भुतीया आणि रहस्यमयी अश्या अनेक गोष्टी जगात आहेत काहींचा संबंध भुताशी जोडला गेला काही एलियन किंवा टाइम ट्रॅव्हल संकल्पनेशी.....पण त्या त्या देशाच्या सरकारने वेळोवेळी ह्याचे खंडन केले आहे.....आणि ह्या सगळ्या अफवा आहेत असं वेळोवेळी जाहीर केले आहे.....सेंटीयागो मिसिंग प्लेन ही घटना अशीच आहे....तिथल्या सरकारने ह्याला अफवा आहे असं घोषित केलं आणि त्या पत्रकाराचा खोडसाळपणा होता हे पण जाहीर केलं होतं तर काय होती ती घटना कमी शब्दात जाणून घेऊ
4 सप्टेंबर 1954 साली सेंटीयागो एअर लाईनच्या फ्लाईट नंबर 513 ने जर्मनीच्या अकिन इथून उड्डाण केले पण हे प्लेन कधी लँड केलंच नाही....92 प्रवासी घेऊन उडालेले हे विमान 18 तासांनी ब्राझील मध्ये लँड करायचं होतं पण हे जहाज लँड झालंच नाही....अचानक आकाशात गायब झालं...त्यानंतर खूप शोधूनही त्याचा पत्ता लागला नाही किंवा जर क्रॅश झालं असेल तर त्याचे अवशेषही सापडले नाहीत.....हे विमान जेव्हा संपर्कात होते तेव्हा अटलांटिक महासागरावरून उडत होतं पण तिथून त्याचा संपर्क तुटला आणि ते गायब झालं.....92 प्रवासी असलेलं हे विमान अचानक गायब झाल्याने खूप चर्चा झाली....अनेक एजन्सीनी ह्या विमानाचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही.....लोक समजून चुकले की अटलांटिक महासागरावर उडत असताना कुठल्यातरी दुर्घटनेत हे विमान क्रॅश झालं आणि सगळे यात्री मरण पावले
पण 12 ऑक्टोबर 1989 साली पोर्तो एलेग्ले ह्या विमानतळावर एअर ट्राफिक स्क्रीनवर एक विमान दिसू लागले ह्या विमानाची नोंद कुठेच नव्हती.....तिथल्या लोकांनी पायलटशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण त्या विमानाच्या पायलट कडून कोणतेही उत्तर येत नव्हते.....विमान एअरपोर्ट रनवे वर आले....ह्या विमानकडे कोणतीही परवानगी नसताना हे विमान लँड झाले होते....सगळे कर्मचारी सावध झाले आणि धावत विमानाजवळ गेले.....विमान एकदम नवीन होते आणि त्याचे इंजिनही सुरूच होते....विमानाभोवती फिरल्या नंतर काही कर्मचारी सावध झाले त्या विमानावर सेंटीयागो एअरलाईन अस लिहल होत....आता मात्र तिथे काही वेळ खूप गोंधळ झाला कारण.....सेंटीयागो एअरलाईन 1956 साली बंद करण्यात आले होते आणि हे तेच विमान होते ते गायब झाले होते.....सगळे कर्मचारी गोंधळले शेवटी धीर एकवटून काही कर्मचारी त्या विमानात शिरले....आता मात्र त्यांना ओरडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण त्या विमानाच्या सीट्सवर मानवी हाडाचे सांगाडे होते....त्यांच्या शरीरावर अजूनही सीटबेल्ट तसेच होते....त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी कॉकपिट उघडलं तेव्हा दोन्ही पायलटचे हाडाचे सांगाडे सीट वर होते आणि त्यांचे हात कंट्रोल करणाऱ्या हँडलवर होते.....
ही घटना पहिल्यांदा 14 नोव्हेंबर 1989 ला इर्विन फिशर ह्या पत्रकाराने छापली होती.....लोकांनी त्यांच्यावर खूप टीकाही केली होती....ब्राझील सरकारने पण हे खोटं असल्याचं सांगितलं होतं.....पण हे एक मोठं रहस्य आहे की ही घटना खरच झाली होती की अफवा होती.... लोकांत भीती पसरू नये म्हणून सरकार ह्या घटनेविषयी बोलायला टाळते अस काहींच मत होतं....पण ह्या बातमीने पूर्ण जगात एक वेगळाच विषय छेडला होता