Dyatlov pass incident
एक दुर्दैवी सत्य रहस्यमयी घटना
जी डियाटलोव पास इंसिडेंट या नावाने प्रसिद्ध आहे.
ज्यात रशियन हायकर्स चा एक ग्रुप हाइकिंग करण्यासाठी ज्या पर्वतावर गेला त्या ग्रुप मधील सर्वांचा रहस्यमयी मृत्यु झाला.
ऐन तरुण्यतील कोवळी मूलं ज्या उमेदिने पर्वतारोहण करण्यासाठी गेली ती तिथून परत जीवंत येऊ शकली नाहीत. त्यां मूलांचा एकाएकी झालेला मृत्यु आज ही रहस्य बनून राहिला.
रशियाच्या पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट मधे शिकणाऱ्या 9 मुलामुलींचा ग्रुप रशियाच्या यूराल पर्वतावर हाइकिंग साठी गेला होता.जिथे आजवर कोणीही मनुष्य प्राणी पोहोचलेला नव्हता.
ही कॉलेजवयीन तरुण मूलं उत्तम पर्वतारोही होती.आजवर अश्या अनेक कठीण जागी जाऊन त्यांनी ट्रेकिंग केल होत बऱ्याच तुफानां चा सामना ही केला होता. यावरून हे हायकर्स हाइकिंग वगैरे करण्यात कसलेले होते हे लक्षात येत पण...
31 जानेवारी 1959 साली रशियन पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट मधे शिकणाऱ्या एकूण 10 हायकर्स चा ग्रुप निघाला ज्यात 3 जण इंजीनियर होते तर बाकीचे विद्यार्थी होते.
पण सुरुवातीला च त्यांच्या हाइकिंग ला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.
त्यातील एकाला पोटदुखी सुरु झाल्याने तो मागेच थांबला आणि बाकीचे 9 जण पुढे गेले.
त्या सर्वानी कोलतसियकल माउंटन ज्याला डेड माउंटन म्हणतात तिथे जायला सुरवात केली तोवर 1फेब्रुवरी उजाडला होता.
डेड मॉन्टेन वर येताच हवामान खराब झाल्याने सर्वानी तिथेच टेंट बांधून हवामान पूर्ववत होताच तिथून जायचा निर्णय घेतला आणि तिथेच कैम्प लावले.त्या दिवशी त्यातील एका मुलाचा बर्थडे होता तो त्यांनी तिथे सेलिब्रेट ही केला होता हे तिथे त्यांच्या टेंट च्या बाहेर पडलेल्या डायरीत दिवस भराच्या नोंदणीत नोंद केलेल होत.
ते हायकर्स जाऊन एक महीना उलटला होता आणि त्यांची कोणतीच ख़बरबात मिळाली नव्हती म्हणून जो मागे 10वा मुलगा राहिला होता तो रशियन रेस्क्यू टीम ला घेऊन त्यांच्या मागावर डेड माउंटन वर गेला पण जेव्हा ही रेस्क्यू टीम तिथवर पोहोचली तोवर त्या सर्वांचा मृत्यु झाला होता आणि तो मृत्यु इतका भयानक होता की त्यातील 5 जणानची डेड बॉडी आतून फ्रैक्चर झाली होती त्यातील एकाला डोक्याच्या आतून जबर मार लागून चक्काचुर झाला होता, काही जणाची जीभ गायब होती तर एका महीलेचे दोन्ही डोळे व जीभ गायब होती.
ज्याना इंटरनल फ्रैक्चर झाल होत त्यांच्या व इतरांच्या शरीरावर बाहेरुन कोणतीच जखम नव्हती,परंतु सर्वांच्या शरीराच्या आत मेजर डैमेज झाल होत.
पोस्टमार्टम रिपोर्ट मधे ही हे मृत्यु कुठल्याही मानवा अथवा जनवरा कडून झाले नसल्याच सिद्ध झाल होत.
प्रत्येकाच शरीर नारिंगि व थोडस काळपट पडलेल होत.
त्या भागात प्रचंड रेडियेशन निर्माण झाल्याचे सांगितले जात होत कस आणि का याचा ठोस पुरावा नाही परिणामी त्यांची शरीरे ही रेडियो एक्टिव झालेली होती.
रशियन आर्मी आणि रेस्क्यू टीम ने इन्वेस्टिगेशन स्टार्ट केल तेव्हा प्रथम दर्शनी लक्षात आल की त्यांचे टेंट आतून फाडले गेले होते आणि ते सगळे सर्वजण टेंट मधून बाहेर पळत सुटले होते.जस की कोणी अमानवीय शक्ति तिथे आली असून त्याला घाबरून ते हायकर्स पळत सुटले असावेत.
त्यावरून तीन मोठे अंदाज बांधले गेले एक होता आवलांज (avlanj) पण तो खरा ठरला नाही कारण चौकशीत त्या दोन तीन दिवसात कुठलाच एवलांज आला नव्हता हे निष्पन्न झाल.
दूसरा अंदाज येती(हिममानव)ने हमला केला असावा हा बांधला गेला परन्तु तो ही खारिज करण्यात आला कारण तिथे ह्या हायकर्स च्या पावलांच्या ठश्या व्यतिरिक्त कुठलाच बिग फुट ठसा सापडला नाही. अन नाही कुठल्या ध्रुवीय प्राण्याचा.
तीसरा अंदाज बांधला तो एलियन अटैक चा तो बरयापैकी खरा असावा अस इंवेस्टिगेटर्स च म्हणन होत कारण त्या दिवशी आकाशात काही रहस्यमयी दिवे पाहिल्या गेल्याच तेथून दुसऱ्या साइबेरिया च्या पर्वत रांगेत कैम्प लावलेल्या पर्वतारोहिना आणि तेथील बर्फ़ाळ प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या मानसा जातिच्या लोकांच म्हणन होत.
विशेष म्हणजे -30℃ च्या अंग गोठवणाऱ्या तापमानात या सर्वानी एकदम साधे कपड़े घातले होते तर काहीच्या अंगावर फक्त इनरवेयर होते कोणीच गरम कपड़े,स्वेटर्स, मफलर,हैंड ग्लोज वगैरे का घातले नव्हते ही एक आश्चर्यजनक बाब होती. त्यांनी जाताना एक हीटर ही नेला होता पण तो न वापरता जसाच्या तसा तिथे पडला होता,काही फ़ूड पैकेट्स ही तशीच न खाता इतरस्त पडली होती.
रशियन गवर्नमेंट, रशियन आर्मी ,डॉक्टर्स सर्वानी आपापल्या परिने ही मिस्ट्री सॉल्व करायचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती निराशा लागली,
मग नेमके त्या वेळी क़ाय झाल असाव जेणेकरून त्या निष्पाप हायकर्स विद्यार्थ्यानचा असा दर्दनाक,ह्रदय पिळवटून टाकनारा अंत झाला?हे अजूनही न उलघड़लेल कोड आहे.
यावर बरेच तर्क वितर्क लावले जाऊ लागले शेवटी इंवेस्टिगेशन टीम ने या सर्व घटनेला निसर्गातील अमानवीय शक्ति कारणीभूत आहे अस सांगून फ़ाइल क्लोज केली.
Source
Discovery channel
लेखन प्रथम वाडकर