर फिरवत असतांनाच मुख्यदारावर २ काळ्या आक्रुत्या त्याची वाट अडवुन ऊभ्या होत्या. दात काढुन हसत होत्या. साळवे ती भयानक रुपं बघुन चांगलाच भेदरला. त्याच्या अंगाच पाणी पाणी झालं. पण जोर लावुन जागेवरुन ऊठुन तो त्याच्या उजव्या बाजुला पळत सुटला. पाय डगमगत होते. पळत पळत अगदि शेवटच्या खोलित घुसुन त्याने दार लावुन घेतले जोरजोरात श्वास टाकत पाठ दरवाजाला टेकवुन आता तो ऊभा होता. तेवढ्यात त्याने पुढे बघितले. ऐक जळालेली व्यक्ती कोंट्यात गुडघ्यात तोंड घालुन बसली होति. त्याच्या पायाखालची जमिन सरकली. तो दार ऊघडायला गेला पण दार आता पक्के बंद झाले होते. पुर्ण जोर लावुन तो दार ओढत असतांना ती कोंट्यात बसलेली आक्रुति जोरजोराने हसत होति. अखेर तो दरवाजा ऊघडला. घामाच्या धारांमधे न्हाऊन निघालेला साळवे जिवाच्या आकांताने बाहेर पळाला थोडा पुढे जाताच त्याच्या पायांना कचकन ब्रेक लागला. थोडं दुर पुढे दुसर्या दोन काळ्या आक्रुत्या खाली मान घालुन ऊभ्या होत्या. कैचित सापडलेला साळवे मधेच थरथरत भिंतीला पाठ टेकवुन ऊभा राहिला. अचानक त्या पुढिल दोन आक्रुत्या नाहिश्या झाल्या. साळवे फट्दिशी सरळ पळत जाऊन पायर्या चढायला लागला. बाल्कनित जाऊन, हात कठड्यावर टेकवुन ऊसासे टाकायला लागला. तेवढ्यात आपण वरति उचलले जात आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो हातपाय झाडायला लागला. जवळ जवळ वाचा गेली होती. ऐका काळ्या आक्रुतिने त्याची कोलर धरुन वर ऊचलले आणि खालि सोडले. जमिनीवर आदळलेल्या चक्रधरचे ढोपरं फुटलित. तोंडाला मारही लागला. ऊठुन गेटकडे पळण्यासाठि तो निघाला तितक्यात त्याचा डावा पाय मागुन कुणीतरी ओढुन साळवेला घासत तो आतमधे घेऊन निघाला. तो पुन्हा आतमधल्या मोकळ्या जागेत फेकला गेला. आता मात्र खेळ संपला होता. साळवेचं अंगातील त्राण संपलं होतं. भितीने गलितगात्र होऊन तो आता गुडघ्यावंर ऊभा होऊन दोन्ही हात जोडत होता. ते जळालेले लोक मात्र दात काढुन हसत होते. साळवेची केविलवाणी अवस्था पाहुन खिदळत होते. आणि अचानक ते लोक दोन भागात विभागले गेले. मधे ऐक वाट निर्माण झाली आणि प्रमुख पाहुण्यांच आगमन व्हावं त्याप्रमाणे म्हातारा विठ्ठलराव हातात कंदिल घेउन पुढे आला. त्याने ऐकवार सर्वांकडे पाहिले. बोडख्या चेहर्यावर ऐक समाधान दिसत होते. हातातिल कंदिल साळवेच्या अंगावरती फेकला तसा ऐक भडका उठुन साळवेने पेट घेतला. आता आगीत जळत होता. धगधगत होता. ओरडत होता.
ईकडे गेटवरती थांबलेला नारायण काम फत्ते झाल्यावर विठ्ठलराव भेटायला येईल, खुप खुप आभार मानणार या अपेक्षेत ताटकळत बसला होता. पण आतमधला कोलाहल थांबुनहि अजुन कुणी बाहेर आलं नाहि. तेवढ्यात त्याची नजर मिलच्या टोकाकडे वेधल्या गेली. १५ ठिकाणाहुन ऐक काळ्या रंगाचा धुर आकाशाकडे झेपावला. सर्वांना आता मुक्ति मिळाली होती.
शेवटि आभारसुद्धा मानले नाहित म्हणुन हताश झालेला नारायण सायकल ढकलत निराश मनाने जमिन न्याहाळत आता घराकडे निघाला. तो सुन्न झाला होता. उद्या पोलिस चौकशित आपण घटनेवेळी ईथेच होतो हे कळलं तर काय होईल? याची चिंता त्याला खात होती. काम केल्या दिवसांचा पगारहि आता मिळणार नाहि. नविन काम मिळेपर्यंत गाठि बांधलेला पैसा खर्च होउन परिस्थिती आ वासणार. तो आता ऐकटा पडला होता.
त्याच मन भरकटलेल्या होडिप्रमाणे सैरभैर झालं होत.
अचानक त्याच्या सायकलला काहतरि धडकलं. सायकलला धडकुन ऐक गोल मडकं रस्त्याच्या बाजुला गेलं. त्याने दुर्लक्ष केलं. पुन्हा विचारांच्या डोहात बुडाला. थोडा वेळ जाते न जाते तोच पुन्हा तेच मडकं त्याच्या सायकलला धडकलं. आता मात्र त्याने प्रकार विचित्र दिसतोय म्हणुन तिकडे निरखुन पाहिलं. आता त्या मडक्यातुन ऐक चकाकती वस्तु बाहेर पडली होती. तो जवळ गेला. त्या मडक्यात बरिचशी सोन्याची नाणी होती. नारायणचे डोळे दिपले. त्याने आजुबाजुला बघितले. डब्यासाठि आणलेल्या कापडि पिशवीत ती नाणी भरली. आणि सायकलवर पाय टाकुन त्याने सायकल घराकडे दामटली. आता त्याच्या डोळ्यापुढे विठ्ठलरावचा चेहरा येऊन त्याचं वाक्य आठवलं.
"तुमचं सगळं ठिक होईल मालक"
. . . . . . . . . . . .
दुसर्यादिवशी पहाटेच पुर्ण परिवारासहित गाव सोडले. कुठे गेला हे त्याने कुणालाच कळु दिले नाहि. साळवे म्रुत्यु फाईलहि जास्त काहि हाती न लागल्याने लवकरच बंद झाली. नारायणने आपला ऐक छोटा व्यवसाय सुरु केला. मुलांना चांगल्या शाळेत घातले. आईला चांगल्या डोक्टरची औषध सुरु केली. घरात सगळ्या वस्तु आल्याने बायकोहि खुश होती. नारायणच्या संसाराला आता सुगीचे दिवस आले होते. पण. . . . . . .
तिकडे मिलच्या मध्यभागी साळवेचा देह जळुन ऊरलेल्या राखीतुन ऐक आक्रुती उठुन बसली. अगदि तशीच. डोक्यावर केस नाहि, डोळ्यांच्या खोबणी, काळं ठिक्कर पडलेलं शरिर.काहि ठिकाणी मांस लोंबकळत आहे. अगदि भयाण रुप. जिवंतपणी त्याने या मिलवर ताबा मिळवला होता. आता मेल्यानंतरहि त्या संपूर्ण मिलवर त्याचा ऐकट्याचाच ताबा होता. ति आक्रुती संपूर्ण मिलभर फिरत होती.
पुढे काय होईल त्या मिलचं?
समाप्त