खरंच भूत असते? मला नेहमी हा प्रश्न पडायचा कारण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. मला देखील अनुभव आले आहेत मला चकवा बसला आहे पण याचा अर्थ असा आहे का की या मागे काहीतरी अमानवीय शक्ती असेल?
मला तर नाही वाटत असा काही असेल म्हणून आणि जर ती अमानवीय शक्ती असेल तर ती या मानवी डोळ्यांना दिसत का नाही? भूत खरंच असत यावर माझा अजूनही विश्वास नाही.
पडक्या घरातली बाई...
घटना सत्य आहे.....
मी कदाचित पाचवी किंवा सहावी मध्ये असेल. त्या काळी पाचवी च वय म्हणजे एकदम बालिश आताच्या पिढीसारखं आमचं आयुष्य मोबाईल मध्ये नाही गेलं.
गावाकडं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी होतो. रात्री गावी कस विजेची सोय नसायची त्यामुळे सगळीकडे अंधार असायचा. सगळ्यांची जेवण झाले की आमची आजी बाहेर येऊन ओसरीवर बसायची मग आणखी चार बायका यायच्या आणि यांच्या गप्पा सुरु होयच्या पण रात्री अकरा चा ठोका पडला की सगळे घरात जायचे आणि सगळं गाव चिडीचूप होयचं.
एक दिवस असच दुपारी झोपलो होतो सुट्टीच्या दिवशी त्यामुळे रात्रीची झोप येत नव्हती. आणि मी आजीचा लाडका मला झोप येत नव्हती म्हणून मी आजीला झोपू देत नव्हतो. आजी सारखी झोप झोप म्हणायची मी म्हणायचो गोष्ट सांग मग झोपतो. आजी म्हणली तू लहान नाहीयेस गोष्ट ऐकायला मी म्हणालो सांग खूप दिवस झाले सांगितलं नाहीस. आजी म्हणाली झोप नाहीतर ती येईल. अस म्हणून आजी झोपून गेली पण आजी ने झोपताना ती म्हणून कोणाचा उल्लेख केला मला ते समजत नव्हतं. या विचारात मला देखील झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत जायची गडबड मी आवरलं आणि शाळेत गेलो दिवसभर तेच डोक्यात ती म्हणजे कोण? की आजीने मला झोपावं म्हणून भीती घातली ते कळत नव्हतं. मग शाळा सुटली की घर गाठून आजी कडून ती कोण जाणून घेयचं ठरवलं. पाच वाजले शाळा सुटली मी दप्तर पाठीवर टांगल आणि पळत सुटलो घराकडे आणि आजीला आवाज देऊ लागलो आजी आली ओरडत बाहेर का र कुणाचा जीव चाललाय रं.....
मी म्हणालो मला सांग रात्री तू ती येईल म्हणून झोपलीस ती कोण होती?
आजी क्षणभर शांत झाली आणि म्हणाली मी चहा ठेवते तू आवरून घे माझ्या मनात आलं पुण्याला आईबाबांकडे गेलो असतो बर झालं असत...
चहा आणि खारी माझ्या समोर आली मी खात खात आजीला विचारलं सांग कोण होती ती?
आजी म्हणाली सांगते आणि आजीने सुरुवात केली,
अरे आपल्या घराशेजारी एक बोळ आत गेलंय ना तिथं एक पडक घर आहे बघ तुला मी जाऊ नको म्हणत असते तिथे मी म्हणालो हा त्याच काय तू तर म्हणाली होतीस की तिकडे भला मोठा नाग गेलाय म्हणून जाऊ देत नाहीस अस पण तिकडे लोक राहतात च की...
आजी म्हणाली माझं ऐक त्या पडक्या घरात एक बाई राहत होती माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मी दहा ते बारा दिवस झाले होते या घराचा उंबरा ओलांडून. एके दिवशी त्या घरातून आरडाओरडा ऐकू लागला आम्ही घाबरलो काय झालं म्हणून तुझे आजोबा मी दोघे पण पळत गेलो आणि पाहतो तर त्या बाईने स्वतःला जिवंत पेटवून घेतलं होतं. ती फार मोठ्या मोठ्या ने किंकाळी फोडत होती. पण भीतीपोटी कोणी तिला वाचवायला गेलं नाही. शेवटी ती तिच्या घरात मरून पडली. मी मधेच म्हणालो तिने आग का लावली? आजी म्हणाली, मला नाही माहिती पण कोणी म्हणतं नवरा चांगला नव्हता कोणी म्हणत जमीन सावकाराने घेतली होती. मग मी म्हणालो त्याचं इथं काय संबंध ती मेली आहे ती का परत येईल आजी मला म्हणाली अरे आपलं घर गावच्या मुख्य रस्त्यावर आहे ना त्याकाळी रात्रीची पण लोक यायचे कामावरून आणि अस च एके दिवशी एक माणूस गावातला मध्यरात्री परतत असताना त्याला ती बाई दिसली आपल्याच घराच्या समोरून पळत किंकाळत जाताना साडी त्या साडीला लागलेली आग आणि ती मोठ्यामोठ्याने ओरडत पळत होती. तो माणूस तिथे बेशुद्ध होऊन पडला त्यानंतर ती आणखी दोघं तिघांना दिसली गावात सगळीकडे त्याच गोष्टीची चर्चा होती. त्यामुळे गावकरी 11 नंतर आजूनपन बाहेर फिरत नाहीत. आजीने त्या बाईचे केलेलं वर्णन ऐकून माझ्या अंगावरून एक सर्रकन काटा आला. मी मनाशीच म्हटलं वाट लागणार बहुतेक रात्रीच्या झोपेची. कधी कधी शाळेतून येताना वैगरे रस्त्यावरून त्या बोळातल्या घराकडे लक्ष्य जायचं पण आजीने गोष्ट संगीतल्यापासून मी त्याकडे पाहायचं नाही असं ठरवलं होतं पण या न त्या कारणाने लक्ष्य जायचं माझं आणि भीती वाटायची.धसका घेतला होता मी त्या सगळ्या घटनेचा आणि आमच्या आजीची गोष्ट सांगायची पद्धत होती ना त्याने पार गांगरून गेलतो. आणि रात्री झोपताना तेच होयचं झोप तर लागत नव्हती पण डोळे बंद केले की ती बाई दिसायची पेटलेली साडी मोठमोठ्या किंकाळ्या तस पण मी भूत tv मधेच पाहिलं होतं त्यावरून मी निष्कर्ष काढला की पांढरी साडी असेल तिची भूत म्हंटलं की पांढरा कपडा आलाच. पण त्या बाईचा चेहरा कधी नजरेसमोर मला आला नाही. पण स्वप्न मात्र पडायचं कधी कधी अस वाटायचं की खरंच ती ओरडत आहे. असच एकेदिवशी मी झोपलो असताना माझ्या स्वप्नात ती पांढऱ्या साडीतली बाई आली आणि परत तेच पेटलेला पदर आणि मोठ्या किंकाळ्या बस्स. मला वाटलं जाईल लगेच पण बराच वेळ झाला ते तसच चालू होतं ती स्वप्नात पेटलेला शरीरासह पळत होती आणि मोठयाने ओरडत देखील होती. मला घाम फुटला भीतीने मी दचकून जागा झालो आणि आजीला जाग केलं आणि रडू लागलो आजी बोलली काय झालं मी म्हणालो ते पेटलेली बाई स्वप्नात आली होती आणि आता ती सारखी स्वप्नात येते आजी म्हणाली तू झोप आता शांत मग आजीने मला कुशीत घेतलं आणि मी शांत झोपलो. सकाळी मी उठलो आणि आजोबा खालच्या घरात गेले जिथे आमचं देवघर होत आणि तिथून एक काळा दोरा आणला आणि तो माझ्या उजव्या पायात बांधला आणि काहीच नाही बोलले मला. तो काळा दोरा त्यांना जरा खराब झालेला दिसला तरी ते आजपण नवीन बांधतात. पण मला नाही वाटत काळा दोरा काही कामाचा आहे आज 12 ते 13 वर्ष झाली ती बाई कधी कधी माझ्या स्वप्नात येतेच तीच पेटलेली पांढरी साडी आणि मोठमोठ्या किंकाळ्या घेऊन.........
- तेजस काकडे