वारसदार भाग @ १०
जोशी गुरुजींनी मोहिते साहेबांना नमस्कार करून घराच्या आत प्रवेश केला. उंबरठा ओलंडताच त्यांच्या अंगावर सरसरून शहारा आला. अर्थात त्यांना त्याची चाहूल लागली त्यांनी प्रियाचा हात धरला..गुरुजी या इथे बसा, मोहिते म्हणाले... नाही आधी मला तुमचं पूर्ण घर दाखवा, मला तुमचं घर बघायचं आहे, त्यानंतर आपण बोलू...तिक्ष्ण आवाजात गुरुजी म्हणाले. ठीक आहे बोलत मोहित पुढे चालू लागले व गुरुजींना सोबत घेऊन त्यांनी पूर्ण घर दाखवलं... आता सगळे हॉल मध्ये बसले होते... हॉलच्या एका कोपऱ्यात सुरेखा बेडवर भिंतीकडे तोंड करून झोपली होती...
गुरुजींनी सुनील ला सांगितले, बाळा...! तिला झोपेतून उठव... अरे...सुरेखा..! आता तर तुला मी गोळ्या दिल्या आणि तु लगेच कशी झोपलीस, सुनीलची आई बोलली... सुनील ने तिला, दीदी उठ, बघ प्रियाचे बाबा आलेत तुला भेटायला...! दोन - तीन वेळा तिला हलवल्यानंतर ती उठली... गुरुजींची नजर तिच्यावर खिळली होती...
सुरेखा अगदी शांत आणि नॉर्मल वाटत होती, जस की तिच्यासोबत काहीच झालं नाही... पण ती चवताळलेल्या नजरेने गुरुजींकडे पाहत होती... गुरुजींनी तिची नजर हेरली... कशी आहेस बेटा ...! मी जोशी, प्रियाचा बाबा, गुरुजी म्हणाले.. पण त्यांच्या प्रश्नांवर तीच काहीच उत्तर आलं नाही...
गुरुजी तिच्याकडे अगदी रोखून पाहू लागले, सुरेखा पण त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहू लागली... गुरूजींनी आपल्या पिशवीतून एक पुडी बाहेर काढली आणि त्यातला अंगारा सुरेखाचा कपाळावर लावला…अंगारा लावताच क्षणी सुरेखा जोरात किंचाळली, आआआआआ... तिची किंकाळी एवढी जोरदार होती की संपूर्ण सोसायटीमध्ये तिचा आवाज घुमला, लहान मुलं घाबरून घरात लपली...
सुरेखाच्या तोंडून तो गुरगुरला, काय रे थेरड्या..! आaaa.. तुला समजवलं होत, काल रात्री तुझ्या घरी येऊन, तरी सुद्धा तु इथे आलास... मरायला...! काल वाचलास पण आज कसा वाचशील..! हहहाआआ
अरे चांडाळा ...! कोण आहेस तू ? बोल आणि का धरून ठेवलं आहेस ह्या पोरीला, काय बिघडवलं आहे तुझं तिने...? गुरुजी रागाने त्याच्यावर ओरडले... पण तो काही सांगत नव्हता चुपचाप मान खाली घालुन गुरुजींकडे पाहून त्यांना खिजवत होता...
बोलतोस का आता ? की टाकू तुझ्यावर हे पवित्र जल …! अस म्हणत गुरुजींनी उजव्या हाताच्या मुठीमध्ये त्यांनी आणलेल्या बॉटल मधील थोडं पाणी घेऊन काहीतरी मंत्र पुटपुटत त्याच्या दिशेने शिंपडले.. पाणी अंगावर पडताच सुरेखाच्या तोंडून तो सैतान किंचाळला, हे थेरड्या...! काय करतोय तु हे..? आआaa.... सैतान त्या पवित्र पाण्यामुळे चांगलाच तडफडला...
गुरुजींनी पुन्हा त्याला विचारले, बोल कोण आहेस तू..? नाही सांगणार आणि हिला घेऊन पण जाणार, माझं कोणी काहिच करू शकत नाही....! हेहेहेहीहीहीही करत त्या सैतानाने सुरेखाच्या शरीराला जमिनीवर फेकलं, पुन्हा हवेत उचलून भिंतीवर आपटलं... आई ग....! आई , वेदनेने विव्हळतं सुरेखा रडू लागली, सुरेखाच्या आईने तिच्याजवळ जाऊन तिला साभाळलं.. तिच्या वडिलांनी आणि सुनील ने तिला उचलून पलंगावर झोपवलं...
गुरुजी सुरेखाच्या बाजूला बसले. त्यांनी तिच्यावरून एक लिंबू कापून त्यात हळद - कुंकू भरून उतरवून फेकले. त्यानंतर त्यांनी काही मंत्र म्हंटले आणि पिशवीतून ते पवित्र जल बाहेर काढून सुरेखाला एक ग्लासातून थोडं थोडं करत तिला पाजू लागले. पाण्याचा एक घोट घेतल्यावर तिची नजर बदलली आणि गुरुजींनी ती हेरली पण ह्यावेळेस गुरुजी सावधान होते त्यांनी लगेचच तिच्या गळ्यात त्यांनी आणलेली रुद्राक्ष माळ घातली.. सुरेखाच्या आत असलेला तो सैतान काही क्षणापूरता का होईना, शांत झाला. गुरुजींनी थोडा ही वेळ न दडवता, तिला ते पवित्र जल पूर्ण पिण्यासाठी दिल. सुरेखाला थोडावेळ बरं वाटलं, तिला बेडरूममध्ये आराम करण्यासाठी तिची आई घेऊन गेली.
हॉलमध्ये गुरुजी, प्रिया, सुनील आणि सुनील चे बाबा येऊन बसले. थोडावेळ, सगळे शांत होते आणि सगळे गुरुजींच्या बोलण्याची वाट बघत होते.
***
सूर्य मावळतीला झुकला होता, रस्त्यावर वर्दळ सुद्धा कमी होती... अजिंक्य स्वतः पहिल्यांदा शेतात आला होता, त्याच्यासाठी सगळं नवीन होत.. त्याला तर झाडांची नाव सुद्धा माहीत नव्हती...बरीच वर्षे आजोबांनी शेती स्वतः पिकवली होती, त्यानंतर ही जबाबदारी माऊली बाबा सांभाळत आहेत. खरंच शेतात उभा राहून अजिंक्यला आजोबा आपल्या सोबत आहेत, ह्या शेतात नेहमी वावरत आहे, अस त्याला जाणवू लागलं. अर्थात हा सगळा त्याचा आभास आहे, आजोबांविषयी असलेल्या नातवाच्या भावना होत्या.
ट्रिंग ट्रिंग ...sss हॅलो अजिंक्य ..! थँक् गॉड, तुझा फोन लागला ...! पलीकडून ओळखीचा आवाज होता.. हॅलो महादेव ..! काय रे, कसा आहेस, मित्रा, अजिंक्य बोलला. अजिंक्य ...! यार आपला सुनील अडचणी मध्ये आहे आणि आपण काहिच करू शकत नाही ह्याची खंत वाटतेय रे, महादेव एकादमात बोलला. काय..? सुनील अडचणीत, का काय झालं आहे ? मला सांग सविस्तर, अजिंक्य म्हणाला..
फोनवर महादेवने अजिंक्य ला सुनीलच्या घरची सगळी परिस्थिती सांगितली. हे सगळं ऐकून तर अजिंक्य पुरता चक्रावून गेला, त्याला कळत नव्हत की काय करावे..? अजिंक्य .. अजिंक्य, ऐकतोय ना ? हो ऐकतोय महादेव, पुढे काय करायचं आता, अजिंक्य म्हणाला. त्याच्या ह्या प्रशांवर महादेव म्हणाला, अजिंक्य..! यार आम्हाला तर काहिच सुचत नाहीये, म्हणून मी तुला किती दिवसांपासून फोन ट्राय करत होतो, पण रेंज मुळे फोन कनेक्ट होत नव्हता..
हो महादेव..! इथे गावी रेंज नसते, फक्त रानात असते आणि नशीब मी आज रानात आलो म्हणून तुझा फोन लागला, घाबरू नकोस मी लगेचच निघतो तिकडे येण्यासाठी आणि माझा घरचा टेलिफोन नंबर लिहून घे, त्यावर मला कॉल कर, कारण पुन्हा रेंज जाईल, ठीक आहे...
फोन ठेवून अजिंक्य घरी जाण्यासाठी निघाला...माऊली बाबा, माझी बॅग भरा, मला ताबडतोब नाशिक ला जायचं आहे.. तिथे माझ्या मित्राला माझी गरज आहे... अरे अजिंक्य बाळा, पण तू जाणार कसा ? कारण ह्या वेळी तालुक्याला जाण्यासाठी कुठलंही वाहन नाही, तिथून पुढे रेल्वे ही नाही.. त्यामुळे तु उद्या निघ, ते जास्त सोयीस्कर होईल... माऊली बाबांच म्हणणं अजिंक्यला पटलं, त्याने महादेवला फोन करून तस सांगितलं, शिवाय तु सुनीलच्या घरी जा आणि तिथे काय होत आहे ते मला कळव, ते ही स्वतःची काळजी घेत, अशी सूचना ही दिली.
***
येस..ss शेवटी अजिंक्य सोबत बोलणं झालं... उद्या तो येईल आणि काहीतरी मार्ग काढेल, ज्यामुळे सुनील वर ओढवलेली परिस्थिती बदलेलं.. अजिंक्यने सांगितल्या प्रमाणे सुनीलच्या घरी जातो, म्हणून तो सुनीलच्या घरी जाण्यासाठी निघाला... जाताना वाटेत ज्या हॉस्पिटलमध्ये निशा ऍडमिट आहे तिथे जाऊन त्याने अजिंक्य आणि त्याच झालेलं बोलणं तिला सांगितलं.
***
सायंकाळची सूर्याची तांबूस किरणे खिडकीतून आत पडली होती, खिडकीतून बाहेर बघत आणि दोन्ही हात एकावर एक पाठीमागे बांधून गुरुजी विचार करत उभे होते... मोहिते साहेब, हे काहीतरी वेगळं आहे आणि हे खूप जिद्दी आहे, त्याला जे हवं आहे, ते तो घेऊन जाणारच... त्याच्या डोळ्यामध्ये मला तस दिसून आलं म्हणुन बोलतोय, मी आजपर्यंत खूप अमानवीय शक्ती पाहिल्या, पण हा माझ्या शक्तीपेक्षा ही बलाढ्य आहे फक्त सध्या तो कमजोर आहे, तो अजून पूर्ण शक्तीनिशी समोर आला नाही, ह्याचा अर्थ हा की परिस्थिती ह्यापेक्षा ही जास्त भयानक होऊ शकते, तुमच्यासोबत..! ही फक्त एक झलक आहे, सुरुवात आहे... गुरुजी थांबले.
म्हणजे गुरुजी, माझी मुलगी वाचणार नाही का ? आणि तर तिच्यावरून उतारा पण फिरवला, तिला पवित्र पाणी पाजलात... अहो.. अहो गुरुजी, अजून माझ्या पोरीनं नीटस जग सुद्धा नाही पाहिलं हो..! स्वतःच्या लहान बाळाला तिने अजून स्पर्शही केला नाही आणि ही काय अवदसा येऊन पडली तिच्या पदरात, सुनीलचे बाबा हवालदिल होऊन बोलत होते..
बापाकडून लेकिबद्दलची हळहळ ऐकून गुरुजी ही हळवे झाले. मोहिते साहेब..! मी जो अंगारा, लिंबू फिरवलं आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय केला आहे, ह्या अश्या गोष्टी लगेच जात नाही, त्या सैतानाला काय हवंय, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही...माझ्या गुरूंनी मला जे काही शिकवलं आहे त्या सर्व शक्तींचा उपयोग करून मी तुमच्या मुलीचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन..
मला काही पूजा, विधी करावे लागतील त्यासाठी त्याला लागणारी सामग्री मी तुम्हाला सांगेन ती तुम्ही कुठूनही शोधून उपलब्ध करा... दुसरं म्हणजे सुरेखाच्या आतून जेव्हा जेव्हा सैतान बोलेल तेव्हा तेव्ह मी दिलेला अंगारा आणि हे जल तिच्यावर थोडं थोडं शिंपडत जायचं. मी आता निघतो मला पूजेसाठी बरीच वेद पुराणाची माहिती जमा करावी लागेल... मोहिते साहेब सर्वात महत्त्वाचं ही पूजा येत्या दोन दिवसांनी पौर्णिमेच्या रात्रीच झाली पाहिजे, अन्यथा आपल्या विधीचा काही उपयोग होणार नाही. आणि ....
ठक ठक ठक सुनील.... ठक ठक..! सुनीलने दरवाजा उघडून पाहिलं बाहेर महादेव उभा होता.. महादेव..! अरे ये आत.. अरे प्रिया आणि गुरुजी पण आहेत... नमस्कार गुरुजी, महादेवने गुरुजींना नमस्कार केला.
सुनीलचे बाबा बोलले, गुरुजी..! तुम्ही काहीतरी सांगत होता, आणि.... त्यावर गुरुजी, हो.. आणि मघाशी मी जो लिंबू उतरवून टाकला आणि आता अजून मी पाच लिंबू पूर्ण घराहुन उतरवून टाकेल, ते सगळे लिंबू आज रात्री बरोबर तीन च्या सुमारास जवळच्या स्मशानभूमीत नेऊन टाकायचे आणि मागे वळून अजिबात बघायचं नाही...
ठीक आहे गुरुजी, मोहिते बोलले. गुरूजी जाताना पुन्हा एकदा सुरेखाशी बोलले, आराम कर बेटा, मी उद्या परत येईल...जात जात तिच्यावरून अजून एक लिंबू उतरवलं आणि बाकीचे पूर्ण घरावरून लिंबु उतरवून ते सगळे लिंबू एका पिशवीत बांधून मोहितेंच्या स्वाधीन केले... रात्री तीन च्या सुमारास लक्षात असू द्या....
.
.
.
.
क्रमशः