आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या असंख्य घटना, अडचणी, जितक्या कुलदैवत कुळाचाराशी संबंधित असतात तितक्याच त्या पितृदोषाशी संबंधित देखील असतात. जितका कुलदैवत कुळाचार महत्वाचा आहे तितकेच पितरांचे श्राद्ध देखील महत्त्वाचे आहे. आणि नेमका तोच लोप पावत चालला असल्याने कित्येक लोक त्रासात आहेत. आणि नेमक्या त्याच गोष्टीचा उलगडा आपण पुढील भागात करणार आहोत. त्याचीच एक सुरुवात आजपासून करीत आहे.
*पितृदोष म्हणजे काय .?*
*भाग -१*पितृदोष लागण्याची काही प्रमुख 8 कारणे आहेत.
प्रत्येक भागात आपण 2 कारणे पाहणार आहोत. त्यापैकी 2 कारणे आज आपण पाहणार आहोत की नक्की कोण कोणत्या कारणामुळे पितरांचे म्हणा किंवा आत्म्याचे दोष लागतात.
◆ पितृदोष लागण्याची प्रमुख कारणे :-
*1) मृत व्यक्तीला 3 वर्ष होऊन गेल्यावर पण पुढे रितसर श्राद्ध न केल्यामुळे.*
बऱ्याच कुटुंबामध्ये असा समज आहे की माणूस मेल्यावर फक्त 3 वर्षच ब्राह्मण बोलावून रीतसर श्राद्ध घालतात. त्यानंतर थांबले तरी चालेल. पण असे नसते. घरातील व्यक्ती गेल्यावर 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांचे श्राद्ध हे रीतसर ब्राह्मण बोलावून विधी करून करावे. जर त्यांच्या तिथीला शक्य नाही झाल्यास पितृपक्षात *महालय श्राद्ध* करावे. त्यामध्ये सर्वच पितरे येतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, श्राद्धाच्या तिथीला कोणताही विधी न करता नुसता कावळ्याला घास टाकला म्हणजे श्राद्ध केले असे नसते. बरेच लोक त्या गोष्टीला श्राद्ध समजून भ्रमात आहेत. तर तसे करू नका. तुम्हाला जसे रोज खायला लागते तसे पितरांना वर्षातून एकदा पोटभर खायला लागते. ते बाकी वर्षभर तुम्हाला काही मागणार सुद्धा नाहीत. त्यांना जर तुम्ही रितसर खायला नाही दिले तर ते तुम्हाला त्रास देणारच. आणि त्रास देतात म्हणजे त्यांना ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची असते म्हणून. त्यांचा इतर कोणता हेतू नसतो. हे आपण लक्षात घ्यायला हवे. बरेच लोक श्राद्ध करणे बंद करतात आणि मग खरा त्रास सुरू होतो.
*2) देवघरात पितरांचे टाक ठेवल्यामुळे
मी आत्तापर्यंत जेवढ्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्र च्या केस हाताळल्या आहेत त्यात हि एक गोष्ट मला खूप प्रखर्षाने दिसली आहे. बऱ्याच समाजात जेव्हा घरात नवीन लग्न करायचे ठरवतात तेव्हा कुलदेव कुलदेवीच्या टाकासोबत पितरांचे टाक देखील बनवले जातात. अश्या मोठ्या शुभकार्यात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना मान देणे काही चूक नाही. पण त्याला देखील काही नियम आणि शास्त्र आहेत, तेच बऱ्याच लोकांना माहिती नसतात आणि मग खरे दोष मागे लागतात त्यांच्या. ब्राह्मण समाजात लग्नाच्या वेळी सोडमुंज आणि नांदी श्राद्ध केले जाते. आणि हे झाल्यावर मुलाला 3 दिवस विटाळ असतो. तो फिटेल तेव्हाच पूढील कार्यात वरमुलगा सामील होऊ शकतो. तसेच इतर समाजात पितरांचे टाक बनवून देवक पूजन करतात त्या वेळी पितरांच्या टाकाची पूजा केली जाते. पण खरी गोष्ट तर नंतर आहे. पितरांच्या टाकाला हा मान फक्त तेवढ्या कार्यपूरता देऊन लग्न झाल्यावर त्या पितरांच्या टाकांचे रितसर पाण्यात विसर्जन करावे लागते. पण बरेच लोक असे न करता ते टाक तसेच देवघरात पूजेत ठेवतात.
आणि तिथून खरा त्रास सुरू होतो मग. शुभकार्यात आशिर्वाद देण्यासाठी तुम्ही पितरांना आवाहन तर केलेले असते. पण ते टाक तुम्ही देवघरात पूजेला ठेवून त्यांच्या परतीच्या प्रवासाचा मार्गच बंद करून टाकता. आणि त्यांच्या आत्म्याची खरी तडफड सुरू होते. ते माघारी तर जाऊ शकत नाहीत. आणि त्यांना देवाजवळ ठेवल्यामुळे त्यांच्या आत्म्याला जे देवाच्या ऊर्जेचे चटके बसतात ते वेगळेच. कारण साधू संत, सिद्ध पुरुष, हे सोडून कोणत्याही
सर्वसामान्य मृत आत्म्याला देवाजवळ थेट स्थान नाही. देवाजवळ बसण्याचा अधिकार नाही. हे नियमाच्या विरुध्द आहे. आणि नेमकी तीच चूक लोक करतात. आणि मग आपलेच पूर्वज जरी असले तरी त्यांचे आत्मे तुम्ही नियमबाह्य वागल्यामुळे तुम्हाला शिक्षा द्यायला सुरू करतात. आणि मग आपण म्हणतो अरे आपलेच पूर्वज असून आपल्याला कसे त्रास देतायत. तर त्याचे कारण म्हणजे त्यांनी देह सोडल्यावर त्यांना पितृलोकचे नियम लागू पडतात. त्यांना तुमचे मनुष्य लोकाचे नियम लागू पडत नाहीत. आणि त्यांना त्यात काही आवड सुद्धा नसते.
माझ्या ह्या विषयातील आत्तापर्यंत चा अनुभव सांगतोय की,
ज्या घरात असे प्रखर पितृदोष असतात त्या घरात, खूप वर्ष झाली तरी मूलबाळ नसणे, गर्भ राहिला तरी काही कारण नसताना अचानक गर्भपात होणे, घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू होणे, सततची मोठी आजारपणे लागणे ही लक्षणे प्रखर्षाने जाणवतात.
इतर कारणे आपण पुढील भागात पाहुयात...
क्रमशः
लेखन आणि संकलन
कुलकर्णी गुरुजी