फितूर आभाळ
नारायणराव गर्गेंनी आपल्या ललितपूरची पूर्ण फर्म भुसावळ साईडला तापीकाठावर जमीन घेत विकसीत केली. आपल्या महाराष्ट्रातील माती त्यांना साद घालतच होती. त्यात बाजीची साथ मिळताच त्यांनी ललितपूरला राज डागामुळं राम राम ठोकला. सोनेवाडी साईड बाजीनं मुद्दाम बंदच करत भुसावळ साईड पाच सहा महिन्यातच डेव्हलप केली. बाला सुमीला शिक्षणासाठी जळगावला ठेवलं. किसनबा व जसोदा माय पोरांना सांभाळत जळगावलाच राहू लागले. किसनबानं बाजी व रचनास आधी जळगावला येण्यास नकार दिला. पण बाजीनं त्यांचं एक ऐकलं नाही.
" काका ,तुमचा दुलबा राहिला असता तर आला नसता का? मग का नकार देता आहात?"
" बाजी, तुझ्यापेक्षा बाला व सुमीत जास्त जीव अडकतो रे! कारण माझ्या दुलब्यानं ही सोनपाखरं माझ्याकडं सोपवलीत.पण आता तू आला मी बिनघोर झालो. पण मला जळगावला नको बोलवू.माझा दुलबा जळगाव सोडून जर सोनेवाडीत येऊन खपला तर मी का त्याला सोडून जळगावला येऊ! "
" काका असं समजा बाजी अजुन आलाच नाही!"
" तसं नाही रे पण एक सांगू का? तू पण सोनेवाडीत राहिला असता तर मला कोण आनंद झाला असता!"
बाजीचा ऊर दाटून आला.
" काका ,जिथं माझा दादा वहिणी ,माझा जन्मदाता माझी वाट पाहून पाहून ... गेलेत ,ती भूमी मी सोडतीय ती आनंदानं का? बिलकूल नाही. फक्त त्या रंजन हणम्याला रसातळाला घालण्यासाठी फक्त एक वर्ष आपण जळगावला राहू.एका वर्षात ते नाक घासत येतील. तो पावेतो सोनेवाडी सोडणं भाग आहे"
किसनाबास आता कुठं मनास धीर वाटला व तो आनंदानं जळगावी आला.
बाजी चार पाच महिने सर्व फर्म भुसावळ ला आणण्याच्या कामात दंग झाला.
नारायणरावांनी आपलं कुटुंब जळगावलाच नविन आलिशान बंगला उभारत शिफ्ट केलं.
आपण जमीन बाजीला मुळीच विकायची नाही असं ठरवत रंजन हणमंतराव परतले होते. पण गावची सारी जमीन गेली.जळगावचं घर गेलं.तो मिनाला घेत रांजणेवाडीत रहायला गेला.तर धनाचा माॅलच गेला राहतं घरच गेलं.ना काम ना धंदा. जमीन घेतेवेळी राधाच्या नावावर ही पतपेढी, बॅंकेमधून कर्ज काढलेलं. तिचा पगार हफ्ते कापून चार पाच हजार शिल्लक राहू लागला. धनानं जळगावला कामच उरलं नाही म्हणून सोनेवाडीतली आपली चार एकर जमीन तरी कसू असा आपणा पुरता विचार करत सोनेवाडीत आला व सासऱ्याच्या जुन्या घरात राहू लागला. हणमा ही कधी मिनाकडं रांजणेवाडीला तर कधी राधाकडं जळगावला राहू लागला. हणमंतरावास, रंजनला सुरुवातीस वाटत होतं की जर कारखान्याचं काम सुरु केलंय तर जमीनीसाठी नारायणराव येईलच.पण त्यांचा अंदाज सपशेल खोटा ठरला. उलट नारायणराव व बाजीनं ही साईड बंदच करून भुसावळ ला सुरू केली. म्हणजे त्यांनी ही साईड सोडलीच. मग आपण जमिनीचं काय करायचं.त्यात धनानं त्याचा त्याचाच विचार करत चार एकर कसायला सुरूवात केली. विशेष धना शेतात रात्री पण राहतो तरी त्यास संता व जनी......काहीच करत कशी नाही. आपल्याला तर पाय ठेवू देत नाही रात्री. धनानं सर्व जमीन कसायला काहीच हरकत नव्हती यानं रंजन त्याबाबत मनात अढी धरु लागला. तर रंजननेच आपला माॅल व्यवस्थीत चालत असतांना विनाकारण विकायला लावून आपणास बरबाद केलं म्हणून तो ही रंजन वर काट खाऊ लागला. म्हणून विकत घेतलेल्या तीस एकरमध्ये त्याचा ही हिसा होता तरी त्यानं तूर्तास दुर्लक्षच केलं. चार सहा महिन्यात रंजनला कंगालागत करत एकटं पाडलं बाजीनं स्वत: काही एक न करता. पण रचना व नारायणरावास सारं करायला लावण्यात मास्टर माईंड त्याचाच होता.आपल्याला तारण्यात आपलं चार एकर शेत घेण्यासाठी नारायणरावांनी जी मदत केली होती त्यासाठी तो रात्रंदिवस राबत होता.
हिवाळा संपला व उन्हाळा लागला.
भुसावळच्या साईडवरनं निघायला रात्रीचे दहा वाजले. रचना व बाजी दोघेच होते.नारायणराव जालन्याकडं गेलेले.
वातावरणात रात्र होताच उकाड्याची काहिली कमी होत गारवा वाटत ह़ोता.
गाडी हायवेवर दौडत होती.
" बाजी आज घरून निघतांना आबांचा जालन्याहून फोन होता.
" काय विशेष मॅम?"
" पुण्याचा मुलगा सिडनीला आहे. तो उद्या येतोय"
" सिडनीहून की पुण्याहून?"
रचनानं या बावळटछाप प्रश्नावर बाजीकडं तीव्र कटाक्ष टाकला.
बाजी निर्वीकारपणे समोर पाहत गाडी चालवत होता.
" तो कुठून येतोय,हे नाही महत्वाचं "
" मग?"
" तो जळगावला येतोय!" रचनाचा स्वर गाडीच्या फायरिंगसोबत वाढला.
" कशासाठी मॅम? सोनेवाडी साईड सुरु करायची की काय आबांना?"
" बाजी तो सिडनीला आहे ,तो काय बाजी नाही ग्रामीण भागात काम करायला!" रचनाचे गाल आता रागानं लाल होऊ पाहत होते.
" ते पण खरंय, आबासाहेबांसारखंच ग्रामीण मातीतून उगवून त्या मातीसाठीच राबायला बाजीलाच जमेल.बरं जाऊ द्या का येतोय तो?"
बाजीनं अप्परकटचा सिक्स मारत अरेरे कॅच होईल की काय असे मिश्कील भाव करत विचारलं.
" मि. बाजी तो मला पहायला येतोय"
" अरे व्वा! मग तर आमच्या सोबत ग्रामीण भागात राबणं ,फिरणं सुटेल तुमचं; नी सिडनीवासी होणार आपण!" बाजी निर्वीकारपणा तसाच ठेवत बोलला.
रचना अंधारात लालेलाल झाली. तिला आपला अपेक्षाभंग झाला याचं दुःख वाटलं.
" बाजी काय सांगू ,होकार देऊ का?"
" अर्थातच मॅम! आबांनी होकार दिला म्हणजे मुलगा चांगलाच असावा.आपण डोळे लावून येस करा!"
" अरे पण मला......!" ती रागानं काही बोलणार तोच जाऊ दे म्हणत ती शांत झाली.
बराच वेळ गाडीत शांतता पसरली.
" मॅम, काल रात्री सुमी विचारत होती!"
आता रचनाला बोलण्यात रुचीच राहिली नाही.तरी तिनं सुमी म्हटल्यावर नाईलाजानं
"काय विचात होती!" विचारलं.मनात तर बाजीचा संताप दाटत होता.
" काका रचना मॅडम माझी कोण लागते हो! नादान आहे हो काही ही विचारते!"
" मग तुम्ही काय उत्तर दिलं?"रचनाची छाती आता एकदम धडधडायला लागली.
" सुमे बावळटासारखं काहीही विचारायचं नाही .झोप बघू शांत!" म्हणत मी संतापलो व तिला झोपवलं.
परत रचनाचा संताप वाढला.
"....." ती धुसफुसत काहीच बोलली नाही व रागात बाहेर पाहू लागली.
जळगाव आलं. बाजीचं उतरण्याचं नाकं आलं तो खाली उतरला व रचना ड्रायव्हींग साठी बसू लागली.
तोच बाजी जवळ आला
" मॅम काल सुमीला मी रचना मॅम काकु लागते व आॅन्टीच ठोकून म्हणायचं हे सांगितलं बरं! नी हो सिडनीच्या पोरा आधी आबांनी मला जळगावला आपण आलो होतो कृषी मेळाव्याला त्या रात्रीच सांगितलं होतं,बाजी रचना तुझीच आहे!" नी तो हसत वळू लागला.
रचनानं त्याचा हात धरत त्याला गाडीतच ओढला नी चटाचट गालावर मारत त्याच्या छातीशी बिलगली.
" इतका छळ, का कधी एका शब्दानं बोलला नाहीस!" ती रडतच त्याला विचारू लागली.
" तु ही कधी स्पष्ट बोलली नाहीस मग का उगाच घाई; म्हणून वाट पाहत होतो.." बाजीनं तिला गाडीतच बाहूपाशात घेत म्हटलं.
नी मग तिनं त्याला गाडीतच घेत गाडी रस्त्याला लावली.
" आता कुठं निघालीस?"
" चल बोलायचं नाही ,मी आज सारी रात बेधूंद फिरणार नी मग गाडी अजिंठ्या रस्त्याला लागली.घरी फोन करत भुसावळलाच मुक्काम असल्याचं कळवलं गेलं.
सारी रात.... घुमा धुंद... गंधानिळ झरला, रात कात टाकत मोहरली.
रचनाचा व बाजीचा स्पष्ट होकार मिळताच नारायणरावांनी लग्नाचा बेत ठरवला.बाजीनं सोनेवाडीतच लग्न ठेवायचा आग्रह धरला. त्यासाठी लग्नाआधी दुलबाचं जुनं रंजननं पाडलेलं घर घाईत बांधण्यात आलं. अगदी साधं पण टुमदार.धनाची त्या जागेवर घर बांधू नका सांगण्याची हिम्मतच झाली नाही. लग्नात किसनबा व जसोदा माय यांनीच वडिलधारी म्हणून जबाबदारी उचलली. बाजीस आई बाबा संता दादा व वहिणीची आठवण येऊ लागली. नारायणराव व किसन बानं बाजीची समजूत घालत धनाला येऊ देण्याबाबत विनवलं. दुलबाच्या बाजीचं लग्न म्हटल्यावर दुलबाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेलं आख्खं सोनेवाडी उभं राहिलं. खाली मान घालत रडत धना व राधाही आले.
रंजनकडं तीस एकर जमीन तरी तो रूपयाला मोदात झाला. त्यानं खाल मानेनं हणमंतरावास काहीही करा पण ही जमीन विका व मला दुसऱ्याकडं जमीन घेऊन द्या. निदान ती तरी कसून सुखी राहीन. हणमंतराव व तो सोनेवाडी झर्रेवाडी,परतेवाडी,जळगाव फिरले पण गिऱ्हाईक मिळेचतना. कारण मूळ भाव जिथं आठ लाखाला महाग तिथं पंधरा लाख कोण देणार. नंतर तर यांनी भावात ही तडजोड केली. पण एक दोन एकर घेऊ असे फुटकळ गिऱ्हाईक येऊ लागले. सरते शेवटी सारा नांदचाळा सोडत शेअर्स का असेनात घेऊ. कारखाना सुरू झाला तर उत्पन्न तरी येईल असा शहाणपणाचा का मूर्खपणाचा विचार करत हणमंतराव मिरा रंजन जळगावला नारायणरावाच्या पायाला लागले.
नारायणरावांनी ती साईड रचना व बाजीची असल्यानं तेच निर्णय घेतील.त्यांनाच भेटा सांगत तुम्ही लवकर शहाणपणाचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना दिलासा ही दिला.
रंजनला बाजीची भिती वाटू लागली.दुसऱ्या दिवशी सकाळीच मिरानं राधाला सोबत घेत सोनेवाडी गाठली.
नवी नवरी रचनाची अजुन हळद ही उतरली नव्हती. नारायणरावांनी त्यांना एक महिना साईडवर सुट्टीच दिल्यानं बाजी व रचना आरामशीर उठत. आज ही बाजी बाला व सुमीसोबत अंथरूणातच लोळत होता. बालानं मात्र विठ्ठलाच्या आरतीसाठी सकाळीच उठत अंघोळ केली होती व आरती ही करून आला होता. सोनेवाडीत आला की आजोबांनी घातलेला पायंडा तो विसरला नव्हता.
रंजन व हणमंतराव आधी बाहेर ओठ्यावरच थांबले. मिरा व राधा खाल मानेनं हाॅलमध्ये गेल्या. किसन बानं बाजीस मध्ये कळवलं. रचनाची नुकतीच अंघोळ उरकली असल्यानं हळदीच्या अंगानं जात्याच सुंदर असलेली ती अधिकच मोहक दिसत होती. बाजीनं चहा द्यायला आलेल्या रचनास जवळच बसवलं.त्याच वेळी मिरा व राधा मध्ये आल्या. त्यांना पाहताच रचना उठू लागली. पण बाजीनं मिरा व राधाकडं लक्षच नाही भासवत रचनास कवेत घेतलं.
" अहो ,अहो काय हे बघताहेत नं"
मिराच्या अंत:करणात एकदम जाळ उठला. आपली हळद याच्याशीच ठरली असतांना आपण यास धोखा देऊन महाचूक केली यांची तिला कचकन जाणीव झाली व तिच्या डोळ्यात आसवे तरळली. तिला थांबणं मुश्कील झालं.
राधा व ती माघारी फिरत हाॅलमध्ये आली त्याचवेळी रंजन व हणमंतराव हाॅलमध्ये आले. मिराला आत येणाऱ्या रजत कडे पाहून त्याची किव वाटू लागली.
बाजी व रचना बाहेर आले. रंजन खाल मानेनं बाजीकडं आशेनं पाहू लागला. त्यावेळेस तर ' एखाद्यानं कोर तुकडा फेकत कुत्राला जोजारात गळयात पट्टा घालावा' मिराला अगदी तसाच भास झाला. रंजनची कीव वाटण्यापेक्षा ही जाणीव तिला खूपच भयानक वाटली. पत्नीच्या डोळ्यातील पतीबाबतची असली जाणीव म्हणजे पतीचं मरण बरं. बाजीनं बोटही न लावता इथंच बाजी जिंकली होती.
" बोला मामाश्री, का येणं केलंत, लवाजम्यासह?"
" माफ करा चुकलं आमचं, आम्ही शेअर्सच्या बदल्यात जमीन द्यायला तयार आहोत!"
" मामाश्री तुम्हास जे वाटतं ते इतरांना ही वाटतं का?" बाजी मिरा व राधाकडं तुच्छतेनं पाहत म्हणताच रंजन पुरता खचला.
" जी, रंजनरावही तयार आहेत" हणमंतराव सरळ शरणागती पत्करत बोलले.
" मामाश्री, मी माझं घर अगदी साधं बनवलं. मी ठरवलं असतं तर इथं टोलेजंग इमारत उभारू शकलो असतो. पण का ? तर माझ्या बापाच्या घरातून जी माणसं ठोकर मारत उडून गेली होती त्यांनी ठोकरा खायला त्याच उंबऱ्यावर यावं म्हणून मी उंबरा ही बदलला नाही. माहितीय लोकांनी इमला विकला होता.तेथून शोधुन तोच उंबरा आणला व बसवला. तुमचं भाग्य तुम्ही जे मागायला आलात ते या छताखाली व त्याच उंबऱ्यावर आलात.माझ्या बापाचा उंबरा कधीच कुणाला विन्मुख करत नाही.एव्हाना तुम्ही दुसऱ्या जागी ही मागणी केली असती तर..... जाऊ द्या मला जे सांगायचं ते कळलंय तुम्हाला"
"...,..." ना हणमंतराव काही बोलला ना रंजन.
" रचना सकाळी सकाळी माझा वारकरी बाप कुत्रालाही उपाशी फिरवत नसे .ही तर आपली माणसं आहेत. उद्याच सोनेवाडी साईड सुरू कर" बाजी आवेशानं बोलला व उठून घरात जात राधेनं दुलबास दिलेला त्रास आठवत ढसाढसा रडला.
मनासारखं होऊनही मिराला मात्र आपण भिकारी पेक्षाही हीन ठरलो यानं ती सुन्न होत खाली उतरली.
किसनबा घरात येताच " काका ,आता तुम्हास जळगावला यायची गरजच नाही कारण हा बाजी आता कधीच सोनेवाडी सोडणार नाही" म्हणाला नी किसनबाला दुलबाचं व रचनाला पहिल्या भेटीत मंदिरात सुमी बालाचं
" मरणाशीही ज्याची बाजी तो बाजी" हे ह्रदयातलं कळवळून बोलणं आठवलं.
" पोरा, आता मी बिनघोर मरायला तयार आहे कारण दुलबाला आता छातीठोक सांगेल दुलब्या तु आणलेला विठोबा सोनेवाडीतच आहे!" किसनाबा रडू लागला.
सोनेवाडी साईड पाच सहा महिन्यात तयार झाली. साऱ्या इस्टीमेट नुसार रंजनला वीस टक्के व धनास दहा टक्के शेअर्स मिळाले. आता हणमंतरावास हायसं वाटू लागलं. कारण बाजी वा गर्गे फर्मचे शेअर्स तीस टक्के का असेना पण तरी दोन्ही मुली सुखानं खातील.नी आपण केलेली पापं ही बाजीस न कळता झाकली गेली.
पण कारखाना उभारला. खताचे पेस्टीसाईडचे प्लांट बसवले गेले. आता प्राॅडक्शनला सुरुवात होणार . चाळीस एकरातील तापीकाठावरील महाकाय कारखाना पाहताच छाती बसू लागली. हणमंतराव दिवसा काम नसतांनाही तिथंच थांबत होता. पण रात्री तो वा रंजन चुकूनही थांबत नसत. बाजी यांना कुत्र्यापेक्षाही कमी लेखे.
कारखाना सुरु होणार असतांनाच बाजी फर्मनं कारखाना बंद केला.
.
.
रंजन व हणमंत बावचळला. आता तर कुठे उत्पन्नाला सुरुवात होणार होती ,मग कारखाना बंद करण्याचं कारण काय?
.
.
बाजीशी बाजी!
तीस पस्तीस एकर आठ लाखानं जरी विकली असती तरी अडिच तीन करोड आले असते.त्यात काहीही करता आलं असतं. आता ते ही गेलं .नी बँद पडलेल्या कारखान्याच्या शेअर्सच्या, बाजीविना कवडीमोल गुंडाळ्या हाती राहिल्या.
.
.पण त्या शेअर्सच्या गुंडाळ्या वागवायला रंजन , हणमंत मिना राहणार का?
.
.
क्रमशः