#कथा :- महरूम
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- २
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - १ ची लिंक खाली दिलेली आहे
कोणीतरी धावत गेल्याचा आवाज नेमका ह्याचाच होता की काय ह्या विचारांनी ती कोलमडून पडली आणि थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. . . . !!
थोड्या वेळाने ती चिखलाची पावले गायब झाली होती. . .
सकाळ झाली. सूर्याची किरणे थेट घरात येत असत. आदित्यला जाग आली. तो नेहमी प्रमाणे कामावर जायला उठला. तर त्याने पाहिले की विनिता बाजूला नाही. त्याला कळेना काय झाले. वाटलं लवकर उठून काम आटपत असेल म्हणून त्याने आवाज दिला तर एक नाही दोन नाही. कुठेच आवाज येत नाही म्हणून तो घाबरून उठला. खोलीत शोधू लागला, म्हणता म्हणता खाली पायऱ्या उतरून आला. तर खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेली विनिता त्याला दिसली. खालच्या मजल्यावरचे सर्व लाइट्स , दिवे प्रज्वलित तसेच होते. विस्कटलेले सामान तसेच होते. त्याला कळेना काय झाले ते. त्याने जाऊन पाणी आणले आणि विनिताच्या चेहऱ्यावर मारले. तशी सुस्कारा सोडून विनिता जागी झाली. जागी होताच ती जिकडेतिकडे ते पायांचे चिखलाचे ठसे शोधू लागली पण कुठेही ते तिला दिसले नाहीत. ती इतकी गडबडून गेलेली पाहून आदित्य ने तिला वरच्या खोलीत नेऊन झोपवले. तिला थोडा आराम करू दिला तोपर्यंत स्वतःची कामाला जायची तयारी केली आणि पुन्हा तिच्याकडे येऊन बसला. काय प्रकार झालाय तो त्याला ऐकायचा होता. बसल्या बसल्या विनिता ने घडला प्रकार सर्व त्याच्या कानावर घातला. त्यावर तो म्हणाला
आदित्य :- तू ती पुस्तक वाचणं आधी बंद कर. नको ते काहीतरी वाचत बसतेस मग डोक्यात तेच घोळत राहत आणि मग झोपेत पण तेच दिसत राहत. काही नाही वाचायची उद्यापासून पुस्तकं.
त्याला सांगून कळत नाही बघितल्यावर विनिता ने बोलणं बंद केलं. पायाचे ठसे समोर असते तर त्याला दाखवू शकली असती पण काही फायदा नव्हता म्हणून तिला ही गप बसणं भाग पडलं. आदित्य निघून गेला.
दिवसभर विनिता एकटीच घरात होती. त्या दिवसभरात तिने खूप गोष्टी अनुभवल्या होत्या. मनाला गुंग करून टाकतील आणि प्रत्यक्ष सांगून कोणाला पटणार नाहीत अश्या घटना तिने पहिल्या होत्या आणि ऐकल्या होत्या. आदित्य सकाळी गेला तेव्हा ती पुन्हा झोपली आणि थोड्यावेळाने उठली तेव्हा ती खालच्या मजल्याच्या एका कोनाड्यात होती. वरून आपोआप खाली कशी आली तिलाच कळले नव्हते. मग उठली नी जेवण करू लागली तेव्हा घराच्या आजूबाजूने कोणीतरी फिरत असल्याचा भास तिला झाला. जेवत जेवताना कोणीतरी खालच्या मजल्यावर उड्या मारतानाचा आवाज तिला आला. प्रत्यक्ष डोळ्यांनी इकडचा ग्लास तिकडे हलताना जेव्हा तिने पाहिले, तेव्हा मात्र तिची चाळण उडाली. पायाखालची जमीनच सरकली. दुपारी ती झोपली. पुन्हा झोपेत ती एकटीच चालत होती. बडबडत होती. कोणीतरी दरवाजा वाजवायच , कोणीतरी खिडकीपाशी येऊन आवाज द्यायचं , संध्याकाळ झाली तशी ते प्रकार वाढले. सूर्यास्त झाला आणि घरातील देवघर दोन्ही बाजूने निखळले आणि अर्धवट लटकत राहिले. सगळे देव खाली पडले. तिने पटपट जाऊन ते उचलले आणि एक चांगल्या स्वच्छ जागेवर ठेवले , तिथेच दिवा लावला. अचानक कधी ही न जाणारी लाईट तेव्हा गेली. संपूर्ण काळोख घरात झाला. काळोखात धडपडत ती खाली आली , माचिस आणि मेणबत्ती शोधू लागली. मेणबत्ती हाताला लागली आणि माचिस सुध्दा पण माचिस खाली पडली. पडलेली माचिस शोधायला ती खाली वाकली. एका टेबलाच्या खाली ती माचिस गेली होती. विनिता ने खाली हात घातला आणि हातांना माचिस लागते का शोधू लागली आणि अचानक ती थबकली. हाताला मऊ स्पर्श झाला, दोन चार बोट लागली. कुणाचा तरी पाय होता म्हणून ती किंचाळत बाजूला झाली. ती खूप घाबरली असल्याने मुख्य घराचा दरवाजा उघडून सरळ बाहेर आली. वेड्यासारखी आरडाओरडा करू लागली. दमछाक झालेली त्यात भयानक अनुभव येत असल्याने ती दमून गेली होती. बाहेर येताच गेलेली लाईट पुन्हा आली. तसा तिच्या जीवात जीव आला. ती घरात गेली कारण घाबरून बाहेरही थांबू शकत नव्हती कारण बाहेर उघडे शेत होते आणि अंधार पसरला होता. घरात राहणे चांगले म्हणून ती सरळ वरच्या मजल्यावर गेली आणि बेडवर पडून राहिली. रात्रीचे ८ वाजले होते. काळोखाचे आपले साम्राज्य विस्तारले होते.
तिला झोप लागली. झोपेत तिने स्वतःला स्वप्नात पाहीले. ती जंगलातून एकटीच घाबरून धावत आहे ,तिच्या पाठीमागे कोणीतरी धावत आहे. कोण धावत आहे ते स्पष्ट कळत नव्हते. ती पुढे आणि मागे ते कोण ? धावत धावत ती एका डोंगराच्या कडेला गेली. तिथून तिने खाली वाकून पाहिले. इतक्यात पाठून त्या अज्ञात व्यक्ती चे हात आले आणि तिला खाली फेकून दिले. एवढे स्वप्न पाहताच ती दचकून उठली. चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. इतक्या भयानक स्वप्नातून ती बाहेर आली होती. ती उठली आणि खाली आली ,चेहरा स्वच्छ धुतला. इतक्यात गाडीचा आवाज आला. तशी तिच्या आतली ऊर्जा संपली आणि डोळ्यात पाण्याचे डोह भरून ती भर वेगाने आदित्य कडे धावली. रडायचा एकही क्षण नाही गेला. ती धुस्मुसुन रडू लागली. आदित्यला ही कळेना काय झाले ? त्याने तिला सावरले , आत घेऊन आला , बेडवर बसवले आणि पाणी आणून दिले. तिची अवस्था पाहून आदित्यला खूप गहिवरून आले होते. विस्कटलेले केस , डोळ्यातील पाणी, रडून रडून झालेले हाल, तीची शुध्द नव्हती. आदित्य च्या मनात घालमेल झाली. काय करावे ? कसे करावे ? इतक्यात विनिता रडून सांगू लागली . . . .
विनिता :- "आदी" इथे काहीतरी वेगळं घडतंय. मला खूप भीती वाटतेय ! आपण कुठे तरी दुसरीकडे जाऊया का रहायला. मला खूप भीती आहे इथे.
आदित्य :- अग "विनी" आपण अस नाही करू शकत. वेडी आहेस का. अस कस जाऊ शकतो आपण. हे बघ तू घाबरु नकोस होईल सगळं ठीक.
दोघांनीही एकमेकांना आधार देऊन जेवण आटोपून घेतले आणि झोपायला गेले. खरंतर विनिता नुकतीच झोप घेऊन उठली होती. त्यामुळे तिला लगेच काही झोप येणारी नव्हती. ती खूप वेळ अशीच आदित्य च्या बाजूला पडून राहिली. मग ती थोड्यावेळाने उठली. खिडकीत पुस्तक वाचत बसली. त्याने ओरडल्यामुळे त्याच्या नकळत पुस्तक वाचत होती. पुढचा एक तास ती बसली आणि मग तिलाही हळूहळू मग थंड वाऱ्यात पेंग येऊ लागली. तिने पुस्तक बाजूला ठेवलं आणि आदित्यच्या बाजूला येऊन झोपली. पुढच्या सेकंदाला ती पूर्ण गाढ झोपली. . . . .
झोपेत पुन्हा तिला विचित्र स्वप्न दिसू लागली. घामाघूम झालेली विनिता धड झोपत ही नव्हती नी जागी ही राहू शकत नव्हती. इतक्यात एक विचित्र घटना घडली. उघड्या असणाऱ्या खिडकीवर ,जिथे वारा अलगद रेंगाळत होता ,चंद्राचा प्रकाश स्थिर होता तिथे अचानक अनपेक्षितपणे एक काळा कावळा येऊन बसला. विनिता घाबरली. त्या काळ्या कावळ्याच्या डोळ्यातील भाव खूप भयावह होते. तीक्ष्ण डोळे चंद्राच्या प्रकाशात लखलखत होते. काळोखात उठून दिसणाऱ्या त्या डोळयांनी विनीता ला भीती वाटली आणि ती मिट्ट डोळे बंद करून कुशी होऊन झोपली. अचानक काहीतरी धाडकनsss.. पडल्याचा आवाज झाला. . . . .
विनिता फिरली आणि मागे वळून पाहिले तर तिला विचित्र पणाचा धक्का बसला . . . .
भाग - ३ पुढील टप्प्यात