वारसदार भाग @ ६
काय ग..! तुझे डोळे एवढे लाल कसे झालेत ? आणि आल्या आल्या काय कामाला लागलीस. बस थोडावेळ माझ्याजवळ, सरिता ची आई वस्तल्याबाई सरिताला बोलत होत्या. सरीताचं आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं, तीच सारं लक्ष फक्त सुनील च्या विचारात गुंगल होत. सरे..अगं ये, सरे..! मनाच्या धुंदीतुन बाहेर पडून सरिता आईच्या हाकेला प्रतिसाद देत, हो आई आलेच... काय झालं आई. अगं...! माझं नाही तुझं काही बिनसलं आहे का ? मी आल्यापासून बघतेय, तु वेगळ्याच धुंदीत आहेस, वस्तल्याबाई बोलल्या. सकाळी घडलेला सगळा प्रकार रडत रडतच सरीताने आईला सांगितला. आईने सरिता ला समजावून शांत केले.
***
दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव लवकर उठला आणि सुनीलच्या घरी जाण्यासाठी तयार झाला. अजिंक्यला फोन लावून त्याला सगळी हकीकत सांगावी, अस त्याला मनोमनी वाटले म्हणून त्याने लागलीच अजिंक्यला फोन केला, पण गावी असल्याने त्यांच्या मोबाईल ला रेंज नव्हती, म्हणुन फोन काही लागत नव्हता. नंतर सरिता, निशा आणि प्रियाला कॉल करून त्याने मी सुनील च्या घरी जाऊन येतो तुमच्यापैकी कोणी येणार आहे का ? म्हणून त्याने दोघींना विचारलं. सरिताला आज तिच्या आईला दवाखान्यात घेऊन जायचे होते, त्यामुळे निशा ला सोबत घेऊन महादेव प्रियाच्या घरी आला.
***
सुनील आणि मि. मोहिते घरी पोहचले. मि. मोहितेंच घर चांगलं प्रशस्त होत. बाहेरून घरात येताना हॉल त्यानंतर किचन आणि शेवटला बेडरूम होता. हॉलमधे एका कोपऱ्यात एक व्यक्ती भिंतीकडे तोंड करून झोपली होती. त्या व्यक्तीजवळ जाऊन काही बोलणार तितक्यातच सुनील आणि मि. मोहिते कडे बघत त्याने मोठा श्वास घेत सैतानी आवाजात तो त्यांच्यावर पिसाळला, खिई खि खि खि ... हिहीहीहीहीही, फुकटचा मारला गेला, तो थेरडा हिहीहीहीहीही..ssss.. फक्त आणखी एक दिवस शांत राहिले असता तुम्ही, तर त्या म्हाताऱ्याला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायची गरज पडली नसती. हाहाहाहा... फक्त तुमच्या एका चुकीमुळे तो थेरडा मेला, तसंही बरच झालं मेला, माझ्या कामात व्यत्यय आणला होता त्याने....हाहाहहहह... त्याचबरोबर तो आवाज आणि ती नजर आता हळू हळू बदलू लागली होती, आणि एक वेगळाच आवाज बाहेर पडला. बाबा, आई, सुनील...! मला वाचवा रे, मला वाचवा, मला जगायचं आहे, मला माझ्या बाळासाठी जगायचं आहे, प्लिज, मला वाचवा रे, आज किती तरी दिवसानंतर स्वतः सुरेखाच्या तोडून खुद्द सुरेखा बोलली. हिहीहीहीहीही... पुन्हा ते किन्नरी हसू, वाचवा तिला.... हाहाहहह.... मर्दासारखा पहाडी आवाज पूर्ण घरभर गुंजला.
तो सैतान तिच्या तोंडून पुन्हा बोलू लागला. आजपासून बरोबर पुढच्या सातव्या दिवशी अमावस्येला मी हिला घेऊन जाणार ... हिहीहीहीहीहीहेहे... करत सुरेखाचं शरीर पुन्हा निद्राव्यस्थेत गेलं. तिची ही अवस्था मोहिते परिवार बऱ्याच दिवसांपासून फक्त पाहत होत. सुरुवातीला जेव्हा सुनील ने घरी सुरेखाचा मध्यरात्रीचा किस्सा सांगितला तेव्हा कोणाला विश्वास बसला नाही, पण त्यानंतर जे काही घडत आलं आहे, ते अगदी डोकं सुन्न करणार आहे.
***
दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव, निशा आणि प्रिया हे तिघे सुनीलच्या घरी जाण्यासाठी निघाले, गुरुजी पण आज घरी नव्हते ते जवळच्या गावी त्यांच्या नातेवाईकांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिघांची आप आपसात कुजबुज सुरू होती. मागच्या भेटीमध्ये सुनील ने सांगितलेल्या गोष्टींवर तिघेही वेगवेगळे तर्कवितर्क लावू लागले.
रिक्षा ..! मि. मोहितेंच्या बिल्डिंगपाशी येऊन थांबली. तिघेही रिक्षातून खाली उतरले. राहून - राहून प्रियाला सतत वाटत होतं की आपण बाबांना सांगून यायला हवं होतं, तिने ते महादेव आणि निशा जवळ बोलून दाखवलं. तिला मनात एक विशिष्ट अनामिक भीती जाणवू लागली. पण महादेव ने तिची समजूत काढली की आपण तिघे, आहोत ना सोबत आणि आपण सुनीलच्या घरी जात आहोत, ते घर आपल्यासाठी नवीन नाही. आपण कितीतरी वेळा सुनील च्या घरी गेलो आहे, तिथे त्याचा पूर्ण परिवार आहे त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. उगाचच मनात कुठल्याही शंका आणू नकोस. त्यावर निशा म्हणाली, तस ही, गुरुजींनी दिलेला धागा आहे आपल्या मनगटावर.
टिडिंगsss... डोर बेलचा आवाज ऐकून घरातले सगळे बिथरले की एवढ्या सकाळी कोण आलं असेल, म्हणून दरवाजा उघडण्यासाठी मिसेस मोहिते आल्या. कोण ..! प्रिया, अरे निशा आणि महादेव पण सोबत आहेत वाटत, म्हणत थोडंस स्वतःला सावरून मिसेस मोहितेंनी त्या तिघांना घरात घेऊन दरवाजा बंद केला. अरे सुनील, हे बघ महादेव आला आहे, सुनील ला आवाज देऊन मिसेस मोहिते किचनमध्ये त्यांना पाणी आणण्यासाठी गेल्या. सुनील आणि त्याची लहान बहीण अपेक्षा आत बेडरूम मध्ये तयार होत होते.
मि. मोहिते ही आता हॉल मध्ये येऊन मुलांजवळ बसले. त्यांची विचारपूस केली. हॉल मध्ये कोपऱ्यात छोटा बेड कम सोफा होता, त्यावर सुरेखा भिंतीकडे चेहरा करून झोपली होती. त्यामुळे तिचा चेहरा काही नीटसा दिसत नव्हता. पण महादेव च्या एक गोष्ट लक्षात आली की सकाळचा उजेड असुनही सुनीलच्या घरात मंद प्रकाश जाणवत होता, जे घर नेहमी प्रसन्न आणि आनंदी वाटायचं, आज ते घर अगदी भकास आणि आळसलेले वाटत होतं. थोड्या वेळासाठी सर्वजण शांत झाले. कोणी काहीच बोलत नव्हते पण ही शांतता मिसेस मोहितेंनी भंग केली मध्येच चहाचा ट्रे ठेवून, घ्या पोरांनो चहा घ्या... आता सुनील ही महादेवाच्या बाजूला येऊन बसला आणि सर्वजण चहा घेऊ लागले. चहा पिऊन झाल्यावर महादेव ने सरळ विषयाला हात घातला. त्याआधी त्याने सहजच सुरेखा बद्दल विचारलं, दीदी ची तब्येत ठीक आहे ना ? कारण ती एवढा वेळ कधीच झोपत नाही. महादेव चा अचानक आलेला प्रश्न ऐकून मोहिते परिवार बुचकळ्यात पडले. सावरा सावरी करत मिसेस मोहिते नी उत्तर दिल, हो बेटा...! ती ठीक आहे, फक्त तीच थोडं डोकं दुखतंय म्हणून पडून आहे. महादेव ने पण सुरेखा बद्दल जास्त न विचारता पुढे बोलू लागला, सुनील ..! तु आम्हाला काल अर्धवटच सांगितलंस, आज आम्ही पूर्ण जाणून घ्यायला आलो आहोत, सांग काय झालं आहे.
सुनील च्या कपाळावर घाम फुटला. महादेवच्या अचानक आलेल्या प्रश्नांने त्याला काहीच सुचेना की काय आणि कसं सांगावं. सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिल्यावर तो सांगू लागला.
तुम्हाला काल मी जे सांगितलं ते फार कमी सांगितलं आहे त्यापेक्षा ही फार भयानक गोष्टी घडल्या आहेत. आणि अस बोलत त्याने सुरेखा दीदी कडे बोट केलं व तो पुढे बोलू लागला. गाईज ...! जी झोपली आहे ना, ती माझी सुरेखा दीदी नाहीये. भलतीच कोणीतरी व्यक्ती आहे. सुनील च्या तोंडून हे ऐकून निशा आणि प्रियाच्या तोंडचं पाणीच पळालं. महादेव च्या मनात थोडी भीती निर्माण झाली पण तो घाबरण्यातला नव्हता. तो सुरेखा कडे पाहू लागला आणि त्याला अस दिसलं की सुरेखा चे पाय दोरीने घट्ट बांधलेले आहेत. पण तो शांत राहिला. सुनील पुढे बोलू लागला, काल मी तुम्हाला सांगितलं ना की, रात्रीची ही मध्येच उठते आणि विचित्र पद्धतीने पोटावरून हात फिरवते, त्यानंतर मी दोन रात्र तिच्यावर पाळतं ठेवायचं ठरवलं आणि दोन्ही रात्री मला तेच जाणवलं. हे मी आई बाबांना सांगितलं पण त्यांनी मला तुझा हा भास असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण माझ्या ह्या गोष्टींचा त्यांना लवकरच विश्वास बसला.
दोन दिवसांनी आम्ही पुन्हा तिला रुटीन चेक अप साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर काही दिवस मी तिच्या वर रात्रीचा लक्ष ठेवून होतो, अन आनंदाची गोष्ट म्हणजे ती रात्रीची गाढ झोपेत असायची, मागे २ -३ रात्री मी जे काही अनुभवलं होत ते आता पूर्णपणे बंद झालं होतं. त्यामुळे मी सुद्धा माझ्या मनाची समजूत काढली की, ते सगळं माझं स्वप्न तरी असेल किंवा भास...!
असेच काही दिवस गेले. आम्ही तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याचं नियोजन सुरू केलं. कार्यक्रमाचा दिवस आला, दीदी चे चंद्रावर बसून फोटो, काही झोपाळ्यावर बसून फोटो तर पारंपरिक आभूषणे घालून फोटोसेशन झाले. कार्यक्रम मस्त पार पडला. आम्ही मोहिते परिवार सगळे अगदी खुश होतो. आम्ही त्या रात्री घरात जेवायला बसलो, पण दीदी एकदम पटापट जेवत होती, अगदी जेवण ताटाबाहेर पडत होत, ह्याच सुद्धा तिला भान राहील नाही. मी तिला जोरात आरोळी देऊन बोललो, अगं..! दिदे, खाली पडलं आहे सगळं, तरी तीचं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. अस वाटत होतं की ती खूप दिवसांपासून उपाशी आहे. मला ही अस वाटलं की ती आता दोन जीवाची आहे त्यामुळे तिची भूक वाढली असेल, पण तीच सुरूच होत, अगदी शेवटची भाकरी संपली, तरीही ती बोलत होती की, मला अजून भूक लागली आहे. आईने तिच्यासाठी आणखी दोन भाकरी बनवल्या तेव्हा तीच पोट भरलं आणि ती शांत झाली. साधारपणे, फक्त दीड पोळी खाणारी मुलगी, आज ३ -४ ज्वारीच्या भाकरी खाऊन आम्हा सर्वांना तिने अचंबित करून सोडलं.
सर्वजण आश्चर्यचकित होते पण सेम जो मी विचार केला, ती दोन जीवाची आहे, त्यामुळे भूक लागली असेल, त्यात आज कार्यक्रमा मुळे दिवसभर धावपळ झाली. म्हणून सगळे झोपायची तयारी करू लागले. पण दीदी हॉलमध्ये इथेच खाली मान टाकून बसली होती. सुनील ने महादेव कडे बोट करून ती जागा दाखवली. निशा आणि प्रिया खूप जास्त घाबरल्या होत्या. महादेव ने विचारले, मग पुढे काय झालं ?
***
एक व्यक्ती सकाळी झोपेतून उठून स्नानगृहाकडे फ्रेश होण्यासाठी जात होता. डोळ्यावर अजूनही झोप होतीच, वॉशबेसिन जवळ ब्रश करता करता जुनी गाणी बोलण्याचा छंद असल्याने गाणी बोलतच ब्रश करत होता. बाथरूम मध्ये अंगावरून पाणी ओतण्याचा आवाज येत होता, कोणीतरी अंघोळ करतंय म्हणून त्या व्यक्तीने आत आवाज दिला की लवकर अंघोळ करा, मला बाहेर जायचं आहे. आतून काहीच प्रतिसाद नाही फक्त पाणी ओतण्याचा आवाज येतच होता. त्याने एकवेळ दरवाजा ठोकला तरी काहिच प्रतिसाद नाही. डोळ्यावर झोप असल्याने त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि थोड्यावेळाने पुन्हा तो बाथरूम जवळ आला पण ह्यावेळेस पाणी ओतण्याचा आवाज बंद झाला होता म्हणजे सदर व्यक्ती अंघोळ करून बाहेर आली आहे त्यामुळे त्याने तसाच दरवाजा आत ढकलला आणि क्षणांतच त्याची बोबडी वळली, कारण त्याने जसा दरवाजा आत ढकलला, तसा त्याला नवविवाहित असलेल्या हिरव्या चुडीदार बांगड्यांमध्ये असलेल्या एका बाई चा हात जोरात मागे जाताना दिसला.
हुउसशशशह sssss... अरे बाप रे ...! हे काय विचित्र आणि भयानक स्वप्न मला पडत आहेत, अजिंक्य स्वतःशीच पुटपुटला. बाजूच्या टेबलावर असलेल्या पाण्याचा ग्लास घेऊन त्यातलं पाणी पिऊन त्याने मोठा श्वास घेतला. आरशासमोर स्वतःला पाहत तो विचार करू लागला, की मला हे असे विचित्री स्वप्न का पडत आहे आणि ह्याचा नेमका अर्थ काय असेल ? हे कोड कसं सोडवायच म्हणून तो विचार करू लागलाच की त्याला पं. राघव शास्त्रींची आठवण झाली. त्याने दुसऱ्याच दिवशी सकाळी शास्त्री बुवांना भेटायला जाऊच ठरवलं.
***
पुढे...! सुनीलच्या चेहऱ्यावर अचानक भीतीच वातावरण निर्माण होऊ लागलं अन तो बोलू लागला, दीदी तशीच मान खाली घालुन खूप वेळ बसून होती. मी तिला हाक दिली, दीदी जा, बेडवर जाऊन झोप, तरी ती माझ्या कडे लक्ष देत नव्हती, मी पुन्हा हाक दिली, ह्यावेळेस मात्र तिने माझ्याकडे पाहिलं. तिने हळूच मान तिरक्या बाजूला झुकवली आणि भेदक नजर माझ्यावर रोखून ती विचित्र हसली, हे सांगताना सुनीलचं पूर्ण शरीर शहारून उठलं. इकडे मोहिते परिवार आणि निशा, प्रिया ह्यांची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती, भीतीने त्यांच ही शरीर थंड पडलं होतं. महादेव पुढचं ऐकण्यासाठी उत्सुक होता.
मी दीदी ला ह्यावेळेस जोरातच ओरडलो, दीदी.ssss... त्यावर ती पूर्वरत होऊन एकदम शांतपणे बोलली की, काय, काय झालं सुनील, तु ओरडत का आहेस ? आता मात्र माझं डोकं फुटायची वेळ आली, म्हणून मी रागातच बेडरूम मध्ये जाऊन झोपलो, ते थेट सकाळीच उठलो.
पुन्हा काही दिवस सगळं व्यवस्थित होत आणि आमच्या सर्वांच्या आनंदाचा दिवस उजाडला. दिदीने एका गोड मुलांला जन्म दिला होता. अगदी गोंडस, गोरापान, चेहऱ्यावर तेज दिसून येत होतो. मी मामा झालो होतो. आता वाटलं की सगळी दुःख आता निघून गेली आणि माझ्या भाच्या च्या रुपात आमच्या घरी सुखाची पाऊले पडलीत.
दिदीला घरी घेऊन आलो, बाळाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती, दीदी सोबत आम्ही सगळेच खूप आनंदी होतो. माझ्या मोठ्या मावशीने तिला आम्ही ताई बोलतो. तर ताईने बाळाला घेतलं होतं आणि बाळासोबत ती बोबडं बोलत होती, काय रे बाळा..! आता बालाचे खूप लाड होणार, ये बाळा मी तुझी आजी आहे. तो तुझा मामा आहे, ती बघ तिथे तुझी ममी बसली आहे. ताई ने आई ( मिसेस मोहिते ) कडे बघून कौतुकाने विचारलं की, विजया, आता लवकरच आपल्याला बाळाची पाचवी पुजायला हवी.... अन एवढ्याच शब्दामुळे वातावरण बदललं, खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक घरात आली आणि मंदिरातील दिव्याची वाट विजली, अन तिकडून पुरुषी पहाडी आवाज आला, " बघतोच मी..! बाळाची पाचवी कशी पूजता ते ".. ताई ने आवाज आल्याच्या दिशेने लक्ष दिलं, तो आवाज सुरेखा दिदीच्या मुखातून आला होता. ताईने अक्षरशः तिच्यावर ओरडली, ये पोरी काय बोलते. पण ह्यावेळेस तो आवाज अगदी आत्मविश्वासाने भरलेला आणि द्वेषाने भरलेला वाटला, पुन्हा एकदा तो आवाज घरभर घुमला, बघतोच मी..! बाळाची पाचवी कशी पूजता ते ".. हहहाह्हीहिहीही ... हहसहशशशशस .... त्या आवाजाने सगळेच दचकले, कारण आता दीदी वेगळ्याच पुरुषी आणि पहाडी आवाजात बोलत होती. सुनीलने हे सांगिल्यावर प्रिया आणि निशा दोघी घाबरून किंचाळल्या. सुनीलची बहीण अपेक्षाने सर्वांसाठी पाणी आणून दिलं.
सुनील पुढे सांगणार तितक्यातच,
आआआआआ aaaaaaaa..... चूप बस...... हिहीहीहीहीही... खूप सांगितलंस मित्रांना, आता गप्प बसायचं.... हहहहआहाआ .... गुरगुरण्याचा आवाज आला, मोहिते कुटुंबीय घामाघूम झाले. त्यासोबत महादेव, निशा, प्रिया पण कारण हा आवाज त्या पुरुषाच्या पहाडी आवाजासारखा येत होता त्याच वर्णन आताच सुनील ने केलं होतं. भिंतीकडे तोंड करूनच सुरेखाच्या मुखातून तो कर्णकर्कश आवाजात बोलू लागला, चला निघा...! घरातून बाहेर तुम्ही तिघेजण.. कोण आहेस तू ? महादेव बोलला. निशा - प्रिया तर भलत्याच घाबरल्या होत्या, त्या दोघी जणी मिसेस मोहितेंच्या मागे जाऊन लपल्या.
महादेव च्या प्रशांवर उत्तर आलं, इथून निघायचं नाहीतर एकेकाचा मुर्दा पाडेल मी...! आणि अस बोलून सुरेखाचं शरीर बेडवर उठून उभं राहील. तिला त्या अवस्थेत बघून सगळेच घाबरले, अगदी महादेव सुद्धा कारण ती खिडकीजवळ उभी होती आणि बाहेरच्या प्रकाश तिच्या शरीरावर पडल्याने तिची सावली घरात पडली. खरतर तिची सावली बघून सगळे घाबरले कारण तिच्या सावली एखाद्या पैलवान माणसा सारखी जाड, बलाढ्य आणि पूर्ण काळा कूट अंधार पसरवणारी होती. अन सुरेखाच्या डोळ्यात फक्त सफेद बुबुळ दिसत होते आणि तोंडातून एकदम रागीट सिसकाऱ्या निघत होत्या....
.
.
.
.
.
क्रमशः