वाड्यात या वर्षीच लग्न झालेल्या गोविंदाच्या राधेभाभी जवळ कल्याणी बसुन काजू बदाम चारोळी निवडत होती. झब्बू सोबत कल्याण जाताच राधेभाभीनं बदाम कल्याणच्या हातावर ठेवले. कल्याणनं तोंडात टाकत काही गोविंदाला दिले.
गोविंदा तोंडात टाकणार तोच राधे भाभीनं डोळ्याच्या कोनातून मिश्कीलपणे गोविंदाकडं पाहिलं.तोच गोविंदानं हातातले बदाम झब्बूस दिले.
" भाभी क्या हुवा? क्यो खाने नही देती?" कल्याणीनं विचारलं
" कल्याणी ताई यह हमारी पहली पुनम है! बारा के बाद दूध पिने के बाद ही....!"
" काय गं नेमकं?"
" कल्याणी ताई दुधात चंद्र दिसला की मग मी दुधाचा ग्लास घेईन त्यातलंच उष्टं दूध ही राधा प्राशन करेल.तो पावेतो आज मला ही उपवास करावा लागेल!" गोविंदानं स्पष्ट केलं.
" गोविंद, त्यानं काय होतं रे?"
" ताई दोनो मे प्यार बढता है!" राधे भाभीनं हसत हसत सांगितलं.
" अगं ताई आपल्या गावातल्या लग्नात नाही नव्या नवरी व नवरदेवास एकमेकांना दातांनी खोबरं तोडावयास लावतात, घास खाऊ घालतात" झब्बू बोलला.
कल्याणीच्या मनात काही आलं व रजत चांदण्यात तिच्या गालावर अलगद लाली चढली. तिनं मनात काही ठरवलं
राधा आता खोबऱ्याच्या वाट्या किसत होती. कल्याणीनं खोबरं उचललं.
कल्याणला इशारा करत ती बाहेर आली. वाड्याच्या पूर्वेला जवळच व्यंकट तात्याचा केळ्याचा बाग होता. तिची पावलं तिकडे वळलीत झब्बू व कल्याण ही मागून बाहेर आले. बाग जवळ येताच कल्याण थांबला.
" कल्याणी मॅडम इकडं कुठं? सारी तिकडे नदी पात्रात बसलीत! आपण ही तिकडंच जाऊ!" कल्याण थांबत म्हणाला.
" झब्बू!"
" हो ताई ,मी थांबतो!"झब्बू इशारा समजला.
" कल्याण ! थोडा वेळ बसूयात ना निवांत!"
कल्याणची आपला ' कल्याण' म्हणून एकेरी उल्लेख ऐकताच थरथर धडधड वाढली.
" कल्याणी मॅडम, सारी तिकडं असतांना आपण इकडं थांबणं योग्य नाही,. गप्पा मारायच्यात ना मग तिकडे सर्वासमोर थांबू व मारू गप्पा!"
" सर्वासमोर! तू मारशील गप्पा?" कल्याणी तिरकस हसत उद्गारली.
" मॅडम ,का नाही! चला तिकडं!"
" ठिक आहे.पण एका अटीवर? आधी हे खोबरं तोडून दाखवायचं"
कल्याणची थरथर अधिक वाढली. त्यानं कपाळावरचा घाम पुसला.
" कल्याणी...."
" काय? नविन बोल!"
" कल्याणी ,माणसानं जे करावं ते साऱ्यासमोर करावं मग त्याला जग मान्यता देतं. खोबरं हे नवदाम्पत्य चार चौघात तोडतात म्हणून समाज त्यास मान्यता देतं.क्षणिक मोहासाठी लोकांच्या नजरेआड काही करू पाहता लोक अधिक साशंकतेने पाहत पहारा ठेवतात?पण तीच बाब साऱ्यासमोर केली की जग मान्यता देतं. पण आपल्या लिप्सेत निस्पृहता हवी!"
" अय बाबा! पुरे आता! एवढं प्रेममय वातावरण तुझ्या प्रवचनानं भक्तीमय नको करूस!"
कल्याण तिला सोबत घेत माघारी नदी पात्रात परतू लागला.
" झब्बू ,पहारा द्यायला केव्हापासून शिकलास! शहाणा चल!"
" बाबा ,कसला पहारा? मी आपला...!" झब्बू हसू लागला.
पात्रात येताच कल्याणनं बापूजवळ येत " बापू आम्ही समोर बसतो पाण्याच्या प्रवाहाजवळ,चालेल ना?" विचारलं.
कल्याणी अवाक होत पाहतच राहिली.
" पोरा त्यात काय विचारायचं! बसा की मोकळ्या वातावरणात !" बापूंनी परवानगी दिली.
कल्याण, कल्याणी, झब्बू व नंतर आलेले गोविंद राधा सारे पाण्याच्या चिंचोळ्या धारेजवळ जाऊ लागले. पाण्याची धार व सारे बसले होते त्यात बरंच अंतर होतं. गोविंद व राधा एका ठिकाणी बसले. कल्याण व कल्याणी धारेला समांतर चालू लागली.
" कल्याण, नदी धडीवर माझं बालपण गेलं.नदीथडीवर वावरत मोठी झाले मी. पाच सहा वर्षात दर कोजागरीला रात्रीही येतेय.पण कधीच असं वाटलं नाही. हे खुललेलं आकाश, आपल्या अंजुरानं चांदण प्रकाश उधळणारा चद्र, ही संथ पहुडलेली अनेर माय, हा चंदेल उघडणारा गारव्यानं ओथंबलेला दव भारला वारा, हे सारं आज नविन भेटतंय असं का भासतंय मला." कल्याणी वाळूत लयीत पाय ठेवत बोलू लागली.
" कल्याणी, प्रत्येक शिक्षकात जात्यात कवी दडलेला असतो हे ऐकलेलं होतं; पण आज पाहतोय प्रत्यक्षात!" कल्याण मिश्कील हसणार तोच त्याच्या पायावर कल्याणीनं जोरात पाय आपटला.
" कल्याणी , सारी पार्श्र्वभूमी तीच असतांना वेगळी तेव्हाच भासते जेव्हा आपल्या भोवती वावरणाऱ्या व्यक्तींचे संदर्भ बदलतात. हा कल्याण ; कल्याण ऐवजी डाॅक्टर कल्याण व ही कल्याणी; कल्याणी ऐवजी कल्याणी मॅडम म्हणून वावरली असती तर पूर्वीच्या संदर्भात बदल झालेच नसते. ते तसेच भावशून्य राहिले असते!"
कल्याणीनं त्याचा हात हातात घेत बोटं एकमेकात शिरवू लागली.
" कल्याण एक विचारू?"
" काय आणखी? विचार"
" समजा हे संदर्भ पुन्हा बदलले तर? नव्या परिस्थितीत काय बदल होतील?"
कल्याणच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. त्याला विनवणी करणारा आपला सदा बाबा नजरेसमोर अस्पष्टपणे तरळू लागला, जीव तोडून ढोलकी नव्यानं शिकणारा बाबा, व रंगलेल्या बारीवर मुद्दाम आपणास खांद्यावर घेत ढोलकी वाजवत आईशी झुंजणारा बाप आठवला.
" कल्याण बोल ना? गप्प का?"
" कल्याणी , माणसानं नाती जोडली नाहीत तर भावशून्य संदर्भ दु:ख देत नाही. पण..पण.. जोडलेली नाती तुटली की बदललेले संदर्भ जीवघेणी रूपं धारण करतात व माणसाचं जीणंच दुस्वर करतात. समजा कल्याणी पुन्हा कल्याणी मॅडम झाली, कल्याण पुन्हा डाॅक्टर झाला तर हाच नदीचा काठ रैरव होईल.हा दवभारला वारा भयाण होईल..." कल्याणच्या बदललेल्या रुपाची कल्याणीला जाणीव होताच कल्याणीनं त्यास गच्च मिठी मारली.जणू धावणारं अनेरचं पाणी तापीत सामावं तसंच. पण तापीच्या पात्रात आधीच पातळी जास्त असल्यानं तापीनं अनेरला थोपवावं तसंच कल्याण थोपवू लागला. पण अनेरचं ओढग्रस्त पाणी जशी वाट मिळेल तसं तापी पात्रात वाट शोधतच होतं.त्या महापुरात तापीथळीचंही नुकसान झालंच.
" कल्याण ,साथीनं जगणं चांगलं की साथीनं मरणं?" कल्याणी धुंदीतच पुन्हा विचारू लागली.
तो पावेतो चालता चालता ते बरेच दूर आले होते. झब्बू ही मागं मागं अंतर ठेवत येतंच होता. कल्याणनं परतीचा रस्ता धरला तसा झब्बूही परत फिरत त्यांच्या पुढं पुढं चालू लागला.
" कल्याणी साथीनं जगणं केव्हाही चांगलंच. पण शाश्वत साथीचं असावं. पण कधी कधी संदर्भ बदलतात व नाही होत साथीनं सोबत जगणं.तर अशा वेळी साथीनं मरणं ही चांगलंच!"
कल्याणच्या तोंडातून मरणाचा उल्लेख होताच कल्याणी चपापली.
" कल्याण एवढे ढवंढाय का उमळतात रे तुझ्या बोलण्यात?"
" नाही समजणार तुला! जाऊ दे.
तो बघ चंद्र ढागाळलेला चंद्र कसा उजळमाथ्यानं नभात फिरतोय. नी त्या खुळ्या चांदण्या तरी त्याच्या मोहात त्याचा पाठलाग करत आहेत! चंद्रकोर तर त्याच्यातच निमाली".
" कल्याण चंद्र डागाळलेला असला तरी शितलता देतो ,सूर्यासारखा चटके देत नाही म्हणून तर चंद्रकोर आपलं सर्वस्व निमवत त्याचंच रूप धारण करते."
गावातील इतर ठिकाणी चाललेल्या कार्यक्रमातील मुलं ढोल वाजवत नदीकडं येत होती. पात्रात चाललेल्या रासलीलेचा आवाज कमी होऊ लागला. चंद्राचं चांदणं डेगीतल्या आटलेल्या दुधात सांडलं तसा चंद्रही डेगीत उतरलाच.
लाखा लच्छमन गोविंद साऱ्यांना दूधाचे ग्लास वाटू लागले. कल्याणनं आपला ग्लास पूर्ण रिता करताच कल्याणीचा हिरमोड झाला. गावातील उमेश रमेश व इतर मुलं ही आली. त्यांनी कल्याण बाबाच्या कमरेला ढोल अडकवलाच. एव्हाना एक वाजले होते. नदीच्या घनगंभीर थळीवर ढोल घुमला नी नदीकाठ थरथरला. पण काठ दु:खानं थरथरला की प्रेमानं हे नदीला उमगलंच नाही. कल्याण
बाबाच्या ढोलावर साऱ्यांनी फेर धरला. तोच कल्याणीनं संधी साधून दिलेला दुधाचा ग्लास घेऊन झब्बूनं कल्याण बाबाच्या तोंडासमोर धरला. ढोल बडवता बडवता कल्याण नकार देऊ लागला.
" बाबा कुणी प्रेमानं दिला तर नाही म्हणू नये माणसानं!" झब्बू ओठातलं हसू दाबत म्हणाला. पण कल्याणला हसू दिसलंच नाही.
" झब्बू तू प्रेमानं विष जरी दिलं तरी प्राशन करील भावा, आण तो ग्लास!" झब्बूची नितळ माया कल्याणला ठाऊक होती. कल्याणनं दोन घोट घेताच झब्बूनं ग्लास बाजूला काढला व नाचत तो कल्याणीकडं आला व ग्लास तिच्याकडं दिला. बापू अप्पा नाचणाऱ्या पोराकडं पाहतच होते. झब्बूकडं त्याचं अचानक ध्यान गेलंच.
कल्याणीनं झब्बूनं परत आणलेल्या ग्लास तसाच तोंडास लावत घटाघटा दूध प्राशन केलं. तिकडं गोविंदानं तोंड लावून परत केलेलं दूध राधा पित होती. बापू अप्पानं खुशीनं ओठ पुसणाऱ्या कल्याणीकडं पाहताच कार्तिकी एकादशी लवकर यावी अशी मनोमन शिवशंभोकडं याचना केली.पण अक्काच्या वचनासाठी बापूंनी त्याच शिवाच्या पिंडीवर बिल्वपत्र वाहिलं होतं हे भोलानाथ कसा विसरेल.
कल्याणचं उष्ट दुध प्राशन करून कल्याणी ,राधा व सितारामच्या इतर सुना ही कल्याणच्या ढोलावर फेर धरू लागल्या.
कार्तिक लागला तसं कधी नव्हे तो अक्काचा फोन आला.
" बापू, सुरेंद्रच्या वागण्यात काहीच फरक नाही! आता तर रजा वाढवून पिणं अधिकच वाढलं ! इकडच्या मागच्या वर्षी किती मुली पाहून झाल्या पण पसंत नाहीच. आता तूच तिकडच्या मुली बघ बाबा!" म्हणत अक्का रडू लागली.
" अक्का, हा बापू अप्पा असतांना तू का जाच करून घेतेस गं! माझ्या भाच्यासाठी उद्यापासूनच मुलीची रीघ लावतो बघ तुझ्या घरासमोर! तुझ्या वचनात आम्ही बांधील आहोत अक्का!"बापूनं अक्कास धीर दिला.
बापूनं दोन तीन दिवसात साजेशा स्थळांच्या मुलीचे फोटो व बायोडाटा मागवून घेतले. दुपारी नेमके उमेश व रमेश घरी नसल्यानं बापूनं रविवारची घरी असलेल्या कल्याणीला बोलवत आलेल्या बायोडाटा व फोटोचे मोबाईल मध्ये फोटो काढावयास लावले. व सुरेंद्रचा नंबर देत पाठवायला लावले. कल्याणीनं सुरेद्रला पाहिलंच नव्हतं व त्याचा नंबर ही नव्हता तिच्याकडं. तिनं बापुंनी दिलेला नंबर सेव्ह करत फोटो व बायोडाटा सेंड केले.
संध्याकाळ पर्यंत सुरेंद्रने ते पाहिलेच नव्हते. बापूंनी अक्कास फोन करत कल्पना दिली. रात्री आपल्या रूममध्ये फुल टल्ली झालेल्या सुरेंद्र ला अक्कानं फोटो पहायला लावले. पण सुरेद्रला यशदाला सोडलेल्या मुलीच्या चेहऱ्याशिवाय दुसरा फोटो पाहणं नकोसा वाटे. त्यानं हो ला हो करत अक्काला टाळलं.
रात्री झोपतांना त्यानं व्हाट्स अप चाळलं. एका नविन नंबरवर त्याचे तांबारलेले डोळे स्थिरावले. त्यानं स्क्रोल करत पुन्हा त्या नंबर वर क्लिक करत डिस्प्ले पिक्चर झूम केलं. त्याची अंगातली खर्रकन उतरली. तो पुन्हा पुन्हा तो डि. पी पाहू लागला. नंबर कुणाचा? तोच त्यानं मॅसेज पाहिले. त्यात मुलीचे फोटो व बायोडाटा होते .त्याला फोन करावासा वाटला. पण त्यानं टाळलं. अक्काचं बोलणं आठवलं. तो तसाच उठला व अक्काकडं आला.
" अक्का , फोटो कुणी पाठवले?"
" का रे? आवडले का? मामांनी पाठवलेत?"
" तसं नाही गं पण आताच मामास काॅल कर व कोणाच्या नंबरवरून पाठवलेत ते विचार आधी!"
" अरे घरातलाच नंबर असेल! पण का? झालंय काय?"
अक्कानं तेवढ्या रात्री फोन केला. फोन घेत तो स्वत: बोलला व नंबर कल्याणीचा म्हणजे मामाच्याच मुलीचा कळतात " देवा काय खेळ करतोस बाबा! जिसे हम ढूॅंढ रहे थे गली गली, वो हमे पिछवाडे मिली!" म्हणत तो रूम मध्ये येत पुन्हा पुन्हा फोटो पाहू लागला.त्याला आठवलं. आपण पुण्याला गेलो असतांना पाच सहा मुलींनी लिफ्ट मागत यशदाला सोडण्याची विनंती केली. रात्रीची वेळ व तिकडच जायचं असल्यानं आपण लिफ्ट दिली. हिला पाहिलं नी गारद झालो. आपण खुळ्यागत आरशातून पाहत राहिलो.त्याक्षणी उतरता उतरता आपण आरशातून पाहतोय हे तिच्या लक्षात येताच तिनं खडसावलं.
" कधी मुली पाहिल्या नाहीत का! अंगावर वर्दी दिसतेय सैनिकाची नी असलं छिछोर काम करता लाज नाही वाटत!"
ते निघून गेले. आपण बऱ्याच वेळेनंतर शुद्धीवर आलो व निघालो. रात्रभर चेहरा हलेच ना. सकाळी अकरालाच यशदा गाठलं व शोधाशोध केली पण व्यर्थ. गेली ती गेलीच. या चेहऱ्यानं आपणास बाटलीत बुडवलं.नी तीच आपल्या मामाची मुलगी! सुरेंद्रा तू मूर्ख आहेस.का गेला नाही कधी मामाच्या गावाला? मामानंही दरवरषी येऊन कधीच आणलं नाही सोबत तिला. पण उद्याच थेट प्रस्थान! सह्याद्रीचा ओढाळ प्रवाह निघाला अनेर नदीस कवेत घ्यायला.
सकाळीच अक्कास त्यानं सारं सांगत मला मुलगी पसंत आहे आपण बोरवनला जाऊ सांगत तयारी केली.
अक्कानं बापूस बोरवणला येत असल्याचं कळवताच बापूंना गदगदल्यासाखं झालं. येण्याचं कारण त्यांना आपण पाठवलेल्या फोटोपैकी एखादी मुलगी पसंत पडली म्हणून अक्का व सुरेंद्र येत असावेत,असं वाटलं. पण बोरवणला न येणारी अक्का येतेय म्हटल्यावर यावेळेस काही ही करून अक्काच्या वचनातून ही मुक्ती मिळवायचीच असा विचार त्यांनी पक्का केला.
अक्का व सुरेंद्रचं मोठ्या हारीखानं स्वागत करण्यात आलं. सुरेंद्रला पाहताच कल्याणीनं यशदाला हाच होता हे ओळखलं व तिची नस तडकली पण कळाल्यावर आत्याचा मुलगा म्हटल्यावर तो प्रसंग ती विसरण्याचा प्रयत्न करू लागली.
अक्का मंजाकाकीच्या वेळी आली होती तर त्या नंतर आताच म्हणून बापू व अप्पा तिचा अगत्यानं पाहुणचार करू लागले.
रात्री जेवणं आटोपल्यावर बापू, अप्पा, राधाताई, द्वारकाबाई सारी अक्का व सुरेंद्रच्या अवती भोवती बसत गप्पा मारू लागले.
बापू मूळ मुद्द्याला हात घालत
" काय सुरेंद्रराव कोणती मुलगी पसंत केली मग?" हसत विचारू लागले.
" मामा मी म्हटलं होतं ना आपणास मनासारखी मिळाली की दारू बंद करीन! कालपासून थेंबालाही स्पर्श केला नाही! वचनाला बांधील पक्का मी!"
" अरे व्वा! वचनाला बांधीलच असावं माणसानं! 'प्राण जाय पर वचन न ना जाय' ही रघुकुलाची रीत तर चालत आली आहे! पण कोणती मुलगी आवडली ते तर सांग?"
" अक्का सांग मामांना!" सुरेंद्र कल्याणीकडं पाहत लाजत म्हणाला.
कल्याणीनं तोंड फिरवत मोबाईल वर कल्याणला काॅल करू लागली. काॅल डायल झाला पण तिच्या लक्षात आलंच नाही कारण अक्का जे बोलली त्यानं तिला आपल्या कानाचे पडदे फाटतात की काय असंच वाटू लागलं. तिनं मोबाईल तसाच टेबलावर ठेवला. तिकडं कल्याणनं कल्याणी बोलत नाही म्हणून शांत ऐकू लागला.
" बापू, सुरेंद्रनं कल्याणीला पसंत केलीय!"
अक्का बोलली पण बापू व अप्पाच्या पायाखालची जमीन हालू लागली व वरून आभाळ कोसळल्यागत वाटू लागलं.
अप्पा उठून बोलणार तोच बापूनं खूण करत शांत केलं.
" अक्का ,पण मी जे फोटो पाठवले त्यात तर कल्याणीचा फोटो नव्हताच! मग कल्याणीला पसंत करण्याचा प्रश्न येतोच कुठे?" बापू चेहऱ्यावर सातपुड्यातलं रौद्ररूप आणत बोलले.
तसं सुरेद्रला बेछूट गोळीबार करत गनिम चालून येतोय असा भास झाला.
" बापू, तू नव्हता पाठवला.पण त्यानं डि पी.वरचा फोटो पाहिला नी मागे यशदाला त्यानं कल्याणीलाच पाहीलं होतं. पण ओळख नसल्यानं, पत्ता नसल्यानं तो तेव्हापासुनच बिथरला होता! त्याला कल्याणीच आवडलीय!" अक्का शांतपणे बोलली.
" अक्का नाही! कल्याणीचं ठरल्यासारखंच आहे आधी! सुरेद्ररावांनी दुसरी मुलगी पहावी! हवं तर आम्ही मुली दाखवू!" मध्येच अप्पा न राहवून बोलले.
" किसन ,मी बोलतोय ना! मी असतांना बोलण्याची सवय कधीपासून लागली तुला!" बापू आपल्या भावास आतली कळ दाबत दाबू लागले. त्यांना घाम फुटू लागला.
" बापू खरं सांगू? मी का येत नव्हती बोरवणला? माझ्या सख्या मावश्यानं मला दत्तक घेऊन ही मला न विचारता तुमच्या नावावर जमीन केली म्हणून. पण तुम्ही मावशीस जमीन परत करू लागले व मावशी वितळली. पण माझ्या मनात ती खुन्नस अजुनही तशीच आहे रे! तुम्हाला त्यातून मुक्त होण्याचा मी एक मार्ग मोकळा ठेवलाय.तुम्ही मला वचन दिलंय की तुला हवंय ते केव्हाही माग! मग मी आज त्या बदल्यात तुमची मुलगी मागतेय! कल्याणीचा हात सुरेंद्र ला सोपवलात तर माझा सारा राग निवळेल! वचन ही पुरं होईल!" अक्का फाड फाड एका दमात बोलली.
कल्याणी भिंतीला रेलून टेबलावर स्थितप्रज्ञासारखी थिजावली. राधाबाईच्या डोळ्यात आसवे तरळली. तिला खानदानी तोऱ्यात वाढलेल्या व हल्ली व्यसनाधीन झालेल्या सुरेंद्र पेक्षा जावई म्हणून सालस व पोरासारखा हक्काचा वाटणारा कल्याणच हवा होता. तिलाच काय पण बापू अप्पानाही तेच हवं होतं.
अक्का मोक्याची जागा हेरून वचन मागतेय पाहताच बापूंचा घाम वाढला व पाठीतून सणक कळ निघाली.
" वचन दि..." म्हणत अप्पा बसल्या जागी कोसळले. बोंबाबोंब झाली. मोबाईल मधलं सारं नाट्य ऐकताच कल्याणला दूर दूर जाणारी आपली आई आठवण्यापेक्षा आपण आपल्या सदाबाबाच्या भुमिकेत शिरल्याची जाणीव झाली व माडीवरच्या बोलवण्याची वाट न पाहता बॅग घेत त्यानं बाईकला किक मारली. तोच रस्त्यात घाबरत आलेला उमेश त्याला भेटला.
बापूंना जोराचा पहिला झटका येऊन गेला. कल्याणनं अजिबात उशीर न करता गाडी काढायला लावत चोपड्यास न्यायला लावलं व तो ही सोबत गेला. किंबहूना छाती हातानं दाबत बापूनंच त्याला सोबत जीप मध्ये बसवलं. जीप मध्ये बापू राधाताई कल्याणी व कल्याण बसला.
बाकी दुसऱ्या गाडीत आले.
रस्त्यानं राधाताईच्या मांडीवर डोकं असलेले बापू धाप टाकत बोलू पाहत होते. कल्याण त्यांना शांत बसायला लावत होता.
" कल्याण पोरा! ऐक .मला बोलू दे.
कल्या बेटा! हात दे मला तुझा!"
कल्याणी रडतच बापूच्या हातात हात देऊ लागली!
" कल्या बेटा! बापाच्या मिळकतीवर पोरीचा बरोबरचा हक्क असतो.फकिरा काकाच्या मिळकतीवर अक्काचा हक्क होता म्हणून ती वचनाच्या रूपानं मागतेय! माझ्या मिळकतीवर जसा तुझा हक्क आहे तसाच हक्क माझ्या डोईवर असलेल्या ऋणावर ही. हे ऋण तुलाच फेडायचंय आता! वचन देणारी जगोत अथवा ना जगोत पण त्यांनी दिलेली वचनं ही फेडलीच पाहिजेत! बेटा तू शहाणी आहेस कळंतय ना तुला मी काय म्हणतोय?"
" बापू , .......न कळायला काय झालं मला? कळतंय ना!" कल्याणीनं आक्रोश दाबत बापूंचा हात घट्ट धरला!"
" बेटा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती! बेटा प्रेम मरुनही करता येतं पण पूर्वजांची वचनं आधी फेडावीत!"
" बापू आता शांत बसा ना..." ती रडतच विनवू लागली.
" कल्याण पोरा आता तू ऐक! माझा किसन वचन मोडणार नाही पण पोरीसाठी वचन पालटवेल! हे मी पुरतं जाणतो! पण माझी व कल्याणीची लाज आता तुझ्याच हातात आहेस पोरा! नी मला माहितेय! माझा कल्याण माझ्या शब्दास बट्टा लागू देणार नाही!"
" बापू, शांत बसा थोडा वेळ, तुम्ही म्हणताय तसंच होईल पण तुम्ही शांत रहा!" कल्याण आसवाचा बांध घालत विनवू लागला.
गाडी दवाखान्याच्या पायरीला लागली नी कल्याण कल्याणीकडून वचन घेत बापूनी दुसऱ्या झटक्यातच दम तोडला.
रत्नावली थरथरली व बापू परत अनेरकाठी आले.
तेरावं झालं. अक्का व सुरेंद्र थांबलेलेच.
तेरावं आटोपताच संताप दाबून वावरणारे सजन अप्पा बिथरले.
" सखू अक्का, आमच्या संपत बाप्पाच्या खटल्यातला एक गुण तुला सांगतो. यातली माणसं मुलापेक्षा पुतण्यावर व भावावर जास्त जीव ओवाळतात! संपत पाटलाच्या भिकाजीनं मुलांना उघडं पाडलं तर फकिरा काकानं पुतण्यांना आबाद केलं. आता बापूनं कल्याणीस उघडं पाडलं.पण हा 'किसन ..',
'किसन फकिरा चौधरी' छातीवर हात ठोकून सांगतो तो त्याच्या पुतणीस उघडं पाडणार नाही.राहिला प्रश्न तुला दिलेल्या वचनाचा! बापुच्या शब्दास मी बट्टा लावणार नाही. पण वचन जमिनीसाठी दिलं होतं. तर हा सजन चौधरी- फकिरा काकाची ,सजन चौधरीची व किसन चौधरीची सारी जमीन तुझ्या नावावर चढवतो आम्हाला तुझ्या मावश्याची जमीनच नको.नी तुझ्या वचनातून मुक्त होतोय .पण माझ्या बापूच्या मुलीस सुरेंद्रला देणार नाही मी" किसन अप्पा वाघासारखा दहाडला नी कल्याणला बापूंचं वाक्य आठवलं.
' माझा भाऊ वचन मोडणार नाही पण वचन पालटवेन!'
कल्याणला अनेर थडीतील मातीतल्या सोनमुशीत घडलेल्या कोंदणातील हिऱ्यांच्या स्वभावांचं दर्शन होत होतं. काय यांची जगण्याची रीत! काय यांचा मरणाचा अंदाज! मग आपणासही आपल्या सदा बाबाच्या ढोलकीतला बारीवरचा लहजा दाखवावाच लागेल! भले ही साथीनं नाही जगता आलं तरी साथीनं मरणाची प्रतिक्षा करत का असेना!
.
.
क्रमश:

✒ वा...पा..
नंदुरबार.
नंदुरबार.