झटेतलं चांदणं
🔖 भाग::-- चौथा
विभागस्तरावरील सामने कदम सरांच्या शाळेतच असल्यानं अंजनाबाई पण सामने पाहण्यासाठी हजर असतच.मुलींच्या सामन्यात
' पमे, कच्च्या पेरूनं पक्का (पिकलेला)पेरू पाड ' हे वाक्य ऐकताच तिला आपलं माहेर आठवलं. त्यात मुलाच्या फायनल मधील आपल्या मुलाचा धुव्वा उडवणारा, सुरेशला जखमी करणारा, व जिंकल्यावर जल्लोस करणारा एकच....ते पोरगं पुन्हा पुन्हा तिच्या नजरेत सलू लागलं. मागे दिवाळीत भावाचा कापूस पेटवणारा...पम्या. नी तिला सदा नकाशे आठवत
’आम्ही किड लागलेलं वांगं भरतासाठी वापरत नाही' हे आठवत ती लाल लाल झाली. नंतर तिनं चंदू सुरेशला व खास शिल्पाला त्यापासून दूर राहण्यास बजावलं.
राज्य स्तरीय सामन्यावेळीच खडकीची अंध आजी वारली नी पमन व मायास स्पर्धेत भाग घेता आला नाही. तरी मुलींमध्ये पमीच्या संघानं तर मुलांच्या संघात केसानं अनुक्रमे नागपूर व कोकण विभागांशी चुरशीची लढत दिली. एक दोन गुण फरकाने ते हारले. पण पहिल्याच वर्षी राज्यस्तरावर धडक देणारे संघ म्हणून साऱ्यांच्याच लक्षात राहिले. शास्त्री सरांचं नाव अधिक ठळक होतं, काम करणारा *माणूस* बोलत नाही तर त्याचं काम बोलतं हे साऱ्यांपेक्षा अडकमोल मॅडमने विशेष लक्षात घेतलं.
पुढच्या वर्षी अप्पा सरदेसायांच्या मुलांनी चिंतामण कदम व अडकमोल मॅडम यांनाच आर्डीला हाकलत शास्त्री सरांना सन्मानाने नाशिकला आणलं. शास्त्री सरांना आपल्या मित्रासाठी आता आर्डी सोडावीच वाटेना.त्यांनी तशी विनंतीही केली. पण दरवर्षी राज्यावर गाजणारी नाशीकची संस्था एक दोन खेळ प्रकार वगळता या वर्षी गाजलीच नाही .जे गाजले ते ही शास्त्री सरांनी घडवलेले खेळाडूच होते ही बाब खटकताच मनेजमेंटनं सरांचं न ऐकता बदली केलीच.
चंदू सुरेश व शिल्पा पुन्हा बारावीसाठी आर्डीस परतली. त्यांना शास्त्री सरांना तोंड दाखवताच आलं नसतं व शिल्पाला बारावीत प्रथम क्रमांक आणून दहावीचा बदला घ्यायचाच होता.पद्मानंही या वर्षी दहावीला पहिला क्रमांक पटकावत अकरावीस प्रवेश घेतला.
शास्त्री सरांमुळे म्हणा वा खो खो स्पर्धेत जिंकल्यानं म्हणा किंवा वाढतं वय; पण पमनच्या हूडपणात बदल होऊ लागला. तो आता मामासोबत मळ्यात अधिक खपू लागला. मामाच्या गाडीनं कधी चाळीसगावला दूध पोहोचव तर कधी पेरू तोडणी पासून तर स्टेशनवर पोहोचवणे असली कामं करू लागलं. गडी माणसाबरोबर औताचं काम ही शिकू लागला. बारावी असल्यानं ताराबाई व माया त्याला अभ्यासासाठी बसवू लागल्या. पण मामाची कुतर ओढ त्याला पहावेना. रात्री मात्र माया, पमा सोबत तो अभ्यासाला बसू लागला. पमा कायम मायासोबतच राही. हल्ली तिचं मायाकडं येणं जाणं खूपच वाढलं. सतत काहीना काही निमीत्त करून ती मायाकडं येई.पमन घरी असला की ती मायाजवळच घुटमळत राही. पमाचं आर्डी हे मामाचं गाव. मारुती मामा व प्रतापराव अलग पट्टीतले. पमाचं गाव सातपुड्याच्या पायथ्यासी खडकीच्या आसपासच होतं. आजोबाची खूपच भरभराट होती. पण वडिलांनी व्यसनात सारं घालवलं. नंबरा नंबरानं शेत जात राहिलं. पत्ते, जुगार, दारूत बाप खाक होत राहिला. कायम फुकटखाऊ लोकांचा गराडा असायचा. पद्माच्या जन्मापर्यंत थोड फार होतं. पण नंतर नंतर तर काहीच शिल्लक ठेवलं नाही. घरातला एक एक बारदाना, भांडी विकली जाऊ लागली, राहती माडी ढासळू लागली तशी ढासळलेल्या भागाची सागवानी लाकडं, पटई,चौकट विकत बाप पिण्याची सोय बघू लागला. राहता सामान माडीच्या उर्वरीत चांगल्या भागात आकसू लागला. पद्माचं रुप लहानपणापासुनच खुलून दिसू लागलं. सहावीच्या शेवटी शेवटी उन्हाळ्यात आई कॅन्सरनं गेली. मारुती मामानं बहिण गेली नी भाचीस आर्डीस आणलं. पुढे नंतर मोठा भाऊ ब्लड बॅंकेत लागला व तो औरंगाबादला गेला. पमाचे वडील आता कुणासोबतही शहादा खेतीया फिरत. एक दोन रूपयाचा कल्याण मिलन लावायचा व दिवसभर वाट पाहत इतरांसोबत फिरायचं. सारं भविष्य अंधकारमय. मारुती मामानं
" मेव्हणा व भाचा कुठं ही पोट भरतील! पण भाची लेकीची जात! तिची आभाळ नको म्हणून आपली परिस्थिती कष्टप्रद असतांनाही घेऊन आला. मंजा मामीही पमाला लेकीगत सांभाळू लागली. पद्माला परिस्थितीची जाणीव असल्यागत ती झपाटुन अभ्यास करीच पण सुटीच्या दिवशी मामा मामी सोबत कायम मजुरीस उभी राही. प्रतापरावाकडं मजुरीला मंजा मामी व पद्मा कायम असत. मारुती मामा ही आपलं दोन तीन एकर शेत करत इतरांकडं राबे.
अडकमोल मॅडम आर्डीला बदली होताच संतापल्या. तरी नोकरी म्हटलं की बदली हा भाग आलाच म्हणून त्या आर्डीत आल्या. या वर्षी वयानुसार पमन माया शिल्पा चंदू किशोर गटात बसत नव्हतेच. बसले असते तरी अडकमोल मॅडमांनी त्यांना घेतलं नसतंच. त्यांनी पमीचं ही खच्चीकरण करत खो खो ची नविन टिम तयार केली. कबड्डीचा ही संघ तयार केला. पमन, माया व पद्मा मॅडम असं का वागतात ते समजून चुकले. त्यांनी बारावीचं वर्ष असल्यानं खेळाकडून अंग काढून घेतलं. पमन अभ्यास, शेतातली कामं व वेळ मिळेल तसा सुलभा मॅडमकडं गायन शिकू लागला.
स्पर्धा एक दिड महिन्यावर आल्या तसं अडकमोल मॅडमनं पद्माचं नाव थाळी फेक साठी घेतलं. पद्मानं खो खो साठी आग्रह केला. पण तिचं काही एक न ऐकता थाळी फेक साठी नाव घेतलं गेलं. शिल्पा किशोर गटात बसत नव्हतीच व बारावीचं वर्ष म्हणून तिचं नाव भाला फेक साठी घेतलं. कारण भाला फेकीत ती मागच्या वर्षी जिल्ह्यापर्यंत पोहोचली होती. या ठिकाणी कदम सरांनी पाचर मारत पमनचं ही नाव भाला फेकीसाठी घ्यायला लावलं.आपल्या समोर येत जल्लोस करणारं हे आताशी उगू पाहणारं पोरगं त्यांना जिव्हारी लागलं होतं.त्यासाठी भालाफेकीत शिल्पा विभाग वा राज्यापर्यंत जाईल व हे पमन तालुक्यालाच पिछाडेल. म्हणजे याची रग उतरेल. म्हणुन कदम सरांनी अडकमोल मॅडमला त्याचं नाव घेण्यास लावलं. बारावीचा अभ्यास म्हणून शिल्पानं पंधरा दिवसच भालाफेकच्या तयारीचा उजाळा केला. पमन तिकडं फिरकेच ना. अडकम़ोल मॅडमनं त्यास तंबी देत तयारीस बोलवलं. तो मुद्दाम आठ दहा दिवस गेला.
अडकमोल मॅडम त्याचा भालाफेक पाहून गालातल्या गालात हसू लागल्या. पण पमन काय करतोय हे त्यांना कळणारच नव्हतं. शिल्पावर त्यांनी कठोर मेहनत घेतली. पमीची तयारी पाहून तिचीही कठोरतेनं तयारी करून घेतली.
दिवाळी नंतर तालुकास्तरीय स्पर्धा सुरू झाल्या खो खो कबड्डी संघानं तालुक्यालाच मान तुकवली. पद्मा , शिल्पा थाळी व भाला फेकीत पुढे गेल्या. पमननं ८६ मीटर फेक करत दिमाखात जिल्ह्यावर गेला. अडकमोल व कदम चक्रावले.
जिल्ह्यावरून विभाग व विभागावरून राज्यावर तिघे ही निवडले गेलेच. कदमला चुकुन पमनचं नाव दिलं गेल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. राज्यावर पुण्यास स्पर्धेसाठी एका प्रायव्हेट कारनं तिघांना घेत अडकमोल मॅडम निघाल्या. कारच्या मागच्या शीटवर पमन पद्मा व शिल्पा बसलेले. मॅडम पुढे बसल्या.
पमानं आपल्याकडील खारका काढत पमनला दिल्या व शिल्पासही देऊ लागली.
" नकोय मला! पमनला दे आणखी!" ती खोचक बोलली.
" अग घे ना! त्याला तर दिल्याच!" पमा साधेपणानं म्हणाली.
" पद्मा तू असं खायला देते म्हणून हा जिंकतो वाटतं!" शिल्पा गालात खोचक हसत बोलली.
" शिल्पा तसं असतं तर सरावाची गरजच नसती! " पमानं निर्वीकार म्हटलं. नाशिक येताच शिल्पा अंजना आत्या व प्रशांतसोबत त्यांच्या गाडीवर बसली. पुण्यास शास्त्री सरांचे मुलंही विभागावरून निवड होत आलेले. थाळीफेक मध्ये तर पद्मास दुसऱ्या क्रमांकावर ढकलंलं होतं. शिल्पा व पमननं मात्र पहिला क्रमांक सोडला नव्हता.
राज्यावर पमन मुद्दाम माघारला व शास्त्री सरांच्या खेळाडूस संधी दिली.
पद्मा हारली. फक्त शिल्पा राहिली. तिला उत्तेजन देण्यासाठी पमन धावतच तिच्याकडं जाऊ लागला. तोच प्रशांतनं त्याला अडवत मागं खेचलं. पमननं त्याचा हात झटकत त्याला धुतकारलं.
त्यानं तिच्या दोन्ही खांद्यांना हातानं थोपटत " शिल्पे ,शास्त्री सरांची मुलगी स्पर्धेतून बाहेर पडली. तू प्रयत्न कर! गिरणेचं पाणी काय असतं ते दाखव यांना!" म्हणाला व प्रोत्साहन म्हणून हातात तिचे हात घेतले. त्यामागं त्याचा उद्देश आपली दुश्मनी गाव जिल्ह्यावर ठिक पण पुढं जातांना या छोट्या गोष्टी विसरत आपल्या संस्थेचं विभागाचं नाव व्हावं हाच होता.
त्याच्या राकट हाताचा स्पर्श तिच्या गुलाबाप्रमाणं मऊ हातांना होताच तिचं रोम रोम पुलकीत झालं. साऱ्या अंगावर रोमांच उभे राहत एक सुखद शहारा संचारला. आता पर्यंत कळत न कळत बऱ्याचदा तिला परक्याचा स्पर्श ही होई .पण पमनच्या स्पर्शात तिला वेगळाच स्वर्गसुखाचा भास झाला. नी याचा परिणाण उलटा झाला. विभागापेक्षा ही तिची भालाफेक खालावली. स्पर्धेतलं आर्डीचं आव्हान संपलं व सारे माघारले.पण पमनचा हातात हात घेतांनाचा स्पर्श तिच्या अंतर्मनात बरेच दिवस दरवळत राहिला.असं का होतंय हे मात्र तिला कळेना.
बारावी झाली. सुटीत तो खडकीस आला. सदास आबाचे हाल पहावेना. आबा स्वत: हातानं या वयात स्वयंपाक करत. याचं त्याला वाईट वाटू लागलं. सुटीत असे पर्यंत तो स्वत: स्वयंपाक करू लागला.
" पवन, मला सवय आहे पोरा! तू कशाला त्रास करून घेतोस!" आबा त्याला सांगू लागले.
आबांनी शेती भाड्यानं दुसऱ्यास कसायला दिली होती तरी ते विटाभट्टावर ट्रक घेऊन जात. खडकी हे मध्यप्रदेश सिमेवर वसलेलं आदिवासी पट्ट्यातलं गाव. उन्हाळ्यात जिकडे तिकडे लग्नाची धूम. रात्री डिजे पार्टीत पमन गाणं म्हणण्यासाठी हौसे खातर जाई. पमन म्हणजे जिंदादिल रसायन होता. जेथे जाई तेथे दिलखुलास मिसळणं हे त्याचं वैशिष्ट्ये. त्याला कोणतीही गोष्ट करण्यात कधीच कमी पणा वाटेना. रात्री हळदीत वा आदिवासी लोकांच्या जान (लग्नाच्या वरात) मध्येही तो डिजेसोबत जात गाणं म्हणे. त्याच्या गाण्यानं सारी तरुणाई झुमे तर म्हाताऱ्यांना त्याच्या आवाजातील कातरपणा जाणवे. आबांना हे माहीत पडलं.
" पवन, हे काय लावलंस! लग्नातल्या बॅण्ड पार्टीत गाणं म्हणणं आपल्याला शोभत नाही पोरा!" आबा कळवळून म्हणाले.
" आबा , गायन ही एक कला आहे! त्यात काय एवढं! मोठ मोठे सुपर स्टार्स ही लग्नात कोट्यावधी रूपये घेतात व गाणं म्हणतात.त्यात काय लाज!"
" पवन मोठ्यांनी काहीही केलं तरी सामान्य त्याचं कौतुक करत त्यांची कृती फॅशन म्हणून स्विकारतात.पण तिच कृती सामान्य माणसानं केली तर तिचं हसं होतं पोरा!"
" आबा कोणास काय वाटेल, यापेक्षा आपणास योग्य वाटेल ते करण्यास काय हरकत आहे.आणि सामान्याची सामान्य कृतीच एक दिवस मोठी होते!"
सदा आबाचं सांगणं मनावर न घेता पमन जातच राहिला. त्याच्या गायनानं सारी वेडावू लागली.
बारावीचा निकाल लागण्या आधी तो आर्डीत परतला.
" पमन, काय म्हणते आबांची तब्येत?" मामा व मामीनं विचारलं
" मामा! आबा या वयात स्वत: हातानं करून खातात हे पहावलं जात नाही!"
पमन भरल्या गळ्यानं म्हणाला.
दुसऱ्या दिवशी प्रताप राव ताराबाईनं विचार विनीमय केला. भिका बाबास आनंदच झाला. प्रतापराव निघाले. आबा नाही म्हणत असतांनाही प्रतापराव आबास आर्डीत घेऊन आले. शेती नफ्यानं दिलीच होती. यथावकाश ट्रक ही विकला. आबा नकार देत असतांनाही ताराबाई व प्रतापरावाच्या विनवणीपुढं त्यांना माघारच घ्यावी लागली.
" आबा मला एकटी माया आहे. तिचंपण लग्न होईल व ती चालली जाईल .मग या साऱ्या पसाऱ्याचं काय. एवढं असून तुम्ही तिथं हाल अपेष्टा करत किती दिवस राहणार? त्यापेक्षा इथंच रहा आता!" सदा आबांचे डोळे भरले. त्या दिवसापासून ते प्रतापरावासोबत मळ्यात झेपेल ती मदत करत आर्डीतच राहू लागले. ताराबाईच्या हाताचं आयतं जेवणं त्यांना सुखावू लागलं.
बारावीत पुन्हा मायानं बाजी मारली. नव्वद टक्के मिळवत ती पहिलीच आली. शिल्पानं जिवाचं रान करूनही ८८ टक्केच मिळाले. पुन्हा ती ढसा ढसा रडली. पमननं चाळीशीचं चक्र भेदत झेप घेत ६५% मिळवत साऱ्यांना अचंबित केलं. पमन नापास होणार या आशेवर बसलेल्यांना गालात चापट मारल्यागत झालं.
शाळेने पहिल्या तीन मुलांचा सत्कार ठेवला. सत्कार झाल्यावर सुलभा मॅडमनं सहज विचारलं
" मुलांनो पुढं कोण कशाला जात आहात?"
" मॅडम, मी इथंच आर्ट्स ला प्रवेश घेतेय." माया.
सुलभा मॅडमनं शिल्पाकडं पाहिलं.
" मॅडम, संशोधन क्षेत्रात जायचंय मला म्हणून नाशिकला जात मी सायन्स घेणार!"
माया सोबत आलेल्या पमनला पाहून ती म्हणाली.
" पवन तू रे?" सुलभा मॅम
" मॅडम, मी संगीत विषय घेत ग्रॅज्युएशन व नंतर PG करणार!"
अरे व्वा! छान पवन.तुझा आवाजही चांगला आहे.कर. काही मदत लागली तर सांग,माझे भाऊ आहेत.ते मदत करतील तुला.
शिल्पा रागात उठली. घरी जाताच तिनं घरी आलेल्या अंजना आत्यास सांगितलं.
" शिल्पा तू सांगितलं ना सायन्स? मग पहा ते माकड पिच्छा करत नाशिकला सायन्सलाच फाॅर्म भरेल!"
पण कदम, अंजनाबाई व सोमा, मंगा पोवार साऱ्यांचाच अंदाज चुकला. पमनने जे ठरवलं होतं त्यातच फाॅर्म भरला व त्याचा पुण्याच्या संगीत महाविद्यालयात नंबर लागला. जिथं आधीच शिल्पाचा प्रवेश निश्चीत होता.
यांना साऱ्यांना वाटलं की शिल्पा सायन्सला जाणार म्हणून हा ही सायन्स घेणार पण आडाखे चुकले व पुन्हा तीन वर्ष आता दोन्ही सोबत राहणार. अंजना बाईनं आपल्या भाचीस समजेल अशा मार्मिक भाषेत काही कानमंत्र दिला. सावध राहत एकाद्याला आयुष्यातून कसं उठवायचं हे शिल्पा प्रथमच ऐकत होती. तसं पाहता तिला पमननं हातात हात घेतला तेव्हा उठलेला शहारा अजुनही आठवत होता. पण त्याच्या जिवनात शहारा ऐवजी काटे उभे करत जिवन उध्वस्त करण्याबाबत आत्या सांगतेय म्हटल्यावर कोऱ्या मनावर लगेच बिंबलं. कारण आत्याला याच्या काकानं वडिलांनी छडल्याचं तिनं ऐकलं होतं त्यात माया व पमन तर तिला प्रत्येक ठिकाणी नडत आलेले. दहावीला प्रथम येण्याचं स्वप्न भंगलं. कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आर्डीत आपल्या गाण्यानं गारूड घातलं पण मिरवणूक पुढं आली नि याच्या ' लख लख सोनानी....' या एकाच गाण्यानं आपली हवाच गुल केली. खो खो त पमीला आपण यू गुंडवत होतो पण हा एकच वाक्य बरडला नी सारा खेळ पालटला व आपण हरलो.प्रशांतचा तर यानं धुव्वाच उडवला. हा प्रत्येक ठिकाणी नडतोच आपल्याला. याचा काटा काढायचाच. पण आत्या सांगतेय तसाच.
पुण्यात दोघं होस्टेलला राहत काॅलेज करू लागले. पहिल्या वर्षी ही मुद्दाम याच्याशी सलगी करत जवळ येई. क्लास मध्ये ही गायनाच्या वेळी याच्याशी जोडी करत सलगी करी. पण पमनला हे सारं नकोसं वाटे. कारण अल्लड वयात त्याच्याकडं हुल्लडबाजी वा हूडपणा,मस्ती म्हणा तो तिची मजा घेई. तिचीच काय पण इतर कोणत्याही मुलीला तो छेडे. पण वय वाढू लागलं नी तो या पासुन दूर जाऊ लागला. मस्ती वा हूडपणा असेल पण बाकी त्याच्या स्वभावात नव्हतं. शिल्पा सलगी करू लागली की त्याला हसू येई. तो केवळ मजा घेत दूर होई. पहिलं वर्ष संपलं. पहिल्या वर्षात तो गायकीचे बरेच बारकावे शिकला. गायनाबाबत सिरीअस होत त्याची ज्ञानपिपासा वाढली. संगिताच्या विविध प्रकाराचा तो खोल खोल विचार करत रियाज करू लागला. पमन एक अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला होता पण आबा व मामा मामीच्या लाडानं त्याची बुद्धिमत्ता हूडपणा वा द्वाडपणा करण्यात खर्ची होत होती.शास्त्री सर भेटल्यापासुन त्याला जाणीव झाली.पुण्यास आल्यापासून तर तो गायनाचाच विचार करू लागला. पहिल्या वर्षीच त्याच्या कातर आवाजातील काळीज कातर सल ऐकणाऱ्यास जाणवू लागली. शिल्पाचा आवाज ही ती जितकी नितांत सुंदर तितकाच माधुर्यपूर्ण. ती पमनला जाळ्यात ओढू पाहत होती. पण पमन पाण्यातील तवंगासारखा परेच राहत होता. तिला खात्री होती की हा जास्त दिवस दूर राहूच शकत नाही.
पमी बारावी झाली व तिनं अप्पा सरदेसायांच्या संस्थेतच शेतकीला अॅडमिशन घेतलं.पमीला मायाच्या घरी आता पूर्वीसारखी रया वाटेना. ती कायम मायासोबतच राही तरी काही तरी हरवल्यागतच तिला वाटे. हल्ली हल्ली हे हरवलेलं काय हे तिला जाणवायला लागलेलं होतं.
दुसरं वर्ष सुरू होतं. पोळ्याच्या सुट्या व गणपती म्हणून काॅलेजच्या पोरांनी काॅमन हाफ घेत गावाकडं निघाली. पमनही आर्डीस परतला. होस्टेल मध्ये मुली थांबलेल्याच होत्या.चार पाच दिवसांनी थांबणं बोअर होऊ लागलं म्हणून शिल्पा घरी यायला निघाली अचानक साऱ्या मुलींनी मस्त कुठं तरी ट्रीपला जाऊ असं ठरवलं. त्यात शिल्पा घरी जातेय म्हटल्यावर सारींनी दौलताबाद वेरूळ अंजिंठ्याचा बेत आखला व निघाल्या.
पोळा झाला. आर्डीत जिकडे तिकडे कामाची धांदल होती. लिंबू तोडणी सुरू होती. दोन तीन दिवसाआड लिंबू तोडणे ,मार्केटला पाठवणे, कापसाला फवारणी, पेरूच्या बागा बहर धरलेल्या, त्यांची निगा राखणे अशी कामं जोरदार सुरू होती.
आज लिंबू तोड असल्यानं माया पमा मळ्यात येणार होत्या. चार पाच दिवसांपासून आलेला पमन ही मामास मदत करत मळ्यातच दिवस भर थांबे.हल्ली आबाही मळ्यातच काहीना काही काम करत. ताराबाईच्या मायेच्या देखरेखीनं आबांची तब्येत व्यवस्थीत होती व त्यांच्या कामातील मदतीनं प्रतापरावावरील ताण बराच हलका झाला होता.
प्रतापरावांच्या शेजारीच वामन भटाचा दहा एकराचा लिंबू , पेरूचा उभा बाग त्यांनी उन्हाळ्यात विकला. वामन भटाची मुलं परदेशात स्थिरावली. त्यांनी वामन भटास पुण्याहुन तिकडेच बोलावून घेतलं. म्हणुन भटानं मळा विकला. त्यांनी आधी गटाला गट जवळ म्हणून प्रतापरावास विचारलं .पण आपलंच आपल्याकडून आवरलं जात नाही म्हणून त्यांनी स्पष्ट नकार दिला. तोच मळा सोमा मंगा पोवारानं घेतला. त्या मळ्यातही लिंबू तोडणी सुरू होती. काही भागात त्यांनी मृगात केळी लावली व मका ही पेरला होता.
आज त्यांच्या विहीरीकडं काही तरी गडबड सुरू होती.
पमन मोटार सायकलवर माया व पमास बसवून मळ्यात आला. मळ्यात येताच पिकून खाली पडत सडलेल्या लिंबुचा वास त्याच्या नाकात घुमला. पेरुच्या बहराचाही वास घुमतच होता. मक्याच्या धाट्यांना फुटलेल्या गाठींवर मक्याची कणसं तांबूस काळ्या जटा दाखवत होते. वरच्या तुऱ्यावर भुंगे फिरत होते. नाल्या काठावरील पिंपरणीवर वटवाघळे लटकलेली होती तर राघू आसमंतात भिरभिरत बागेतील पेरुंच्या झाडावर स्थिरावत आगात पिकलेल्या एखाद्या पेरूवर डल्ला मारत होते. माया,पमानं काठी व गोणी घेत आधी आलेल्या बायांकडं जात लिंबू तोडू लागल्या. पमा चार पास दिवसांपासून एकदम आनंदात तरळत होती.
पमन पाठीवर पंप घेत कापसावर फवारणी करू लागला. चालूच पडून गेलेल्या पावसानं ओल्या शेतातून वाफ निघत दमटपणा जाणवत होता. गरगर फिरत तो फवारणी उरकू लागला. दुपार पर्यंत त्यानं फवारणी उरकली. अकराच्या सुमारास भटाच्या मळ्यात गाडीचा आवाज आला होता. विहीरीवर काही तरी गलका ऐकू येत होताच.
त्यानं पंप पाठीवरून उतरवला. नाल्यात उतरत हातपाय धुतले. नाल्यातून वर येत विहीरीवर साऱ्यासोबत डबा खाल्ला.
जेवतांना त्याची नजर अचानक पमीवर गेली. पाच सहा वर्षांपासून तो पमीला पाहत आलेला. पण आज पमी त्याला वेगळीच भासू लागली.पमीच्या चेहऱ्यावर बटा लोंबकळत होत्या .जेवतांना ती डाव्या हाताच्या मनगटानं हळूच वर करी. त्यावेळचे तिच्या चेहऱ्यावरील भाव त्याला वेगळेच भासले.आपण एक दिड वर्षांपासून आता पुण्यात गेलो म्हणून आपणास वेगळा भास होतोय असं त्याला वाटलं.
" पम्या ध्यान कुठंय रे ?" माया त्याला भाजी घेतोय का म्हणून विचारत होती व तो तरी तो बोलत नाही म्हणून ती बोलली.
" काही नाही मायडे या बटा आड येत आहेत पुन्हा पुन्हा!" पमन पमीकडं पाहत अचानक बोलून गेला.
" कसल्या बटा रे! कुठं आड येत आहेत!" माया भांबावून जोरात विचारती झाली.
" अगं मक्याच्या कणसांना मस्त बटा तांबूस काळ्या झाल्यात .आता मक्याची कणसं भाजून खायला तयार झालीत .हे सांगतोय मी!" त्यानं जीभ चावत वेळ मारली.
सोमा पोवाराच्या विहीरीवर शिल्पा ट्रिपला आलेल्या मुलींना वेरूळ दाखवून आर्डीलाच घेऊन आली होती व आता ती मळ्यात आली होती. चंदू व सुरेश त्यांच्यासाठी मक्याची कणसं भाजत होता. विहीरीवरील चिंचेच्या बाजुला ओल्या काड्यांचा गराडा उठला व नंतर मक्याच्या भुट्ट्यांचा भाजका वास घुमला. मळ्यातील जागल्यानं भुट्ट्याचीच काळ्या मसाल्याची भाजी बनवावयास सुरूवात केलेली. मसाल्याच्या फोडणीचा ही वास घुमत होता. शिवारात आज वास व इतर साऱ्याच बाबीस उफर आला होता.
शिल्पा मैत्रिणींना घेत लिंबू व पेरुच्या बागेकडं निघाली. पमा माया व बायांनी जेवणं आटोपून लिंबू तोडावयास सुरूवात केली पमनची फवारणी आटोपली होती म्हणून तो बागेतल्या भरलेल्या गोण्या विहीरीकडं आणू लागला. दुपारून पारोळ्याकडच्या दिशेनं परतीच्या पावसाची चिन्ह भासू लागले. पमनला सदा आबा या पावसास राणी काजळचा पाऊस म्हणतो हे आठवलं. मोसम बहर पाहून त्यानं लता दिदिनं गायलेलं गाणं आठवलं व त्यानं रानात सूर घुमवले. त्या सुरानं पमाचे लिंबू तोडणारे हात स्थिरावले व ती कानात प्राण आणून आवाजाकडं पाहू लागली.तिच्या मनात वेगळ्याच गाण्याच्या ओळी तरळल्या. तिची गाण्याची व कवितेची वही पमनच घेऊन गेल्याचं आठवलं. तोच पमननं तिचीच कविता गायला सुरुवात केली.
लिंबूच्या बागेत फिरणाऱ्या मुली आवाजाकडं येऊ लागल्या.
शिल्पानं आवाज ऐकला व ओळखला ही.
पमनला डोक्यावर गोणी घेऊन या अवतारात पाहताच काॅलेजच्या मुली चक्रावल्या.
" नकाशे तू? इथं कसा?"
पमननं काॅलेजच्या शहरी टिटव्यांना ओळखलं.
गोणी खाली ठेवत " माझं गाव हे! नी तुम्ही इथं कशा?"
" अरे आम्ही ट्रिपला केव्ज पाहिला आलो नी शिल्पासोबत इथं आलो! पण तुझं ही गाव हेच हे शिल्पा ही बोलली नाही व तू ही?"
मग पमननं संध्याकाळी घरी यायला सांगत गोणी उचलली व कुठून बुद्धी सुचली नी गायलो याचा पश्चात्ताप झाला. व भटाच्या विहीरीवर म्हणूनच आज गडबड होती हे ओळखलं
टिटव्या जागल्यानं आणून दिलेली लिंबू मिठ व तूप लावून भाजलेल्या मक्याची कणसं खात लिंबू पेरूच्या बागेत फिरत राहिल्या.पमननं गोणी वाहून वाढलेल्या बांधावरील गवत कापण्यासाठी विळा हातात घेत टिटव्या नसलेल्या बांधाकडं निघाला व गवत कापू लागला. आता काळा ढग जवळ जवळ येत टपोरे थेंब बरसू लागले. पमननं कापलेल्या गवताचा केळीच्या खोडाच्या सालीनं भारा बांधला.पण तो पावेतो पाण्यानं तो पुरता भिजला. टिटव्या विहीरीकडं पळाल्या. पण शिल्पाची सोबत आणलेली छत्रीच कुठं ठेवली गेली म्हणून ओली होत ती पेरुच्या बागेत शोधू लागली. पमननं भारा बांधला व मायाला डोक्यावर चढवण्यासाठी बोलावलं. पाऊस आता धाडधाड कोसळायला लागला. लिंबू तोडणाऱ्या बाया ही विहीरीवर पळाल्या. माया भारा डोक्यावर चढवणार तोच पमाही तिच्याकडं आली. पमन भारा धरत बांधानं चालू लागला. पमी माया पूर्ण भिजत भाद्रपदच्या थंड पाण्यानं काकडू लागल्या तोच बांधावरच्या गवतात पमनच्या पायात काहीतरी घुसलं व त्यानं भारा फेकत तो जोरात किंचाळला.त्याच वेळी पेरूच्या बागेतून शिल्पा छत्री घेऊन परतत होती. पूर्ण भिजल्यावर छत्री सापडली नी मग तिनं छत्री उघडलीच नाही.पमन बांधावर गवतातच पाय धरत लोळला. माया धावत येत काय झालं पाहू लागली. पायातनं लाल रक्त चिडकांडत पाण्यात मिसळत होतं. काचेची बाटली कोणी तरी बांधावर फोडली असावी. गवतात ती दिसली नाही व गवताच्या भाऱ्याचं ओझं यानं करकचून पाय काचेवर पडला व कचकच काच पायाच्या टाचेत घुसली होती. रक्त पाहून मायाला भोवळ येऊ पाहत होती. मायानं त्याचा पाय हातात घेत काच धरला पण पमन जोरात ओरडू लागला. तोच पमा त्याच्या डोक्याकडं बसली. मायानं काचेचा खोल घूसलेला तुकडा घट्ट चिमटीत धरुन काढणार तोच वेदनेनं पमननं पमास घट्ट बिलगत दात ओठ खात ओरडला. पमा पावसात भिजलेली. पमनच्या घट्ट मिठीत. मायानं काच काढला नी पमनची पमास घट्ट बसलेली पकड ढिली होऊ लागली पण आता पमाच पकड घट्ट करत जखडू लागली. शिल्पा पडत्या पावसातच समोर उभी राहत पाहत होती. पेरूच्या झाडावर आगात पिकलेल्या पेरूवर राघू व दोन मैना चोचीनं डंख मारत पेरू खात होते. शिल्पास खाली वाकत भिजलेल्या मातीतून दगड उचलत जोरात भिरकावून मैनाना हाकलून लावावं अशी तिव्र जाणीव झाली.
परतीचा पाऊस ओसरला पण मळ्याजवळील नाल्यास स्टेशन कडून जोराचा पूर आला. त्या पुराचं पाणी आर्डीच्या नदीकडं झेपावत धरणातून ओसंडत गिरणेस भेटण्यासाठी आसुसलं.
पमनला आधार देत एका पायानं लंगडत पमा व माया विहीरीकडं आणू लागल्या. पमा अजुनही भान हरपल्या धरणीगत तृप्त तृप्त होऊ पाहत ह़ोती. पमन बिचारा वेदनेनं विव्हळत होता. तर माया आपल्या भावाच्या वेदनेनं विव्हळत होती.
शिल्पानं मक्याच्या भुट्ट्याची जागल्यानं बनवलेली मसाल्याची भाजी खाल्लीच नाही.
ज्याला जाळ्यात ओढू पाहत होतो तोच आपणास गिळू पाहतोय! मासे पकडणाऱ्यानं शिदोड गळाला अडकवत मासा पकडावा पण माशानं शिदोडसहीत गळच पाण्यात ओढत न्यावा तसंच.
रात्र भर तिला पमाचा हेवा वाटू लागला. जवळ असुनही आपण का पुढं सरकु शकलो नाही? एक वेळ पाय सरकलेही पण तोच पमा सरकली. नी मग तिला पेरूवर झपाटलेले राघू मैना दिसू लागले व ती रात्र भर जागत राहिली. भालाफेकीच्या आधी पमननं केलेलं हस्तादोलनाच्या वेळी जे रोमांच उभं राहिलं होतं त्याचा अर्थ तिला आता कळला. तिनं अंजा आत्याच्या कानमंत्रास तिलांजली देत पेरूवरील राघूसोबतच्या साऱ्या मैनांना हुसकावण्याचं ठरवलं.
.
.
क्रमशः

✒ वा......पा....