#वारसदार अंतिम भाग
घरात सगळेजण शांत बसले होते. सुरेखा ही पूर्वरत झाली होती. पण शास्त्री बुवा अगदीच सावध होते, कसली तरी चाहूल त्यांना लागली होती. अचानक शास्त्री बुवांच्या मागून हल्ला झाला... सगळ्यांचा नजरा सुरेखावर गेल्या पण सुरेखा भानावर होती आणि ती सुद्धा घाबरली. अजिंक्य आणि बाकीचे सगळे विचारात पडले की दीदी इथे आहे मग हल्ला कोणी केला, तेच बघण्यासाठी सगळ्यांनी शास्त्री बुवांच्या मागे पाहिलं तर डोळे बंद, हात सैल, केस मोकळे सोडून अपेक्षा उभी होती.. त्या सैतानाने तिला सावज केलं. पण अजूनही सुरेखाचं शरीर मात्र सोडलं नव्हतं.
अचानक झालेल्या आघाताने शास्त्री बुवा थोडे हडबडले. मनाची शक्ती एकाग्र करत त्यांनी अपेक्षाला त्या असुरी शक्तीच्या संमोहनातून बाहेर काढले. अपेक्षा खाली पडली. तिला उचलून सुनील ने आतल्या खोलीत झोपवले. शास्त्रींनी सर्वांना जवळ बोलवले आणि बोलले, इथे फक्त एकच आत्मा नाही, अजून एक अतृप्त आत्मा आहे आणि ती आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.. मला थोड्या वेळासाठी ध्यान लावून माझ्या दिव्यशक्तीच्या साहाय्याने त्या आत्म्याशी बोलावं लागेल. पण तोपर्यंत तुम्हाला सुरेखावर नजर ठेवावी लागेल. कदाचित मी ध्यानावस्थेत गेल्यावर तिच्यातील सैतान पुन्हा जागी होईल..
अजिंक्यने पुढे येत जबाबदारी स्वीकारली, शास्त्री बुवा...! तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही दिदीची काळजी घेऊ.. तुम्ही फक्त दिदीला ह्यातून बाहेर काढा. अजिंक्यचा आत्मविश्वास पाहून महादेव, सुनील, विश्वास ह्या तिघांनी ही तिच्या सुरक्षितेची ग्वाही दिली. शास्त्री बुवा थोड्या वेळासाठी ध्यानस्थ मुद्रेत बसले. त्यांनी डोळे मिटून दिव्यदृष्टीच्या साहाय्याने त्या आत्म्याशी बोलू लागले.
अन..हळूच सुरेखा हसली... खिखीखिखी... तिचे डोळे लगेच पांढरे झाले, शरीर ताठ झालं, दात विचकत बेडवरून उठली अन थेट दरवाज्याजवळ पाय जमिनीवर जोरजोरात आपटत तो उद्गारला, हिहीही खिखिखी.. चाललो मी, हिला घेऊन आणि तो विचित्र हसू लागला. तसे सगळे सुरेखाच्या मागे धावले... सुनील आणि महादेवने सुरेखाचे पाय धरून ठेवले पण जोरात लाथ मारत सुरेखाने त्यांना लांब लाथाडल..महादेव जाऊन दगडी वरवंट्यावर पडला डोक्यावर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला आणि सुनील आधीच शरीराने पोकळ झाल्याने त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी शक्तीच उरली नव्हती. पुढे येत विश्वासने दोन्ही हाताने सुरेखाच्या चेहऱ्याला प्रेमाने पकडल आणि तो तिला गोंजारू लागला, कदाचित प्रेमाने तरी ती भानावर येईल पण परिस्थिती बदलली होती, विश्वासला तिने जोरात बेडवर ढकललं.. आणि पुन्हा तो विचित्र हसू लागला, खि खिखी... माझ्या शक्तीसमोर खुद्द परमेश्वर सुद्धा हतबल आहे, तुम्ही माणसं तर माझ्यासाठी किड्या मुंग्यांसारखे आहात.. म्हणत सुरेखाने जोरात स्वतःच शरीर भिंतीवर आदळलं.. आता मात्र अजिंक्यला राग आला त्याने सुरेखावर एकटक नजर रोखून धरली.. अशी काय जादू होती त्याच्या नजरेत की थोड्या वेळासाठी सुरेखा शांत झाली.. अजिंक्यने बराच वेळ नजर रोखून ठवली होती पण आता पापण्या लवू लागल्या आणि डोळ्यात पाणी आलं.. त्याच वेळेचं औचित्य साधून त्या सैतानाने अजिंक्य वर वार करण्यासाठी हवेतच झेप घेतली पण सैतानी ताकदीचा अजिंक्यला स्पर्श होताच जोरदार विजेचा झटका बसावा असा तो सैतान ओरडला, आहहहह... आणि दूर फेकला गेला.. सैतानाला तो त्याचा अपमान वाटला.
रागातच त्या सैतानाच्या सांगण्यावरून सुरेखा स्वतःच्या शरीरावर, हातावर, गालावर नख ओरबडू लागली.. रक्तस्राव सुरू झाला, वेदनेने ती विव्हळू लागली.. आता हा क्षण कधी सुरेखा बोलायची तर कधी तो सैतान... बाबा.. मला वाचवा.. खिखिखीहिहीही.. कोण नाही वाचवणार तुला, चल तु माझं सावज आहेस, तुला नाही सोडणार... जमिनीवर पडलेल्या सुरेखाचा एक पाय हवेत कोणीतरी पकडून खेचत होतं... जिवाच्या आकांताने ती ओरडत होती, विव्हळत होती, बाबा मला वाचवा ना ..! मम्मी मला वाचव ना ग ...!
मध्येच खिखिखिहिह्हीही आवाज पूर्ण घरभर गुंजत होता... शास्त्री अजूनही ध्यान्यात होते.. सुनील ला लाथ मारल्यामुळे सुनीलला उठता येत नव्हतं त्याला सरिता सावरत होती, ती पण बिचारी खूपच घाबरली होती... सुरेखाचे आई बाबा भीतीने कापत होते ते जेवढं सुरेखाच्या जवळ जायचे तेवढा तो सैतान तीच्या शरीराला त्रास देत होता, नाईलाजाने त्यांना सुरेखापासून अंतर ठेवण गरजेचं होतं, स्वतःच्या लेकीची अशी दुरवस्था बघून आई रडकुंडीला आली होती, बाप तर गुडघ्यावर बसून दयेची याचना करत होता.. पण त्या सैतानाला त्याच काही घेणंदेणं नव्हतं...
सुरेखाच सिजर ऑपरेशन झालं होतं त्यामुळे तिच्या पोटाचे टाके अजून ओलेच होते, सुरू झालं राक्षसी कृत्य ... ते टाके आपोआप निघू लागले, पोटातून रक्त पडू लागलं अन सुरेखा रडू लागली, जीवाची भीक मागू लागली.. पण तो सैतान फक्त तोंडातून लाळ गाळत होता. त्याला तीला वेदनाच द्यायच्या होत्या की म्हणून त्याने तिचे सगळे टाके तोडले. जोरात वेदनेची किंकाळी घरभर गुंजली, त्यात असंख्य वेदना, यातना होत्या...
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
मंत्र म्हणत आणि सोबत आणलेली राख सुरेखावर टाकून शास्त्रींनी त्या सैतानाला शांत केलं. सुरेखा बेशुद्ध पडली, खाली जमिनीवर रक्त सांडलं होत. सरीताने जमीन पुसून घेतली.. सुनील ने सुरेखाला बेडवर झोपवलं.. रडत रडत सुरेखाच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, वडील तर दरवाज्यापाशी उभे राहून रडत होते.. महादेव भानावर आला. विश्वास थरथरत होता त्याला शास्त्रीबुवांनी पाणी पाजलं.. सगळे हॉलमध्ये बसले... रात्रीचे दहा वाजले होते..
शास्त्री बोलू लागले, ह्या घरात आत्मा आहे " मुंजा " त्याच्याशी मी दिव्यदृष्टीने बोललो, त्याने मला सगळी हकीकत सांगितली, सुरेखाला कोणी झपाटले आहे, केव्हा, कधी आणि हे सर्व कोणी केलं आहे ? सगळेजण शास्त्रीकडे श्वास रोखून पाहू लागले... आणि शास्त्रीबुवांनी विश्वास कडे पाहिले, काय विश्वासराव..! स्वतःच्या बायकोची काळजी घेता येत नाही...
विश्वास गडबडून, काय बोलताय तुम्ही शास्त्री बुवा..! मला काहिच कळत नाहीये..? कळेल थोड्यावेळात, बरं तुमची आई नंदिनीबाईं अजून का आल्या नाहीत, सुरेखाला बघायला ? शास्त्री बोलले...
कारण माझ्या मामांनी तिला सांगितलं होतं, की बाळाला त्या घरात धोका आहे, बाळाला त्या घरात घेऊन नको जाऊस, शिवाय बाळाला एकट टाकून ती कशी येईल..? विश्वास बोलला.
शास्त्री बुवा खुर्चीत पुढे सरकले, विश्वासराव ...! त्याक्षणी तुमच्या मामाचं तुमच्या आईनी ऐकलं ते खूप चांगलं केलं... नाहीतर बाळाला एकट पाहून त्याचाही जीव घेतला असता, त्या सैतानाने...
शास्त्री सुनीलच्या वडिलांकडे वळले, मोहिते साहेब..! सुरेखा चेक अप साठी त्या हॉस्पिटलमध्ये जायची तेव्हा तिच्यासोबत कोण जायचं.. कधी कधी अपेक्षा जायची नाहीतर सुरेखाची आई जायची सोबत, मोहिते म्हणाले..
काय झालं शास्त्री बुवा, काही कळलं का ? तुम्हाला, अजिंक्य म्हणाला.. हो पंत..! सुरेखाला एका अहंकारी माणसाने झपाटलेलं आहे... ते ही त्याच हॉस्पिटलमध्ये जिथे सुरेखा वारंवार चेक अप ला जात होती, शास्त्री बोलले.. ह्या घरात जो मुंजा बनून फिरतोय, खरतर तो आपल्या मदतीसाठीच आलाय आणि हा मुंजा दुसरा तिसरा कोणी नसून विश्वासरावांचे मामा अण्णा आहेत... त्यांनीच मला सांगितलं..
शास्त्री बुवा बोलू लागले, एके दिवशी नेहमीप्रमाणे सुरेखा रुटीन चेकअप साठी हॉस्पिटलमध्ये गेली होती, त्यावेळेस तिच्या सोबत अपेक्षा होती, म्हणून ते संकट अपेक्षा वर पण आलं. चेकअप झाल्यानंतर सुरेखा ज्या बाकावर बसली होती तिथुन थोड्या अंतरावर नुकतंच मेलेलं प्रेत होतं.. तिची नजर त्या प्रेतावर पडली आणि सुरेखा न राहावता त्या प्रेतावर हसू लागली... कारण त्याचा चेहरा विचित्र होता.. पण सुरेखाला माहीत नव्हतं की तो झोपलेला माणूस प्रेत आहे...त्यामुळे ती सहजच हसून गेली...पण जेव्हा तिला ती गोष्ट कळली तिने सोबत असलेल्या अपेक्षाला सांगितलं, अप्पू..! मी त्या झोपलेल्या माणसावर चुकुन हसले.. आई ग कसा दिसतो तो, बघ ना... आणि मला वाटलं तो झोपला आहे पण ते मृत प्रेत आहे.. हे सांगत असताना सुद्धा सुरेखा हसली होती... तिथूनच हा सगळा प्रकार सुरू झाला... त्या प्रेताचा आत्मा तळमळला, प्राण हळहळला.. त्याचा अहंकार दुखावला आणि त्याचक्षणी त्याने शब्द दिला, " बघतोच बाळाची पाचवी कशी पूजते " ...इकडे सुरेखा हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेली होती..
पण नकळतपणे तिच्या हातून खूप मोठी चुक घडली होती ज्याची शिक्षा तिला आणि तिच्या बाळाला ह्या रुपात भेटत आहे, शास्त्री बोलून थांबले.
शास्त्री पुढे म्हणाले, मुळात, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या दोन दिवसाआधीच सगळी सुरुवात झाली. तिच्या मनावर भीतीने कब्जा केला. रात्रीची ती मध्येच उठून बसायची... बरोबर शास्त्रीबुवा हे मी स्वतः अनुभवल आहे, सुनील मध्येच म्हणाला..
पण पोटात असलेल्या बाळामुळे आणि गळ्यात बांधलेल्या गावच्या कुलदैवताच्या ताविज मुळे ती सुखरूप होती.. पण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमापर्यंत तिच्यावर तो सैतान अर्ध्यापेक्षा जास्त हावी झाला होता. मध्ये मध्ये तो त्याच अस्तित्व जाणवून द्यायचा... जस की डोहाळे जेवणाचे अलबम बघा, शास्त्रींनी अलबम सर्वांच्या पुढ्यात केला, बघा सुरेखाचे सगळे फोटो त्यात तिचा चेहरा हा पुरुषी आकारासारखा दिसतोय.. डोळे बारीक आणि मिचमीचत आहे.. फोटो जुना झाला असूनही, तो फोटो अजूनही जिवंतपणाचं दृश्य दाखवतोय... सगळ्यांनी फोटो पाहिले सगळ्यांच्या काळजात धस्स झालं, सगळ्यांचे डोळे मोठे झाले.. कारण फोटोमध्ये खरच सुरेखा एका शालीन बाई प्रमाणे न दिसता एखाद्या अहंकारी, रागीट पुरुषा सारखी दिसत होती...
चला लवकर आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. रात्री बारा वाजता आपल्याला सुरेखाचे केस, जुनी साडी, थोडस रक्त हे सगळं एक काळ्या बाहुली सोबत गावाजवळच्या स्मशानात त्या व्यक्तीच्या प्रेताला कबरीमधून बाहेर काढून बरोबर रात्री बारा वाजता जाळून टाकायची आहे.. तत्पूर्वी, मोहिते साहेब तुम्ही तुमच्या गावी कोणा नातेवाईकाला सांगून कुलदैवतला त्या काळ्या कापडातून मुक्त करा.. मोहित्यांनी गावी फोन फिरवला...
स्मशानात आणि घरी कोण कोण राहणार हा प्रश्न पडला..विश्वास बोलला, मी सुरेखाला सोडून नाही जाणार भलेही काही ही होऊ दे.. शेवटी ठरलं...
सुनील आणि अजिंक्य हे स्मशानात जातील आणि शास्त्री बुवा, महादेव, सरिता आणि विश्वास हे सुरेखाच्या आई बाबांसोबत राहतील.. रात्रीचे अकरा वाजले होते... सुरेखा अजूनही बेशुद्ध होती...
सुनील आणि अजिंक्य स्मशानाच्या वाटेने त्या घनदाट जंगलातून हळू हळू पुढे निघाले.. आज ची रात्र खूप महत्त्वाची होती.. सगळीकडे फक्त काळोख, रात किडे किर्रर्रर्रर्र करत होते.. मध्येच कुत्र्यांच्या विव्हळन्याचा आवाज येत होता.. हळूच वाऱ्याची झुळुक दोघांना स्पर्शून जात होती.. इकडे शास्त्री बुवा, महादेव आणि विश्वास घरात इकडून तिकडे फिरत होते.. सुरेखाचे आई, बाबा आणि सरिता सुरेखाच्या भोवती बसले होते...
आजची रात्र ... खिखिखी घरात तो किन्नरी आवाज घुमला.. सुरेखा डोळे बंद करून होती... महादेव त्या आवाजाच्या मागे गेला.. आवाज बेडरूम मधून येत होता.. तो आत गेला आणि बेडरूमचा दरवाजा बंद झाला...
महादेव दिसेनासा झाल्यामुळे शास्त्री बुवा त्याला शोधू लागला.. महादेव...महादेव... विश्वास आणि शास्त्री बुवा दोघे बेडरूमच्या दरवाज्यापाशी गेले पण दरवाजा आतून लॉक होता.. ते दोघे जोर लावत होते पण काहीच फायदा नव्हता...
आतमध्ये फक्त काळोख, आणि बेडवर ते हिरवट डोळे चमकत होते...ते दृश्य पाहून महादेवच्या तोंडचं पाणीचं पळालं... बाहेरून दरवाज्यावर थापा सुरूच होत्या... महादेव... महादेव...
काही मोजक्या गाव वाल्याना सोबत घेऊन सुनीलचे काका त्यांच्या शेतातल्या कुलदैवतेच्या मंदिराकडे निघाले.. वाटेत फक्त अंधार होता.. मशाल हाती घेऊन जंगलातुन वाट काढत सगळे पुढे सरसावत होते...त्या मशाली मुळे आजूबाजूला चांगलाच उजेड पडला होता.. काही अंतरावर त्यांना मंदिर दिसू लागलं..
***
स्मशानाच गेट चर्रर्रर्रर्र करत उघडल गेलं.. त्या दोघांनी आतमध्ये प्रवेश केला.. सुनील आणि अजिंक्य दोघे एकामागोमाग एक चालत होते... बाप रे ..! आता ती जागा कशी शोधायची अजिंक्य, सुनील म्हणाला... त्यावर अजिंक्य बोलला, काळजी करू नकोस सुनील, थांब... देवाने इथपर्यंत आपल्याला साथ दिली आहे, पुढे पण तो मार्ग दाखवेलच.. सुनील, माझ्या मागे चल, म्हणत अजिंक्य आणि सुनील दोघे स्मशानाच्या मधोमध आले.. स्मशान अगदी सामसूम होते..गळ्यातल्या लॉकेटला हात लावत अजिंक्य विचारात पडला, पुढे काय करायचं ? कस शोधायचं ते प्रेत...? अन स्मशानात असलेल्या एकमेव दिव्याचा प्रकाश येऊन सरळ अजिंक्यच्या लॉकेट वर येऊन पडला आणि त्याचा प्रकाश परावर्तित होऊन एका कबरीवर पडला, ज्यावर काळ्या अक्षरात कोरल होत, " कबर क्रमांक ४४०, मि. अलबर्ट डिसुझा "... मृत्यू दिनांक १२ एप्रिल २००७... अजिंक्यच्या मनातल्या चेतना त्याला अगदी आत्मविश्वासाने सांगत होत्या की हीच ती कबर आहे... त्याचसोबत त्याच्या गळ्यातील लॉकेट सुद्धा चमकत होत...अजिंक्यच्या डोळ्यात सकारात्मक ऊर्जा वाहत होती.. आज त्या खऱ्या वारसदाराच्या शक्तीची परीक्षा होती.. एका निर्दोष आईला, मुलीला, बहिणीला न्याय मिळवून द्यायचा होता... सैतानी शक्ती पासून मुक्ती द्यायची होती...
अजिंक्यच्या सांगण्यावरून सुनीलने ती जागा खोदायला सुरुवात केली.. अन हळू हळू वातावरणात बदल होऊ लागला.. ही शांतता अगदी जीवघेणी वाटू लागली.. वारा वाहू लागला.. पालापाचोळा उडू लागला...मेघगर्जनेसह आभाळ गुंजू लागले, कसबस सुनील ने प्रेत बाहेर काढलं. सडका वास आणि कुजलेला चेहरा पाहून सुनील ला उलटी आली... अजिंक्य स्थिर होता..
***
सुरेखा... सुरेखा.... करत हळूच आवाज चोहीकडे घुमू लागला... सुरेखाने डोळे उघडले, ती उठून बसली आणि विचित्र पद्धतीने मान तिरपी करून हसू लागली. तिची अशी अवस्था बघून बाजूला बसलेले आई, बाबा, सरिता सर्वजण घाबरून किंचित थोडे मागे सरकले आणि जोरात शास्त्री बुवांच्या नावाने किंचाळले. इकडे बेडरूमचा दरवाजा उघडण्याच्या नादात शास्त्री आणि विश्वास बाहेरून किंचाळण्याचा आवाज आला म्हणून हॉल कडे धावले.. आई, बाबा आणि सरिता तिघेही खाली पडले होते आणि सुरेखा बेडवर उभी राहून मोठं मोठ्याने हसत होती... हहहाह्हीहीही आणि किन्नरी आवाजात गुरगुरली, थोड्याचवेळात बारा वाजणार आणि मी हिला घेऊन जाणार... खिखिखी.. माझ्या वाटेत यायचं नाही...
विश्वास तिला पाहून बोलला, सुरेखा...! नाही तु मला सोडून नाही जाऊ शकत. अगं आपलं बाळ आहे त्याला तर अजूनही तु पाहिलं नाहीस.. बोलत विश्वास रडू लागला..
शास्त्री तिच्याकडे चालत येऊन बोलू लागले, सुरेखा ऐक, खाली बस, काही होणार नाही तुला... आम्ही आहोत ना ..
किन्नरी आवाजात तो पुन्हा गरजला, ये भटा ..! हरामखोरा तु जवळ यायचं नाहीस..नाहीतर बघ म्हणत सुरेखाने स्वतःचा गळा आवळला.. शास्त्री बुवा जागेवरच थांबले.. पुन्हा तो किन्नरी आवाज, तु असशील पंडित, विद्वान पण तुझ्या जगात, हे माझं जग आहे...खिखिखिह्हीहीही करत दोन्ही हात पसरवत सुरेखा हवेत उभी राहिली... तिला तस पाहून सरिता जोरात किंचाळली...आई ग....! सुरेखाच्या आईने तिला जवळ घेतलं...
शास्त्री बुवांनी सांगितल्या प्रमाणे अजिंक्यने विधी करायला सुरुवात केली.. स्मशानात वारा वाहू लागला.. सुनीलच्या डोळ्यात स्मशानातील माती गेली, डोळे चोळत चोळत त्याने समोर पाहिले तर थोड्यावेळापूर्वी जे प्रेत समोर झोपले होते तेच प्रेत त्याच्या पुढे उभे राहिले होते... त्याला दरदरून घाम फुटला...
सुरेखा हसू लागली कारण तिचा एक मोरका स्मशानात सुनीलचा जीव घेण्यासाठी तयार होता..आणि एक मोरका महादेवचा जीव घेण्यासाठी तयार होता..इकडे गाववाले अंतर कमी करत करत शेतातल्या मंदिराजवळ पोहोचले.. मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात कचरा, काटे वैगरे होते. आधी साफ सफाई करून मंदिर उघडू म्हणून सगळेजण साफ सफाई करू लागले..
आतल्या खोलीतून हिरवट चमचमणारे डोळे आता महादेवच्या दिशेने गुंज करत आले.. महादेव धीट होता, त्याला परिस्थिती हाताळत येत होती पण समोर जे अमानवीय होत त्याच्याशी दोन हात कसे करायचे, हे त्याला ठाऊक नव्हतं.. त्यामुळे तो किंचितसा मागे सरकला...देवाचे नामस्मरण करू लागला.. आणि त्याच्या पाठीचा धक्का एका वस्तूला लागला.. पाठीमागून त्याच शर्ट पाण्याने भिजल.. देव्हाऱ्यातला तांब्या त्याच्या धक्क्याने खाली पडला.. तिथे मोहिते परिवाराचा देव्हारा होता. महादेवने ताबडतोब पडदा बाजूला केला आणि एक ज्योत पेटवली.. तरीही त्या असुरी छायेवर त्याचा परिणाम होईना.. अर्थात खोलीत फक्त काळोख होता..त्यामुळे आत काय आहे हे नीटस दिसत नव्हतं.. दिवा विजला.. आणि ते भयानक उपद्रव अजून जवळ येऊ लागले.. आणखी जवळ आले, तो मोरका महादेवला हात लावणार तितक्यात महादेवने चेहरा हाताने लपवला आणि त्या मोरक्याला जोरदार झटका बसला.. तो लांब जाऊन पडला..महादेवला आश्चर्य वाटले पण जेव्हा त्याने त्याच्या हाताकडे लक्ष दिले तेव्हा त्याच्या हातात गुरुजींची रुद्राक्षमाळ होती, ज्याबद्दल तो पूर्णपणे विसरून गेला होता..
अपेक्षाने जेव्हा संमोहित होऊन सुरेखाच्या गळ्यातून ती माळ बाहेर फेकली होती तेव्हा अजिंक्यने ती उचलून महादेवकडे दिली होती.. त्या रुद्राक्षमाळे मुळे आज महादेवचा जीव वाचला होता... पण दरवाजा अजूनही बंद होता.
शास्त्री बुवांना काहीच करता येत नव्हते, ते फक्त सुरेखाचं विचित्र हसू आणि तिची वाईट अवस्था फक्त पाहू शकत होते. कारण जागेवरून जरा जरी ते हलले, तरी तो सैतान सुरेखाच्या शरीरावर घाव करत होता...घरात भरभर वारा वाहत होता, खिडकी आणि दरवाज्याची आदळ आपट सुरू झाली होती... सुरेखा आता तर हवेतच चालत होती, ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या मारत होती.. सगळ्यांचे डोळे चक्रावले होते.., विश्वास आणि बाकी सगळ्यांसाठी हे नवीनच होत..सुरेखाचा चेहऱ्यातुन आता रक्त वाहताना दिसू लागलं पण ते रक्त जमिनीवर पडत नव्हता.. स्वतःचाच रक्त ती हाताने पुसून जिभेने चाटत होती... तिची लाळ खाली पडत होती...
घरातील भांडे आपोआप पडत होते. खिडकीतून वारा भरभर आतमध्ये येत होता.. बारा वाजायला फक्त पंधरा मिनिटे उरली होती.. घराच्या बाहेर कुत्रे विव्हळत होते आणि घराच्या छतावर कावळ्यांची गर्दी जमा होऊन काव काव करत होती...
***
ते प्रेत आता हळू हळू सुनीलच्या दिशेने येऊ लागलं.. स्मशानात मिट्ट काळोख आणि धूर पसरला होता.. अजिंक्यने बुवांनी सांगितलेली सगळी सामग्री एकत्रित केली आणि मंत्र बोलू लागला, अजिंक्यच्या भोवती पिवळसर कवच निर्माण झाले.. तस त्या प्रेताने सुनीलकडे जाणारी दिशा बदलून अजिंक्यकडे आपली पाऊले वळवली पण ह्या गोष्टीपासून अजिंक्य अनभिज्ञ होता.. काळी बाहुलीला त्यांने आधी अग्नी दिली...त्याचा परिणाम इकडे सुरेखाच्या आतील सैतान विव्हळू लागला... आआआआआ.. ये हरामखोर पोरा ... तुझ्या नरडीचा घोट घेईल मी.. म्हणत तो सैतान हवेतून खाली जमिनीवर पडला... तस विश्वास आणि शास्त्री बुवांनी सुरेखाला घट्ट पकडलं..
इकडे अजिंक्यच्या अगदी जवळ येऊन ते प्रेत उभं राहील होत. काही आघात होणार इतक्यात लक्ख पिवळसर प्रकाश त्या प्रेतावर पडला.. मोठं मोठ्याने शंखनाद होऊ लागला होता. आकाशात सकारात्मक अगदी मजबूत अस वलय दिसू लागलं.. अर्थात, गावकऱ्यांनी आणि सुनीलच्या काकांनी मिळून देवाच्या वर असलेला काळा कपडा काढला आणि स्वच्छ पाण्याने देवांचा अभिषेक केला.. मंदिरात ताजी फुले आणि अगरबत्तीचा सुगंध दळवळू लागला.. मंदीरात आपोआपच दिवे दिपू लागले...अख्य मंदिर दिव्यांनी उजळून गेलं... काळ्या कापडातून देवांना बाहेर काढल्यावर निर्माण झालेला पिवळसर प्रकाशाने सरळ त्या प्रेताला राख करून टाकले.. देवांना त्या काळ्या कापडातून बाहेर काढल्याने सुरेखाशी निगडित असलेल्या बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या..
इथे सुरेखाच्या अंगातील सैतान रागाने लालबुंद झाला. आणि आता त्याला त्याचा अंत दिसू लागला पण अजूनही तो सुरेखावर हावी होता. शास्त्रींनी आणि विश्वासने सुरेखाला घट्ट पकडलं होत पण सुरेखाने जोरात धक्का मारून स्वतःची सुटका केली आणि दरवाज्याकडे पळू लागली...पिशवीतून हात टाकून शास्त्री बुवांनी राख बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण थोडावेळा पूर्वी झालेल्या झटापटीत सगळी राख खाली जमिनीवर सांडून गेली.. सुरेखाच्या शरीरासोबत तो सैतान घराबाहेर जाऊन तिला मारून टाकणार होता म्हणून बाहेर पळाला पण समोरून दरवाजा उघडला गेला अन तो सुरेखारूपी सैतान घाबरून पुन्हा मागे फिरला.. कारण,
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्...
मंत्र जोरजोरात बोलत स्वतः पं. अमित जोशी गुरुजी, प्रिया आणि निशा हे तिघेही मोहितेंच्या घरात प्रवेश करत आले होते..
गावच्या कुलदैवतेला काळ्या कापडातून मुक्त केल्यावर आलेल्या सकारात्मक ऊर्जेचा एक किरण गुरुजींच्या मस्तकावर पडला आणि निद्राव्यस्थेत असलेले गुरुजी भानावर येऊन मोहितेंच्या घरी निघाले होते...बोलतात ना, देवा त्याची लीला पूर्ण करूनच घेतो.. आज देवाचा दिवस होता.. आज कोणताही वार निकामी होणार नव्हता...
गुरुजी ह्यावेळेस पूर्णशक्तीनिशी आणि आत्मविश्वासाने त्या सैतानाचा सामना करायला तयार होते... आता मात्र सुरेखारूपी सैतान बिथरला, त्याला त्याची शक्ती कमकुवत वाटू लागली.. सैतान आज स्वतःच्या जीवासाठी जीवनदान मागू लागला... पण ह्यावेळेस नियतीला काही वेगळच मान्य होत... स्मशानात अजिंक्यने शेवटचा विधी म्हंटला, त्यासोबत त्या प्रेताची राख आणि सामग्री सोबतच अग्निमध्ये समर्पित केली...अग्नीचा भडका उडाला, शंखनाद झाला, वाऱ्याने दिशा बदलली, चोहीबाजूने मेघगर्जना होऊ लागल्या आणि तो सैतान नष्ट झाला... सुरेखाचं शरीर शांतपणे खाली जमिनीवर पडू लागले विश्वासने तिला अलगद हवेतच पकडलं आणि तिला उचलून बेडवर झोपवलं... बारा वाजून गेले होते आणि त्या सैतानाचं सावट सुद्धा सुरेखाच्या सावलीवरून निघून गेले होते.... वातावरण पूर्वीसारख शांत झाला. बेडरूमचा दरवाजा आपोआप उघडला गेला, महादेवही सुखरूप बाहेर निघाला... सुनील आणि अजिंक्य दोघेही सुखरूप घरी पोहचले... आता शेवटचं काम राहील होत.. अपेक्षा...!
शास्त्री बुवांनी आणि गुरुजींनी तिला बर करण्याचा मार्ग सांगितला, जो अजिंक्य च्या दिशेने होता.. अजिंक्य कडे असलेल्या लॉकेट द्वारे आपण अपेक्षाच आत्मा कैदातून मुक्त करू शकतो पण ह्याची खूप मोठी किमंत अजिंक्यला चुकवावी लागेल. ती म्हणजे त्याला वारस म्हणून मिळालेली दिव्यशक्ती.... हो ... लॉकेट द्वारे आत्मा कैदेतून मुक्त होईल पण नंतर ते लॉकेट साध्या लॉकेट प्रमाणे होईल शिवाय त्यामुळे अजिंक्यची शक्तीसुद्धा कायमची नष्ट होऊन जाईल....
अजिंक्यने वेळ न दडवता पुढे येऊन म्हणाला, गुरुजी आणि शास्त्री बुवा..! मी ही अमूल्य दिव्यशक्ती घेऊन जन्माला आलेलो नाहीये त्यामुळे माझी मुळीच हरकत नाही, माझ्या ह्या शक्तींमुळे जर आमची लहान बहीण अपेक्षा पुन्हा उठून उभी राहू शकत असेल तर कृपया करून तुम्ही तिला परत आना... मी सामान्य माणुस आहे, मला सामान्य माणसा सारखच आयुष्य जगायचं आहे...
स्वतःच्या बहिणीप्रति जिव्हाळा पाहून सुनील भारावून गेला त्याने अजिंक्यला कडकडून मिठी मारली, सोबत महादेव ही आला ... आता त्याचा पाय ही ठीक झाला होता....शास्त्री आणि गुरूजी दोघांनी अजिंक्यच लॉकेट घेऊन सोबत मंत्र म्हंटले आणि अपेक्षाचा आत्मा मुक्त केला. ती पुन्हा त्याच्या समोर उभी राहिली... अपेक्षा उठून सरळ आईकडे धावत गेली.. सगळे खुश होते..
सकाळी सात वाजता, सुनीलच्या घरी
सगळे जण हॉलमध्ये बसून बोलत होते... सुरेखा तिच्या बाळासोबत हसत होती, खेळत होती, बाळावर प्रेम करत होती... करणारच ना आज किती दिवसांनी त्या माऊलीला तीच वासरू भेटलंय... सकाळीच नंदिनीबाईं बाळाला घेऊन मोहितेंच्या घरी आल्या होत्या..विश्वास आणि सुरेखा दोघे सोबत बाळावर प्रेमाचा वर्षाव करत होते...
गुरुजी, शास्त्री बुवा आणि सुनीलचे वडील आपापसात कुजबुजत होते.. आत किचनमध्ये सरिता, प्रिया आणि निशा सुनीलच्या आईच्या मदतीसाठी गेल्या होत्या. अजिंक्य, महादेव आणि सुनील तिघे अपेक्षाला घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून सांगत होते..
गुरुजींनीच पुढाकार घेत सर्वांना हॉलमध्ये एकत्र बोलवलं आणि ते बोलू लागले, तर आम्ही तिघांनी मिळून म्हणजे मी, मोहिते साहेब आणि राघव शास्त्री असा निर्णय घेतला आहे की, आम्ही तुम्हा मुलांना लग्नाच्या बेडीत अडकवायचा विचार करत आहोत
म्हणजे सुनील - प्रिया, महादेव - सरिता आणि अजिंक्य - निशा बरोबर ना ...! मोहिते साहेब...
गालातल्या गालात हसू आतल्या आत दाबत मोहिते म्हणाले, बरोबर गुरुजी..! अगदी बरोबर बोललात.. मला तर ह्या मुलांनी एकमेकांसाठी शोधलेले जोडीदार आवडले आहेत..
सगळी मुलं एकमेकांकडे काहीतरी हरवल्यासारख पाहत होती आणि एकमेकांना डोळ्यांनीच इशारा करत होती, की तू बोल ना, तु बोल ना... म्हणून ...
शेवटी शास्त्री बुवा जोरात हसले, अरे बाळांनो..! गुरुजी आणि मोहिते साहेब तुमची मस्करी करतायत.. आम्हाला सर्वांना माहीत आहे, कोणाला कोणाशी लग्न करायचं आहे ते... चोरांनो...!
सुनील - सरिता, महादेव - निशा आणि अजिंक्य - प्रिया बरोबर आहे ना जोडी आता गुरुजी... लगेच प्रिया बोलली, बरोबर आहे .. आणि सगळ्या मुली लाजून आतल्या खोलीत गेल्या...
मोहितेंच्या घराला पुर्णतः सुरक्षित करण्यासाठी शास्त्रींनी आणि गुरुजींनी मजबूत अस सुरक्षा कवच बांधल आणि नेहमीसाठी त्यांचं घर सुरक्षित करून ठेवलं... काही महिन्यांनी तिघांच्या लग्नाचा दिवस उजाडला.. मित्र मित्रता नाही निभावणार तर कोण निभावणार... तिघांची लग्न एकाच मांडवात ठरली...
स्टेजवर सरिता, निशा आणि प्रिया नवरीच्या वेशभूषेत तयार होत्या. लग्नाचा विधी पार पाडण्यासाठी शास्त्री बुवा आणि गुरुजी दोघेही होतेच शिवाय मुलां मुलींचे आई वडील आणि अजिंक्यच्या बाजूने त्याचे एकमेव माऊली बाबा ही गावाहून आले होते... प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सापळे देखील उपस्थित होते...
लग्न मंडपात मस्त ढोल ताश्यांचा आवाज घुमत होता.. जो तो आनंदाने नाचत होता.. मंडपाच्या मेन गेट मधून तीन नवरदेवांचा प्रवेश झाला.. नाचत, हसत, खेळत सगळे आनंदाने लग्न सोहळ्याचा आनंद घेत होते... सुरेखा आणि तिचं बाळ दोघे मनसोक्त नाचत होते... तिन्ही नवरी मुली अत्यंत खुश होत्या, अर्थात आपल्या आवडत्या जोडीदारा सोबत त्यांचं लग्न होत आहे...
खिखिखिखीहिहीही... काय झालं अजिंक्य..? महादेव म्हणाला.. अरे तुला हसण्याचा आवाज आला का ? अजिंक्य म्हणाला.. सुनील तुला..!
नाही रे बाबा, काही ही काय ? गप बस आज लग्न आहे आपलं, उगाचच मनात काही आणू नकोस... आनंद लूट लग्नाचा, सुनील म्हणाला... तस अजिंक्य त्या लग्नाच्या सोहळ्यात हरपून गेला....
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम,
मोरेश्वरम सिद्धीधम
बल्लाळो मुरुडम विनायकमहम
चिन्तामणि स्थेवरम
खिखिखिहिह्हीही.......
गंगा सिंधु मंगलाष्गंम
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका
शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी
पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान
खिखिखिहिह्हीही.....कबर क्रमांक ४४०
समाप्त
सर्वांचे खूप खूप आभार सहकार्य केल्याबद्दल
पुन्हा भेटू लवकरच
