जळालेली मिल (भाग - ०२)
लेखक - समीर गडेकरम्हातारा चौकिदार विठ्ठलरावच्या सोबतिने रात्रपाळीची डयुटि आता थोडि सोयिस्कर व्हायला मदत झालि होति. म्हातारा जुन्या आठवणी रंगवुन सांगत होता. नारायण गुंग होऊन ऐकत होता. दिवस बर्यापैंकी जात होते.
नेहमिप्रमाणे आजहि नारायण जेवणाचा डबा सायलला अडकवुन कामावर निघाला. आज अमावस्या होति. माळरानावरिल वाटेवरहि आता अंधार गुडुप होता. सायकलच्या पायडलचा टरक् टरक् आवाज ती स्मशानशांतता भंग करत होता. आज लवकर पोहचायचं म्हणुन तो रपारप पायडल मारत होता. आज गाणं गुणगणत शेतातिल वाट वार्याशी गप्पा मारत तुडवण्यास पुरक असं वातावरण नव्हतं.
मिलजवळ पोहचेपर्यंत परिश्रमामुळे तो घामाघुम झाला. त्याने गळ्यातिल शेल्याने चेहर्यावरिल घाम पुसला. गेट ढकलुन त्याने सायकल आतमधे घेतलि. वारा जोरात वाहत होता. पालापाचोळा, कचरा वार्याने हवेत ऊडत होता. थोड्यावेळात पाउस सुरु होईल का याची शंका वाटत होति. विठ्ठलराव अंगावर गोधडी घेउन बसला होता. नारायणला पाहताच त्याच्या बोडख्या चेहर्यावर आनंद निर्माण झाला. आज गप्पाहि विशेष झाल्या नाहि. जेवण आटोपुन नारायण रात्रि ११ च्या सुमारास आपल्या नेहमिच्या जागेवर म्हणजेच बाल्कनीत गेला. अंथरुण घालुन पालखट मांडुन बसला. त्याने सोबत आणलेला रेडियो गाणी ऐकायला घेतला. पण मधे मधे रडियो खरखरत होता. शेवटि तो बंद करुन तो अंथरुणावर आडवा झाला.
थोडं वातावरण आता निवळलं होतं. थोडावेळपुर्वी मस्ती करणारा वारा शांत होऊन कुठेतरि दडी मारुन बसला होता. वातावरणात ऐक स्तब्धता आलि होती. आजच्या ढगाळ वातावरणात आकाशात चांदण्याहि दिसत नव्हत्या. शांत चित्त वातावरणात, सभोवतालच्या गर्द काळोखात अंग जमिनीवर पसरवुन डोळे ऊघडे ठेवुन तो आकाशाकडे पाहत सुन्न पडला होता. झोप लागणे आज कठिण दिसत होते. घुटमळत घुटमळत शेवटि रात्रिचा १ वाजला. आणि अचानक त्याला लघवी लागली. जागेवरुन ऊठणे त्याच्या जिवावर आले होते पण नाईलाज होता. तो खालि ऊतरला. वातावरणात गारठा वाटत होता. वारा अंगाला झोंबत होता. त्याने दोन्हीं हातांची घडी घातली आणि गेटकडे निघाला. चालतांना त्याच लक्ष विठ्ठलरावच्या खोलिकडे गेलं. दार बंद होतं. कंदिलाचा मंद उजेड फटितुन बाहेर येत होता.
कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत गेट उघडले. त्या शांत वातावरणात तो आवाज घुमला. बाहेर येउन ऐका गवताळ भागात ऊभा राहुन लघवि करत असतांना तो थोडा थरथरत होता. कारण हवेत थंडावा होता आणि रात्रि १ वाजता या सुनसान ठिकाणि त्याला खुप ऐकटं वाटत होतं. आज देव जाणे का पण या भागात त्याला ऐक वेगळिच हुरहुर जाणवत होति. ऐक नकारात्मक ऊर्जा. दुरवर कावळे ओरडत होते तर बाकि सभोवतालचं संपुर्ण वातावरण जिव गेलेल्या मढ्याप्रमाणे निपचित पडलं होतं. ईतक्यात……….
ईतक्यात अचानक १० - १२ कुत्रि त्याच्य पुढ्यात येऊन जोरजोराने भुंकायला लागली. ती कुठुन आलित माहिती नाहि. नारायण भेदरला. या अचानक हल्ल्याने तो भांबावला. सरळ आतमधे पळाला. ति कुत्री भुंकत भुंकत गेटपर्यंत आलि. गेटबाहेर ऊभि राहुन भुंकत होती. त्यांच्या भुंकण्याचा जोर अजुन वाढला होता. घाबरलेला नारायण उसासे टाकत विठ्ठलरावांच्या खोलिच्या भिंतीआड जाऊन लपला. घाम फुटल्या अंगाने तो गेटकडे वाकुन पाहत होता. गेट बंद करणे आवश्यक होते म्हणुन तो तिथेच थांबला होता. शेवटि थोडं अवसान गोळा करुन तो बाहेर आला. त्याने परिसरातिल २ - ३ दगड उचलले आणि कुंत्र्यांच्या बाजुने तो भिरकवायला लागला. कुत्री मागे जाउन पुन्हा पुढे येत होति.
करता करता शेवटि दगडहि संपलेत. आणखी दगड शोधण्यासाठी त्याने आजुबाजुला पाहिले. एेका कचर्याच्या ढिगार्यावर त्याची नजर गेलि. त्यावर ऐक बुट उलटा पडला होता. तो ऊचलुन फेकुन मारावा म्हणुन तो तिकडे वळला. बुट उचलायला गेला पण तो जड वाटत होता. पुर्ण जोर लावुन त्याने तो ऊचलला. तो फक्त बुट नसुन ऐक अर्धा तुटलेला, अर्धवट जळालेला पाय होता. हातात धरलेल्या त्या पायाकडे पाहुन नारायणची पाचावर धारण बसली. त्याचा हात थरथरायला लागला. तो ताडकन फेकुन तो आपल्या जागेवर पळत सुटला.
बाल्कनीत येउन त्याने ब्लँकेट तोंडावरुन ओढुन, पाय पोटुशी घेउन तो अंथरुणावर पडला. अंग थरथरत होतं. ऐवढ्यात जोराचा वारा आला आणि त्याचं ब्लँकेट अंगावरुन बाजुला उडालं. तो सैरभैर झाला. ते ब्लँकेट बाल्कनीतुन खालि पडणार ईतक्यात त्याने त्याचे शेवटचे टोक पकडले आणि वरति ओढायला लागला. ओढतांना जोर लागत होता. कुणितरि ते ब्लँकेट खालुन ओढत असल्यासारखं वाटतं होतं. शेवटि ऐका झटक्यात जोराने ते ओढुन तो बाल्कनीच्या मोकळ्या भागातुन ईमारतीच्या आतल्या बाजुला आला. छोटा रेडियो, विजेचि बैटरि, जेवणाचा डबा सगळं सामान आतमधे घेतलं. थरथर करत तो भितिंला टेकुन बसला. जमिनिवर काहिहि न अंथरता त्याने अंथरुण पांघरुन दोन्हीही अंगावर घेतले आणि तिथेच आडवा झाला. पांघरुणामधे जोरजोरात श्वासोश्वास सुरु होता. घामाचे लोट जमिनिला स्पर्श करत होते. थरथरत तो देवाचं नामस्मरण करत होता.
थोडा वेळाने शांत होऊन त्याने पाय सरळ केले. श्वासोश्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालवला. थोड बरं वाटुन तो आता शांत निपचित आता पडला होता. सुन्न वातावरणात ऐका कोंट्यात कबुतरांची फडफड ऐकायला येत होति. ईतक्यात त्याच्या पायाजवळ काहितरि हालचाल जाणवलि. त्याने झटकन पाय मागे ओढला. आपला बिळबिळत स्पर्श नारायणच्या अंगाला करुन ऐक ऊंदिर बाजुला पळाला. नुकत्याच शांत झालेल्या शरिरात पुन्हा कंप निर्माण झाला होता. थोडा वेळ शांततेत गेला. आतमधे ठिकठिकाणी लटकेल्या वटवाघळांमधे नुकत्याच झालेल्या हालचालिने फडफड निर्माण झालि. दोन वटवाघळं फडफड करत संपुर्ण रिकाम्या जागेत फिरत पुन्हा आपल्या जागि जाउन चिकटलि. ते ऐकंदरित वातावरण जणु खायला उठलं होतं किंवा आपल्या नविन पाहुण्यावर आज राग काढत होतं.
जोरजोरात दम टाकणारा नारायण आता पांघरुणाखालच्या अंधारात शांत पडला होता. त्याचा श्वासोश्वास अजुनहि पुर्णत: सामान्य झाला नव्हता. आजुबाजुच्या भयानक जगापासुन त्या पांघरुणाखालि त्याला ऐक अलिप्तता जाणवत होती.
रात्रि २ वाजले तेंव्हा वातावरणात स्मशानशांतता निर्माण झालि होति. झोपेला डोळ्याचे दरवाजे आज बंद झाले होते. घामाच्या थारोळ्यात पडुन बंद पांघरुणाआड श्वास गुदमरल्याने नारायणने डोके बाहेर काढले. डोळे बंद करुन पडुन राहिला. चेहर्याला वारा लागल्याने थोडे बरे वाटले. ईतक्यात………
ईतक्यात कुणाच्यातरि हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. पाय पुन्हा पोटुशी गेले. शरिर थरथरु लागले. आपसुकच नजर आवाजाच्या दिशेने गेलि. अंधारात काहि काळ्या आक्रुत्याची हालचाल नजरेस पडत होति. ते लोक कदाचित पत्ते खेळत होते. हसत खेळत ऐकमेकांना टाळ्या देत होते. १२ - १३ लोक त्या विस्तिर्ण मोकळ्या जागेच्या अगदि मध्यभागि बसले होते. ते भयानक द्रुष्य पाहुन नारायणच्या पोटात गोळा उठला. शरिरात भितीचा वणवा पेटला. हातपाय लटलटायला लागले. ईथुन निसटायला हवे नाहितर आपलं खरं नाहि म्हणुन तो उठुन पायर्यांच्या बाजुने घासत घासत निघाला. तेवढ्यात बाजुला ठेवलेल्या बैटरिवर हात पडुन त्याच बटण दाबल्या गेलं आणि क्षणार्धात प्रकाशाचा झोत त्या लोकांवर धावला.
ऐकाचवेळी सर्वांनी नारायणाच्या दिशेने बघितले. ति सगळि जळालेलि माणसे होति. शरिर काळठिक्कर पडलं होत. काहि ठिकाणि मांस लोंबत होतं. डोक्यावर केसं शिल्लक नव्हते. डोळ्यांच्या खोबणि झालेल्या. तोंडातिल दात मात्र चमकत होते. ते भयाण चेहरे आणि जळालेलि शरिरं नजर रोखुन नारायणकडे ऐकटक पाहत होती. शरिर लुळं पडलेला नारायण भेदरलेल्या अवस्थेत जागिच थरथरत होता. तेवढ्यात ते लोक जागेवरुन ऊठलेत आणि नारायणच्या दिशेने चालत निघाले
आता मात्र नारायणने पुर्ण जोर लावुन जागेवरुन उडि घेतलि. पायर्या सरसर उतरुन तो विठ्ठलरावच्या खोलिकडे पळाला. दार जोरजोरात ठोठवायला लागला. दार ठोठवतांना मुख्य ईमारतीकडे पाहायचिहि हिम्मत त्याची होत नव्हति. दरवाजा उघडला.
"काय मालक? काय झाल?"
काहिहि उत्तर न देता तो आत शिरला. स्वत:च दार लावुन घेतले. अगदिच कोंट्यात पाय दुमडुन बसला. जोरजोरात श्वास टाकत होता. म्हातारा शांत होता. त्याने बाजुल्या ठेवलेल्या मडक्यातिल गार पाणि भरुन ग्लास नारायणाला दिला. २ ग्लास पाणि तो ढसाढसा प्यायला. थोडा शांत झाल्यावर म्हातारा बोलला.
"आता बोला. काय गडबड आहे?"
"ते…. . . . . . . आतमधे. . . . . . . . .लोक. . . . . . . .. . .पत्ते. . . . . . . .काळे. . . . . . .जळालेले. . . . . . . . .मला. . . . . . . . येत. . . . . . . . होते. . . . . . . ."
नारायणला बोलणे सुचत नव्हते.
"असु द्या. असु द्या मालक. खुप घाबरलेले दिसता. तुम्हि ऐक काम करा ईथेच आराम करा. सकाळि बोलु" ऐवढं बोलुन म्हातार्याने त्याला जवळचे अंथरुण-पांघरुण दिले. खोलितला लाईट बंद केला. ऐक गुडुप अंधार निर्माण झाला. नारायणाला थोडे सुरक्षित वाटले. थोडा श्वासोश्वासाचा वेग कमि होउन तो आडवा झाला.
नारायण आता सामान्य झाला. काहि प्रमाणात का होईना भयाचा वणवा विझत चालला होता. शांत सुरक्षित वातावरणात डोळे मिटुन तो झोपायचा प्रयत्न करत होता. पण काहि शक्य होतं नव्हतं. सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यापुढे फिरत होते. ते भयान चेहरे, जळकि शरिरं त्याच्या डोक्यात जणु घरं करुन बसले होते. आपण पळत असतांना ते मागे अाले असतिल का? कि बाल्कनीत ऊभे राहुन आपल्याला पाहत असतिल? का आताहि दाराबाहेर येऊन ते ऊभे असतिल? आपण त्याच्या हाति पडलो असतो तर? नानाविध विचारांनी डोकं कुरतडलं जात होतं. ईमारतीच्या सभोवतालि संपुर्ण परिसरात ति भयाण शरिरं फिरत आहेत असं द्रुष्य त्याच्या डोळ्यासमोर तरळत होतं. ताटकळत १.३० तास निघुन गेला आणि अचानक. . . . . . .
त्याला पुन्हा लघवि लागलि. तो रागाने लाल झाला. काय गरज होति २ ग्लास पाणी प्यायची? त्याला स्वत:वरच खुप राग यायला लागला. त्याने डोके दोन्ही हाताने धरले. भिंतीवर डोकं घ्यावं ऐवढा राग त्याला आला होता पण त्याने स्वत:ला सावरले. नाईलाज होता. त्याने हळुच दाराच्या फटितुन बाहेर बघितले. कुणिच दिसत नव्हते. खोलित संपुर्ण अंधार होता. त्याने थरथरत्या हाताने हळुच कडि काढलि. अर्ध दार उघडुन बाहेर बघितले. सुनसान वातावरणात कुठलिहि हालचाल जाणवत नव्हति. हळुच दार उघडुन त्याने डावा पाय बाहेर ठेवला. संपुर्ण परिसरावार ऐकवार नजर टाकली. छाति धडधडत होति. बराच विचार करुन त्याने दुसरा पाय बाहेर काढला. बाल्कनीकडे बघण्याची त्याचि हिम्मत होत नव्हति. त्याने गेटकडे बघितलं. बघुन तो चमकला आणि जागेवरच थांबला. गेट पुर्णत: बंद होतं. "आपण गेट बंद केलं नव्हतं मग गेट कसं काय बंद झाल?" कदाचित म्हातारा मधेच उठला असेन म्हणुन त्याने मनाचं समाधान केलं. पावलं ऊचलत तो तो त्या आतमधिल रस्त्याच्या दुसर्या बाजुला गेला. काठावर उभा राहुन लघवी करत तो जमिन न्याहाळत होता. बाजुला असलेल्या झाडाची सावलि जमिनिवर हलत होति. संपुर्ण सावलि न्याहाळत असतांना ऐक विचित्र द्रुष्य त्याच्या नजरेस पडले. ऐके ठिकाणि झाडाच्या फांदिच्या सावलीसोबत दोन मानवी पायांच्या सावल्या हलत होत्या. याचाच अर्थ झाडावरति कुणितरि बसलं होतं. त्याच्याच पायाच्या सावल्या जमिनिवर दिसत होत्या. ति व्यक्ति पाय मागेपुढे हलवित असावि. त्याच्या रुदयाचं जनरेटर ऐका क्षणात धडधडायला लागलं. त्याच अवस्थेत तो मागे मागे सरकायला लागला. ऐक हात दरवाज्याला धडकाताच त्याने झाडावरति बघितलं. तो म्हातारा विठ्ठलराव झाडाच्या वरच्या टोकावर पाय खालि सोडुन बसला होता. ऐका हातात कंदिल होता. दोन्ही पाय तो मागेपुढे हलवित होता. ते भयानक द्रुष्य पाहुन नारायण दरवाज्याच्या चौकटित मधेच कोसळला. तेवढ्यात झाडावरिल विठ्ठलरावने तिकडे बघितले आणि वाढलेलि दाढि खाजवत तो नारायणकडे बघत तो हसत होता. नारायण आता पुरता घायाळ झाला. दाराची कडि घालण्यासाठि ऊभं राहायचहि धाडसं त्याला होत नव्हतं. दार नुसतचं लोटुन, कोट्यात जाऊन त्याने पांघरुणाखाली अंग झाकुन घेतले. कुडकुडत, थरथरत, घामाघुम झालेल्या शरिरातिल त्राण संपुन आता प्रेताप्रमाणे तो जमिनीवर पडला होता.
थोडा वेळ जाते न जाते खोलिचे दार कर्रर्रर्रर्र आवाज करत वाजले. कुणितरि आतमधे आलं होतं. खोलित ऐक हालचाल जाणवत होती. कुणितरि बाजुला येउन झोपलं. थरथरत्या शरिराने हळुच पांघरुण थोडसं बाजुला करुन बाजुच्या खाटेकडे बघितलं. तो म्हातारा नारायणकडे तोंड करुन हसत खाटेवर पडला होता. नारायणने गपकन डोळे मिटले. भोवळ येऊन तो जमिनिवर पडला राहिला. . . . . . . . . . . . .
क्रमश: