सायको सिझन ऐक भाग १
मंदार साखरकर
सन २०१२ बदलापूर पोलिस चौकित. एका अपराधीस घेऊन ई. रवी वानखडे येत होते.
त्या अपराधीस बघण्यासाठी आजूबाजूचे रहिवासी जमा झाले होते. का तर ती कोण आहे ते बघण्यासाठी. तर मिडिया अपराधीचा एक फोटो घेण्यासाठी.
कारणच तसे होते. त्या अपराधीने अपराधच तसा केला होता. मानसाला लाजवेल असे क्रुत्य केले होते.
ई. रवी त्या अपराधीस घेईन चौकीत आले. तेंव्हा मिडियावाले तिचा एक फोटो घेण्यासाठी धडपढत होते, तर स्थानिक रहिवासी ती कोण आणि दिसते कशी ते बघायला धडपडत होते. पण सगळ्यांची निराश झाली. तिच्या चेहऱ्यावर काळे फडके घालून पोलीस चौकीत आणले.
तीला चौकीत आणून, तिच्या चेहऱ्यावरून जेंव्हा काळे फडके काढण्यात आले. तेंव्हा ती आपले डोळे चोळत बोलते किती दिवस मला इथे ठेवणार आहेस बघुया. काँनस्टेबल स्वाती तिला थोबाडीत मारतात बोलते, सालीची चर्बी काही कमी झाली नाही.
ई. रवी बोलतो स्वाती बाहेरया अगोदर कोठडीतून.
तेवढ्यात अपराधी बोलते स्वाती नाव आहे का तुझे, जरा पाणी आणून दे पियाला.
......
सकाळी शांत पणे, उठून ती कोठडीत बसली होती. जणू काहीच घडलेच नव्हते असे.
तिच्या कडे बघून कोणी बोलणार पण नाही, की सर्व हत्या तिने केल्या असाव्यात.
ई. रवी, स्वातीला बोलतात, जा तिला लॉकरमधून बाहेर काढा आणि तिच्या चेहऱ्यावर काळे फडके घाला.
ई.रवी, हवालदारला बोलतात पोलिस व्हँन तयार आहे ना. हिला आज कोर्टात हजर करायचे आहे. असे बोलुन तिला कोर्टात हजर करून, सात दिवसाच्या रिमांईन्डवर परत पोलिस चौकीत आणतात.
ति दुपारचे जेवन करून ती स्तभद बसली.होती, जसे तिने काहीच केले नाही तसे.
.........
रात्रीचे ८.०० वाजले होते, ई. रवी. स्वाती बोलतात जा तिला चौकशीसाठी रूममध्ये आण.
काँ. स्वाती बाहेर जात, अपराधीस कोठडीतून तिचा हात पकडत, चौकशी रूममध्ये आनते.
ई.रवी अपराधीस बोलतो बस आणि स्वातीला बोलतो जा बाहेर जाऊन ऐक बिना साखरेची चाय आणि बिस्किटे आन, मग आपण हिची चौकशी चालू करूया. जरा वेळाने काँ. स्वाती तिला चहा आणि बिस्किटे देते.
ई. रवी, काँ. स्वातीला बोलतात बसा आणि हीची साक्ष लिहून घ्या.
ई. रवी अपराधीस विचारतात तुझे नाव काय.
अपराधी खात बोलते तुम्हाला माहिती नाही का.
तेवढ्यात काँ. स्वाती तिला मारायला ऊठनार, तेव्हां ई.रवी स्वातीला बोलतात बसा आपल्या जागेवर.
परत ई.रवी अपराधीस विचारतात तुझे नाव काय.
अपराधी बोलतो तुम्हाला माझ्याच तोंडातुनच ऐकायचे आहे तर ठिक आहे. माझे नाव प्राजक्ता वानखडे.
ई.रवी पुढे विचारतो प्राजक्ता तू राहते कुठे, काय करते, कुठल्या काँलेजला जाते, शिक्षण किती झाले, तुजे नातेवाईक कुठे राहतात वगैरे.
प्राजक्ता बोलते किती प्रश्र्न विचारतात आहे.
काँ.स्वाती बोलते जेवढे विचारले तेवढेच सांग बोलून परत तिला मारते.
प्राजक्ता तिच्याकडे रागात बघून बोलते, लिहून घे. मी बदलापूर ला राहते, काँलेजला जाते, काँलेज कुठले सांगु, ऐक असेल तर सांगु का. शिक्षण चालू आहे. राहिला प्रश्न कुठे राहते तर , हे काय माझे नातेवाईक बसले आहेत समोर.
काँ. स्वाती परत बोलते मनात येईल ते बोलू नकोस.
तेवढ्यात ई. रवी, काँ. स्वातीला बोलतात माझा पत्ता लिहा.
काँ. स्वाती बोलते ही तुमची मुलगी आहे.
ई. रवी प्राजक्ताला पुढे विचारतात हे सगळे का केलेस तू.
ऐक सुड घेतला मी आणि बोलते लहान, वया पासून सुड घ्यायची सवय आहे ना मला.
लहान पणी का त्या मांजरला मारले मी, आठवते का तुम्हाला. साली तिच्यावर ऐवढे प्रेम केले आणि साली मलाच चावली. कसे तिला, पहिले रशीने बाधुन तिला लटकवले नंतर तिला हतोड्याने तिला ठेचून मारले, साली मला चावलीस ना, आठवते ना बोलुन स्वातीकडे बघते.
.......
तेवढ्यात Adv. काचंण पोलीस चौकीत येत हवालदारला बोलतात, मला ई. रवीना भेटायचे आहे. तो आवाज ऐकून ई.रवी बाहेर येत बोलतात. काय Adv. कांचन साहेब आज आमची आठवन कशी काढलीत, काय काम काढले आमच्या कडे.
Adv. कांचन एक फाईल देत बोलतात बघा.
ई.रवी फाईल ऊघडून बघतात, ब़ोलतात वा ही केस तुमच्या कडे आली तर, बोलून बोलतात कोणी अपील केली आहे. हिच्या बाजूने केस लढायचे, बघुया जरा बोलुन बघतात आमदार विलास.
Adv. कांचन बोलतात माझ्या क्लाईटला. भेटायला मिळेल का.
ई.रवी बोलतो आता तरी नाही. बघुया ऊद्या सकाळी या.
ओके बोलुन Adv. कांचन बोलतात उद्या सकाळी ११.०० ला येतो.
ई.रवी चौकशी रूममध्ये येत प्राजक्ताला बोलतात, तिच्याकडे काय बघते आहेस.
प्राजक्ता बोलते काही नाही असेच तिच्या बराबर बोलत होती. कुठल्या IPC धारा लावल्यात आहेत, 307 ची IPC धारा अटेंड तु मडर, अजून कुठली ग ची 302 कुठली, पण कुठली पण धारा लावा तुम्ही. मी बाहेर येणार हे नक्की. बोलून ई. रवीकडे बघत बोलते आजून काही विचारायचे आहे का.
ई. रवी बोलतात हो ना खुप विचारायचे आहे. त्यांच्या हातात असलेली फाईल प्राजक्ताच्या हातात देत बोलतात.
प्राजक्ता ती फाईल ओपन करून बघते. तर तिची केस Adv. कांचन ह्याना आ. विलासन यांनी दिली आहे.
ई. रवी बोलतात चल सांग ऐवढा मोठा आमदार आणि Adv. कांचन का बरे तुझ्या बाजुने ऊभे.
प्राजक्ता बोलते मला काय माहिती. ते काम तुमचे आहे माझे नाही बोलते. मी तर काहीच केले नाही आहे. मी आज नाही तर उद्या सुटून बाहेर येणारच आणि स्वाती कडे बघत गालावर हात फिरवत बोलते, काय मग दोन दिलेस ना. फक्त सात दिवस आहे, तुमच्या कडे माझ्या बाबतीत पुरावे उभे करायला, नांही तर मी बाहेर.
ई. रवी प्राजक्ताला बोलतो. ह्या टाईमला तु नाही सुटणार. तुझ्या सारख्या सायकोला फासावर दिले पाहिजे किँवा मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवले पाहिजे.
प्राजक्ता सायको हा शब्द ऐकून चिडत बोलते, खूप बोललात तूम्ही पाहिले सीद्ध करा, हे सगळे मी केले आहे ते. मग बोला मी खुनी आणि सायको आहे.
ते उलटे एकून ई. रवी चा संयम सुटून, प्राजक्ताच्या थोबाडीत मारून , स्वातीला बोलतात हीला लॉकर रूम मध्ये टाका.
स्वाती प्राजक्ताचा लॉकर रूम मध्ये घेऊन जाण्यासाठी प्राजक्ताचा हात पकडते. प्राजक्ता हात झटकून, आपल्या गालावर हात फिरवत ई. रावीकडे रागात बघत बोलते मला माहिती आहे, लॉकर रूम कुठे आहे ते.
ई.रवी मोबाईलचे रेकाँडींग बंद करतात. तेवढ्यात प्राजक्ता हळू आवाजात बोलते सुटल्यावर आ. विलास आणि Adv. कांचन बोट वर करून दाखवत बोलते, ती सवय सोडा ई.रवी तो मोबाईल बाहेर काढा आणि बंद करा रेकाँडींग. हा आवाज रेकाँड झाला की नाही चेक करा. चल ग लाँकर रूमला सोड.
क्रमश
मंदार साखरकर