एक सत्य अशी क्राईम स्टोरी वाचण्यात आली.....तसं आपण सोशल मीडिया प्रत्येक जण वापरत असतो.....सगळे जण आपला आपला एक विचार किंवा अजेंडा घेऊन इथे आलेला असतो त्यात काही चांगले असतात काही वाईट......पण आपण सावध राहिलं पाहिजे.....फेसबुकवर फिरत असताना मला अमिताभ ह्यांच्या अग्निपथ मधील एक डायलॉग आठवतो आणि तो सोशल मीडिया साठी परफेक्ट सूट होतो
"गलत चीज बनाया ये...यहाँ आदमी सोचता कुछ और है....बोलता कुछ और है....करता कुछ और है"
आता महिलांनी फेसबुक वर वावरताना कोणते नियम व अटी पाळल्या पाहिजेत ह्यावर अनेक लेख रोज पडत असतात त्यामुळे ह्यावर काही बोलायला नको....तर ती कथा अशी होती की.....काल्पनिक नाव घेऊन बोलूया......
पिंकीचा प्रेमविवाह एका मुलाशी झाला त्याला महिना 2 लाख पगार होता....ही पण नोकरी करत होती पण तिने आता गृहिणी होणं पसंद केलं....घरात पती जॉब वर सासरा आणि सासू एका मोठ्या शाळेत शिक्षक आणि तिची नणंद ही कॉलेजमध्ये जात असल्यामुळे.....पिंकी एकटी असायची मग रिकाम्या वेळेत तिचं सोशल मीडियावर काहींना काही चालू असायच... त्यात एक दिवशी तिला रॉनी नावाच्या मुलाची रिक्वेस्ट येते.....धडाधड रिक्वेस्ट घेणारी ही....त्या मुलाची माहिती न घेता रिक्वेस्ट घेते....रॉनी एक गाणं अपलोड करतो मग पिंकी म्हणते की हे तर माझे आवडते गाणे आहे....मग रॉनी एका पदार्थाचा फोटो अपलोड करतो मग पिंकी म्हणतो की हा पदार्थ तर मला पण आवडतो....अस करत करत त्याला जे जे आवडत असत ते पिंकीला पण आवडत असतं..रॉनीने सांगितलं असत की तो एका कंपनीचा ceo असतो त्याचा बंगला गाडी सगळं त्याने पिंकीला फोटोतून दाखवलं असत..मग पिंकी आणि रॉनी मध्ये ऑनलाइन जवळीक वाढू लागते....एकमेकांचे व्हाट्सअप्प नंबर शेअर होतात....घरी कोणी नसताना तासन्तास ह्या दोघांचे चॅटिंग सुरू असते.....पिंकीने रॉनीला चांगला फ्रेंड मानलं असत....एके दिवशी रॉनी तीला फोन करतो म्हणतो "माझं तुझ्या घराजवळ काम सुरू आहे मी येऊ का 2 मिनिटांसाठी भेटायला" पिंकी पण त्याला परवानगी देते मग दोघे तिच्या घरात भेटतात.....आता ह्या भेटी सारख्या होऊ लागतात....2 मिनिटांची भेट 2 तासांची होऊ लागते......पिंकी त्याला चांगला मित्र मानत असते आणि मैत्री निभावत असते
एके दिवशी रॉनी तिला मेसेज करतो की "मला तू खूप आवडते आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे" हे ऐकून पिंकी जाम चिडते...तिने त्याला फक्त चांगला मित्र मानलं असत पण हा ऐकण्याच्या मनस्तीतीत नसतो....शेवटी रागारागाने पिंकी त्याला ब्लॉक करते......काही वेळातच तिच्या व्हाट्सअप्प वर काही नग्न फोटो आणि व्हिडिओस येतात....पिंकीला ते बघून धक्काच बसतो कारण ते नग्न फोटो तिचेच असतात.....पिंकीला प्रश्न पडतो की हे फोटो त्याच्याकडे कसे.....पिंकी रडत रडत त्याला फोन लावते आणि गयावया करू लागते.....पण रॉनी म्हणतो की तू जर मला आताच्या आता ह्या हॉटेल मध्ये भेटली नाहीस तर मी हे फोटो सगळीकडे व्हायरल करीन.....पिंकी तडक त्या हॉटेल मध्ये जाते तिथल्या हॉल मध्ये तिची रडारड दोघांची भांडणे सुरू होतात....तेव्हा रॉनी तिला म्हणतो की इथे भांडून तमाशा होत आहे आपण एका वेगळ्या खोलीत बोलू.....मग ते एका स्वतंत्र खोलीत जातात.....तिथेही त्यांचा वाद सुरू.....ह्या वादात रागाच्या भरात....रॉनी तिच्या वर लैंगिक अत्याचार करतो आणि तिचा गळा दाबून तिला मारून टाकतो......दुसऱ्या दिवशी एक प्रेत विवस्त्र तोंडात बोळा कोंबलेल्या अवस्थेत त्या खोलीत सापडत.....आयकार्ड वरून ते प्रेत पिंकीच आहे असं कळतं.....पिंकीचा जीव गेलेला असतो....पोलीस आपल्या कार्यात तत्परता दाखवतात आणि कॉल डिटेल्स मधून रॉनीला पकडतात....
आता प्रश्न हा की रॉनी जवळ पिंकीचे नग्न फोटो आले कुठून??.....तर रॉनी सांगतो की जेव्हा तो तिच्या घरी भेटायला गेला होता तेव्हा फ्रेश होण्याच्या बहाण्याने त्याने त्या बाथरूम मध्ये प्रवेश केला आणि तिच्या बाथरूम मध्ये हिडन कॅमेरे लावले....आणि तिचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ आणि फोटो मिळवले....काही कॅमेरे बेडरूम मध्येही लावले होते....ह्यावरून त्याने सगळे फोटो आणि व्हिडिओ मिळवले होते....आणि हा रॉनी कुणी ceo वैगेरे नव्हता तर त्याचा धंदा असा फसवणुकीचा होता....हे पिंकी प्रकरण पचलं तर तिच्या नणंदेला फसवायचा त्याचा डाव होता कारण तिचेही आंघोळीचे व्हिडिओ ह्यांच्याकडे होते....आता दुसरा प्रश्न की तिच्या आवडीनिवडीची रॉनीला इतकी माहिती कशी??.....ज्या मुळे ती पिंकी ह्याकडे आकर्षित झाली...तर ह्या पिंकीने आपल्याला जे जे आवडत ते आपल्या प्रोफाइल वर bio मध्ये लिहून ठेवलं होतं....त्यामुळे त्याला जाळे टाकणे सोप्पं होत....आता ह्यात दोष कुणाचा??.....अतिविश्वास ठेवून मैत्री निभावणार्या पिंकीचा की फसवणूक करणाऱ्या रॉनीचा
ही एक सत्य क्राईम स्टोरी आहे उत्तर भारतात घडलेली...कमी शब्दात सांगितली..कुणीही अस फसू शकत....कुणी म्हणेल मी तर निडर पुरुष आहे मला काय होतंय??...काही पुरुषांनीही मानसिक धक्क्यात जाऊन आत्महत्या केल्या आहेत बरं...मग तो मानसिक आजार ऑनलाइन फसवणुकीचा असेल किंवा सोशल मीडियावर अपमानाचा झालेला मनावर परिणाम...जास्तीत जास्त क्राईम स्टोरी वाचणे मानसिक आरोग्यासाठी चांगलं नसत म्हणतात पण कधी तरी अश्या सत्य घटना वाचत चला.....आपल्या समाजाची लायकी नक्की समजेल......काहींच्या nice ह्या कमेंट मागे nich मानसिकताही असू शकते.....प्रश्न फक्त लैंगिक छळाचा नाही तर आर्थिक फसवणूक सुद्धा होऊ शकते आणि मुख्य म्हणजे इथे वैचारिक भेसळ सुद्धा होऊ शकते.....विचारवंत आणि पांढरे कपडे घातलेले काळ्या विचारसरणीचे लोकही इथे हिंडून समाजात क्रांती घडवण्याच्या गोंडस नावाखाली तुम्हाला रस्त्यावर उतरून आपला अजेंडा राबवत असतील तर त्यांचीही माहिती घ्यायला हवी......एकूणच आपण जागरूक असणे महत्त्वाचे..........