कथा :- महरूम -भाग :- ६
लेखक :- चेतन साळकर
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - ५ ची लिंक खाली दिलेली आहे
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_64.html
झाले निघाले . . . . दोघे ही तसे आनंदात होते . . . त्या जंगलातून जाताना झालेल्या सगळ्या अनुभवांची आठवण काढून ते सगळं तिथेच सोडून ते निघाले होते इतक्यात . . . . .
समोरून एक गाडी येऊन त्यांच्या समोर थांबली. बघता बघता गाडीतून दोन पोलिस खाली उतरले. त्यांच्या गाडीजवळ आले. आदित्य आणि विनिता विचारात पडले. काय झाले ? हे पोलिस इथे का येतात ? विचारात असताना पोलिस गाडीच्या काचे पर्यंत पोहोचले. आदित्य ने गाडीची काच खाली केली.
पोलिस :- कुठे चालला आहेत ?
आदित्य :- पुणे !
पोलिस :- नका जाऊ , पुढे दरड कोसळली आहे घाटात.
आदित्य आणि विनिता दोघेही अवाक् झाले. काहीही करून तिथून पळ काढायचा होताच.
आदित्य :- अहो मग दुसरा कोणता मार्ग ?
पोलिस :- इथून मागे गेलात तरी एका गावातून छोटा रस्ता आहे. शॉर्टकट. . .!! पण बाहेर पडायला वेळ लागेल.
दोघांनाही तिथे एक क्षण थांबायची इच्छा नव्हती. कालच्या फक्त एका रात्रीत जे घडले ते पुन्हा त्यांना अनुभवायचे नव्हते. शेवटी जे त्यांचे काम करावयास ते आले होते ते काम तर झाले होते. म्हणून त्यांनी कितीही उशीर झाला तरीही चालेल पण, इथून निघायचं अस ठरवल.
ते पुन्हा मग वळले. जिथून आले त्याच्या विरूद्ध रस्त्याने ते जायला निघाले. पुन्हा वाटेत शोफी च घर लागलं. त्यांना इच्छा सुध्दा नव्हती बघायची. दोघांनीही मान न वळवता समोर बघत प्रवास चालू ठेवला. दोघेही अगदी सुटकेचा निःश्वास टाकत प्रवासाचा आनंद घेणार इतक्यात विनिता ला बाजूच्या झाडीतून कोणीतरी पळताना दिसले. भर दिवस तो प्रकार घडत असल्याने तिला समजेना. आदित्य ही थोडा बावरला. त्यालाही काही समजत नव्हते. झाडातील जे कोणी होते ते कार च्या वेगाने पळत होते. इतक्या वेगाने एकतर काही ठराविक जनावरे पळतात नाहीतर काहीतरी आणखी वेगळं, पण मनुष्य कधीच धावू शकत नाही. दोघांनीही कटाक्ष टाकून पाहिले तर त्यांना माणसे पळताना दिसली. तेव्हा विनीता ला कळले की ती माणसे नसून तीच दोन मुलं होती ,जी तिला आदल्या रात्री त्रास देत होती. अगदी समान वेगाने ती दोघे गाडीच्या बरोबर समांतर रेषेत पळत होती. हळूहळू ती जवळ येऊ लागली. आणखीन जवळ , आणखीन जवळ. . . .अस करता करता ते अगदी गाडीच्या समोर आले आणि गाडीच्या काचेवर आपटले. नंतर क्षणात गायब ही झाले. ते जरी गायब झाले असले तरीही आदित्य चा गाडीवरील ताबा सुटला होता. त्याचे हातपाय काम करणं बंद झाले. हातपाय मोकळे झाल्याने गाडीचा तोल सुटला. गाडी हेलकावत गेली आणि घरंगळत जाऊन मोठ्या झाडाला आपटली. जशी गाडी आपटली तशी विनिता समोरच्या भागावर आपटली. डोक्याला मार बसला. समोर असलेल्या गाडीचा कोपरा कडील भाग डोक्याला बसला आणि डोक्यातून रक्त आले. आदित्य ला देखील डोक्याला लागले. त्याचे डोके समोर आदळले. म्हणून काही क्षण दोघेही तसेच पडून राहिले. नंतर एकमेकांना सावरू लागले. . . !!
दोघांनाही आता पुढे जाणे शक्य नव्हते , हे कळले होते. दोघेही पुन्हा मागे वळले. गाडी काढली आणि दोघेही शोफी च्या घराकडे परत आले. दुपार झाली होती. शोफी दरवाज्यात बसला होता. ह्यांची गाडी बघताच तो उठून चार पावले पुढे आला. त्याने दरवाजा उघडला. दोघांनाही पाहून तो हळहळला. आदित्य आणि शोफी दोघांनीही विनिता ला बाहेर काढले आणि घरात घेऊन गेले. मध्यान्ह झाली होती. भर चढला होता. घरात जाऊन त्यांनी विनिता ला औषध पाणी केले. विनिता ची तब्ब्येत आदित्य पेक्षा जरा जास्त खराब होती. फक्त डोक्यालाच नव्हे तर अंगाला सुध्दा मार बसला होता. झाले ते पुन्हा नको त्या ठिकाणी येऊन पडले. तेव्हा पुन्हा शोफी म्हणाला.
शोफी :- साहेब , नियती होती है. जाने कब कहा घेऊन जाईल.
झालं संध्याकाळ झाली. दिवसभर औषधपाणी केल्याने विनिता आणि आदित्य ला बरे वाटले होते. तिघे ही असेच आपल्या खोलीत बसले होते. आदित्य आणि विनिता दोघे ही नाराज होते कारण त्यांना तिथे एकही रात्र काढायची नव्हती. ती त्यांना काढावी लागत होती. पुन्हा ते अनुभव , भयाचे खेळ, पुन्हा ते स्वप्न . . .बापरे. ते सगळं पुन्हा अनुभवावं लागणार तर नाही ना , त्या भीतीने विनिता एकटक त्या खिडकीकडे बघत बसली होती. इतक्यात शोफी विषय काढतो.
शोफी :- काय करत होते , तुम्हांरे पिताजी ?
विनिता :- ते आमच्याबरोबर राहत नव्हते. आई आणि मी त्यांच्यापासून वेगळे राहत होतो. माझ्या जन्मापासून पुढे त्यांनी साधं मला कधी उचलून घेतलेलं नाही. कधी मधी नुसते लांबून बघून जायचे.
शोफी :- मग ते वारले कैसे ?
विनिता :- मला माहित नाही पण आई ने सांगितले की पाण्यात बुडून गेले , त्यांचं शरीर सुध्दा नाही मिळालं !!
हे एवढं बोलून होताच. बाहेरून मिट्ट काळोखातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. तिघेही सतर्क झाले. आता मात्र ती जी कोण मुलं होती ती, सर्वांसमक्ष आपल अस्तित्व दाखवू लागली होती. शोफी ने ही तो आवाज ऐकला. एवढं बोलून आदित्य पाणी प्यायला गेला. विनिता देखील थोडी विव्हळत बसली असताना तिने पाहिले , की शोफीने आपला हात दरवाज्याच्या दिशेने फक्त वळवला होता. तिला ही कळले नाही तो काय करत होता ते. एकतर तो विचित्र होता ते त्यांनी कालच्या रात्रीपासून ओळखले होतेच. तोपर्यंत आदित्य पाणी पिऊन आला. झाल्या पुन्हा गप्पा चालू झाल्या. विनिता ने मुद्दाम च विषय काढला . . . .
विनिता :- तुम्ही इथे का राहता ?
शोफी :- क्यु म्हणजे , मेरा घर आहे !
विनिता :- हो पण इतके तुम्ही शिकलेले वकील. मग चांगल्या ठिकाणी राहायचं सोडून इथे जंगलात एकट , अस का ?
शोफी :- वो क्या है , मे पूना मे ही रेहता था पण काही कारणाने मेरी मां और वडील मरगये. तो मी इथे आलो. मला आवडत जंगलात रहायला.
विनिता आणि आदित्य ला ते विचित्रच वाटले होतं कारण मुद्दाम जंगलात रहायला जरी आवडत असल तरी कोण एकटं येऊन राहील का वेड्यासारखं ? असे विचार दोघांच्याही मनात घुळत राहिले. पुन्हा शांतता पसरली. अचानक पुढे जे झाले ते इतके भयानक घडले. जे पाहून आदित्य आणि शोफी जागच्या जागी स्थब्द झाले. विनिता उठली आणि ओरडत किंचाळत जंगलात धावत गेली. त्या दोघांना काही कळायच्या आत ती कुठल्या कुठे पोहोचली होती आणि क्षणात नाहीशी झाली. ती लोकं पाठून धावेपर्यंत विनिता कुठे गडब झाली. आदित्य पूर्णपणे शॉक झाला होता. तो काय प्रकार आहे ? काय झालं तिला ? काय करायचं ? कुठे गेली असेल ? कसं शोधायचं ? सगळे प्रश्न नुसते ढोल बडवू लागले. आदित्य खूप म्हणजे खूपच घाबरला. त्याला स्वतःला सावरावे लागणारच होते. त्याला घळून चालणार नव्हते. शोफी ने त्याला सावरलं. ते दोघे ही तिला शोधायला जंगलात गेले. हातात टॉर्च घेऊन ते दोघे ही एकत्र चालत होते. अंधारून आलेलं काळोख खायला उठला होता. अंधरातल्या हलत्या सावल्या मनात घुसमटवून टाकत होत्या. चित्रविचित्र जंगली आवाज मनात घाव घालत होते. पाल्यापाचोळाचा आवाज चर्र करून जात होता. एखाद पान फळ पडलं की धपकन येणारा आवाज मनात घालमेल उठवत होता. दोघे ही खोल जंगली गर्भात जात होते. पुढे काय हाताला लागेल ,ह्याची पर्वा करीत नव्हते. एखाद भूत - जनावर - पिशाच समोर आलं तर आपण काय करणार , हे दोघांच्याही मनात नव्हतं. जेवढे मुख्य रस्त्यापासून आत खोल जंगलात जात होते तसा बाहेरच्या जगाशी संबंध तुटत होता. भयाण रहस्यमयी आणि भुताटलेल्या दुनियेची संपर्क येणार होता. ते आत जात गेले. कुठे विनिता चा आवाज ऐकू येतोय का हे पाहू लागले. . . . . . !!
अचानक त्या दोघांच्या अगदी बाजूने कोणीतरी जोरजोरात धावत गेले. इतक्या जबरदस्त वेगाने ते गेलं की कळलेच नाही काय झाले ते. तरीही दोघांनी टॉर्च त्यादिशेने भिरकावली. तर फक्त एक पुसटशी काळी गर्द सावली दिसली पण नक्की ती विनिता असेल का आणि कोण ? हे सांगता येण्यासारखे नव्हते. त्यांनी देखील पाठलाग केला. पळत पळत जाता होते त्यामागून. ती सावली प्रचंड वेगाने पुढे धावत होती आणि पाठीमागून हे दोघे धावत होते. थोडे अंतर धावल्यावर दोघेही थांबले. एकतर दामले म्हणून थांबले आणि ती सावली देखील कुठे दिसेनाशी झाली म्हणून सुध्दा थांबले. चंद्राच्या चांदण्यात काही लक्ख दिसत नव्हते. अंधुक असे दिसून येत होते. काही कळले नाही ते काय होते ? कोण धावत गेले होते ? अचानक मात्र एक घटना घडली. दूरवरून लांबून कोणीतरी रडण्याचा आवाज येऊ लागला. दोघेही थबकले. जवळ जवळ जाऊ लागले. एका झाडाच्या आडून पाहू लागले तर अंधुक अश्या प्रकाशात त्यांना विनिता एका दगडावर बसलेली दिसली. ती रडत होती. शोफी ने आणि आदित्य ने तिला आणण्यासाठी पुढे पाय टाकला तसा विनिता ने त्या दोघांकडे कटाक्ष टाकला. भयानक डोळयांनी ती दोघांना पाहू लागली. शोफी थांबला. त्याने आदित्य ला देखील थांबवले. दोघे ही दोन पावलं मागे गेले. तिघांची नजरानजर खूप भयानक होती. दोघे झाडाच्या मागून तिला बघत होते आणि ती तिथून त्यांच्याकडे नजर देऊन बघत होती. हळूहळू विनिता उठली आणि त्यांच्याकडे बघत त्यांच्याच दिशेने येऊ लागली. जवळ आली. भयानक अवतार पाहून दोघे ही चरकले होते. दोघेही जरा ही हालचाल नव्हते करत. शोफी ने तेव्हा आदित्य ला डोळ्यांनी खुणावले की "डोळे बंद कर". आदित्य ने डोळे बंद केले. पुन्हा त्याचा आवाज आल्यावर डोळे उघडले तर विनिता अगदी पूर्ववत होती. त्याला खूप आनंद झाला. . . . . तिने देखील त्याला मिठी मारली. ती सावरली होती.. . . .तसे तिघेही टॉर्च च्या साहाय्याने पुन्हा घराकडे निघाले. . . . . .
चालता चालता आदित्य च्या मनात प्रश्न घुळत होता की,
"शोफी ने मला डोळे बंद करायला का लावले". . . .!!
भाग - ७ पुढील टप्प्यात
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_19.html
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा