कथा :- महरूम -भाग :- ७
लेखक :- चेतन साळकरHorrorostory tube present
© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - ६ ची लिंक खाली दिलेली आहे
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_50.html
चालता चालता आदित्य च्या मनात प्रश्न घुळत होता की, "शोफी ने मला डोळे बंद करायला का लावले". . . .!!
तिघेही अंधारातून वाट काढत घरापर्यंत पोहोचले. घनदाट अरण्यातून रात्रीच्या थंड वातावरणातून वाटेने जाताना तिघांच्याही अंगात शिरशिरी होतीच. पोहोचले तिघेही घरात. शोफी ने घराबाहेर शेकोटी पेटवली. जंगल पुन्हा खायला उठले. तिघांनी जे काय होतं ते काहीतरी खाल्लं. पुन्हा झोपायची वेळ , पुन्हा तो अनुभव , आदल्या दिवसाची रात्र जे देऊन गेली होती , ते पुन्हा नको ! असं विनिता च्या मनात येत होते. झाले झोपायची वेळ आली. आदित्य आणि शोफी दोघेही घराबाहेर शेकोटी जवळ बसून शेक घेत होते. विनिता आतमध्ये बसून झोपायची तयारी करीत होती. अचानक तिच्या हाताला घरातील काही पुस्तके लागली, जी शोफी वाचत असे. त्या पुस्तकातील काही पुस्तकांनी तिचे लक्ष वेधले. तर "अशुभ घटना , जंगल , प्रेतात्मा , घोस्टली-नाईट" अशी पुस्तके होती. तिला जरा विचित्र वाटले. अश्या पुस्तकांची आवड शोफी ना कशी असावी. कोर्टाचे मुख्य असून ह्यांची ही जगण्याची प्रवृत्ती. तिने बरचसे प्रश्न तसेच ठेवले. इतक्यात आदित्य आणि शोफी दोघेही घरात आले. सगळे झोपायला गेले. आदित्य आणि विनिता खाली झोपले आणि शोफी वर खुर्चीवर झोपायला गेला. झोपायला जाताना शोफीने विस्कटलेली पुस्तके पाहिली. . . .आणि तो झोपला.
रात्र वाढली. घुबडांची चित्कारनी वाढली. घराबाहेर येऊन ते विव्हळू लागले. भयानक आवाजाची रेलचेल सुरू झाली. दूर रानातून धावणाऱ्या प्राण्यांची हालचाल ऐकू येऊ लागली. एखाद चिटपाखरू विचित्र आवाज काढत हवेत इकडून तिकडे विहरू लागलं. झाडाखाली असलेल्या सुकलेल्या पानांचा चर्र म्हणून होणारा आवाज खेचत होता. चंद्राच्या नितळ प्रकाशात हलणाऱ्या सावल्या मनात भ्रम निर्माण करू लागल्या. विनिता झोपली होती. तिला स्वप्न पडले. कधी नव्हे ते तिच्या स्वप्नात वडील आले. "वडील एका झाडाजवळ उभे राहुन तिच्याकडे बघत रडत आहेत , असे त्या स्वप्नात दिसले". ती दचकून उठली. वडिलांशी तिचे आणि तिच्या आईचे संबंध चांगले नव्हते , हे तिला माहीत असताना सुध्दा असे स्वप्न ? म्हणजे एक आश्चर्यच होते. ती उठली. तिला तहान लागली. आदित्य आणि शोफी आपापल्या जागी झोपले होते. ती उठून मटक्या जवळ गेली. तिथे जाऊन तिने मटक्यातून पाणी काढले आणि दोन घोट घेतले. झोप तशी लागत नव्हती कारण तशी मनाची इच्छा सुध्दा नव्हती. तिने पाहिले घराच्या खिडकीतून बाहेर तर तिचे वडील एका झाडाखाली खरंच उभे होते आणि तिच्याकडे बघत रडत होते. तिला समजेना , हे कसं शक्य आहे. स्वप्न होतं तर मग जे आता डोळ्यांना दिसते आहे ते काय आहे ? असं संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. ती खाली बसली. तिला काही सुचत नव्हते. पुन्हा उठली पाहिले बाहेर तर ते वडील तसेच उभे होते. काय करावे सुचत नसल्याने ती गोंधळून गेली. मेलेला माणूस पुन्हा डोळ्यांना दिसला आणि जरी तो आपला बाप असला तर भीती ही वाटतेच. ती पुन्हा बघू लागली तर तिने पाहिले तर वडील चालत चालत रस्त्याच्या मध्यावरती आले. अगदी मधोमध ते आले आणि तिकडून जाणाऱ्या एका भरदार वेगाच्या गाडीने त्यांना उडवले. त्यांच्या शरीराला चिरत ती गाडी तिथून वेगाने निघून गेली. ते पाहताच तिला राहवले नाही. ती झटकन बाहेर आली. धावत त्यांच्याजवळ गेली. ते जिथे पडले होते तिथे पोहोचली आणि खाली बसून त्यांना बघू लागली. रडत असताना तीच लक्ष बाजूला असलेल्या एका चित्राने वेधलं. समोरच्या डोंगरात एक पाऊलवाट वर गेलेली होती आणि वर मंदिराचा कळस असावा असे घुमट होते. ती आठवू लागली तेव्हा कळले की, तिने ते मंदिर किंवा ते दृश्य स्वप्नात पुण्याला घरी असताना पाहिले होते. ती घाबरली. म्हणजे ह्या जागेबाबत तिने स्वप्न पाहिले होते ती हीच जागा !! ह्याचं तिला अचंबा वाटला. ती शहारली. खाली मान वळवली तर तिथे वडील नव्हतेच. कोणीच नव्हते. एकटीच रस्त्याच्या मध्यभागी बसलेली होती. . . . .तिला कळले तेव्हा ती भानावर आली आणि पळत घरात जाणार इतक्यात तिला कोणीतरी खेचले आणि मागे पाडले.
काही कळायच्या आतच तिला फरफटत खेचले गेले. दगडधोंडे , काटे, ह्याला अंग फाटून निघत होते. मोठमोठ्या खड्यातून तिला फरफटत नेले गेले. ती ओरडत राहिली , किंचाळत राहिली परंतु त्या घनदाट जंगलात तिचा आवाज शोफी च्या घरापर्यंत पोहोचू शकतच नव्हता. इतक्या खोल जंगलात तिला खेचत नेले गेले. पाठीमागून कोण दोन्ही पाय धरुन खेचत होते ते तिला दिसतच नव्हते. तिने पाहण्याचा प्रयत्न केला पण दिसले काहीच नाही. ती आपोआपच जमिनीवरून फरफटत जात होती. ती खूप घाबरली होती. जीवाच्या आकांताने ती नरडे फुटेपर्यंत ओरडत होती. आवाज घोगरा झाला , प्रत्येक श्वासा बरोबर दम वाढत चालला होता. कपडे जमिनीकडच्या बाजूने खालून फाटायला लागले. एकटी बाई काय करणार ? ह्या विचाराने ती कोसळून गेली. काय बर वाईट झाले तर काय करणार ? कसे बाहेर पडणार ? ती रडून रडून दमून गेली. घसा कोरडा पडला. शेवटी खोल जंगलात जाऊन ती एका झाडाजवळ थांबली. तिने आजुबाजुला पाहिले तर तोच दगड होता जो तिने कालच्या रात्री पहिला होता. ज्याच्या भोवती ती विशिष्ट दगडांची माळ घातली होती. त्यातले काही दगड जागेवरती नव्हते. तिला ते दृश्य आदल्या रात्री ही आवडले नव्हते आणि तेव्हा ही आवडले नाही.
ती घाबरली. काय करावे . रात्र आता पुढे पुढे सरकत होती. सांजावून कधीचा वेळ गेला होता. रात्रीचे ११ वाजले असावेत. तिला रस्ताच दिसत नव्हता तर पुढे ती एकटी काय करणार होती. ती उठली. जागेवर उभी राहिली. चारही बाजूला तिने नजर दिली. चारही बाजूने फक्त अंधार खायला उठला होता. त्या अंधारातला तो भयानक गुढतेचा राक्षस आपले काळे दात वीचाकुन अंगावर येत होता. अचानक तिला एका कोपऱ्यात थोडासा उजेड दिसला. ती जवळ जवळ जाऊ लागली. तो उजेड थोडा प्रखर होऊ लागला. होता होता ती त्या प्रकाशाजवळ पोहोचली. तिला दिसले एक जुनाट दगडाचे अवशेष. त्या दगडाच्या भोवती चौकोनी तारेचे कुंपण घातलेले होते. तारा खूप जुन्या होत्या ,गंजून गेल्या होत्या. ती ते असले विचित्र प्रकार पाहून आधीच घाबरली होती. तिला मागून हालचाल जाणवली. काय असेल ? काय असेल ? डोळे तयार नव्हते. पाय थरथरत होते , हातापायाला कंप सुटला , पाठीमागे वळल्यावर काय दिसणार ह्या भीतीने ती कोलमडून गेली. शेवटी धीर करून ती मागे वळली आणि समोर पाहिले तर तिचे वडील उभे होते. ती खूप घाबरली. ओरडायला लागली. वडिलांनी आपले हात एका दिशेने दाखवले. त्यांचा हात निर्देश करीत होता एक जागा पण ती त्या मनःस्थितीत नव्हती. ती घाबरत धावत सुटली. पुन्हा तिला कोणी पाडले आणि फरफटत ती खेचली जाऊ लागली. पुन्हा खाचखळगे, खड्डे, काटे ह्यानान चिरत तीच अंग रक्ताळून गेलं. तिची फरफट थांबली ती थेट शोफी च्या घराच्या पायरिशी.. .
तिला खूप लागले होते पण. ती थोडावेळ अंग सावरून बसली. आदित्य आणि शोफी दोघेही शांत झोपले होते. त्या आधीच्या सगळ्या प्रकारात ते शोधत यायचे आताच का आले नाही ? असे प्रश्न तिला सतावू लागले. ती उठली , घश्याला कोरड पडली म्हणून ती आत पाणी पिण्यासाठी गेली. पाण्याचा ग्लास तोंडाला लावताना तिला एक अशी वस्तू दिसली ज्याने ती मागच्या मागे उडाली. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिला त्या अडगळीच्या वस्तूंमध्ये दिसले काही दगडाचे मणी. बोटाच्या एक पेर उंचीचे ते दगड त्या मध्ये गोल नक्षी होती. तिला आठवले त्यादिवशी आणि मघाशी जो दगड मी जंगलात बघितला आणि त्याच्या भोवती ह्याचं प्रकारच्या दगडाची माळ आहे. तिने आदित्य ला उठवले आणि झाला सगळा प्रकार सांगितला. आदित्यने देखील तिच्यावर विश्वास ठेवला. दोघांनी मिळून शोफी ला हा काय प्रकार आहे ,हे विचारायचे ठरवले. दोघांनी हितगुज केली आणि ते आतमध्ये घरात प्रवेशकर्ते झाले आणि समोरच शोफी उभा होता.
शोफी :- मे दुंगा, तुमच्या प्रश्नांचे उत्तरं !
आदित्य :- हरामखोर, हे काय चाललंय ते आधी सांग ? ह्यामुळे आम्हाला केवढा त्रास झालाय. कळतंय का तुला ?
विनिता :- जे काय असेल ते लवकर सांगा ? ती दगडांची माळ आणि तो जंगलातला दगड ,ह्याचा काय संबंध ?
शोफी :- मे उसकी पूजा करता हू. नाही तर मग मी मरून जाईन.
आदित्य :- आम्हाला काय ते व्यवस्थित सांग ?
शोफी :- मे वकील तो हुं पर मै भूतो से परिचित हुं. मी पुण्याला काम पे हु. रेहता यहापे हुं. जास्त जात नाही मे पुणा मे. माझे वडील भूत प्रेत आत्मा उनके साथ बाते करते थे. मला पण ती आवड आहे. मुझे भी वो आता हैं. इथे एकदा मी आलो होतो वडिलांसोबत. तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला भुतांनी. मे डर गया. उसके बाद घर जाणे के बाद वो बिमार रेहणे लगे. कुछ दिवस बाद मर गये. फिर एक दीन मे यहा आया, औंर यही रेहने लगा. अभी मुझे सब विद्या येते.
आदित्य आणि विनिता खरतर घाबरले पण त्यांना आनंद ही झाला कारण आपल्याला होणाऱ्या त्या त्रासापासून शोफी वाचवू शकेल. विनिता ने एकूण एक झालेले सगळे प्रकार त्याच्या कानावर घातले. शोफी थबकला. विनिता ने तो दगड आणि तो चौकोन कुंपण असलेला दगड बघितला यावर घाबरला. त्याने त्याच क्षणी दोघांनाही " आपल्याला जंगलात जावं लागेल" असे सांगितले. तिघेही मिळून जंगलाकडे निघाले. हळूहळू वातावरण आता रंगायला लागले होते. शोफी ची ओळख पटली होती. इतके प्रसंग घडले होते की, प्रत्येकाची क्रमवारी लावून त्याचा सोक्षमोक्ष लावणे थोडे कठीण होते पण ते शोफी च्या मदतीने साकार करायचे होते. रात्र वाढली. सुमार १२ चा झाला. जंगल शांत असल तरी पेटल होतं. एकेक रहस्य उलगडून तेव्हा समोर येऊन थैमान घालीत होती. रस्ता ओलांडून तिघेही जिथे तो दगड आहे तिथे निघाले होते. बरेच प्रश्न विनिता च्या डोक्यात नुसती गर्दी करून होते. हळूहळू पावले टाकत तिघेही त्या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या त्या दगडापासून दहा पावले अंतरावर थांबले. शोफी पुढे झाला. त्याने एकेक पाऊल पुढे चालायला प्रारंभ केला. विनिता आणि आदित्य दोघेही तिथेच थांबले. शोफी दगडापर्यंत पोहोचला. त्याने दगडावरील ती दगडांची माळ काढली आणि अलगद हाताने ती स्वतःच्या गळयात घातली. . . . .
आणि तत्क्षणी वातावरण पेटले. वारा उधळून आला. माती , खडे , वाऱ्याच्या झोतात उडू लागले. डोळ्यात माती जाऊ लागली. झाडे गदगदाउन हलू लागली. काय होत आहे ? काही समजत नव्हते ? शोफी मात्र शांत उभा होता. आदित्य आणि विनिता ने समोर पाहिले तर समोर घडणारी घटना असह्य होत होती. . . . . शोफी ने देखील पाहिलं तर समोर. . . . . . !!
भाग - ८ पुढील टप्प्यात
>https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_20.html
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा