नाग रहस्य भाग 3
★ कनक धनावरील नाग ★
आपण पाहतो कि प्राचीन काळी पैसे,धन असल्यावर ठेवण्यासाठी अडचणी येत त्यावेळेस ते धन हंड्यात भरून तो गुप्त ठिकाणी जमिनीत ठेवण्याची प्रथाच होती व तो अतिशय सुरक्षित उपाय त्या काळातील होता.कालांतराने त्याच धनाची चोरी होत असे त्या मूळे त्या धनाच्या रक्षणासाठी पहाड्या रिंगण (नजर बंदी) वापरले जात त्यामुळे धन चोरणाऱ्या सापडणाऱ्या व्यक्तीला धनाचा चकवा होतो.तसेच रक्षणासाठी बाह्य शक्तीचा ही वापर करत त्यात मुंजा हा एका दगडात बंदिस्त करून त्या धनावर बसवला जातो ,तसेच धनाई चा पाठीराखा देवाची स्थापना करत आणि आजही त्या ठिकाणी आमावस्याला सायंकाळी तेलाचा दिवा ठेवला असता तो रहस्यमयी ऊर्जेने लागल्या जातो.
आजही पूर्वजांचे पुराणे वाडे ,तळघर,लादण्या,मंदिराच्या ठिकाणी गुप्त धनसाठा आहे त्यात सोन्या चांदीची नाणी,अलंकार दागिने मौल्या वान रत्ने जमिनीच्या आत गुप्त गाडलेली आहेत.पायाळू जन्मणाऱ्या व्यक्तीला हे गुप्तधन दिसते,तर काही व्यक्तींना रात्री हंड्याचा ,घागरीचा,जमिनीच्या आत भांडे वाजल्याचा आवाज येतो,काही व्यक्तींना गुप्त धनावरील धन्या आवाज देतो की मला बाहेर काढा...काही पिढ्यात पंजोबा,आजोबा सांगतात की या ठिकाणी गुप्तधन आहे...तर काही ठिकाणी घराचा पाय खांदातांना थोडे धन सापडते नंतर पूर्ण धन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात... पण एक अडचण येते की ज्या ठिकाणी धन असते त्याचा राखणदार हा रक्षणासाठी बसलेला असतो त्यात विशेष करून धनाचा नाग ह्याला खूप घाबरता कारण त्याच्या कडे दैवी शक्ती असतात.त्या ठिकाणी नागाचे वास्तव्य असते व तो दिसतो ही मंग धन मिळवण्यासाठी त्याचा बंदोबस्त
न करता काढण्याचा प्रयत्न केल्यास धनासाठी धन तर जातेच पण त्याच्या नादी लागल्या मुळे पूर्ण घरदार नष्ट झालेली दिसतात आशा व्यक्तींचा आजही अनुभव ऐकल्यावर गुप्त धनाचे भय निर्माण होते त्या मुळे बंदोबस्त करणाऱ्या जाणकाराच्या साह्याने धन काढतात.तर पाहुया धनावरील नाग...काहि वेळा मृत्यू नंतर ही गुप्त ठेवलेल्या धनात जीव अडकल्या मुळे पितृ...नाग योनीत जाऊन धनाचे रक्षण करतात.असे अनेक प्रकार आहेत तसेच त्या काळी प्रचिलीत असणारी पद्धत म्हणजे
"कनक धनावरील नाग"
हा त्या गुप्त ठेवलेल्या धनावर नाग करून ठेवत तो कसा करता तर एक गुप्त विधी आहे तर पाहूया .....गावात, घरात गुप्त ठिकाणी धन जमिनीत ठेवल्या जात नंतर पांढरे धान्य वगळता इतर धान्य घेऊन घाणीच्या म्हसोबाची पूजा देऊन ते धान्य तोंडात दिले जाते ...काही भागातील लोकांना माहीत आहे घाणीचा म्हसोबा तो जात्याचा असतो...ते घेऊन जात्यावर धान्य टाकून सुरवातीला उलट फिरवलं जाते नंतर पीठ काढलं जात त्या पिठाच्या कणकेचा नाग तयार केला जातो त्याला शेंदूर लावून मंत्राने भार टाकुन गुप्त पूजा विधी केला जातो नंतर त्या नागाला नाव ठेवले जाते व धनावर वाळूत एकवीस दिवस पुरून ठेवला जातो हळूहळू त्याला जीव फुटून जागृत अवस्थेत येतो.कालांतराने दुसऱ्या व्यक्तीला त्या कनक धनाच्या नागाचे नाव माहीत असेल तरच तो धनाला काढून स्पर्श करू शकतो अन्यथा त्या नागाच्या समोर मृत्यू शी सामना करावा लागतो ....कनक धना वरील नाग हा काळा व भयंकर आक्रमक आणि जसे जसे आयुष्य वाढते तसे त्याच्या अंगावर केस पाहायला मिळतात तसेच पितृ नाग हा पांढरा असतो व त्याठिकाणी वावरताना दिसतो त्याच प्रमाणे धन खुप असल्यास त्या ठिकाणावर एकापेक्षा जास्त नाग करून ठेवले जातात.काळ्या केसाळ नागांचे वास्तव्य भरपूर असल्याने त्याच ठिकाणी मुंगुस राहत असतील तर धन असल्याचे संकेत मिळतात कारण कुबेराचे वाहन मुंगूस आणि मुंगुसाला सारे धनाचे साठे माहीत असतात...
धन काढतांना कनक धनावरील नाग चावल्यास किंवा वारा लागल्यास मृत्यू होतो तर अशा नागाचे विष वारा कसा उतरवतात तर पाहुया...
मंत्र फक्त माहितीस्तव दिला आहे....
मंत्र: - ओम नमो आदेश नाडी आडी शँख गजावर्म ब्रह्मपोथी सूर्य किरण शेषाची आण गरुडा ची आण,एक दोन वर्म चार पाच वर्म,सहाजण सर्प,आठ जण घोणस, अधेल्या फुरुषा धुंकार करिशी गुरूंनाथाचे चेले पाताळी गेले तेथे होते अमृतकुंड चोर साप म्हैसासुर दैत्य आनंद करिसी,फूट करिसी,तिडीक करिसी,रगत करिसी,तर परटाचे पातरीचे पाणी पीसी,तांब्या शेल्या,तांब्या टोण्या नांवे त्याने आणिले शेषाचे हाती दिली कण्हेरीची काठी विखार गेला गिरीकपाटी तेथून आणिला लिंबाचा डहाळा त्याने उतरला विखाराचा वारा ....... ...... ......अशा मंत्राने विधीयुक्त झाडा करून विष वारा उतरवतात क्रमशः....
पुढील भागात सविस्तर गुप्त धन व नाग बारी व नाग संचार विषयी पाहूया,लेख आवडला असेल व या संदर्भातील अनुभव प्रतिक्रिया नक्की द्या....
लेख:
(नाथभक्त अभिनाथ)
टीप: सदरील लेख हा आस्तिक लोकांसाठी असून नास्तिक लोकांसाठी कथा रहस्य म्हणून पहावे