माईनं एक महिन्याची रजा टाकत वारीच्या एक महिन्या आधीच पंढरपूर गाठलं. सोबत चिखलीतील आणखी चार कुटुंबं होतीच. घरुनच साऱ्यांनी महिनाभर पुरेल इतका सिदाआटा घेतला. मस्त पंढरपुरात भाड्यानं खोली घ्यायची व तिथंच राहत आजुबाजुची स्थळं पहायची, पंढरपुरात किर्तन प्रवचन ऐकण्याचा बेत आखला.
पंढरपुरात ओळखीनं खोल्या घेतल्या. दोन दोन कुटुंब एका खोलीत अॅडजेस्ट झाली. माईनं त्यांच्या शेजारीच सदा गायकवाडाची छोटीशी खोली घेतली. आठ दहा दिवसात त्यांनी आजुबाजूची बरीच स्थळे पाहिली. सोबत सदा गायकवाड गाईड म्हणून फिरू लागला. सदा त्यांना फिरवणं, पाणी भरून देणं, किरकोळ बाजार करून आणणं, स्वयंपाकात मदत करणं अशी बरीच मदत करू लागला. आठ दहा दिवसात साऱ्यांचाच तो परिचयाचा झाला.
त्याच्या सोबत त्याचा चार पाच वर्षाचा कल्याण म्हणून पोरगा ही या माणसात चांगलाच रूळला. माई त्याला जवळ आला की एक-दोन रूपये हातावर टेकवी तर कधी खाण्याची वस्तू. एके दिवशी रात्री किर्तन नसल्यानं जेवणानंतर सारी गप्पा मारत बसली. व कुणीतरी सदास कल्याणच्या आईबाबत छेडलं. सदाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यानं तो विषय टाळत दुसराच विषय काढला. सारेजण पुन्हा आपापल्या भजन, किर्तन, प्रवचन व फिरण्यात दंग झाली. एकादशी पाच सहा दिवसावर येऊन ठेपली. कल्याण आता बऱ्याच वेळ माईसोबत राही.
सदा जवळ नसतांना माईनं कल्याणला सहज विचारलं
" कल्याण तुझी आई रे बाळा?"
" आई...आई...पळून गेली मला सोडून..!" बोबड्या बोलात त्याला कुणीतरी म्हणा वा सदानं सांगितलेलं तो म्हणाला व माईला आपण नाहक विचारलं असं झालं.
त्या रात्री सदा घरी आलाच नाही. कल्याण माई जवळ राहिला. दुसऱ्या दिवशी सदाचे सारे कपडे फाटलेले अंगावर बऱ्याच ठिकाणी माराच्या खुणा उमटलेल्या अवस्थेत तो आला.
साऱ्यांची जेवणे चालूच आटोपलेली व वामकुक्षी घेत पहुडलेले. तो तसाच त्याच्या खोलीत जात अंघोळ करत कपडे बदलवुन आला. पण तरी अंगावरील खुणा, व्रण बरंच काही बया करत होते. गोविंद बाबानं त्याला काय झालं म्हणून विचारतात तो कल्याणला धरून ओक्सा बोक्सी रडू लागला.
रडण्याचा भर ओसरला व त्यानं सांगावयास सुरूवात केली.
.
.
सदा व सुंदरा हे तमाशा कलावंत. नारायणगावातील चंदा फणसे च्या बारीत काम करायचे. दिवाळी झाली की महाराष्ट्रात नगर पट्टा, सांगली कोल्हापूर, सातारा पार नाशीककडं तमाशाचा फड जाई. सदा उत्कृष्ठ सोंगाड्या तर सुंदरा नर्तकी व त्या ही पेक्षा ढोलकी सुंदर रित्या वाजवी. सदाचे डोक्यावर तिरकी टोपी, पायजम्याचं एक फलकं वर व लोंबकळलेली नाडी या अवतारातील फुलत जाणारे विनोद, बतावणी तर सुंदराच्या बहारदार नृत्याच्या लावण्या यानं चंदा फणसे बाईच्या तमाशानं महाराष्ट्रातील मातीला वेड लावलं. मराठी माणूस एक वेळ उपाशी राहील पण कुस्ती व बारी शिवाय राहणार नाही. त्यात सुंदराच्या अदा व ढोलकीची थाप कित्येकांना घायाळ करत. यात्रा संपल्या की सदा पंढरपूर ला परते. यात्रेला येणाऱ्या भाविकांना आपलं घर भाड्यानं देत यात्रेत बऱ्याच उठाठेवी करत आपला संसार फुलवत होता. कल्याण दिड वर्षाचा झाला.दिवाळी झाली व तो सुंदरासह नारायणगावास निघाला. चंदाबाईचा मुलगा चंदुही या वर्षीच बारीत आला. रूबाबदार, देखणा व ढोलकी ही छान वाजवी. चंदाबाईनं त्यास भावी बारीमालक म्हणूनच बारीवर उभं केलं.
आधी चंदाबाईची बारी म्हणजे सबकुछ सदा व सुंदरा! दोन्ही जण उभे राहिले की रात्र यू पास करत.
पण आता चित्र बदललं. सुंदरा सोबत सदाला कल्टी मारली जाऊ लागली व चंदू स्वत: उभा राहू लागला. तमाशाच्या रूपरेषेत नांदी गण गवळण पोवाडा ,वग यात दोघेच जास्त स्टेजवर राहतील अशी आखणी होऊ लागली. महिन्यातच सदाला जाणीव झाली. चंदा व सुंदराच्या ढोलकीच्या वादनाचा व कलगीतुरा रंगू लागला. तरी सदा चंदू आपल्यापेक्षा चांगला वाजवतो म्हणून दुर्लक्ष करी पण सुंदराचं चंदूकडं झुकणं त्याच्या काळजाचा दाह करू लागलं. त्याच्या स्टेजवरील विनोदालाही हल्ली दाद मिळेना .प्रेक्षक चंदू व सुंदराची जोडीच पसंद करू लागली. त्याला वाटलं आपल्यापेक्षा त्यांची कला उजवी ठरतेय म्हणून असावं.आपण आपल्या कलेत सुधारणा करू. पण दिवसा चंदूचं सुंदरा भोवती वावरणं, सुंदराचं आपल्याकडं व कल्याणकडं दुर्लक्ष त्याला पोखरू लागलं. त्यानं त्या बाबत सुंदराला जाणीव करून दिली. पण सुंदरानं त्याला अजिबात किंमत दिली नाही. साऱ्या बारीत चंदू व सुंदरा बाबत बोललं जाऊ लागलं. त्यानं हा सिझन कसा तरी पास करू व नंतर बारीच बदलवू असं ठरवत दिवस काढू लागला. पण आता सुंदरा उघड उघड चंदूसोबतच राहू लागली. सदाची आग आग झाली. चंदूनं तिला बारीची मालकिण करतो अशी फूस लावली व त्यात त्याच्या रुपावर व ढोलकीवर सुंदरा भाळली. त्याचा नारायणगाव मधील भव्य वाडा तिला भुरळ घालू लागला. म्हणून पंढरपुराच्या छोट्याशा खोलीत पावसाळ्यात ती परतलीच नाही. सदानं रडत रडत तिला विनवलं.
" सुंदरा, निदान कल्याणचा तरी विचार कर! ऐक परत फिर.मला तू हवी आहेस!" सदा आतला सारा कढ दाबत हमसू लागला.
पण सुंदरा चंदूसह नाराणगावाला गेली. बारीतले इतर सारे परतले. सदा मागोमाग जात दोन तीन दिवस तिची मनधरणी केली. शेवटी मालकिण चंदाबाईपुढं हात जोडत
" मालकिण बाई चंदूस समजवा, माझ्या संसाराचा तमाशा करू नका!" पण चंदाबाईनं सपशेल कानावर हात ठेवले.
" सदा , बाईनं स्वत: हून माणसापासून दूर रहावं.पण सुंदराच जर ..... मी काय करू!"
" चंदूला समजवा तुम्ही!"
" माझ्या चंदुनं सुंदरास बांधून थोडी ठेवली! "
तितक्यात चंदाबाईनं मधून सुंदरा व चंदूस बोलवलं.
" सुंदरा, जा बाई सदा बोलवतोय तुला!"
" ........"
सुंदरा काहीच बोलेना.
" अगं जायचं नसेल तर तसं स्पष्ट सांग.उगाच आमच्या बारीच्या मालकाची बदनामी नको करू!"
" ....." तरी सुंदरा काहीच बोलली नाही.
" सुंदरे कल्याणचं काय?" आपल्या पुढ्यात उभ्या कल्याणकडं पाहत सदा विचारू लागला.
" का रे त्या रेडकूस का घेऊन जातोय म्हशीसोबत! त्याला तिकडंच बांध!" चंदूनं बाहेर गुराखी म्हशी चरावयाला घेऊन जात होता त्याला सुंदराकडं पाहत बोलू लागला.
सदा काय ते समजला. बारीत नर्तकीसोबत लहान पोर कामाचं नसतं हे तो ओळखून होता. आता तो संतापला. त्याच्या देहाची आग आग होऊ लागली.
" सुंदरे मी मुलाचा विचार करून नमतं घेत होतो पण आता सारं तुटलंच.पण लक्षात ठेवा तुम्ही माझ्या संसारात तमाशा घालून बारी उभी करताय ना! पुढच्या सिझनलाच तुमच्या तमाशा नाही गुंडाळला तर हा सदा गायकवाड बापाचं नाव लावणार नाही!" तो कल्याणला उचलत निघू लागला.पण पोरगं आईकडं धाव घेऊ लागलं. जवळ आलेल्या कल्याणला दूर ढकलत ती चंदूसोबत आत निघून गेली.
पोरगं " आईsss, आईsss, आईss" म्हणत रडू लागलं. सदानं रडणाऱ्या कल्याणला उचललं
" कल्याण बाबा रडू नकोस! आजपासून मीच तुझी आई नी मीच तुझा बाबा! चल"
सदानं पंढरपूरला येताच खोल्या भाड्यानं देत तो कल्याणला घेत कोल्हापूरला निघाला. त्याच्या ओळखीच्या ढोलकी वादकाकडं तो पुन्हा नव्यानं ढोलकी शिकू लागला. त्यांचं वय झालं होतं. त्यांना ही चंदाबाईनं फसवलं होतं. त्यांनी त्या वयात ही सदाला ढोलकी शिकवण्याचं कबुल केलं. त्यांची मुलगी ही तमाशा बारीत होती.
सदा व ते पहाटेच सह्याद्रीच्या घाटात जात सदाला ढोलकी येत होतीच पण सुंदरा वाजवतेय म्हणून त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं होतं. त्या बाबानं ढोलकीच्या विविध अंगाची, बाजाची, नव्यानं ओळख करून देत सदास शिकवलं. सदा घाटात रात्रंदिवस ढोलकी गुंगवू लागला. माणसाच्या शिकण्याला जिवनातील दु:खाची, यातनाची, सलीची जोड दिली की तो माणूस हवं ते शिकतो. सदा कल्याणला जवळच बसवत दोन महिने रात्रंदिवस वेळ मिळेल तसा ढोलकी बडवू लागला. त्यानंतर त्या बाबाच्या मुलीला घेत इतर कलाकार निवडले. बाबांनीच त्याच्या तालमीतले कलाकार दिले संच उभा राहिला.
चार महिने कठोर साधना करत विनोदांची नविन जुळणी व तडका देत तो सिद्ध झाला. बाबांच्या पोरीसह ( यमुना बिनी) तो ढोलकी ,कलगी तुरा, लावण्या, बतावण्या तयारी केली.
दिवाळी झाली व बाबांनी आणखी एका फडास सोबत करत एक संच उभारला त्या संचाच्या तारखा होत्याच.
बऱ्याच ठिकाणी यात्रेत चंदा फणसे व यमुना बिनी दोन्ही बाऱ्या समोरा समोर ठाकू लागल्या.
सदाच्या ढोलकीवर यमुनाबाई थिरकू लागल्या व प्रेक्षक धुंद होत शिट्या वाजवत फेटे उडवू लागले. नविन- जुने कलाकार ,नविन कला. सुंदरा व चंदू दोन तीन प्रयोगानंतर फिके वाटू लागले. पहिल्या सिजनमध्येच यमुना बिनीची बारी महाराष्ट्र गाजवू लागली. एका ठिकाणी दोन्ही बाऱ्या अगदी समोरासमोर उभ्या ठाकल्या. गावकऱ्यांनीच दोन्ही तमाशात ढोलकीची समोसमोर बाजी लावली. चदु व सुंदरा एकीकडं तर दुसरीकडं सदा.
सदानं कल्याणबाबास खांद्यावर उचललं व ढोलकीवर
' झिंगीनांघ,चिकीनांघ झिंगीनांघ चिकीनांघ...' थाप उठवली. एक तास बेफान होत सामना रंगला. सुंदरानं यापूर्वी सदाची अशी ढोलकी ऐकलीच नव्हती तिथेच ती गारद झाली व त्यात कल्याण खांद्यावर ...चंदू आटापिटा करत तिला आवेशात आणू लागला पण सुंदराची त्याला मागच्या वर्षासारखी साथ मिळेच ना. त्या रात्री यमुनाची बारी रसिकांच्या मनात भरली.नंतरच्या सिझन मध्ये चंदाबाई ऐवजी लोक यमुनाबाईच्या बारीलाच सुपारी देऊ लागले. दुसरं वर्ष सदानं ढोलकी व सोंगाड्याच्या भुमिकेनं गाजवलं. सुंदरा व चंदूच्या बारीकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
.
.
सदानं सारं सांगताच साऱ्यांना सदा व कल्याण बाबत वाईट वाटलं.
त्यांनी त्याच्या अंगावरील खुणाबाबत विचारलं पण सदानं विषय टाळला.
त्या रात्री सदा थांबला. सकाळी तो यात्रेत कामानिमीत्त गेला. कल्याण ही त्याच्या मागं जाऊ लागला.
" कल्याण बाबा माईजवळ थांब ना! एकादशी जवळ येतेय तशी बाहेर गर्दी वाढतेय.मी लगेच येतो.यात्रेत काही ना काही काम मिळण्याचे हेच दोन चार दिवस आहेत."
तरी कल्याण ऐकेना .माईनं त्याला बोलवलं. कल्याणला माई कडून काही तरी खायला मिळेल ही आशा म्हणून तो फिरला.
सदा गेला तो गेलाच.दोन दिवस आलाच नाही. कल्याण सायंकाळी जीव तोडून वाट पाहू लागला. रात्री माई गोविंदबाबानं त्याला जेवण दिलं पण तरी जेवणात चित्त नव्हतं. दुसरा दिवस ही गेला. तिसऱ्या दिवशी चंद्रभागेत भल्या पहाटे चार पाच किमी अंतरावर फुगलेलं प्रेत सापडलं. दुपार पर्यंत ओळख पटली.चंद्रभागेत बुडून मृत्यू अशी बातमी फुटली. सत्य सदा सोबतच चंद्रभागेतच बुडालं. गाडी गल्लीत आली. सदाचं दुसरं कुणीच नव्हतं. भाडेकरू म्हणून गोविंदबाबा माई यांनी कल्याणला घेतलं. शेजाऱ्यांनी नारायणगावास फोन लावला. ओळखीवाल्याकडून चंदाबाईस फोन गेला. पण सुंदरा दिल्लीला गेल्याचं कळलं .ती आलीच नाही. नदीवरच दहन झालं. यात्रेची धांदल असल्यानं प्रशासनानं तिकडं दुर्लक्ष करत प्रकरण बाजुला ठेवलं. माईनं कल्याणला सोबत घेत विठोबाचं दर्शन घेतलं व त्यांनी इतरांना चिखलीस पाठवत नारायण गाव गाठलं. चंदा फणसेचा वाडा सहज सापडला. त्यांनी चंदाबाईस सारी हकीकत सांगत सुंदराची चौकशी केली.पण सुंदरा व चंदू महिन्यांपासून दिल्लीला गेल्याचं कळलं.
" ठिक आहे पण त्यांना बोलवून घ्या, मुलाचा प्रश्न आहे!" माईंनी विनंती केली.
" बाई तुम्ही काय करता?" चंदाबाईनं माईंना विचारलं.
" मी शिक्षीका आहे आश्रमशाळेत!"
" बरं . सदाशी काही नातं?"
" नाही हो काहीच नाही. पण एक महिन्यापासून त्याच्या खोलीत थांबलो होतो. जिव्हाळ्याचे संबंध झाले एवढंच!"
" मग आता विसरा नी निघा ना गावाला!उगाच जास्त इंटरेस्ट दाखवला तर यात्रेनंतर पोलीस प्रकरण उकरत भाडेकरुंनीच .....असं फिरवलं तर घेण्याचे देणे पडतील"बाई बोलल्या नी माई घाम पुसायला लागल्या.
" अहो तेच म्हणतेय मी. या पोरास त्याच्या आईकडं सोपवा म्हणजे मी परत जायला मोकळी!"
" बाई , ज्या सुंदरानं दोन वर्षापूर्वीच सोडलं मुलास ती पुन्हा कसं स्विकारेन? तिला आता दुसरा मुलगा झालाय!"
" चंदाबाई,त्या वेळची स्थिती वेगळी होती, त्या वेळेस सदा होता. आता सदा नसल्यावर मातृह्रदय स्विकारेलच!"
" मग शोधा त्या सुंदराला नी सोपवा." बाई बोलत आत निघून गेल्या.
माई उठल्या व बाहेर पडल्या. तोच बाहेरून कल्याण माईस मागं बोट दाखवू लागला. माईनं वळून पाहिलं तर खिडकीत सुंदर स्त्री बसलेली होती.कल्याणनं बोट दाखवलं म्हणजे सुंदराच असावी.माई परत वळल्या.
जवळ जात त्यांनी कल्याणला सोडलं.पण खिडकीतून अंगणात येऊनही ना सुंदरा पुढं आली ना कल्याण पुढं गेला.
" सुंदरा बाई तुम्हीच ना?"
"...."
" सांभाळा तुमच्या लेकराला!त्याच्या बापाचं तर आपणास कळलंच असेल?"
" ठिक आहे चंदूरावांना सांगून आश्रमात सोय करते!" सुंदरा शांतपणे म्हणाली.
माईच्या कानात तप्त लाव्हा घुसळू लागला.
" म्हणजे तुम्ही नाही सांभाळणार?"
माईनं थरथरत विचारलं.
" ज्याचा होता तो निघून गेल्यावर मी कसं सांभाळू!" कोरड्या स्वरात सुंदरा बोलली.
" ठिक आहे .तुम्हास योग्य वाटेल तसं करा!" म्हणत माईनं कल्याणला सुंदराकडं चालतं करत माघारी वळल्या. पण तोच त्याचा पदर ओढला गेला. त्यांनी माघारी पाहिलं तर कल्याणनं त्यांच्या पदराला लागून त्याच्या पायाशी बिलगला. माई विरघळल्या.ज्या अर्थी जन्म देणारी आई पोरास जवळ करत नाही तर पोरगं कसं जाईल?
खाली वाकत " कल्याण बाबा सोड! आईकडं जा!" त्या म्हणाल्या.
कल्याण माईलाच बिलगला.
माईनं त्यास उचललं.
" सुंदरा बाई मीच कल्याणला आश्रमात सोडते!"
" पहा तुम्हास जमेल तसं करा!" म्हणत सुंदरा घरात परतली. ती दिल्लीला गेलीच नव्हती.
माई पुन्हा सोलापूरात परतल्या. प्रवासात कल्याण बाबा त्यांच्या मांडीवर निर्धास्त झोपला. काय करावं? या लेकरास पोलीसाच्या अधीन केलं तर ते ही अनाथालयातच टाकतील. द्यावा का आपणच आधार? आपण आधार दिला तर तो भविष्यात आपणास आधार देईल.
माईनं पोलीस स्टेशन गाठत रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या व त्या चिखलीस परतल्या.
परतण्या आधी त्यांनी कल्याणबाबास त्याच्या घरी नेलं तेव्हा लहानसं पोर सदाबाबाच्या आठवणीनं काळीज फाडणारा आक्रोश करत माईस बिलगू लागलं. माईनं त्यास छातीस लावलं नी चिखली गाठलं. आपल्याच आश्रमशाळेत त्यास शिकवू लागल्या.
.
.
.
कल्याणबाबाचा जिवन पट ऐकून बापू अप्पा, राधाताई, कल्याणी साऱ्यांचाच थरार उडाला. माईंचं तर रडणं थांबेना. कल्याण बाबानं त्यांचा हात हातात घेत मूक ऊर भरला संवाद साधला.
तमासगिराचं पोर डाॅक्टर झालं यावर बापुंचा विश्वास बसेना. माईंच्या मायेनं पोरक्या पोरास आकार दिला.
" बापू, आमच्या कल्याण बाबानं माझा पदर धरला नी मी त्याची जात, धर्म लक्षात घेतलाच नाही. "
" माई, जाती, पंथ, धर्म आपणच निर्माण केलेत. निखळ ममतेत, प्रेमात जातीच्या, धर्माच्या, श्रृंखला गळाव्यातच. आम्ही ही ते विसरूच!" बापू बोलले नी कल्याण व माई बापूकडं पहायला लागले.
" माणूस जातीपेक्षा त्याच्या कर्मानं ओळखला जावा.सांप्रत माणसाची कर्मे थोर असतील तर जात धर्म आड येऊ नयेत! आमच्या कल्याण पोराचं काम निस्वार्थी आहे.आम्हीच काय तर आमचा अख्खा गाव त्यांच्या कामावर खूश आहे.कल्याणी बेटा बरोबर की नाही?" बापूला काही तरी वेगळंच सांगायचं होतं. ते कल्याणीनं ओळखलं .
माई परतल्या. परततांना त्या माडीवर आल्या तेव्हा कल्याणीस पाहून त्यांच्या मनात काही तरी वेगळ्याच तरल भावना उठल्या. पण ....? पाहू भविष्य काय दान देतं कल्याण बाबाच्या पारड्यात असं मनातल्या मनात म्हणत त्या निघाल्या.
अश्विन महिन्याची पुनव जवळ येऊ लागली तसं बोरवण गाव व अनेर थडी कलेकलेनं वाढणाऱ्या चांदण प्रकाशात न्हावू लागलं. बोरवण गावातील बोरी नविन कोवळी पालवी धारण करत बहराच्या उभारीत हरखू लागल्या. थंड वाऱ्याच्या सोबत खट्याळपणा करू लागल्या.मग वारा ही बोरीच्या झाडास झिंझोळण्यास तयार झाला.
कल्याणी आता पर्यंत साधा मोबाईल वापरीत होती. तिनं नविन अॅनराॅईड घेतला व व्हाट्स अॅप, फेसबुक सुरू केलं. कधीच या फंदात न पडणारी ती, आताशी तिला समाजमाध्यमं वापरावीशी वाटू लागली.
कल्याणबाबाचा कुठं ही पडणारा मोबाईल आता पासवर्डनं उघडू लागला.
अनेर काठावर सिताराम भरवाडचा खिल्लारचा मोठा वाडा होता. दरवर्षी पावसाळ्यात त्याची लच्छमन, गोविंदा, लाखा ही मुलं गाई सातपुड्यात मोरचिड्याकडं नेत व थंडीला सुरुवात व्हायच्या आधी अनेर थडीवर आणत. केळीचं खोड, पिल, पत्ती खाऊन त्यांच्या गाईचा दुधाचा धंदा चाले. सिताराम भरवाड व सजन बापूचे घरोब्याचे संबंध होते. आताशी डाॅक्टरासही बऱ्याचदा वाड्यावर बोलवत. कारण सितारामच्या परिवारासोबत दोन तीन आणखी कुटूंबं होती. म्हणून आजारी असलं की डाॅक्टराला बोलवत.
सिताराम भरवाड कोजागरी पुनवेला दुध आठवत मोठा कार्यक्रम करी. त्यात बापू अप्पा यांच्या परिवारास व गावातील आणखी दोन तीन परिवारास तो बोलवी. केसर बदामयुक्त दुधाची बासुंदी आणि कृष्णाची रासलीला यानं रात्री उशीरा पर्यंत मस्त कार्यक्रम रंगे. यावर्षी डाॅक्टरांनाही आमंत्रण गेलं.
कोजागरीच्या पूर्ण चांदाच्या रजत चांदण्यानं अनेर थडी झाकली. पाण्याचं पात्र सिकुडल्यानं वाळूतच डिजे लावत व नंतर रास लीला होणार होती. आठ वाजताच बापू अप्पा, राधाताई, द्वारकाबाई,कल्याणी सारी जिपगाडीनं आले. उमेश रमेशचे दुसरीकडेच कार्यक्रम असल्यानं ते आलेच नाही. गावातील इतर ही आले.
कल्याणला आठ पासुनच मॅसेज, मिसकाॅल्स जाऊ लागले. त्यानं झब्बूला घेतलं व नऊच्या सुमारास तो पोहोचला. वाडा काठावर तर कार्यक्रम नदी पात्रात. दुधाची भली मोठी डेग पात्रातच आटू लागली. अप्पा बापू सारी हळूहळू पात्रात उतरली. कल्याणी काठावरील वाड्यात सितारामाच्या सुनांजवळ थांबली.डाॅक्टर पात्रात जाऊन साऱ्यांना भेटला. तोच गोविंदानं (की कल्याणीनं) त्याला वर वाड्यात बोलावलं.

क्रमशः
✒ वा....पा...
नंदुरबार.
8275314774
नंदुरबार.
8275314774