नाग विद्या ......रहस्य भाग 2
माघील लेखात पाहिले की डोकरी नाग विद्ये सारख्या अनेक विद्येचे प्रकार आहेत त्यात आपण पाहिले प्राचीन काळी युद्धाच्या वेळी नाग अस्त्र सोडले जात ते रामायण काळात महाभारतात पाहिले आहे त्या नंतर नवनाथांच्या काळात ह्या विद्येत भर पडल्याचे दिसून येते
एखाद्या व्यक्तीवर विद्येने नाग सोडला आहे का नाही......? हे विद्येने कसे ओळखतात तर ग्रामीण भागात वेग वेगळे प्रकार आहेत त्यातील एक प्रकार नाथ डँख विद्येने पाहतात ते कसे एका काशाच्या धातूंची परात घेऊन त्यात पाणी टाकून त्यांत डोक्याचे केस टाकल्या जातात व नाथ डँखातील नऊ डँख मंत्राचे भार टाकला जातो नंतर त्या व्यक्तीला ते पाणी पाहण्यास दिले जाते नाग सोडला असेल तर तो त्याला दिसतो व तो घाबरतो जर नाग सोडला नसेल तर तो व्यक्ती पाण्यात केस आहे म्हणून सांगतो आशा प्रकारे पाहतात....
मंदिर, देवस्थान ठिकाणी डोगरात, नदीला ,ग्रामीण भागात ,किंवा तीर्थक्षे्त्रा जवळ विद्येने नाग स्थापना केली जात रक्षणासाठी व त्याचे प्रत्यक्षात दर्शन झाल्याचे ही पाहतो ,त्यांची स्थापना मूर्ती व्दारे केल्याची ही दिसते त्यात नागदेव ,कुठे त्याला ब्राम्हण देव सुद्धा म्हणतात हे रक्षणासाठी उभे राहतात तसेच औट नाग आणि कोट नाग हे अष्ट कुळातील सरकोट वंशी नाग आहेत हे उग्र देवता असुन ते अघोर प्रकार द्वारे सोडले जातात व त्या व्यक्तीला त्रास देतात त्या व्यक्तीच्या रस्त्यात नाग आडवे येतात ,स्वप्नात नाग दिसणे घाबरून टाकने तसेच काहींना संचार ही येतो त्यावेळी त्या व्यक्तीचे शरीर निळसर होऊन विष असल्याचा प्रभाव दिसतो,तोंडाला फेस येणे, चक्कर येऊन पडणे असा प्रकार घडतो त्यावेळेस त्याला काही वनस्पती घेऊन विधी केला जातो व मंत्राने टाक मारतात त्या वेळेस ज्या व्यक्तीने हा खेळ करून सर्प सोडला आहे त्याच्यावर त्याचा खेळ उलटवून तो फिरवला जातो
माहितीस्तव मंत्र...अरे अरे तुझं गुरू लवातीतर माझा गुरू ससाणा उतर डँखा होय निराळा गरुड पिळील मान आडमोडू हाडतोडू तीनशे पान अष्ट कुळी नवनागाची मान मोडू गरुड अस्ता..... ..... ..... अशा प्रकारे टाक मंत्रा द्वारे मारला जातो काही वेळातच अशा प्रकारे आजारी व्यक्ती बरा होतो
तर पुढील भागात करक धना वरील नाग व नागाची बारी या विषयाचे रहस्य पाहूया
टीप: सदरील लेख हा अस्तित् लोकांसाठी असून नास्तिक लोकांनी रहस्यकथा म्हणून पाहावे.