वर्ग: १0 वी अ.-
Marathi horror story,bhutachi gosht-2
चोर दरवाजा वर्ग : १० वी अ
असेच खुप दिवस लोटून गेले.अमोग रोज रात्री बेचैन व्हायचा.त्याच्या मनात नेहमी त्या चोर दरवाजा बद्दल विचार घुमत होते.त्याला वाईट वाईट स्वप्न पण पडु लागली होती.कधी न पाहिलेल्या अजय चा चेहरा त्याच मन काल्पनिक रित्या बनवुन त्याची छबी एकरुप होउन अमोग कधी येतोय मला भेटायला अस वारंवार स्वप्न स्म्रुती ने त्याला आवाज देताना त्याला स्वप्नात दिसु लागतात.बघता बघता दिवस निघुन जातात व ८वी त शिकत असलेला अमोग आता ९ वी त जातो. तरी देखील त्याला अजुनही चोर दरवाजा शाळेत कुठे आहे हे त्याला सापडलेल नसतं.
त्या वर्षी शाळेत नविन बदल झालेले असतात. आतापर्यंत शाळेत फक्त मुलांना प्रवेश मिळायचा तेथे शाळेत त्या वर्षा पासुन तिथे मुलींना पण प्रवेश मिळायला सुरवात झालेली. त्या वर्षी शिकत असलेली मुले त्यामुळे जरा जास्तच उत्सुक होती त्यामुळे. अमोग ला मात्र या गोष्टीत काही रस न्हवता तो आपल्याच विश्वात रमत होता. हे वर्ष अमोग साठी जरा चॅलेंजिंग झालेल होत. कारण वारंवार झालेल्या परिक्षेत त्याच मार्कस चा परफाॅर्मस थोडा डाउन होता. व यामुळे त्याच्या वर्गातील आयशा नावाची मुलगी प्रत्येक परिक्षेत अमोग पेक्षा चांगल्या गुणांनी पास होत होती. तीच नाव वर्गात व शाळेत खुप गाजत होत. पण कुठे तरी तिच्यापेक्षा जास्त चर्चा अमोग ची होत होती. त्यामुळे आयशा ला पण जरा अमोग बद्दल इंटरेस्ट निर्माण झालेला. अमोग मात्र या सर्व गोष्टींपासून लांब होता. एक दिवस या सर्व गोष्टी घडत असताना अमोग चा मित्र मिहीर हा आयशा चा सर्व वर्गासमोर अपमान करतो. आयशा हुशार तर होतीच पण ती मनाने फार हळवी होती. ती मिहीर ने केलेला अपमान सहन करु शकली नाही व ती रडत वर्गाबाहेर निघुन गेली.
शाळेची ब्रेकची घंटा वाजते.मिहिर आणि अमोग डब्बा खाउन झाल्यावर चोर दरवाजा बद्दल बोलु लागतात अमोग मिहीर ला रात्री पडणार्या स्वप्नांबद्दल सांगु लागतो.तेवढ्यात त्यांना बाजुच्या बेंचवर बसलेल्या दोन मुली आयशा विषयी कुजबूज करताना दिसल्या त्या बोलत असताना शाळेच्या सर्वात जुन्या लेडीज टॉयलेट बद्दल बोलताना दिसतात.., जे शाळेच्या सर्वात लेफ्ट साईड ला असलेल्या एका ग्राउंड फ्लोअर ला लायब्ररी पासुन थोडी लांब ती मुलींची टॉयलेट असते. त्या मुलींच्या बोलण्यातून अस समजल की मिहीर न केलेल्या अपमाना मुळे आयशा ने तिथे जाउन स्वतःहाला बंद करुन घेतलेले असते.
हे ऐकून अमोग मिहीर ला बोलतो आपण पुर्ण शाळा पालती घातली पण आपल्याला शाळेत कुठेच तो चोर दरवाजा मिळाला नाही. हा चोर दरवाजा मुलींच्या टॉयलेट च्या येथे तर नाही.. मिहीर बोलला नाकारता तर येत नाही.. आपण मुल आहोत आणि आपला आणि मुलींच्या टॉयलेट संबंध तरी कशाला येईल तसही ते टॉयलेट किती दिवसांनी बंद आहे ते कोण युज पण करत नाही तिथे कोण जात पण नाही त्यामुळे आजवर आपल्या ते लक्षात आलं नसाव...लगेच वेळ न दवडता अमोग चल आपण त्या टॉयलेट जवळ चोर दरवाजा सापडतो का ते पाहुन येउ अस बोलुन ते पळत त्या मुलींच्या टॉयलेट च्या दिशेने धाव घेतात. बाथरुम जवळ येताच दोघेही सावधगीरीने कोणी पाहु नये या दृष्टीने बाथरुम गेटच्या दिशेने खाली उतरतात बाथरुम तळमजल्यावर असल्याने तिथे जिन्यात खुप अंधार असतो. बाथरूमच्या च्या जवळ आत पोहचताच ते गेट मध्ये प्रवेश करतात बाथरुम खुप मोठे असते १० -१२ बाथरुम तिथे असतात व एंटरस लाच मोठा आरसा धूळखात असतो व तिथे एका बेंसींगच्या नळातून पाणी बाहेरच्या दिशेने पडत असते. एकदम आतल्या बाजुच्या बाथरुम मधुन एका मुलीचा रडण्याचा आवाज ऐकु येताना अमोग आणि मिहीर ला दिसतो.त्यांना वर्गातल्या दोन मुली आयशा बद्दल बोलत होत्या ही तीच मुलगी असावी जीने स्वतःहाला त्या बाथरुम मध्ये बंद केलेल असत हे त्यांच्या लक्षात येते ते त्या बाथरुम जवळ जाता जाता एक दोन बाथरुम पार करताच तीसर्या बाथरुम मधुन एक कुत्री बाहेर चवताळून त्यांच्या दिशेने येते या गडबडीत ते दोघे घाबरुन बेसींग वर चढतात.या सगळ्या आवाजाने आयशा सावध होते व डोळे पुसते व बाहेर तीला दोन मुलांचा बोलताना आवाज तीला ऐकु येतो त्यात तीला मिहीर चा आवाज जाणवतो. मिहीर घाबरलेल्या अवस्थेत अमोग शी बोलत असतो रडवय्या आवाजात तो अमोग ला सांगतो अरे मला खुप भिती वाटते या कुतर्यांची मला लहान पणी एका कुतर्यांनी चावललेल मला वाचव यार अमोग यातुन अस बोलत तो मोठ मोठ्यानने ओरडत असतो हे आयशा मजा घेउन ऐकत असते मिहीर ची ही अवस्था पाहुन खुप हसायला येते व ती बाथरुमची कडी उघडुन बाहेर हसत येते. मिहीर व अमोग दोघेही वरती बेसींग चढलेले पाहुन तीला अजुन हसायला येते. ती कुत्री आता आयशा आणि त्या दोघांकडे बघुन अजुनच आक्रमक होते व मोठमोठ्याने त्यांच्याकडे बघुन भुंकु लागते. आयशा त्या कुत्रीला शांत करण्याचा हेतुने ती तीच्याकडे एकटक बघुन ती त्या कुत्रीकडे हात करून ती त्या भुंकणार्या कुत्री कडे एक मंत्र फेकते व ती कुत्री क्षणार्धात शांत होते व ती तिच्या जवळ जाउन ती तिच्या डोक्यावरुन हात फेरते. हे सगळ पाहुन अमोग मिहीर आवक होतात.. मिहीर बोलतो 'ऐ तुमने कैसे किया" त्यावर ती त्यांच्याकडे पाहुन स्मितहास्य देत बोलते हि एक मला दैवी देण आहे मला माझ्या वडिलांकडून मिळालेली मी पशु पक्षी तसेच इतर प्राण्यांवर मला जादु करुण त्यांना शांत करता येते. प्लीज तुम्ही हे कुठे बाहेर कोणाला बोलु नका. पण तुम्ही दोघे इथ काय करताय ते पण मुलींच्या बाथरुम मध्ये...दोघेही बेसींग वरुन खाली उतरतात.. त्यावर मिहीर बोलला तुला काय करायचय..ह...
मिहीर पुढे काय बोलायच्या आत अमोग बोलतो अह्अअ..अॅच्युली मिहीर न तुझा अपमान केलेला त्यासाठी तुझी माफी मागण्यासाठी आम्ही ईथे आलेलो...ती बोलते खरच पण याच्याकडे बघुन अस वाटत नाही हा माफी मागायला आलाय आणि तुम्ही जागा पण छान निवडलीये हा... माफी बोलताल तर मिहीर ला मी तेव्हाच माफ केल जेव्हा या कुत्री ने याचा माज उतरवला असो..मला खर खर सांगा तुम्ही इथे का आला... तेव्हा मिहीर बोलतो तुला का आम्ही सांगु...तेव्हा ती बोलते सांगाना प्लिज मी तुमची चांगली फ्रेंड झाली ना आता...तेव्हा अमोग बोलतो ओके ओके ओके ठीके आम्ही ईथे एक शाळेतला रहस्यमय दरवाजा इथेच आहे का हे हे पहायला आलोय..आयशा बोलते काय रहस्यमय दरवाजा...मिहिर बोलतो हो....आयशा त्यांना बाथरुम च्या कोपर्याच्या दिशेने बोट करत इशारा करते तो तिथे आहे असे सांगते...अमोग आणि मिहीर हळुहळू त्या दरवाजा पाशी येतात व ते दोघे खुप खुश होतात..त्यांना खरोखर तो दरवाजा सापडलेला असतो...अमोग आयशाचे खुप आभार मानतो कारण तिच्यामुळे तो दरवाजा मिळालेला असतो....दरवाजा तर सापडलेला असतो परंतु याला खोलायचे कसे हा खुप पुर्विचा प्राचिन दरवाजा उघडायचा कसा हा प्रश्न आता त्याच्या पुढे उभा होता...तेवढ्यात शाळेची बेल होते. आयशा बोलते आपल्याला जाव लागेल उद्या येउन आपण दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करु असे बोलुन कोणाला काही न कळता तिथुन बाहेर पडतात तिथुन जात असताना लायब्ररी तुन बाहेर निघताना रानडे काका त्यांना पाहतात.
त्यांच्या मनात विचार आला अरे बाप रे पोरांना दरवाजा सापडला तर नाही.. म्हणुन ते बाथरुम जवळ धाव घेतात.. त्यांना तिथे मुलांचे बुटांचे पायाचे ठसे दिसतात रानडे काकांना समजत मुल दरवाजा पाहुन गेलेत..ते दरवाजा बघायला आत वळतात तोच ती कुत्री रानडे काकांवर भुंकायला सुरु करते रानडे काका तिला घाबरत नाही कारण ती त्यांच्या ओळखीची कुत्री असते तीन दिलीली ३ पिल्ल घेउन तिला ते दुसरीकडे घर करुन देतात व बाथरुम च गेट बंद करुन त्यावर प्रवेश निषिद्ध असे लिहितात. व शाळेच्या अनाउंसमेटवर सर्व विद्यार्थांना सक्तीची मनाई करतात शाळेच्या जुन्या मुलींच्या टॉयलेट पाशी कोणीही विद्यार्थी जाउ नये तिथे प्रवेश बंद केलाय.
अनांउंसमेट ऐकताच अमोग आयशा आणि मिहिर एकमेकाकडे घाबरलेल्या अवस्थेत पाहतात.
भाग ३ लवकरच
लेखक : महादेव कांबळे