#कथा :- महरूम
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- १
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
पुन्हा नविन कथा.
नवीन मांडणी. . . . चला प्रारंभ करूया भय अनुभवाला !
मागच्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे
या ही कथेला सुंदर प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो
धन्यवाद !
लेखकाची भेट कथेच्या समाप्तीला !
तोपर्यंत धन्यवाद !!
स्थळ :- कॉर्पोरेट ( पुणे )
वेळ :- संध्याकाळी ६
पुण्याची "ती" संध्याकाळ तशी रागीटच वाटत होती. भिरभिरणाऱ्या पक्ष्यांचे थवे त्यादिवशी भकास वाटत होते. पर्वती वरून दिसणारा सूर्यास्त देखील जरा गोंधळून गेला होता कारण त्यालाही ते घडणारे दृश्य पाहवत नव्हते. इतकी भीषणता, त्यात अंधारायाला लागले होते. गदारोळ माजला होता , रस्त्यांवर गाड्यांची रेलचेल कमी झाली, सर्व सिग्नल बंद झाले , नाक्या-नाक्यावर पोलिस उभे होते आणि कॉपोर्रेट कडे जाणाऱ्या गाड्यांना मज्जाव करीत होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तिथून पास झाल्या. दिव्यांच्या प्रकाशझोतात घडलेल्या घटनांनी सारे वातावरण शहारून उठले होते. इतक्यात तिथे सिग्नल ला एक गाडी लागली आणि त्यातून एक साधारण तरुण वयातला व्यक्ती खाली उतरला, तो होता "आदित्य".
उतरून तो गाडीचा दरवाजा खोलून बाहेर आला. कशी बशी गाडीची चावी थरथरत्या हाताने काढली किंबहुना खेचली आणि गाडी आहे त्या अवस्थेत टाकून तो जश्या होता त्या अवस्थेत पळत सुटला. घामाघूम झालेला चेहरा , डोळ्यात भयाचे भाव , अंग थरथरत होतं , त्याच्या पळण्यातून कळत होते की काहीतरी गडबडीत असावा. तो पुढे सरसावला आणि कॉपोर्रेट मध्ये आला. तिथे डेपो ला लागूनच एक छोटे मध्यवर्ती न्यायालय आहे. अगदी छोटे म्हणजे ते बघून कोणाला वाटणार नाही की ते न्यायालय आहे म्हणून. तिथे तो पोहोचला आणि पोलिसांच्या वेढ्यातून वाट काढू लागला. न्यायालय मोठमोठ्या अग्नीच्या धगित जळून निघत होतं. तो रडत होता , त्याच्या डोळ्यांतील भावनांना दिशा देऊन पोलिसांनी त्याला आत पाठवले. त्याने तिथे आत सोडायची काही कारण सांगितली असावी. आत जाणार इतक्यात न्यायालयाच्या छताकडील भाग जो जळून खाक झाला होता, तो खाली भिरकावला गेला. आदित्य थोडक्यासाठी वाचला. त्याने पाय थांबवले तसा तो पत्रा खाली कोसळला. तो भिरभिरत्या नजरेने जिकडे तिकडे पाहू लागला. डोळ्यात पाणी तसेच होते तरळत. इतक्यात आतून एक मुलगी बाहेर आली. जीवाच्या आकांताने पळत ती त्या आगीच्या लोटातून बाहेर पडली आणि आदित्य च्या पायात पडली. तिला बघताच आदित्य आणखीन रडू लागला. त्याने तिला उचलून धरलं आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. दोघे ही रडत होती. . .
अखेर तीची भेट झाली. ती म्हणजे "विनिता". आदित्य ची बायको. न्यायालयात एका कामासाठी आलेली असताना अचानक भयंकर आग लागली. ती खबर कळताच आदित्य धावत आला होता. मुलबाळ अद्याप नसल्याने त्यांना एकमेकांशिवाय कोणीही नव्हते. दोघांचे नितांत प्रेम असल्यामुळे दोघे ही खूप भावूक झाले होते. आदित्य आणि विनिता रहायला "सिंहगड रोड" ला. आदित्य फार्मा कंपनीत डिपार्टमेंट स्टॉक मॅनेजर होता. विनिता घरीच असायची. आदित्यला फारसी कश्याची आवड नव्हती पण विनिता ला मात्र पुस्तक वाचण्याचा छंद होता. असा दोघांचा सुखी संसार होता. . . . . असाच संसार चालू असताना मग अशी एक घटना जेव्हा घडली तेव्हापासून पुढचे सर्व फासे उलटे पडत गेले. . . . !!
स्थळ :- दोघांचे घर
वेळ :- रात्री १०
थंडीचे दिवस आले होते. रात्रीचे १० वाजले होते. नेहमीप्रमाणे दोघे ही आपापल्या कामात बसले होते. सिंहगड रोड ला लागूनच असलेल्या एका शेतजमिनीत ह्याचं घर होतं. घर दुमजली होते. आजूबाजूला शेती आणि दूर दूर अंतरावर मुख्य रस्ता, असा ह्यांचा कबिला राहत होता. आदित्य आपली कामे आटोपून बेडवर पडला होता पण विनिता खिडकीत बसून पुस्तक हातात घेऊन फक्त समोर बघत होती. खिडकीतून दिसणाऱ्या दूरच्या रस्त्यावर एकटक बघत असताना मागून आदित्य ने विषय काढला
आदित्य :- महिना होईल ना ग , बाबांना जाऊन !
( विनिता काही न बोलता नुसती बसून राहिली. डोळ्यात मात्र पाणी होते.)
आदित्य :- त्या वकिलांना फाईल दिलीस ना आज ?
विनिता :- हो दिली. आज जर नसती दिली तर पुन्हा महिनाभर थांबावं लागलं असतं , कारण ते खूप जखमी झालेत आज !
आदित्य :- हे बघ वाईट नको वाटून घेऊन पण , त्यांची जी काय इस्टेट आहे, पैसा - प्रॉपर्टी आहे ती आता आपल्यालाच मिळायला हवी होती कारण आता तुझ्या मागे कोणी भावंड नाही. म्हणून आपण सगळं केल !
नुसती मान डोलवत तिने संमती दिली होती. हातातील पुस्तक बाजूला ठेवून ती उठली आणि काही क्षण खिडकीजवळ उभी राहिली. तोपर्यंत थोड्या वेळाने आदित्य झोपला. रात्र भराला उठली. मिणमिण करणारे गाड्यांचे दूरवरून येणारे दिव्यांचे प्रकाश थोडा आभास निर्माण करू लागले. थंड वारा खिडकीतून आता शिरू लागला होता. अचानक एक काळा रंगाचा झोत खिडकीवर आपटला. तशी विनिता मागे धडकली. काय झाले कळले नाही. तिचा एकाएकी तोल गेला. मागे असलेल्या बेड च्या कडेला ती आपटली. डोक्याला लहानसा मार बसला. पुन्हा उठली तिला कळेना काय झाले. कसला आवाज झाला, काय काळ्या रंगाचं होत , तिला कळेना म्हणून ती पुन्हा उठली आणि खिडकीत गेली तर खालच्या मजल्यावर कोणीतरी धावत गेल्याचा आवाज झाला. पहिल्यांदा तिला कळलेच नाही की नेमका आवाज कुठून आला ते. नंतर तिने थोडी हालचाल झालेली लक्षात घेतली मग ती खाली यायला निघाली. . . .
पायऱ्या उतरू लागली. उतरताना तिच्या मनात घालमेल होतीच. खरतर ती आदित्य ला उठवू शकली असती पण तो दिवसभर दमतो म्हणून तिने काही त्याला उठवले नाही. पायऱ्या उतरताना तिला खाली काहीतरी किंवा कोणीतरी आहे ह्याची खात्री पटली होती. एखाद पाखरू ? प्राणी ? सरपटणारे जीव ? सगळे संबंध लागले होते. पण धप धप करून आलेला आवाज कसला असावा ? ह्याच विचारात ती खाली आली. खाली येताच तिने खालच्या मजल्यावरची लाईट लावली. मागे वळली. तिथे ही एक खिडकी होती. त्या खिडकीजवळ जायला लागली. दुतर्फा असणारी झाडी , चित्रविचित्र आवाज ह्यामुळे जरा घाबरायला होत होते एवढेच. तिथे असणारा एक छोटा दिवा तिने प्रज्वलित केला. थोडा उजेड वाढला. तीच लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या दृष्याकडे असताना मागून पुन्हा धप धप धप असा पळण्याचा आवाज आला. ती मागे वळली तर तिच्या अंगावर शिरशिरी उठली. डोळ्यांना विश्वास बसणार नाही अस दृश्य दिसलं. समोर दरवाजा उघडा होता आणि खाली खोलीतून बाहेर पडणारे चिखलाचे पाय होते. जसं की कोणी खोलीतून बाहेर पडावं असे. तिच्या पायात कळ उठली. डोळ्यांनी बघितलेले ते दृश्य ती वारंवार पाहू लागली. कोणीतरी धावत गेल्याचा आवाज नेमका ह्याचाच होता की काय ह्या विचारांनी ती कोलमडून पडली आणि बेशुद्ध झाली. . . .
रात्र रंगात गेली , खोल भीती गर्भात दाटून ठेऊन ती थरथर कापत होती, संभ्रम निर्माण करीत होती आणि थोड्या वेळाने ती चिखलाची पावले देखील गायब झाली होती. . .
भाग - २ पुढील टप्प्यात