वारसदार भाग @ १
लेखक : - राहुल माघाडे" खरंच भुतं असतात का ? जर देव आहेत तर भुतं ही असतीलच..." अस महादेव ग्रुपमधील सर्व मित्रांकडे बघून बोलत होता. महादेव, सरिता, प्रिया, निशा, अजिंक्य आणि सुनील हे सर्वजण शाळेपासूनचे जिगरी मित्र, पुढे कॉलेजमधील शिक्षण पण सोबत पूर्ण केलं. नुकतंच कॉलेज संपलं होत, त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व मित्रांनी मिळून शहराबाहेर कुठेतरी दूरवर एक रात्र मुक्काम प्रवासाच्या सहलीला जावं म्हणून तश्याप्रकारे नियोजन करायला सुरुवात केली. त्यांनी मोठं अस प्रशस्त पाच बेडरूमचं अस फार्महाऊस चं बुक केलं. त्यात इनडोर - आउटडोर गेम, स्विमिंग पूल, व्हेज - नॉन व्हेज जेवण, सकाळचा नास्ता, चहा, कॉफी, आजूबाजूला प्रशस्त असा बगीचा आणि त्यात शोभा वाढवण्यासाठी फार्महाऊस च्या लगतचं वाहत असलेलं नदीच पाणी. ह्या अश्या निसर्गरम्य वातावरणात रात्रीच्या वेळी मध्यभागी शेकोटी करून व प्रत्येकाच्या हातात चहा अन कॉफीचा आस्वाद घेत सर्व मित्र - मैत्रिणी शेकोटी भोवती गोलाकार बसून भुताखेतांच्या गप्पा गोष्टी करत बसली होती.
" महादेव खरंच असतील का भुतं ? सरिता म्हणाली. तिला रोखून प्रिया बोलू लागली, " अगं..! खरच भूत असतात आणि शक्यतो भुतं ही अमावस्येच्या रात्री दिसतात, ते ही फक्त मनुष्यगण असलेल्या व्यक्ती ला, असे माझे बाबा सांगत होते. " आता प्रिया चे बाबा म्हणजे नाशिकचे पंडित, अत्यंत हुशार, वेद पुराणाची चांगली माहिती असणारे व्यक्तिमत्त्व होते. सध्या सत्तरी ओलांडली होती, अन त्यात तब्येत ही काही प्रमाणात खालावलेली असते म्हणून प्रवास टाळतातच.
अमानवीय शात्रानुसार मनुष्य तीन गणामध्ये विभागला गेला आहे. देव गण, ह्यांना भूत दिसत नाही पण त्रास होतो. राक्षस गण, ह्यांना भूत दिसतही नाही आणि त्रासही होत नाही. मनुष्य गण, ह्यांना भूत दिसतात अन त्रास ही होतो. तर अश्याप्रकारे हे शास्त्र असत. प्रियाचे बाबा विद्वान त्यामुळे त्यांच्याकडून थोडीफार माहिती प्रियाला ही मिळाली होती.
शेकोटीवर हात शेकत निशा तिच्या गावचा किस्सा सांगू लागली की, रोज रात्री त्यांच्या अख्या गावावर प्रत्येकाच्या घरच्या छतावर दगड फेकायचा आवाज येतो अन तो आवाज अजूनही येतो, तुम्हाला जर हे अमानवीय कृत्य बघायचं असेल तर माझ्या गावी तुम्ही येऊ शकता. हे ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. थोडावेळासाठी भयाण शांतता पसरली अन त्याच शांततेचं औचित्य साधून मध्येच अजिंक्य ने त्याच्या गावचा किस्सा सांगायला सुरुवात केली, त्याच्या घरी सर्व जण झोपल्या नंतर रात्रीची हळूच त्याची आजी उठते आणि बाहेरच्या झोत्यावर जाऊन बसते आणि अजिंक्य च्या आजोबांशी गप्पा मारते, जे आज हयात नाही, ४ -५ वर्षांपूर्वीच सोडून गेले. आणि मुख्य म्हणजे त्याचे आजोबा रोज येतात, आजी शी गप्पा मारतात ते ही घराचा उंबरठा न ओलांडता. आणि आजी सुद्धा हाकेच्या अंतरावर बसून त्यांच्याशी गप्पा मारते आणि कधी आजोबा बोलता बोलता नाहीसे होतात कळत सुद्धा नाही. हे ऐकुन तर आता सर्वांची चांगलीच टरकली.
" ये गप बसा रे, त्यापेक्षा आपण दुसऱ्या विषयांवर बोलू " अस म्हणत सरिता ने विषय बदलला. पण बाकीच्या मुलांना हाच एक मौका मिळाला मुलींची टिंगल उडवण्याचा त्यामुळे सर्वचजण भुतांच्या गोष्टींसाठी आग्रही झाले. " अरे सुनील आणि मी तर रस्त्यांवर पडलेलं नारळ, हळद - कुंकू लावलेलं, टाचण्या टोचलेलं लिंबू पायाने उडवलं आहे त्यामुळे मनात आणू नका, काही होत नाही. घाबरून राहीलं, तर भीती ही वाटणारच," महादेव म्हणाला. " अरे मित्रांनो काही होत नाही, एवढं लक्ष द्यायचं नसत, मी नाही घाबरत ह्या अश्या गोष्टींना ", आता सुनील लाही जोर आला. त्यावर सरिता म्हणाली, अरे सुनील, पण निशा आणि अनिश ह्यांच्या सोबत घडलेला किस्सा ते काय आहे मग. आपले मित्र आपल्याला खोट तर नाही सांगणार. त्यावर सुनील ने उत्तर दिले की आपण स्वतःच्या डोळ्याने नाही पाहिलं आहे आणि राहिला प्रश्न त्यांनी सुद्धा तो अनुभव स्वतः नाही घेतला आहे. मी हे नाही बोलत की ते खोट बोलत आहे, पण फक्त ऐकीव गोष्टींवर आपण तरी विश्वास नको ठेवावा. आपण २१ व्या शतकातले मुलं आहोत. आज मेडिकल सायन्स किती पुढे गेलं आहे. सुनील च बोलण सर्वांना पटलं. दोन दिवस मज्जामस्ती करून सर्व जण परतीच्या वाटेला निघाले. मनात एक होतच की पुन्हा लवकर भेट होणं नाही.
वर्षभरापूर्वीच मि. मोहितेंच्या मोठ्या मुलीचं सुरेखाच लग्न झालं होतं. शहरापासून थोड अंतरावर असलेल्या कोळशेवाडी ह्या छोट्याशा गावातल्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या घरात तिचा संसार सुरू झाला होता. माहेरची सुरेखा मोहिते आणि आता सासरची सुरेखा सरपोतदार झाली होती. लेकीचं लग्न झाल्याने मि. मोहिते अगदी आनंदी आणि निर्धास्त झाले. डोक्यावरचा खूप मोठा ताण कमी झाला. आता फक्त एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांना चांगलं शिक्षण देऊन योग्य तो करिअर निवडून लग्न करून देऊ व त्यांच्यासाठी जमवलेली सेविंग त्यांना देऊन गावी शेती करायचा त्यांचा विचार होता. मोठी मुलगी सुरेखा जीच आताच लग्न झालं होतं, त्यांनतर धाकटी मुलगी अपेक्षा मोहिते आणि सर्वात लहान म्हणजे सुनील मोहिते जो नुकताच कॉलेज पूर्ण करून कॉलेजच्या मित्रांसोबत सहल एन्जॉय करून आला होता. पण हसत खेळत असलेल्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागतेच ना ...! तसचं काहीसं ह्या परिवारासोबत झालं.
दोन वर्षांनतंर...
टेलिफोनची बेल वाजते.. ट्रिंग... ट्रिंग...हॅलो प्रिया आहे का ? हा प्रिया बोलतेय आपण.
( अत्यंत गंभीर आवाजात )
सुनील : - मी सुनील बोलतोय.
प्रिया : - हे, हाय सुनील कसा आहेस. घरी सगळे कसे आहेत. आणि आपले बाकीचे मित्र भेटतात की नाही.
प्रियाचं बोलणं मध्येच मोडून सुनील बोलू लागला, मला तुझ्या बाबांशी थोडं महत्त्वाचं बोलायच आहे. प्लिज त्यांना देतेस का ?
प्रिया : - काय झालं रे अचानक ? आणि बाबा सध्या घरी नाहीत, बॉडी चेक अपसाठी तालुक्याच्या दवाखान्यात गेले आहेत. झालं काय आहे ते सांग, तुझा आवाज एवढा गंभीर का येतोय.
सुनील : - ते फोनवर सांगता येणार नाही, भेटून सांगतो आणि येताना सर्वांना सोबत घेऊन ये, आपल्या नेहमीच्याच ठिकाणी... अस बोलून सुनील ने फोन ठेवला...
***
नुकतंच जन्मलेलं चार - पाच दिवसाचं बाळ. त्यात बाळाच्या आईची ही अशी अवस्था, बाळाला उचलून दूध सुद्धा पाजू शकत नव्हती ती, एवढी हतबल झाली होती. पण करणार काय. नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. घरचे तर अक्षरशः रडकुंडीला आले होते. आज बरोबर महिना होऊन गेला होता पण शेवटी अपयशच हाती येत होतं.अस वाटत होतं सर्व मार्ग बंद झाले आहेत.
कधी त्या बाळाला मायेचा स्पर्श जाणवेल ?
कधी त्या आई अन बाळाची भेट होईल ?
कधी त्या विधात्याला मायेचा पाझर फुटेल ?
.
.
.
.
कधी......
खि खि खि... किन्नरी आवाजातलं ते अतिशय भयानक हसु मध्येच पुरुषी आवाज घेत, त्याची शक्ती किती अफाट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत होत. त्याच्या अवतीभवती काही माणसं बसून त्याच्याकडे अगदी रागाने तर कधी भावुक होऊन बघत होती. आणि तो किन्नरी आवाज एखाद्या जंगली श्वापदा प्रमाणे सगळीकडे आपली भयानक नजर टाकत होत. हे सगळं रात्री एखादं भयानक स्वप्न पडावं अस काहीस विचित्र दृश्यासारख दिसत होत. सगळीकडे नजर फिरवून शेवटी एखाद्या हिंस्र प्राण्यांच्या आवाजात एकदम जोरात आवंडा गिळत तो तिच्या मुखातून बोलला, नाही नाही अगदी किंचाळलाच, " मी बोललो होतो ना बघतोच मी..! बाळाची पाचवी कशी पूजता ते "..
हाहाहाहहहह... खिई खि खि खि ....
.
.
.
.
.
.
.
क्रमशः