वारसदार भाग @ ९
हो...! मी आहे, पं. अमित जोशी गुरुजी... या आतमध्ये, गुरुजी त्यांना आतल्या खोलीमध्ये घेऊन गेले. त्यांना पाणी दिल. बोला साहेब काय काम काढलंत, गुरुजी म्हणाले. हाताची घडी घालून मोहिते बोलू लागले, जोशी गुरुजी, मला डॉ. सापळेंनी तुमचा पत्ता दिला.. माझ्या घरी माझ्या मुलीचा एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तुम्ही जर माझ्या घरी एकदा आलात तर तुम्हाला बाकीच सगळं मी तिथे अजून उलगडून सांगेन म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला ही सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. तर उद्या तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का ? हवं तर मी तुम्हाला स्वतः घ्यायला येईल...! थोडावेळ विचार करत गुरुजी बोलले, मोहिते साहेब ...! माझी काही हरकत नाही पण उद्या मला माझ्या मुलीच्या मित्राच्या घरी जायचं आहे कारण तिथे माझी जास्त गरज आहे. आता तिथल्या कामासाठी मला किती वेळ, किती काळ लागेल ? ते आताच सांगता येणार नाही. गुरुजींच्या अश्या वक्तव्यावर मोहिते अगदी हताश होऊन गेले. दरवाज्यावर पुन्हा एकदा थाप पडली, ठक ठक ठक.... मोहितेंना सांगून गुरुजी दरवाज्याकडे वळले.
काका ..! तुम्ही इथे, तुम्हाला माझं घर माहीत होतं.. अरे प्रिया ..! हे तुझं घर आहे, मला माहीतच नव्हतं. मला तर डॉ. सापळेंनी गुरुजींचा रेफरन्स दिला होता आणि मी इथे आलो. एक मिनिटं म्हणजे जोशी गुरुजी तुझे बाबा आहेत आणि त्यांनी आताच म्हंटल्याप्रमाणे ते उद्या त्यांच्या मुलीच्या मित्राच्या घरी जाणार आहे ते म्हणजे माझ्याच घरी, बरोबर आहे का हे ..? मोहिते बोलले.
गुरुजींना ही आश्चर्य वाटले, त्यांनी प्रियाला विचारलं, बाळा...! तु ज्या परिवाराबद्दल सांगत होतीस, तो परिवार ह्यांचाच आहे का ? प्रियाने होकारार्थी मान डोलवली. हे परमेश्वरा ...! मानलं तुला .... तु स्वतःच ही भेट घडवून आणलीस. अस म्हणत गुरुजींनी देवाजवळ दिवा पेटवला. मोहिते साहेब...! डॉ. सापळे हे माझे फॅमिली डॉक्टर आहेत, वय झाल्याने त्यांच्या क्लिनिकला माझ्या सारख्या चकरा होत आहेत.
हो ते माझे ही फॅमिली डॉक्टर वजा मित्र आहेत, माझ्या मुलीचा उपचार त्यांच्याकडूनच होत आहे, त्यांनीच मला तुमचं नाव सुचवलं. बरं गुरुजी...! आता तुम्हाला तर प्रिया कडून सगळीच हकीकत कळली आहे, तुम्ही सांगा, माझी मुलगी होईल ना बरी....आम्ही गेल्या महिन्याभरापासून खूप त्रस्त झालो आहोत. तुम्ही नक्कीच काहीतरी मार्ग काढालं, ह्याची मला खात्री आहे, सुनील चे बाबा अत्यंत कळकळीने बोलत होते.
काळजी करू नका मोहिते साहेब...! कदाचित ह्याच दिवसासाठी माझी शक्ती माझ्याकडे अजूनही जपून आहे. त्या शक्तींच्या जोरावर आपण सगळं ठीक करू, तुम्ही निवांत घरी जा, उद्या मी येतो, काळजी नसावी, गुरुजी म्हणाले.
***
शास्त्री बुवा म्हणजे एक लहान बाळ किंवा त्याच्या निगडित असलेलं काहीतरी आहे जे संकटात आहे आणि ते मला मदतीसाठी बोलवत आहे. आणि दुसऱ्या स्वप्नांत मला एका नवविवाहित स्त्रीचा हात दिसला म्हणजे तिच्याशी निगडित काहीतरी आहे, कदाचित नवविवाहित स्त्री अडचणीत असेल किंवा तिच्यामुळे कोणी अडचणीत असेल, अजिंक्य स्वतःच्याच स्वप्नांना घेऊन गोंधळून गेला होता.
शास्त्री बुवांनी त्याला त्याच्या अलौकिक शक्तींवर विश्वास ठेव आणि वेळोवेळी तुझ्या दिव्यदृष्टी मुळे तुला मदत ही होतच राहणार आहे, अस बोलून त्याच्या डोक्यावरचा भार कमी केला. सर्वात आधी तु तुझ्या घरच्यांना, नातेवाईकांना फोन करून विचार की कोणाचं लहान बाळ, आजारी किंवा काही त्रासात तर नाही ना ..! म्हणजे तुला कल्पना येईल, अशी स्वप्न का पडत आहेत ते....? शास्त्री बुवांनी सुचवलेला मार्ग अजिंक्यला देखील पटला. त्याने ताबडतोब वाड्यावर जाऊन सगळ्यांना फोन करण्याचा विचार केला. निघण्याआधी त्याने शास्त्रीबुवांना वंदन केले आणि तो वाड्यावर जाण्यासाठी निघाला.
शास्त्री बुवांचा निरोप घेऊन अजिंक्य घाईगडबडीने वाड्यावर पोहचला. त्याचं गाव आडरानात असल्याने मोबाईल ला पुरेशी रेंज मिळत नव्हती, रेंजसाठी गावच्या वेशीवर अजिंक्यला शेतावर जावं लागत होतं. तिथे काय ती थोडीफार मोबाईल ला रेंज भेटत असे. वाड्यात एक जुना टेलिफोन होता आणि त्याच टेबलावर टेलिफोन डिरेक्टरी होती. त्या डिरेक्टरी मधून एक एक नातेवाईकांचा नंबर शोधत अजिंक्य कॉल करत सुटला. सर्वांशी बोलणं झालं पण त्याच्या मनातील उत्तर तसंच राहील, अजूनही तो निरुत्तरीत होता. तो थोडा अजून विचार करून लागला की कोणाला फोन करायचं राहील तर नाही ना ...? पण तरी देखील काही कळण्यास मार्ग सापडत नव्हता. वाड्यात जुनी खोली होती, त्या खोलीच्या आतमध्ये जाऊन अजिंक्य खोली निहाळू लागला. वाडा जुना असल्याने जुन्या काळातील बरीच साधनं तिथे होती. त्यात वाडवडिलांचे जुने फोटोचे अलबम, शेतीची अवजारे, पितळीची भांडी, पुस्तके अस बरंच काही...
***
रात्री दोन - तीन च्या सुमारास सगळी वस्ती गाढ झोपेत होती. गडद अंधार, वर आभाळ अगदी दाटून आल्यासारखं त्यात फक्त चंद्राची सावली पडली पण ती ही अतिशय मंद स्वरूपाची जणू काही उसण अवसान घेऊनच... रस्ता अतिशय सामसूम, निर्मनुष्य रस्त्यावर कुत्रे भुंकण्याचा आवाज तर दुसरीकडे घुबडांचं कण्हन सुरू होतच. आजची रात्र अतिशय भयानक दिसत होती.
एका घरात एक म्हातारा गाढ झोपेत होता. अगदी गाढ, बिलकुल बेफिकीर, त्याला कसली ही चाहूल नव्हती. छातीपर्यंत ओढून घेतलेली ब्लॅंकेट आता हळू हळू त्या म्हाताऱ्याच्या डोक्यापर्यंत सरकू लागली, घराबाहेर कुत्र्यांच रडणं जोरजोरात सुरू झालं, जणू काही त्यांना अमानवी भीतीची जाणीव होऊ लागली आणि ते त्या म्हाताऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. डोक्यापर्यंत आलेली ब्लॅंकेट आता त्या म्हाताऱ्याचं डोकं पूर्णपणे झाकून जोरात, एकदम घट्टपणे दाबण्याचा प्रयत्न करत होती. श्वास गुदमरल्यामुळे म्हाताऱ्याला जाग आली आणि तो जीव वाचवण्यासाठी हात पाय मारू लागला पण म्हातारा सत्तरी पार असल्याने शारीरिक बल काही उपयोगी पडेना म्हणून त्याने बाजूच्या पलंगावर झोपलेली त्याची नातं प्रियाला जोरात हाक दिली. प्रिया... हो ते गुरुजी होते, गुरुजींवर हल्ला झाला होता.
प्रियाची झोप सावध होती त्यामुळे गुरुजींच्या एका हाकेतच तिला जाग आली आणि तीने गुरुजींजवळ धाव घेतली. बाबा ...! बाबा.... काय होतंय ही ब्लॅंकेट निघत का नाहीये..? त्यावर गुरुजींनी तीला देवऱ्यातील त्यांची रुद्राक्ष माळ आणायला सांगितले. वेळ न दवडता प्रियाने देव्हाऱ्याकडे धाव घेतली आणि रुद्राक्ष माळ घेऊन आली.
बाबा ...! मी रुद्राक्ष माळ आणली आहे, सांगा काय करू..? प्रिया ...! ती माळ फक्त माझ्या ब्लॅंकेट वर फेक बस..! आणि प्रियाने तेच केलं रुद्राक्ष माळ ब्लॅंकेटच्या वर पडल्या पडल्या लगेचच गुरुजी त्या जाळ्यातून सुटले. त्यांनी मोठा श्वास घेऊन बाजूला ठेवलेला पाण्याचा घोट घेतला. वर घडलेल्या क्रिया खूप घाईघाईने घडल्या.
पाणी पिऊन झाल्यावर प्रियाने गुरुजींना विचारले, बाबा, हे काय होत ...? तुम्ही ठीक आहेत ना ...! त्यावर गुरुजींनी होकार दर्शवला... प्रिया, बेटा... खरतर मला काही कळायच्या आतच ह्या गोष्टी घडल्या. हो बाबा पण हे अस अचानक कस घडलं, कोणी केलं असेल हे...!
गुरुजींनी मनातल्या मनात विचार केला, प्रिया बेटा, मला माहित आहे, हे कोणी केलं आहे आणि त्याची शिक्षा मी त्याला उद्या देईलच... डोळे मिटून गुरुजींनी काही मंत्र पुटपुटले आणि मनातच म्हणाले, आता येऊन दाखव पुन्हा...! गुरुजींनी प्रियाला घाबरलेल्या अवस्थेत बघून तिला एवढ्या रात्री काही न सांगण्याचे ठरवले आणि गोष्ट उद्यावर ढकलली
***
अरे यार .... ह्या अजिंक्यचा फोन का लागत नाही..? किती वेळ ट्राय करू ..? एकदा फक्त एकदा त्याच्या मोबाईल ला रेंज भेटू दे, अजिंक्यचा फोन लागत नव्हता म्हणून इकडे महादेवची चिडचिड होत होती. शिवाय सुनीलच्या घरच्या प्रसंग बघून निशाला ताप आला होता. म्हणून तिला दवाखान्यात ऍडमिट केले होते. त्यामुळे त्याला निशाची काळजी वाटू लागली.
***
सुरेखा उठ बाळा, थोडं खाऊन घे, सुनीलची आई सुरेखाला सकाळच्या नाश्त्यासाठी आग्रह करत होती. पण सुरेखाची मनस्थिती कुठे जागेवर होती. मनात भीती आणि बाळाची चिंता नेहमी तिला सतावत होती. त्या असुरी सैतानाच्या गुंगीतून उठल्यावर ती सारख सारख तिच्या बाळाची विचारपूस करायची. आई .. आई ...! माझ्या बाळाला सांभाळ, त्याला.. त्याला.. इथे घेऊन नको येऊस नाहीतर तो त्याला पण ठार मारेल. माझं तर काही खरं नाही निदान माझ्या जीवाचा अंश तरी तुझ्याकडे जगला पाहिजे, तेवढीच तुम्हाला माझी आठवण म्हणून.... सुरेखा तिच्या आई जवळ अगदी हुंदके देत देत रडत होती.
सुरेखा बाळा काळजी नको करुस आता सगळं ठीक होईल, आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांनी तुझ्या बाबांना एका गुरुजींबदल सांगितलं आहे, ते म्हणे...! खूप विद्वान आहेत, त्यांनाच भेटायला तुझे बाबा गेलेत, तेव्हढ्यात सुनीलचे बाबा घरी येतात आणि गुरुजींनी उद्या येण्यास होकार दर्शवला आहे असं सर्वांना सांगतात, सोबत ते प्रियाचे बाबा आहेत हे ही सांगतात. आता पूर्ण मोहिते कुटुंब उद्याच्या दिवसाची वाट बघत असत.
...
अजिंक्य आतल्या खोलीमध्ये असलेली पुस्तके चाळू लागला, मुळात तो लेखक त्यामुळे पुस्तकं म्हंटली तर त्याचा जीव को प्राण... त्यात जुन्या काळातील वैचारिक, रहस्यमयी आणि वेदपुराणाची पुस्तके वाचण्याचा त्याला भरपूर छंद होता... त्याच खोलीत बसून तो एक पुस्तक हातात घेऊन खुर्चीवर बसला...' खरा वारसदार ' हे पुस्तक बघून त्याचे डोळे चक्रावले, कारण त्या पुस्तकाचे लेखक खुद्द त्याचे आजोबा गंगाधर मोरोपंत होते. स्वतःचीच पुटपुटत, वाह... ! आजोबांनी पुस्तक पण लिहिलं आहे, कमाल आहे .... तेव्हाच त्याच्या डोक्यात कळ आली आणि एखादा मनुष्य निद्राव्यस्थेत गेल्यावर जसा आपोआप बोलतो तसा अजिंक्य बोलू लागला, म्हणजे आजोबा लेखक होते म्हणून मला पण लिखाणाची आवड निर्माण झाली. हा सुद्धा एक प्रकारे आजोबांकडून मिळालेला वारसा आहे. आणि एवढं बोलून तो पुन्हा पूर्वरत झाला...बाप रे ...! हे काय झालं होतं मला अचानक मध्येच ...
थोडा वेळ डोक्यावरून हात फिरवून त्याने वाड्यातील एका गडी माणसाला चहा साठी हाक दिली... माऊली बाबा...! हो माऊली बाबा...! मला थोडा कपभर चहा ठेवा... माऊली म्हणजे मोरोपंत आजोबांचे खास सेवक, अगदी त्यांच्या लहानपणापासून ते ह्या वाड्यात होते, मालक हयात असेपर्यंत मालकाची चाकरी केली शिवाय त्यानंतरही ते ह्या वाड्याची काळजी आपुलकीने घेत होते.. थोड्यावेळात माऊली आले, त्यांनी अजिंक्यला चहा दिला व पुन्हा स्वयंपाकघरात कामासाठी निघाले पण अजिंक्यने त्यांना अडवलं. माऊली बाबा ...! थोडावेळ इथे बसा, तुमच्याशी बोलण्यासाठी वेळच भेटला नाही, गावी आल्यापासून मी फार बिजी होतो... त्यात गावची जत्रा आपल्या कुलदैवतं दर्शन घेईन मी जाता जाता....
जाता ... जाता... म्हणजे अजिंक्य पोरा... तु लगेच शहरात जातोय का ? आणि केव्हा जाणार आहेस, तु काही बोलला नाहीस, माऊली बाबा बोलले. हे काय दोन दिवसांनी मी निघेल आज आपल्या शेतीची पाहणी करून येतो, उद्या परवा बारीकसारीक काही कामे उरली असतील तर ती करून घेतो, अजिंक्य म्हणाला. पण त्या आधी आपल्या कुलदैवताच दर्शन करून घे लेकरा...माऊली बाबा बोलले...हो बाबा थोड्यावेळात मी शेतीची पाहणी करण्यासाठी जाणार आहे तेव्हा वाटेतच मंदिर आहे.. म्हणून अजिंक्यने हातातलं पुस्तक वाचायला घेतलं. आणि माऊली बाबा पण त्याच्या कामासाठी निघाले.
***
सकाळी नेहमीप्रमाणे सुनीलची आई सुरेखाला चहा नास्ता झाल्यावर सकाळच्या गोळ्या देत होती. अन इतक्यात, ठक.. ठक ... सुनील ..! ठक ठक, जोरजोराने कोणीतरी सुनीलच्या घरच्या दरवाज्यावर थाप मारत होत.. दरवाजा सुनीलनेच उघडला, अरे प्रिया ..! ये आज सकाळीच अचानकपणे, बाकीचे पण आलेत का ?
गंभीर स्वरात प्रिया बोलू लागली, बाकीचे कोणी आले नाही, पण... सुनीलने तीच वाक्य अर्धवटच ठेवलं आणि त्याची नजर प्रियाच्या मागे उभे असलेल्या वृद्ध व्यक्तीवर पडली, वय जेमतेम सत्तरी पार असेल. कोण आपण ..! कोणाला भेटायचं आहे ..? सुनील बोलला. अरे सुनील ...! हे माझ्या सोबत आहेत, माझे बाबा पं. अमित जोशी सर्वजण त्यांना जोशी गुरुजी म्हणून ओळखतात. काय जोशी गुरुजी ..! हे ऐकताच हॉल मध्ये चहा पित बसलेले सुनीलचे बाबा घाईने दरवाज्याजवळ आले आणि त्यांनी गुरुजींना आत बोलवले.
.
.
.
.
.
क्रमशः