भय नावाचा शब्द या चित्रपटासमोर फिका पडेल.याला अमानुष हत्याकांडाची मालिका म्हणता येईल.या सिरीजचे खूप भयपट आहेत.सर्व भागात रक्तपात ठासुन भरला आहे.हा रक्तपात बघताना कधीकधी किळस वाटते.प्रत्येक भयपट पहिल्यापेक्षा भयानक आहे.एक दोन भाग अतिशय रटाळ आहेत.तरी wrong turn series बाकी भयपटांपेक्षा वेगळी आहे.यातील थ्री फिंगर,सॉ टूथ आणि वन आय नावाच्या तीन भावांनी लहान असताना आपल्या आईवडीलांना खाल्लेलं असतं.एकाने आपल्या हाताची दोन बोट खाल्लेली असतात म्हणून त्याला थ्री फिंगर नाव पडत.हा थ्री फिंगर खूप हुशार असतो.दुसर्याने आपला एक डोळा काढून खाल्ला म्हणून त्याला वन आय नाव पडलं.तिसरा आपले दात भिंतीवर घासत असायचा त्याला सॉ टूथ नाव पडल.सॉ टूथच तोंड लोखंडी पत्र्याने बांधाव लागायच.सिरीजमधला पहिला चित्रपट 2003 मधे आला.हा पहिला चित्रपट या सिरीजमधल्या बाकीपेक्षा सरस आहे.
याची सुरुवात वेस्ट व्हर्जिनीयातील एका जंगलातून होते.एक जोडप ट्रेकिंगला आलेलं असतं.रिची आणि हेली नावाचं ते जोडप असतं.रिची रोपच्या साहाय्याने वर जातो.त्याला खाली घाण पाण्याने भरलेलं डबक दिसत.रिची गायब होतो,हेलीच्या रोपला झटका बसतो.कोणीतरी तिला वर ओढत असत.ती रिचीला आवाज देते.तिच्या तोंडावर रक्ताचे थेंब पडतात.ती वर बघते तिला डोक फुटलेला रिची दिसतो.कोणीतरी रिचीला खाली फेकून देत.ती आपल्याकडच्या चाकूने रोप कापते.पाय घसरुन खाली रिचीजवळ पडते.डोक्यात दगड घालून त्याला मारलेल असत.वर कोणीतरी विचित्र आवाजात हसत खाली येत असत.हेली जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाते.पळताना एका लोखंडी तारेला अडकून खाली पडते.कोणीतरी तिचे पाय मागे ओढतो...
नंतर या भागात घडणारे भयानक प्रकार दाखवतात.गायब होणार्या लोकांची नाव दिसतात..
गाडी बिघडल्याने चार जण फोनच्या शोधात जंगलात फिरत असतात.त्यातील फ्रेन्सी आणि ईवान गाड्याजवळ थांबतात.ख्रिस आणि अजून तीन जण जंगलात जातात.रस्त्यात त्यांना मेलल मुंगूस दिसत.पुढे जंगलात गाड्यांचे टायर जळत असतात.ख्रिसला तिथं धोका जाणवतो.मागे थांबलेल्या ईवानला जंगलात हालचाल जाणवते.ईवान ती हालचाल कसली आहे बघायला जंगलात जातो.जंगलात गायब होतो.त्याच्यासोबत असलेली फ्रेन्सी नावाची मुलगी एकटीच पडते.ईवानला शोधत फ्रेन्सी जंगलात जाते.तिला ईवानचा एक बुट आणि कापलेला कान दिसतो.फ्रेन्सी मागे सरकते मागुन आलेले दोन हात तिच तोंड तारेने आवळून टाकतात.
पुढे गेलेल्या चार जणांची नजर एका घरावर पडते.घराच्या बाहेर बेवारस गाड्या पडलेल्या असता.ख्रिस फोनसाठी घरात शिरतो.घरात खूप घाण असते टेबलावर जेवणाच्या खरकट्या प्लेटभोवती माशा घोंगावत असता असतात.घरात गाड्यांच्या चाव्या,गॉगल ,खेळणी पडलेली असतात.गॅसवरच्या उकळत्या पाण्यात मांस असत.एक फ्रिज मांसच्या डब्यांची भरलेला असतंशो.एका डब्यात मानवी काळीज असतं.बाथरुममध्ये गेलेल्या मुलीला एका बरणीत माणसाची नख आणि दातांच्या कवळी दिसतात.बाथटबमधील लाल पाण्यात तुटलेला हात दिसतो.घरात त्यांना टोकदार तार सापडते.हे सगळ बघून ते चौघे घरातुन बाहेर निघतात.घराच्या दिशेने एक ट्रक येत असतो.मागे असणारा दरवाजा बंद असतो.ते चार जण घरात लपतात.ख्रिस आणि एक मुलगी खाटेखाली लपतात.दरवाजा उघडून ते तीघे भाऊ आत येतात.एक जण खांद्यावर असलेल फ्रेंसीच प्रेत खाली फेकतो.फ्रेन्सीच्या तोंडातून निघालेल रक्त खाटेखाली लपलेल्या ख्रिसच्या हाताला लागते.थ्री फिंगर करवतीने फ्रेंन्सीचा पाय कापतो.जेवण करुन ते तिघे झोपी जातात...घरातुन बाहेर पडल्यावर या चौघांची जीव वाचवण्याची धडपड सुरु होते.शेवटी फक्त ख्रिस आणि एक मुलगी वाचते...