भीतीदायक गोष्टीमागेही एक सत्य असते. ते समजले कि भीती संपते.
:
:
आगमन :
पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे फोटो स्पर्धा होती आणि मला ते खूपच आव्हानात्मक वाटले. तसा कॅमेरा माझा चांगलाच दोस्त आहे. साध्या डोळ्यांना जे महत्वाचे वाटत नाही, ते ह्या तिसरा डोळ्यातून मला हजारपटीने महत्वाचे वाटायला लागते. मला घरातले, आजूबाजूचे वेडी म्हणतात, पण खरंय हे! वेड लागल्याशिवाय मानसिक आनंद मिळतच नाही.....आठवडाभर घरी राहिले तर गंज चढतो मला, हुरहूर दाटून येते, जेवण गोड लागत नाही....शेवटी घरातलेच म्हणतात, "जा दोन दिवस कुठेतरी, फोटो काढ, बरे वाटेल." पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी बाहेर पडते आणि मुक्तपणे श्वास घेते! तर काय सांगत होते, फोटो स्पर्धा ...पण फोटो मात्र जुन्या महालाचे, गढीचे, राजवाड्याचे हवेत. अजून बरेच नियम होते, पण गढी.....माझ्या मनात एकच जागा पिंगा घालत होती. माझ्या मैत्रिणींच्या गावाकडे एक जुनी हवेली होती, गूढ...म्हणून त्याला ते गढी म्हणत. आम्ही कॉलेजला असताना तिच्या गावी रहायला गेलो होतो, तेव्हा गढीकडेपण चक्कर मारून आलो होतो. तिच्या घरच्यांनी भर दुपारचे गढीकडे दोन नोकर आमच्यासोबत पाठवले होते आणि अवघ्या दोन तासात परत घरी हजर झालो होतो, कसली भीती होती ते काही कळले नव्हते. डोळे मिटून परत परत मी त्या गढीचा विचार होते.
आता माझ्या मैत्रिणीचे लग्न झाल्यामुळे ती गावात नव्हती. कॉलेज संपून पण सहज पाच वर्षे झाली असावीत. तिचा आणि माझा तसा काहीच संबंध नव्हता इतक्या वर्षात. मी काही तिच्या घरी जाणार नव्हते, कारण मला परत दोन नोकरासोबत दोन तासासाठी सोडले असते. तिन्हीसांज, सूर्यास्त, उत्तररात्र, काळरात्र, पहिला पहर, झुंजूमुंजू, सूर्योदय असे अनेक प्रहर फोटोमध्ये पकडायचे होते मला. माझ्या घरी मी रोज एक फोन करायचा, एव्हडीच अट होती. गरजेपुरते सामान भरून मी ST पकडून संध्याकाळच्या आधी गावात हजर झाले. गावात खूप बदल झाले होते. मला आठवणारे गाव खूपच वेगळे होते. तीन चार ST थांब्यावर उभ्या होत्या, बाहेर रिक्षा उभ्या होत्या. दूरवर फळवाले, कपडेवाले, चप्पलवाले खेटून खेटून दुकाने लावून बसले होते. समोरच्या बाजूला हॉटेल नावाखाली भजी-पाव, मिसळ-पाव हे पदार्थ मिळत होते. बाजूलाच एक मिठाईवाला पण होता. ST धुराळा उडवत बाहेर निघून गेली आणि मी आजूबाजूला नजर फिरवली. उतरलेले लोक कधीच आपापल्या मार्गाने निघून गेले होते. काही रिक्षावाले माझ्याकडे आशेने पाहत उभे होते. मी शांतपणे हॉटेलचा रस्ता धरला आणि चहा सांगितला. मालकाला मला चार दिवसासाठी रहायला कुठे जागा आहे का हे पण विचारले. मालक खुशीत येऊन सांगू लागला, मी ऐकू लागले. फुकाची बडबड करून झाल्यावर, इथे येण्याचे कारण विचारले. मला काही फोटो काढायचे आहेत, जुन्या हवेलीचे, राजवाड्याचे, गढीचे.....असे सांगितले.गढी, ह्या शब्दाने जादू केली. मालक बोलता बोलता गपकन थांबला आणि तरातरा निघून गेला. जाता जाता हाताखालच्या पोराला मला राहायला जागा हवीये असेही सांगितले. तोंडातल्या तोंडात काय बोलत गेला, काही कळले नाही पण देवाचे स्तोत्र म्हणत असावा असे वाटले. गल्ल्यावरच्या खुर्चीत बसायच्या आधी वर असलेल्या देवाच्या तसबिरीसमोर हात जोडले आणि माझ्याकडे पाहत खुर्चीत बसला. तोवर हाताखालच्या मुलगा माझ्याजवळ आला. आता मी त्याला चार दिवसासाठी रहायला जागा हवी, इतकेच सांगितले. चहा झाल्यावर दाखवतो असे म्हणून त्याने चहा दिला आणि मालकाशी काहीतरी बोलू लागला. मालक माझ्याकडे पहात हळूहळू आवाजात त्याच्याशी बोलत होता.
गावातल्या मानाने बरे हॉटेल मिळाले. सगळे रिकामेच, जी आवडेल ती खोली घ्या, असे सांगितले आणि मला हसायला आले. मी कोपर्यातली खोली निवडली. मला काही फोटो काढायचे आहेत म्हणून गावात आले आहे इतकेच सांगितले आणि रूममध्ये आले. रूम बरी होती, जेवण पण चांगले होते. रात्री लवकर जेवण करून, घरी फोन करून मी लौकर झोपी गेले. पहाटेचा अलार्म लावला.

पहिला दिवस :
सकाळ रम्य आणि शांत होती. तुरळक गाड्याचे आवाज सोडले तर पक्ष्याचे आवाजच जास्त येत होते. मी माझा कॅमेरा घेऊन बाहेर पडले आणि जवळपासच जाऊन जरा फोटो काढले . गावात एक गंमत असते, तुम्ही नुसता कॅमेरा डोळ्याला लावला कि चिडीचूप शांतता होते, सगळे एकटक आपल्याला कॅमेरामधून काय दिसते ते विचार करायला लागतात आणि आपलाच फोटो काढणार असे आपल्यासमोर उभे राहतात. मला खूपदा हसायला यायचे पण मी फोटो काढायची. 'इकडं कुणीकडे' असे विचारले तर 'सहज'...इतकेच म्हणून पुढे सटकायची, हो उगाच त्यांची ‘सटकायला’ नको.
सकाळचा नास्ता झाला आणि मी तिथल्या माणसाला विचारायला सुरुवात केली. "मला काही फोटो काढायचे आहेत. एखादा मुलगा द्याल का सोबत? शाळांना सुट्टीच आहे ना नाहीतरी, दोन वेळेचे जेवण देईन आणि माझे काम झाले कि पैसे पण देईन जाताना." पैसे ऐकून खुश झाला. "देतो कि, एक काय...चार पोरे देतो सोबत. काढा हवे तेवढे फोटो...लै छान गाव आहे, नदी आहे, उसाचे मळे आहेत, गुरं-ढोरं सगळे आहेत गावात." "ठीक आहे. तुम्ही मुलांना बोलवा. मी सांगीन कुणाला घेऊन जाणार आहे ते" असे म्हणून मी रूममध्ये येऊन माझी दिवसभराची तयारी केली. गावातलेच कोणीतरी सोबत असेल तर लोक फार चौकशा करत नाहीत हा माझा अनुभव. बाहेर आले तर दंगा चालू होता. तीन पंधरा-सोळा वर्षाची मुले काहीतरी खेळत-बोलत उभेहोते. मी आल्यावर सगळे गप्प बसून माझ्याकडे पाहायला लागले. मी सगळ्यांना नावे विचारून त्यांची माहिती विचारली. कितवीत शिकता, काय मार्क पडतात, कुठले विषय आवडतात, घरी कोण कोण असते, घरी काय काय कामे घरात करता.....साधे सरळ प्रश विचारताना खूप गोष्टी कळतात. मी गोपीला निवडले आणि बाकीच्या मुलांना घरी जायला सांगितले. गोपीला खूप कामाचा अनुभव होता, घरातल्या आणि घराबाहेरच्या कामांचा. शाळेत पण बरे मार्क होते आणि कविता म्हणायला आवडतात म्हणाला. घरच्या शेळ्या चरायला गोपी गड्यासोबत नेहमी जातो. मला गावाच्या आजूबाजूची माहिती असलेला आणि गावाबाहेर फिरायला जाणारा गोपी म्हणूनच योग्य वाटला.
दहा वाजता आम्ही दोघेही चालत नदीच्या दिशेने जायला लागलो. दबकत दबकत माझ्या मागे मागे राहणारा गोपी माझ्यासोबत कधी चालू लागला, हे त्यालापण कळले नाही. चालताना तो गावाबद्दल खूप माहिती सांगत होता. गावात होणारे बदल, नवीन फॅक्टरी, उसाचे गुऱ्हाळ, त्यांच्याकडचे शेळी-मेंढ्यांचे काम, घरातले माणसे....गोपीला भरपूर बोलायला लागते हे मला लवकरच कळले. हातात कॅमेरा घेऊन मी जरी फोटो काढत असले, तरी माझे कान गोपीच्या बोलण्याकडेच असत.सगळा दिवस गावाबाहेर आणि नदीवर घालवल्यानंतर आम्ही दोघेही खूप कंटाळलो आणि दमलो होतो. गावात येईपर्यंत संध्याकाळ उलटून गेली होती. हॉटेल मालक आमचीच वाट पहात होता. जेवणे होताच, उद्या गोपीला वेळेत यायला सांगून घरी फोन केला आणि मी रूममध्ये आले.
नदीच्या पार बाजूला, थोडी उंचावर, पश्चिमेला दूरवर मला गढी दिसली होती. गोपीला मी ते काय आहे, म्हणून सहज विचारले तर तो चटकन म्हणाला "तिथे जायाचं नाही. भुताची गढी हाय."
"भुताची ? तू कधीच गेला नाहीयेस तिथे? "
"तसं नाही. पण ...."
"अरे सांग रे. मी नाही सांगणार कुणाला.."
"एकदा गेलो व्हतो...शेळीच्या मागे मागे. शेळीचा आवाज यायचा आणि मी गेलो कि गायब व्हायचं. असे वाटायचे कि मागेच उभी हाये, इथेच हाये, तिथेच हाये आणि ती दिसली नंतर पार गढीच्या त्या SS टोकाला......(एक हात पार उंच करत) आणि तरीबी तिचा आवाज असा जवळून येत होता कि वाटायचं इथेच उभी हाये. मी पार घाबरलो, शेळीला तसाच सोडून पळून आलो. घरी येऊन बापाला सांगितले. तो शेळीला घेऊन रातचा आला, आला तोच पार घाबरलेला, तापाचं चढला सकाळपातूर ...त्यालाबी शेळीचा चकवा लागला. दिसत तर लांब होती आणि आवाज शेजारून यायचा..." गोपीने घाबरून सगळे सांगितले.
"अजून काही पहिलं का?"
"नाय बा ! त्या वाटेलाच गेलो नाही परत..." तो खाल मानेने म्हणाला.
"फोटो छान येतील रे त्या बाजूने गावाचे, जाऊयात उद्या. गढीमध्ये नको, पण लांबूनच काढूयात फोटो, चालेल ना?"
"चालतंय..." नाईलाजास्तव गोपी म्हणाला.

दुसरा दिवस :
भल्या सकाळी हॉटेल मालकाकडून भेटायला यायचा निरोप मिळाला आणि मी गारव्यात शाल गुंडाळून बाहेर आले. एक गृहस्थ मालकासोबत बसले होते, साधे मळके धोतर, टोपी, शर्ट असे कपडे होते. मी येताच, "हे गोपीचे वडील ", मालकाने ओळख करून दिली.
"गोपी म्हनाला कि तुम्ही आज गढीकडे जाणार हायती. गोपी लै घाबराय. येत न्याही म्हणतोय..."
मला ह्याची कल्पना होतीच. मी हसून म्हणाले "अहो काका, मी काही गढीमध्ये जाणार नाहीये. बाहेरूनच फोटो काढीन. आणि गोपीला जेव्हा घरी जावेसे वाटेल तेव्हा तो येईल निघून, मी काही त्याला थांबायचा आग्रह करणार नाही, चालेल ना?"
गोपीचे वडील मालकाकडे पाहत होते. मालक त्यांना आश्वासक म्हणाला, "बाई म्हणतात ना, गढीत जाणार नाही, मग झालं कि. जाऊ दे त्याला....चांगल्या गप्पा झाल्यात कि काल त्याच्या, आता परत नवीन मुलगा द्यायचा...त्यापेक्षा गोपीलाच जाऊदे." माझ्याकडे पाहत, "त्याला सांभाळून आणा म्हणजे झालं"
"ठीक आहे.... धाडतो त्याले" म्हणत गोपीचे वडील निघून गेले.
थोड्याच वेळाने गोपी आणि मी गढीच्या दिशेने चालू लागलो. बघता बघता गाव मागे पडला आणि मोकळे रान सुरु झाले. गढी थोडी उंचावर होती. त्या भागात वस्ती नाही, झाडे नाही, गुरे-ढोरे पण आलेली दिसली नाहीत. आज गोपीच्या गप्पा पण बंद पडल्या होत्या. मला मात्र फोटोसाठी खूप संधी होती. दूरवर दिसणारी गढी आता जवळ यायला लागली होती. गढीला एक विशिष्ठ आकार येत होता, पण उन्हामुळे फार वेळ बघता येत नव्हते. वारा सुटलेला, मातीचा धुराळा उडत होता, माथ्यावर ऊन.....शुष्क, उजाड परिसर ! सगळीकडे भकास वाटत होते. माझे पाणी पिऊन झाल्यावर मी बाटली गोपीकडे दिले आणि त्याने घटाघटा पाणी पिऊन घेतले.
"कुठवर जायाचे अजून?"
"असं करूयात, गढीच्या बाजूचा भाग फिरुयात आज, प्रदक्षिणा मारुयात. म्हणजे आत जायला नको, पण आजूबाजूचे फोटो काढीन मी. तू माझ्याबरोबरच राहा, एकटा कुठेपण जाऊ नकोस. आवाजाचा चकवा लागतो ना...." मी मोठे मोठे डोळे करत गोपीला सांगितले.
"व्हय जी. चालतंय ..." गोपीला पटले, हे पाहून मला हायसे वाटले.
आता आम्ही जरा उंचावर होतो. गाव खालच्या दिशेला होता. तळहाताच्या मध्ये गाव ठेवल्यासारखे दिसत होते, एका बाजूने कुठे कुठे नदी दिसत होती. मध्ये मध्ये हिरवेगार उसाचे मळे होते. आम्ही जिथे होतो, तिथे एक पडके दार होते आणि आत जाणारा रस्ता दिसत होता. रस्ता संपतो तिथे वाडा सुरु होत होता. आत खूप मोठी भिंत असून वरच्या बाजूला चार इकडे आणि चार तिकडे खिडक्या दिसत होत्या. पडझड झाली असली तरी आतला वाडा भक्कम दिसत होता. कोणे एके काळी खूप सुंदर बाग असावी ह्या दाराच्या मागे अगदी वाडा सुरु होईपर्यंत....दाराच्या बाजूने चारी दिशेला भिंत होती, म्हणजे असावी....आता फक्त थोडी थोडी उरली आहे. त्यामुळे आतला खूप मोठा भाग नजरेच्या टप्प्यात येत होता. मला फोटोसाठी उत्तम जागा होती. मी फोटो काढता काढता दारापर्यंत गेले तसे गोपीने ओरडून मला मागे यायला सांगितले.
मी मागे येऊन परत गोपीसोबत चालू लागले. आज गढीला फेरी मारणार होतो आम्ही. वेगवेगळ्या दिशेने दिसणारी गढी खूप विलोभनीय होती. ज्याने कोणी बांधली असावी त्याने गावाचा, वाऱ्याचा, निसर्गाचा सगळा विचार केला होता. कुठल्याही दिशेने चार चार खिडक्या होत्याच.
आम्हाला कोणीतरी बोलायचा आवाज आला आणि आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. गोपी घाबरून माझ्याजवळ आला. शब्द ऐकू येत नव्हते पण दोन-तीन माणसे असावेत, असे वाटले. मी त्याचा हात पकडला आणि "कोण आहे तिथे?" असे जोरात विचारले. काहीच उत्तर आले नाही. आम्हाला एवढ्या वेळात इथे कोणीच माणसे दिसली नव्हती, हे नक्की. आम्ही पुढे सरकलो. आता आम्ही गढीच्या मागच्या बाजूला होतो. तिथे बहुतेक एखादे तळे असावे. संध्याकाळच्या वेळेला खिडकीतून येणारा वारा घेत आणि तळ्यातील बदके पाहत छान वेळ जात असणार, आता फक्त कल्पना...बाकी सगळेच उजाड होते. दोन-चार कुत्री तेव्हडी वाड्याच्या बाजूला सावलीत झोपलेली दिसली. माझ्या आवाजाने उठली आणि आमच्याकडे पाहू लागली. तेव्हड्यात एक कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. खरं तर कुत्रा खूप लांब होता पण असे वाटत होते कि तो माझ्या शेजारीच उभा राहून भुंकत आहे. कानावर हात ठेऊन आम्ही थोडे पुढे गेलो आणि कुत्र्याचा आवाज बंद झाला.गोपी आता खरंच खूप घाबरला होता. जाऊ जी, जाऊ जी ...चालू झाले होते. हॉटेलमधून घेतलेला वडा-पाव आम्ही खाल्ला आणि जरा बरे वाटले. थोडा वेळपण गेला आणि गोपिपण सावरला.
अचानक अंधारून आले. माझे फोटोचे काम चालूच होते, पण तेव्हड्यात गोपी माझ्या जवळ आला. “पाण्याचा आवाज येतो कुठूनतरी, कोणीतरी बोलतय पण”....मी गोपी जिथे उभा राहून हा आवाज येतोय म्हणाला, तिथे गेले. कारण मी जिथे फोटो काढत होते तिथे कसलाच आवाज येत नव्हता. गोपी खरंच बोलत होता. पाण्याची धार पडावी तसा आवाज येत होता. आता हवेत अचानक गारठा पण सुटला आणि दूरवर विजा चमकायला सुरवात झाली. परत एकदा कुत्री भुंकायला लागली. आम्ही भराभर आमची उरलेली फेरी पूर्ण केली. बाहेरून गढी सामान्य वाटत होती, पण येणारे आवाज खरे होते. मी पण ऐकले होते. आम्ही भराभरा चालत हॉटेलवर आलो तर गोपीचे वडील त्याची वाटच पाहत होते. गोपी वडिलांबरोबर गेला आणि मी घरी फोन करून रूमवर आले.
आता मी गढीचाच विचार करत होते. आम्हाला सगळीकडे आवाज आला नव्हता, काही ठराविक ठिकाणीच आवाज आला होता. कुत्रे खूप लांबून भुंकत होते पण माझ्या शेजारीच भुंकत आहे असे वाटत होते. पाण्याचा, माणसे बोलण्याचा आवाज....हा भास नक्कीच नव्हता. काहीतरी आहे पण काय? जायचं का गढीत, फोटो काढायला? मी परत एकदा आज काढलेले फोटो पहिले, फोटो सुरेखच आले होते. मला परत हि संधी मिळणार नव्हती, आणि आलेच आहे तर जाऊयात गढीत....असं माझे मन म्हणत होते.

तिसरा दिवस :
माझ्याकडे आता दोनच दिवस उरले होते. म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा अर्धा. मला उद्या चार वाजता निघायचे होते. आज काहीही झाले तरी गढीमध्ये जायचेच, असा मी निर्धार केला होता. आज गोपी नक्की माझ्यासोबत येणार नव्हता, मग काय करावे बरे? कोणीतरी सोबत हवेच, निदान गावातले तरी....गढीचे नाव काढले कि लोकांच्या प्रतिक्रिया मी पहिल्या होत्या. मी सकाळी सकाळी उठून माझे आवरून माझ्या मैत्रिणीच्या घरी, म्हणजे तिच्या माहेरी हजर झाले. माझी ओळख-पाळख आणि प्रारंभीच्या गप्पा झाल्यावर मी इथे यायचे खरे कारण सांगितले. माझ्यासोबत कोणी गढीवर येऊ शकेल का, असे पण विचारले. घरातले सगळे अतिशय नॉर्मल होते, कोणीही घाबरले नाही. मला फारच आश्चर्य वाटले. तिच्या वडिलांनी रामा नावाच्या गड्याला माझ्यासोबत पाठवले. आमच्या गप्पा आणि नाश्ता होईपर्यंत माझ्यासाठी दुपारचा डबा तयार झाला आणि आम्ही निघालो. पुढच्या वेळी आमच्याच घरी रहायला यायचे, हे सांगूनच मला पाठवले. मला फार बरे वाटले कि मी योग्य निर्णय घेतला. उगाचच आततायीपणाने एकटीच गेले नाहीे. रामा पण गप्पिष्ट होता आणि लहानपणापासून तिथेच राहत होता. ताईसाहेबांची मैत्रीण, म्हणून मला खूप माहिती देत होता. रामा गढीमध्ये यायला अजिबात घाबरत नाही, हे पाहून मला फारच आश्चर्य वाटले. रामा म्हणाला, "असे काही भूत वगैरे नाहीये गढीत. उगाच लांड्यालबाडी करणारे लोक उठवतात. आमचे मालक आणि त्यांचे मित्र रात्रीचे राहून गेलेत गढीत. अमावस्या, पौर्णिमाला देवीचा जागर घातलाय इथे, काहीपण झाले नाही कोणाला. गाववाले उगाच घाबरतात....."
"अरे, काल मी पण वेगवेगळे आवाज ऐकलेत. दिसत कोणीच नव्हते पण माणसे बोलताना ऐकले. कुत्रे खूप दूरवर भुंकत होते पण असे वाटत होते कि शेजारूनच भुंकत आहे. इथे म्हणे आवाजाचा चकवा लागतो..."
"ऐकले का गाववाल्यांचे...तुम्ही पण ना! " रामा हसत म्हणाला.
"मग, हे खरं नाहीये का?" माझा आपला उगाचच सत्य समजून घेण्याचा प्रयत्न.
“न्हाय,खरं नाहीये. मालक समजून सांगत्याल तुम्हालां. काढा जी फोटो तुम्ही निवांत, अजिबात घाबरू नका. मी हाये इथेच..." रामा हसत हसत म्हणाला. आज आम्ही बिनदिक्कतपणे दारातून आत गेलो आणि वाड्याच्या दारात उभे राहिलो. मजबूत लाकडाचा वाडा होता. म्हणूनच इतके वर्षे होऊनही, भक्कमपणे उभा होता. वर पहिले तर खिडक्या बऱ्याच उंचावर होत्या, म्हणजे वाडा उंचीला पण भरपूर होता. सगळीकडे जाळिजळमटे दिसत होती. भरपूर धूळ, कचरा, माती सगळीकडे पसरलेले होते. वाड्याच्या दारातून आत जाताच खूप मोठी ओसरी पसरलेली होती. ओसरीच्या वर झोपाळा बांधायची जागा असावी, रामाने रिकामे खुंटे दाखवले आणि सांगितले. पूर्वीच्या काळी राबता असताना आत आलेल्या माणसांना बसायची जागा असावी. बाजूला रामाने सांगितले कि घोडे बांधायची जागा आहे. आता फक्त काही खुंट्या उरल्या होत्या. मोजून तीन पायऱ्या होत्या दारातून आत आल्यावर आणि मग प्रशस्त चौक होता. चौक वरून मोकळा, उघडा होता. भरपूर सूर्यप्रकाश येत होता. मधोमध तुळशी वृंदावन असावे बहुतेक, आता नुसतीच मोकळी जागा. मला हवे तसे फोटो मिळत होते पण असे वाटले कि सूर्योदयाचे फोटो पण मिळाले तर, वाड्याच्या दारातून नाहीतर खिडकीतून उगवत्या सूर्याचे पहाटे, मागे हिरवेगार गाव आणि वाहणारी नदी. आणि सूर्यास्ताचे मिळाले तर...वाहवा...मजा येईल. मी रामाला विचारले तर लगेच म्हणाला, "काढा जी ...मी थाम्बातूया सोबत."
मला खूपच आनंद झाला. मी फोटो काढत आत जात राहिले आणि अचानक जाणवले हि इथे हवा गार आहे. पुढे चिंचोळा बोळ होता आणि बऱ्यापैकी अंधार. श्वास घ्यायला पण त्रास होत असावा, कारण मला धाप लागली होती. मी मागे वळून पहिले तर रामा दिसेना, फक्त अंधार… मी घाबरले. फोटो काढत आणि जागा पाहत पाहत नक्की किती आत आणि कुठे आलीये, काही कळेना. रामाला हाक मारत मागे आले तर समजेना कि मी कुठे आहे. माझाच आवाज मोठ्याने घुमल्यासारखा मला ऐकू येत होता. मी जोरजोरात रामाला हाक मारू लागले, मला घाम फुटला. "ताई S S .... इथंच हाय मी. घाबरू नका." रामाचाच आवाज होता. पण कुठे दिसेना तो.
"ताई उजेडाच्या दिशेने चालत राहा. मी भेटेन" रामा मला दिशा सांगत होता आणि मला काही सुचत नव्हते. आवाजाचे प्रतिध्वनी कधी जवळून तर कधी लांबून येत होते. जोरजोरात श्वास घेतल्यामुळे माझ्या नाकातोंडात धूळ जाऊ लागली होती. गडबडीत मी भिंतीवर जोरात धडकले आणि हाताला सगळीकडे माती लागली. कॅमेरा सांभाळण्याच्या कसरतीत मी ठेचकाळले पण होते.
"रामा...तू शोधना मला. मला तू सापडत नाहीयेस..." माझी केविलवाणी धडपड. काळजाचा ठोका चुकणे म्हणजे काय ते मला समजत होते. भुताचा वाडा, आवाजाचा चकवा......रामाच्या आवाजात भूत मला बोलावत होते. बापरे...काय हे भयानक विचार ! चार पाच ढांगात मला अंधुकसा उजेड दिसू लागला. मी उजेडाच्या दिशेने चालू लागले...धावत, पळत..भराभर, धडपडत ...आणि मला रामा दिसला. दाराच्या चौकटीला धरून आत डोकावून पाहत होता. मलाच शोधत होता.
"रामा, आत यायचे कि मला शोधायला, इथेच का उभा राहिलास? घाबरतोस का आत यायला?" मी चिडून धापा टाकत अंगावरची धूळ झटकत विचारले.
"न्हय जी....पण तुम्ही नक्की कोणच्या बाजूला हाय काय समजेना मला. म्हणून इथेच उभा राहिलो. तुम्ही कुठेबी असल्या तरी इथेच बाहेर येणार, मला माहिती व्हते."
अंगावरची धूळ झटकत रामाकडे पाठ फिरवून वाड्याकडे पाहू लागले. रामा काय म्हणत होता ते मला समजले. वाडा चारीही बाजूने एकसारखा होता आणि कुठल्याही बाजूने गेलो तरी आत येताना सगळी दारे मधल्या चौकातच येत होती. वरच्या बाजूला खोल्या आणि चौकाच्या वर परत व्हरांडा होता. रामाने भिंतीत लपलेला सोपान दरवाजा मला दाखवला आणि त्या दरवाज्याने आम्ही जिन्याने वरच्या बाजूला आलो. जिन्यात जरी अंधार , छोट्या पायऱ्या होत्या तरी काहीही भीतीदायक नव्हते, सगळे मोकळे आणि उजाड होते. खिडक्यांच्या चौकटी उरल्या होत्या. खोल्या सगळ्या रिकाम्या होत्या. खिडक्यांमधून भरपूर सूर्यप्रकाश आत येत होता. वरच्या व्हरांड्यामध्ये उभे राहिले कि खालचा संपूर्ण चौक दिसत होता. आले-गेले लक्ष इथूनही राहत असणार मालकीणबाईचे, असे मला वाटले.
बघता बघता सूर्यास्त होत आला. मला मागच्या बाजूला खोल दरीत जाणाऱ्या पायवाटेचे छान फोटो मिळाले, वरच्या खिडकीतून. गावाचे, शेताचे, नदीचे हवे तसे फोटो मिळेपर्यंत सूर्यास्त व्हायला लागला होता. वाड्याच्या मागच्या दारातून सूर्यास्ताचे किरण हलकेच आत येऊन तुळशी वृन्दावनापाशी थांबत होते. कॅमेरा वर फिरवला तसे दोन्ही बाजूच्या चारी खिडक्यांमधून येणारे परतीचे सूर्यकिरण सप्तरंगी दिसत होते.
सूर्य मावळला, तसे आम्ही वाड्यामधून बाहेर पडलो. उद्या सूर्योदयाआधी इथेच भेटायचे ठरवून आम्ही वेगवेगळ्या दिशेने निघालो. मला खूपच समाधान मिळाले होते, हवे तसे फोटो आणि निडर रामा गडी. हा....मध्ये एकदा तंतरली होती माझी, पण सावरले मी. उद्या दुपारी मला जेवायला मैत्रिणीच्या घरीच जायचं होते, तेव्हा तिच्या बाबाना भेटायचे आहे हा निरोप मी रामाकडे दिला होता. माझ्या आवाजातला आनंद माझ्या घरच्यांनी फोनवर लगेचच ओळखला आणि उद्या निघतीयेस, हे परत सुनावले. मला आता मैत्रिणीच्या बाबाना भेटायची आणि गढीबद्दल समजून घ्यायची फार उत्सुकता लागली होती.

चौथा दिवस :
भल्या पहाटे, अंधारातच मी गढीकडे चालू लागले. मधल्या वाटेतच रामा माझी वाट पाहत उभा होता. अंधारात गढीची आऊटलाईन फार सुंदर दिसत होती, अष्टकोनी. मला पहिल्यांदाच हे जाणवले. आम्ही भराभर चालत वाड्याच्या आत चौकात गेलो. शांत असलेला वाडा फार म्हणजे फार सुंदर दिसत होता. अंधारात धूळ, कचरा काहीही दिसत नव्हते, फक्त वाड्याचे भग्न अवशेष.....पण वाड्याचे सौंदर्य लपत नव्हते. मी नेमकी वेळ साधून चौकात कॅमेरा सेट करून उभी राहिले आणि सोनेरी-केशरी आकाशातून सूर्याचे हलकेसे दर्शन झाले. ठरल्याप्रमाणे पहिले किरण बरोबर मध्यभागी चौकात येऊन थांबत होते. सलाम! मनातल्या मनात मी त्या विश्वकर्माला सलाम केला. मला हवे तसे, सूर्याचे, कवडश्यांचे, सूर्यकिरणांचे फोटो आज मुक्तहस्ताने गढी घेऊ देत होती. कदाचित इतक्या वर्षाने कोणीतरी गढीचे, त्याला बांधणाऱ्याचे कौतुक करत असावे....
सूर्य वर येईपर्यंत आम्ही गढीमध्ये होतो. आज आम्हाला पाण्याचे, कुत्राचे, माणसांचे सगळे आवाज ऐकू येत होते पण आम्ही (म्हणजे मीच) न घाबरता दुर्लक्ष करत चाललो होतो. जणू काही गढीने माझ्यावर मोहिनी घातली होती. रामाने मागच्या बाजूला मला पाण्याचा जिवंत झरा असल्याचे ठिकाण दाखवले. कदाचित हेच पाणी मागच्या तळ्यासाठी वापरत असावेत,असेही रामा म्हणाला. अजूनही झरा जिवंत असावा, कारण जागा ओली होती आणि करंगळीएवढी धार अधूनमधून पडत होती. माणसे दिसली नाही, तरी आवाज का ऐकू येतो, यावर रामाने सांगितले कि गढीचे ते वैशिष्ट्य आहे. मालक सांगतील समजावून नीट, मला नाही जमत ....
गढीला परत एक प्रदक्षिणा मारून मी माझे सगळे काम नक्की पूर्ण झाले आहे हे तपासले. आम्ही घरी पोचेपर्यंत दुपार होत आली होती. घरी सगळे आमचीच वाट पाहत होते. जेवण झाले कि समजावतो, असे म्हणून आम्ही आधी गरमागरम जेवण करून घेतले. सगळेच बाहेरच्या दिवाणखान्यात बसलो होतो.
"काका, मला गढी आणि गढीच्या रहस्यमय भीतीविषयी जाणून घ्यायचे आहे." मी अधीरपणे म्हणाले.
"हो...मी सांगणारच आहे सगळे. इथे बाहेरून येणारा माणूस हेच सगळे प्रश्न घेऊन येत असतो." मैत्रिणीचे वडील हसत हसत म्हणाले.
"मला आठवतेय कि आम्ही कॉलेजला असताना जेव्हा गढीमध्ये गेलो होतो, तेव्हा तुम्ही आम्हाला गढीत जाऊन दिले नव्हते, दोन तासात परत आलो होतो आणि सोबत दोन माणसे पण दिली होती. आणि आता....कोणीच घाबरत नाही. रामा पण वेळीअवेळी गढीमध्ये यायला तयार झाला. हे कसे काय?"
"सांगतो....सांगतो...पण जरा दमाने. त्याचे असे आहे कि आम्हाला पण आधी गढीबद्दल ऐकीव माहिती होती. आम्ही लहान असताना आम्हाला आलेले अनुभव, मोठ्याचा धाक...त्यामुळे आम्ही पण असेच वागलो. पण आता शिक्षण आले, आम्ही पण मोठे झालो आणि मग मी गढीबद्दल समजून घेतले. खूप खूप पूर्वी कोण्या धनवान माणसाची ती गढी असावी. आजही तिथे दिसते ती भरपूर जागा, वाड्याची उंची, अष्टकोनी बांधकाम, घोड्याची पागा,भले मोठे स्वयंपाकघर, सहज न दिसणारा सोपान दरवाजा, आतला जिना बाहेरचा जिना,जिवंत झर्याचा वापर करून केलेले तळे आणि काय काय.....आता खरे तर आपण आपले तर्क लावायचे कि इथे हे असेल तिथे ते असेल...खरे खोटे तो विश्वकर्माच जाणे..."
मला काका काय सांगत आहे ते अगदी पटत होते. "खरंय काका...मी पण त्या बांधकामाची मनापासून स्तुती केलीये. फार सुरेख बांधली आहे गढी....उंचावर, गाव दिसेल अशी"
"हं.....तर गढी नुसतीच बांधली नाही तर खूप विचार करून बांधलीये. केव्हा बांधलीये माहिती नाही पण त्याकाळात होणारे हल्ले, त्यापासून करावे लागणारे रक्षण ह्याचा पण विचार केला आहे. तू म्हणतेस कि माणसांचा आवाज ऐकला पण दिसले काहीच नाही. कुत्रे शेजारून भुंकत होते पण खूप लांब उभे होते. गोपीची तू सांगितलेली गोष्ट....शेळी खूप लांब, पार त्या टोकाला होती पण शेजारून ओरडत होती. आवाजाचा चकवा....."
"हो..हो. ते काय आहे रहस्य?"
"हा..तर तेच सांगतोय. माझे काही मित्र आले होते एकदा, गढी पाहायला. ते अश्या जागी मुद्दामून जातात आणि खरे रहस्य शोधून काढतात. आम्ही तीन-चार दिवस रोज गढीत जायचो आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध घ्यायचो. आवाज करायचो. एकदा काय झाले, आमचा एक मित्र पार दुसऱ्या टोकाला उभा राहिला आणि आम्ही वेगवेगळ्या दिशेला उभे राहिलो आणि टाळ्या वाजवल्या. एकाने दोन, एकाने तीन आणि एकाने चार. आता आमच्या मित्राने फक्त तीन टाळ्या ऐकल्या, अगदी शेजारून आल्यासारख्या. म्हणजे.... त्याच्या समोर असलेल्या मित्राने वाजवलेल्या टाळ्या त्याला शेजारून वाजवल्यासारख्या वाटल्या, पण उजवीकडे आणि डावीकडे वाजवलेल्या टाळ्या ऐकूच आल्या नाहीत. मग आम्ही हाच प्रयोग खूप वेळ करत राहलो. आम्हाला खूप वेळाने लक्षात आले कि आवाज परावर्तित होतो आणि ऐकू जातो.
पण वाड्याच्या आत मात्र हाच आवाज आतल्या भिंतीवर आपटून परत परत येतो. म्हणजे वाड्याच्या बाहेर फक्त समोरच्या दिशेने होणार आवाज शेजारून आल्यासारखे येतात . पण वाड्यात तोच आवाज गोल गोल घुमत ऐकू येतो. आता समज, तू एका बंद मंदिरामध्ये उभी आहेस आणि जोरात घंटा वाजवली तर कसे आवाजाचे प्रतिध्वनी उमटतील.... तसं आतल्या बाजूला काहीतरी रहस्यमय रचना केलेली आहे."
मला कळत होते काका काय म्हणत आहेत ते. शेळी लांब टोकाला दिसली पण शेजारून आवाज आला. पाण्याचा धार पडल्यासारखा आवाज, कुत्री भूंकण्याचा आवाज, माणसे बोलण्याचा आवाज (कदाचित काही माणसे आले असतील आवाजाच्या टप्प्यात) म्हणजे ध्वनी परावर्तित होण्याची क्रिया वाडा बांधताना वापरली आहे. त्यामुळे आवाजाचा चकवा होऊन वाड्याच्या आतील माणसांचे संरक्षण होत असावे, त्यांना वाचवायची, बाहेर पडायची, लपायची संधी मिळत असावी.
"आता एकदा खरे काय हे आमच्या लक्षात आले आणि मग आम्ही गाव शहाणे करायला लागलो. पण गाववाल्याना शहाणे व्हायचे नव्हते, ते खुश होती गढी भुताची म्हणून. काही लोकांना गढी 'भूताचीच' हवी होती. आम्ही तिथे जागर, गोंधळ घातला, रात्रीचे राहिलो...पण गाववाले तसेच राहिले. आता निदान आम्ही तरी कोणी घाबरत नाही गढीत जायला आणि आवाजाचा चकवा आम्हाला होत नाही. हा...तुमच्यासारखे नवीन माणसे आले कि गाववाले खुश होतात. आणि जुन्या त्याच त्याच घटना रंगवून रंगवून परत परत सांगत राहतात..."
मला लक्ख समजले. घरातील मोठ्या लोकांना नमस्कार करून मी निरोप घेतला. रामाला धन्यवाद दिले आणि गोपीला घेऊन दुकानात गेले. पुढच्या वर्षीसाठी शाळेची लागणारी खरेदी करून दिली आणि ST स्टॅण्डवर येऊन वाट पाहू लागले. बस धुराळा उडवत चालू लागली. दूरवर अष्टकोनी गढी स्पष्ट दिसत होती. गढीमागे सूर्य लपला गेला होता. मनोमन गढीच्या विश्वकर्म्याला नमस्कार करत मी डोळे मिटून घेतले