हॉलिवुडचे मारधाडीचे चित्रपट कधी बघावे वाटत नाही.गुरुत्वाकर्षनाचे नियम धाब्यावर बसवून चाललेली हाणामारी डोळ्यांना बघवत नाही.हॉलिवुडचे भयपट आवडीने बघावेसे वाटतात.ते साऊंड इफेक्ट,चित्रपटाचे लोकेशन जबरदस्त असतात.मारधाडीच्या चित्रपटात दाखवत नसलेली सुंदर ठिकाण भयपटात बघायला मिळतात.2018 सालचा द नन दोन तीन वेळा पाहिला.कुठे मिळाला तर जरुर बघा.
द नन या भयचित्रपटाची सुरुवात 1995 साल रोमानियातून होते.सुरुवातीला दोन नन एका रुमच्या दिशेने चाललेल्या असतात.त्यांच्या दोन्ही बाजूला ख्रिश्चन धर्माचे पवित्र क्रॉस लावलेले असतात.क्रॉस भुतं आत्मा अमानवी शक्तीला विरोध करण्यासाठी लावलेले असतात.एका भिंतीवर लॅटिन भाषेत देवाची साथ ईथपर्यंतच असे लिहीलेले असते.त्यातील एक नन चावी घेऊन दरवाजाकडे जाते.दुसरी व्हिक्टोरीया नावाची नन तिला म्हणते देवावर विश्वास ठेव आणि ती येशुची प्रार्थना करु लागते.आत गेलेली नन रक्तात न्हाऊन बाहेर येते.बाहेर उभ्या असलेल्या ननकडे चावी देऊन म्हणते तुला माहित आहे काय करायचं.त्याच्या हाती लागू नकोस त्याला फक्त एक शरीर पाहिजे.तितक्यात एक अदृश्य शक्ती त्या ननला आत ओढते.बाहेर उभी असलेली व्हिक्टोरीया नन चावी घेऊन पळून जाते ईश्वराची माफी मागून आत्महत्या करते.तिच्या मागे एक demon सैतान उभा असतो.तो एका ननसारखा दिसत असतो.दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती जीच नाव फ्रेंची असतं तो दाखवला जातो.फ्रेंची महालातल्या ननला किराणा पुरवण्याचे काम करत असतो.त्याला व्हिक्टोरीया ननच कलेवर दिसत.त्यावर कावळे चोच मारत असतात.
पुढच्या दृश्यात व्हॅटिकन सिटी दाखवली जाते.फादर आणि बिशप चर्चा करत असतात.रोमानियात एका नन ने आत्महत्या केली हा चर्चेचा विषय असतो.या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी त्यांना तिथं जायच असत.यासाठी फादर एका सिस्टरला सोबत घेतात. सिस्टरने अजून ननची शपथ घेतलेली नसते.फादर आणि सिस्टर आत्महत्येच्या चौकशीसाठी रोमानियाला जातात तिथे जाऊन फ्रेंची ला भेटतात.फ्रेंची त्यांना सांगतो गावातील लोक महालात यायला घाबरतात.फ्रेंची तीन महिन्यांतून एकदाच ईथे किराणा ठेऊन जातो.पहिल्यांदा फ्रेंची तिथं जायला घाबरतो पण फादरने विनंती केल्यावर जायला तयार होतो.ननची प्रेत ठेवलेल्या जागेवर तो दोघांना घेऊन जातो.पण ते प्रेत बसलेल्या अवस्थेत पाहून फ्रेंची घाबरतो.तो फादरला सांगतो कि त्याने ननचे प्रेत असे ठेवले नव्हते.फादरला ननच्या हातात चावी दिसते.फादर ती चावी आपल्या खिशात ठेवतात.फादर ती चावी खिशात ठेवताना शेजारचा दरवाजा वाजतो.फ्रेंची त्यांना सांगतो नन या दरवाजातून किराणा घेऊन जायची.नन बाहेर येत नव्हती.फादर त्या प्रेताच दफन करतात.त्याच वेळी शेजारच्या कबरमध्ये घंटी वाजते.फादर सिटरला सांगतो ही कबर प्रथम महामारी तील आहे.जर एखाद्या माणसाला मृत समजून दफन केल तर तो घंटी वाजवून सांगतो कि तो मेला नाही.
फ्रेंची दोघांना ननचे प्रेत सापडलं तिथं घेऊन जातो.त्याच वेळी महालातील एका खिडकीवर फादरला ननची सावली दिसते.जमीनीवरचे ताजे रक्त पाहून फादरला आश्चर्य वाटते.ननच्या आत्महत्येला दोन आठवडे झाले असतात.आत तिघांना तोंड झाकलेली एक नन दिसते.तिचा आवाज भयानक असतो.ती नन दोघांना तिथून जायला सांगते.पण फादर तिला सांगतात ते दोघे निघून गेले तर दुसरी लोक ईथ चौकशीसाठी येतील.यानंतर ती नन फादरला दुसरीकडे थांबायला सांगते.कारण त्यांच्या प्रार्थनेची वेळ झालेली असते.रात्री महालातील सर्व दरवाजे बंद होणार असतात.ती दोघांना सकाळी यायला सांगते.फादर फ्रेंचीला तिथून जायला सांगतात.जात असताना फ्रेंचीला एका ननची सावली दिसते.एक सैतानी नन त्याच्यावर हल्ला करते.फ्रेंची तिथून पळून जातो.
पुढच्या दृश्यात फादर आणि सिस्टर जेवणाच्या टेबलवर चर्चा करताना दिसतात.सिस्टर त्यांना सांगते कि तिला लहानपणी खूप विचित्र दृश्य दिसायचे.फादर सिस्टरला वीस वर्षापुर्वीची एक गोष्ट सांगतात.एका मुलाचा मुत्यु झाला होता.फादर त्याच्या मुत्युला स्वतःला जवाबदार मानत होते.त्या रात्री फादर झोपेतुन उठतात त्यांना एक सावली दिसते.ती एका मुलाची सावली असते.फादर दफनभुमी पर्यंत त्या सावलीचा पाठलाग करतात.फादरला समजते हा मुलगा डॅनियल आहे त्याचा चेहरा सैतानी आहे.त्याच वेळी डॅनियलच्या तोंडातुन निघालेला साप फादरवर हल्ला करतो.फादर घाबरुन एका कबरीत पडतात आणि जिवंत दफन होतात.फादर कबरीवरची घंटा वाजवतात.त्याच वेळी सिस्टर जागी होते.सिस्टरला हलक्या आवाजात प्रार्थनेचा आवाज येतो.ती आवाजाच्या दिशेने जाते.एक भयानक नन तिचा पाठलाग करते.पुढे सिस्टरला खूप नन प्रार्थना करताना दिसतात.सिस्टरला ती भयानक ननसुध्दा दिसते.ती हळूहळू मागच्या आरशात उतरत असते.आरशातील नन सिस्टर वर हल्ला करते.सिस्टर घाबरुन तिथून पळ काढते.सिस्टर दफनभुमीकडे जात असते.तिथे तिला फादरच्या ओरडण्याचा आणि घंटीचा आवाज येतो.हळूहळू सगळ्या कबरीवरील घंटी वाजू लागते.सिस्टर फादरची कबर शोधून काढते.सिस्टर फादरची कंबर खोदत असताना एक प्रेत कबरीतच फादरवर हल्ला करते.शेवटी सिस्टर फादरला कबरीतून बाहेर काढते.फादरला कबरीत काही पुस्तक सापडतात.फादर ती स्वतः जवळ ठेवतात.
दुसऱ्या दिवशी फादर महालात जाऊन त्या ननला आवाज देतात.पण तिथं कोणी नसतं.तेवढ्यात दरवाजा उघडतो फादर आपल्याकडील चावी सिस्टरला देतो.सिस्टर आत गेल्यावर तिला एक नन दिसते.सिस्टर ननला आवाज देते पण ती काही थांबत नाही.तिचा पाठलाग करत ती एका ठिकाणी जाते.तिथे ती नन प्रार्थना करत असते.सिस्टर तिला आवाज देऊन तिची प्रार्थना भंग करण्याअगोदर अहाना नावाची सिस्टर तिला थांबवते.ती सांगते कि ही नन कित्येक शतकांपासून ईथ प्रार्थना करत आहे.
दुसरीकडे फ्रेंचीला अस समजते कि लुका नावाच्या व्यक्तीच्या मुलाने तिथे आत्महत्या केली आहे.ही घटना आणि गावातील बाकि वाईट घटना त्याच शापित महालामुळे होत असतात.फ्रेंचीला समजते कि फादर आणि सिस्टरच्या जीवाला धोका आहे.तो बंदूक घेऊन तिकडे जातो.फादर कबरीतुन मिळालेली पुस्तक वाचत असतात.तेवढ्यात ज्या दरवाजातून सिस्टर गेलेली असते तो दरवाजा बंद होतो.आहाना सिस्टरला सांगते कि वास्तू सहा ते दहाव्या शतकात एका राजाने बनवली आहे.ईथल्या राजाने काळी जादू जादूटोण्याच्या विद्या लिहल्या.तो नरकातून काळ्या शक्तींना पृथ्वीवर बोलवू इच्छित होता.नरकाने या गोष्टीचा फायदा घेत तो दरवाजा उघडला.तेवढ्यात चर्चच्या लोकांनी महालावर हल्ला केला.आणि पवित्र रक्ताने तो दरवाजा बंद केला.तेव्हापासून ईथे प्रार्थना चालू झाली.प्रार्थनेमुळे सैतान तिथेच अडकला.पण युद्धात झालेल्या बॉम्बहल्ल्याने दरवाजा उघडला.
काल महालात दिसलेली नन अमानवी होती.ननची रुप घेऊन ती ईथे फिरायची.ती सर्व पवित्र ननवर आपला प्रभाव टाकत होती.या अपवित्र ननचा आणि त्या बंद दरवाजाचा संबंध होता.यामुळे सिस्टर व्हिक्ट़ोरीयाने आत्महत्या केली.तेवढ्यात एक नन येऊन सांगते कि आमच्या प्रार्थनेचा टाईम झाला आहे.सिस्टर ला ईथुन जावे लागेल.पण सगळे दरवाजे बंद झाल्याने तिला आजची रात्र इथेच काढावी लागणार होती.सिस्टरला एका दरवाजात कोंडले जाते.
फादर महालाचा नकाशा बघत त्या दरवाजापर्यंत पोहोचतात.फादरला एक नन भेटते ती त्यांना सांगते कि आता सिस्टर परत येणार नाही.एवढे बोलुन ती पुतळ्यासारखी शांत उभी राहते.फादरने तिला हात लावताच ती त्यांच्यावर हल्ला करते आणि गायब होते.ईकडे खोलीत बंद असलेल्या सिस्टरला व्हिक्टोरीया ननच्या आत्महत्येच दृश्य दिसत.तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि ती बाहेर जाते.चालता चालता ती त्या दरवाजापर्यंत पोहोचते.त्यावर लिहीलेले असते ईश्वराची साथ ईथपर्यंतच दरवाजा उघडतो आणि पुन्हा ती सैतानी नन दिसते.ही सैतानी नन सिस्टर वर हल्ला करते.तेवढ्यात दुसरी नन येऊन तिला वाचवते आणि सांगते सैतान आता खूप ताकदवान झाला आहे.फक्त प्रार्थना आपल्याला त्यांच्यापासून वाचवू शकते.
ईकडे फादर वर आत्महत्या केलेला डॅनियल हल्ला करतो.फादर आईसहाऊसमध्ये जाऊन लपतो.तिथ दुसरी एक सैतानी नन त्यांच्यावर हल्ला करते.ऐनवेळी फ्रेंची तिथं येऊन फादरला वाचवतो.महालात खूप नन जमलेल्या असतात.त्या सर्व सैतानापासून वाचण्यासाठी प्रार्थना करत असतात.तेवढ्यात सैतानी नन तिथे येऊन त्यांची प्रार्थना भंग करते.सगळ्यांच्या कपड्यावर सैतानी चिन्ह बनवते.प्रार्थना करत असलेल्या एका ननवर सैतानी नन हल्ला करते.तिच्या शरीरावर एक सैतानी चिन्ह बनवते.फादर आणि फ्रेंची महालात येतात.सिस्टर त्यांना सांगते कि सैतानापासून वाचण्यासाठी खूप सार्या नन प्रार्थना करत आहेत.पण नंतर कळत तिथं कोणी नाहीये.तिथ एका ननच झाकलेल प्रेत असतं.त्यांना समजत आता कोणतीही नन जिवंत नाही.हा महाल आता अपवित्र झाला आहे.तेवढ्यात ते प्रेत फादरवर हल्ला करत.फादर पवित्र पाणी फेकून तिला जाळून टाकतात.
फ्रेंची सांगतो आता ईथे थांबणे धोक्याचे आहे.पण सिस्टर तो नरकाचा दरवाजा बंद करणे आवश्यक असल्याचे सांगते.व्हिक्टोरीया नन ने स्वतःहून आत्महत्या केली नव्हती.सैतान आणि तिच्यामध्ये एक करार झालेला असतो.सैतानाला फक्त एक शरीर हवं असत.पुढच्या विधी करण्यासाठी सिस्टरला संपुर्ण जीवन देवाच्या नावे करायला लागणार होते.त्यासाठी सिस्टरला ननची शपथ घ्यावी लागणार होती...यापुढे खरा खेळ चालू होतो.पुढे काय घडले जाणून प्रत्यक्ष चित्रपटात बघवा लागेल...