गुप्त नाग विद्या....रहस्य भाग ०१
नाग विद्या विषयी जाणून घेणार आहोत तर नाग देव, नाग विद्या ,रहस्य खूप मोठ असून ही विद्या प्राचीन काळा पासून चालत आलेली आहे त्यात नाथ पंथात नागनाथ यांनी भर टाकली
नाग विद्यात अनेक प्रकार आहेत त्यात... नाग निर्माण करण्या पासून ते नाग निळकंठ विद्या, पाताळी नाग विद्या,तसेच धनात्री विद्या,औंढजली नागीण विद्या,पांडवी नाग विद्या,अष्टकुळी सर्प विद्या, नागाची बारी विद्या,नागसरी पान विद्या,कवलखंड विद्या, घवलखंड विद्या,सर्प-गारुड विद्यात दहा प्रकार आहेत........(वेद गारुड,देवी गारुड,देव गारुड,वीर गारुड,कृष्ण गारुड,मंत्र गारुड,यंत्र गारुड,सिद्ध गारुड,नाथ गारुड,अघोर गारुड अशी दशम गारुड विद्या आहे)....मुंजा नाग,सर्प दंश,पान ढाळ विद्या,बहरकी विद्या,अनेक प्रकार आहेत तर आपणास नाग विद्या विषयी लेख आवडला असेल व प्रतिसाद मिळाल्यास या वरील विद्यावर पुढं लेख सादर करेल
★ डोकरी नाग विद्या ★
डोकरी नाग विद्या विषयी पाहणार आहोत ही विद्या रक्षणासाठी निर्माण केली गेली नाथांनी अनेक विद्या निर्माण केल्या.आपण पाहातो की जुन्या काळा पासून साधना तपश्चर्या करतांना कोणी व्यथ्य निर्माण करू नये यासाठीे रक्षणा साठी सर्प ठेवले जात असे तसेच देव मंदिर रक्षणासाठी खजिना संपत्ती धनाची राखण,रखवाली साठी सुद्धा सर्प तयार करून ठेवले जातात तसेच
मच्छिंद्रनाथ व नागनाथ यांचे युद्ध प्रसंग....बालाघाटाच्या अरण्यात नागनाथ वास्तव्य करत असतांना लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले व राहू लागले तेथे एक गाव निर्माण झाल ते वडगाव त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ भ्रमंती करत असताना आले व त्यांच्या कानी नागनाथ यांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकाणावर नागनाथ ध्यानस्थ होते त्यावेळी सातशे शिष्यांनी त्यांना अडवले व त्यानंतर जो काही प्रकार झाला त्यात मच्छिंद्रनाथ व नागनाथ यांच्यात युद्ध चालू झाले त्यात नागनाथ यांनी नाग विद्याने नाग निर्माण करून मोठाले नागांचा जथ्था मच्छिंद्रनाथ यांच्यावर सोडला त्या वेळी मच्छिंद्रनाथाची अवस्था खूप बिकट होऊन ते संकटात पडले...यावरून सर्प नाग विद्येत नागनाथ यांचे वर्चस्व दिसते .....
तसेच स्वरक्षणा साठी सर्प निर्माण केले जात पण असुरी प्रवृत्ती मूळे शत्रूवर ही सर्प सोडले जाऊ लागले शत्रूचा नाश करण्यासाठी डोकरी नाग विद्येचा जास्त वापर होऊ लागला ....डोकरी विद्या ही खूप कठीण व यात खूप नियम असतात तसेच नागपंचमीच्या वेळी मंत्राचा उजाळा करतात यात पानचा विडा खाणे वर्ज्य आहे रजस्वला स्त्रीचा शब्द, दिवा विजला तर जेवण वर्ज्य असून उपवास करावा लागतो,तसेच पडवळ,घोसाळी गिळले,शेवया ह्या कायमच्या खाण्यास वर्ज्य...बंद करावे लागते असे अनेक नियम आहेत तसेच यात विशिष्ठ प्राणी एक विशिष्ट झाडा खाली बसल्यावर त्याच्या शेपटीचे केस काढून त्याच्या वेणीचा नाग तयार केला जातो तसेच मंत्राने त्याला जीव फोडून शत्रूच्या स्पर्श धातूची नथ त्या नागाला घातली जाते व शत्रूवर सोडला जातो व शत्रूला त्याच्या घरात दारात माघे लावून त्रस्त करून सोडले जाते हा अघोर प्रकार असल्याने सम्पूर्ण विधी स्पष्ट करत नाही ही विद्या ग्रामिण भागात जिवंत आहे
*डोकरी नाग विद्या बंद करण्या साठी* सप्त धान्याचा बाखळा तयार करून परिसरात टाकला जातो, तसेच अपमारीच्या वेलाच रिंगण बांधलं जाते याने सर्व सर्प बंधन होते
*बंधन मंत्र*:- तान्हा बाळ घेईल थान गाई गोठणी इथं राहशील सुख पावशील दुःख पावशील नरकुंडात पडशील,ढोर कुंडात पडशील सडू सडू पडशील नागनाथाची आण तुला, गौरा पार्वतीची आण छू.....
पुढील भागात सविस्तर व गुप्त करक धनावरील नाग विद्या,सर्पदंश विद्या पाहू....
टीप:- सदरील लेख आस्तिक लोकांसाठी असून नास्तिक लोकांसाठी रहस्यकथा म्हणून पहावे