झटेतलं चांदण
🔖 भाग::-- पाचवा
कानबाईला लेझीम पथक ठेवलं होतं म्हणून सुलभा मॅडमनं गणपती विसर्जनासाठी मुलींचं ढोलपथक तयार करण्याचं ठरवत तयारी सुरू केली. सुलभा मॅडमचं सारं शिक्षण पुण्यात झालं होतं तरी आर्डीसारख्या खेड्यात त्या चांगल्याच रमल्या होत्या. कला, संगीत विषय चार भिंतीत शिकवले तरी कला ही समाजात झिरपली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांचे कलागुण, गुणदर्शन पालकांना दिसावं म्हणून त्या सण, उत्सव यांच्यात सहभागी होत. पद्मा ,माया,विद्या, लिना या काॅलेजातल्या व काही हायस्कुलच्या मुली घेत त्यांनी ढोल पथकाची तयारी केली. काॅमन हाफ घेतल्याने शिल्पा आर्डीतच होती. हे मॅडमांना समजताच तिला ही बोलवत तिची ही मदत घेतली. संगीतात तिची गायन शाखा असली तरी वादन शाखेतील बऱ्याच मुली होस्टेलला होत्या व काॅलेजातही शिकवलं जायचंच. शिल्पा व सुलभा मॅडम यांनी विसर्जनात सहसा कोणती गाणी जास्त गायली जातात की ज्यावर ठेका ही धरता येतो अशा पाच सहा गाण्यावर मस्त तयारी केली.
पमनची पायाची जखम बरीच खोल असल्यानं त्याला तारामायनं अनंत चतुर्दशी पर्यंत थांबायला लावलं. पडल्या पडल्या त्याला एक बाब आठवत मनात रुंजी घालत होती. आपल्या पायात काच घुसली तेव्हा माया धावत आली. मायडीनं काच बाहेर काढला तेव्हा असह्य वेदना होत असतांना आपणास लिंबांचा वास दरवळल्याचा मदमस्त सुवास जाणवत होता. एरवी मळ्यातले पेरू, लिंबूचा वास त्याला नविन नव्हते पण त्यावेळेस दरवळणारा लिंबोणी सोलल्यावर येणारा व धुंद धुंद करणाऱ्या वासामुळेच इतकी खोल काच घुसूनही वेदनेत एवढी तिव्रता जाणवतच नव्हती. त्याला आज पावेतो एकच ममतेचा वास माहीत होता.तो त्याच्या तारामायचा.तारामाय दिवसभर सारी उस्तवारी करून तो जेव्हा तारामायच्या मांडीवर झोपे तेव्हा मायच्या कष्टाच्या घामाचा वास पित रहावा असेच त्याला वाटे. आपली आई आपणास आठवत नाही पण मायनं ही आपणास माऊलीच्या ममतेची ददात भासू दिली नाही. आपण एवढं मोठं होऊनही तारामाय आपलं डोकं मांडीवर घेत केसात बोटं फिरवू लागली की माया लटक्या रागानं मायकडं पाहू लागे पण तारामाय हसतच तिला समजावे.
" मायडे तुझं काय! तू लग्न होऊन परक्या घरी निघून जाशील पण आमचा पम्याच आम्हास म्हातारपणी सांभाळेल.म्हणून त्याला जीव लावते गं. " मग माया ही जवळ येऊन आईस बिलगे.
पमनला ममतेच्या या सुवासात आपलं दैवत दिसे.
पण मळ्यात दरवळणारा तो लिंबोणीचा सुगंध जगावेगळा होता.कुठून येत होता तो सुगंध ? हे मात्र त्याला उमगेना. पमन पुण्यास अजुन जात नाही म्हणून शिल्पा ही गेलीच नाही.तिनं अंदाज बांधला की हा गणपती उठवूनच जाईन.
गणपती विसर्जना दिवशी सकाळूनच दोन्ही आर्ड्या एकदम धुंदाळल्या. मोठ्या आर्डीतले गणपती गोळा होत वाजत गाजत संगमाजवळ दुपारपर्यंत आले तसेच लहान आर्डीतले गणपती ही संगमाजवळ आले. तेथूनच ग्रामपंचायतीकडून शाळेचं मुलीचं ढोलपथक आलं. सफेद सलवार कुडता व त्यावर भगवा फेटा चढवलेल्या पद्मा, माया, विद्या, लिना... साऱ्यांकडे मोठे ढोल बांधलेले होते. शिल्पानंही दोन्ही मिरवणूका एक होताच कमरेस ढोल बांधला. डिजेवर " देवा श्री गणेशा..." हे गाण वाजवायला सुरुवात झाली नी ढोलपथकानं सारा आसमंत दणाणला.
पायाला जखम असल्यानं तारामाय व प्रतापमामानं पमनला बाहेर निघूच दिलं नव्हतं. केसा, बाल्या व डिजे पार्टीतले गायक त्याला केव्हाचे बोलवत होते. त्यानं संगमजवळ मिरवणूक आली की मी येतो सांगत त्यांना परत पिटाळलं होतं.
शिल्पा कावरी बावरी नजर भिरभिरवत पाहत होती पण तिला हवं असलेलं गवसत नव्हतं. ढोल पथकाच्या वादनाचा प्रयोग नवीन असल्यानं आर्डीवासी त्या तालावर ठेका धरत नाचत होते.
केसानं एकाची बाईक घेत पमनकडं गेला व पमनला बसवून आणलं. डिजेवाल्याच्या गाडीजवळच त्याच्या गायकाची वेगळी कार होती. पमन येताच गायकानं पमनला कारमध्ये बसवत माईक दिला. पद्मानं पमनला पाहिलं .पद्मा पमनकडं पाहतेय हे शिल्पानं पाहिलं नी मैनांना हुसकावून लावण्यासाठी तिच्या संचलनात असलेलं ढोलपथक तिनं कारसमोर आणलं. पमनकडं पाहत ढोल असा काही घुमार घुमार घुमवला की पमनला पुन्हा तसाच लिंबोणीच्या वासाचा भास होऊ लागला. पद्मा अगदी जवळच ढोल वाजवत होती.
आवाजाच्या गिचाड घाईतही तो हसत पद्मा व मायाकडं पाहत हसला .
" मायडे, मस्त हं! ढोल कसा कडाडला पाहिजे! चला दणकवा!" नी बस्स त्यानं सूर लावत गाण्यास सुरवात केली. त्याचा काळीज कातर आवाज पद्मा, शिल्पाचा ढोल सारे सारे बेधुंद...नुसता तरुणाईचा जल्लोस व राडा.... तोच एकानं "पमन 'लख लख सोनानी..' लाव भावड्या" फर्माईश केली.
पमननं ढोल पथकाच्या ठेक्यास बाधा पोहोचणार अशा लयीत
" लख लख सोनानी, सोनानी नगरी!
कन्हेर कानबाईनी जोडी भलती भारी!!" म्हणायला सुरुवात केली तोच चार पाच जणांनी त्याला कार मधून उतरवत डिजेच्या गाडीवर वर चढवलं. पमन गाऊ लागला नी ढोलाच्या गजरात नुसत्या आरोळ्यांचा जल्लोश सुरू झाला. तोच शिल्पानं ढोल वाजवत डिजेच्या गाडीजवळ जात
" पम्या मला हाथ दे,मला ही वर यायचंय!" म्हणत ती पमनचा हाथ मागू लागली.पमन पद्माकडं पाहत गात गातच डोळे मिचकावत हसू लागला. त्यानं ओळखलं गाण्यानं शिल्पास हूक उठलीय.तेच तो पद्मास डोळे मिचकावत सांगत होता.
" पम्या हाथ दे मला वर यायचंय!" शिल्पा त्याच्याकडं पाहत म्हणाली. चंदू व सुरेशला शंका आली. ते पुढे येत तिला मागे खेचणार तोच जवळ उभ्या कदमांनी त्यांनाच मागे खेचत "चढू द्या तिला वर, तुम्हास नाही समजत! सरा मागं!" त्यांना परतवलं.
पमननं चंदू व सुरेशला किक बसावी म्हणून गाणं म्हणत म्हणतच लंगडत लंगडत तिच्याकडं येत तिला हाथ दिला. नी मग शिल्पानं पद्माकडं पाहत पमनच्या शेजारी उभी राहत ढोल गुंगवला. पमनचं गाणं शिल्पाचं बेधुंद होत त्याकडं पाहत ढोल बढवणं आणि त्यांच्या झिंग आणणाऱ्या नशेत झिंगत नाचणारे....!आज आर्डीत वेगळाच खुमार होता. तोच पद्मानं एका कडनं गुलाल घेत पमनच्या अंगावर भिरकावला. शिल्पानं मैना हुसकत नाही म्हटल्यावर ढोल सोडला माईक घेत ती ही पमनच्या साथीनं गाऊ लागली. पमनला कळेना आज नेमकं काय घडतंय. त्याला वेगळीच शंका यायला लागली. त्यानं डिजे वाल्यास नाशिक कावडी लावायला लावली व तो पावेतो माईक बंद केला.
" शिल्पे खाली उतर व ढोल पथकात जा! लोकं पाहताय!"
" पम्या पाहू दे!"
" कोणी काही तरी खाऊ घातलंय वाटतं तुला!"
" पम्या तू मुर्ख आहेस! "
तोच नाचणाऱ्यांनी पुन्हा पमनला गाण्याची फर्माईस केली.
पमननं गायला सुरुवात केली नी जल्लोश सुरू होताच
शिल्पानं गुलालाची गोणी असणाऱ्या कडनं गुलाल घेत पमनला रंगवलं.
पमननं तिच्या पायावर दुसऱ्या पायानं दणका देत तिला ढकललं नी तो गाणं म्हणतच खाली उतरत कारमध्ये आला.
शिल्पा हसतच खाली उतरली व ढोल बांधत पद्मा मायाला वाजवत वाजवत चिडवू लागली.
पमनने तंग वातावरण पाहिलं नी पायाचं निमीत्त करत मायडीला व केसाला घेत घरी परतला.
आज त्याला प्रथमच जाणीव झाली. त्यानं मायडीला विचारलंच, " मायडे आजपावेतो मी हुल्लडबाजी करत इतरांची मजा घ्यायचो तर आज लोकच माझ्याशी हुल्लडबाजी करत माझी मजा घेत होते!"
विसर्जन झालं. चंदू व सुरेश शिल्पावर संतापले. शिल्पानं तिकडे दुर्लक्ष करत मस्त अंघोळ केली. चिंतामण कदमांनी दोघांना शांत बसत धीर धरायला लावला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पमन पुण्याला परतला. नी मग शिल्पा ही परतली.
तिसरं वर्ष सुरू झालं.
अंजना बाईचा मुलगा प्रशांत यानं ही बेहरामपूरला आयसर(indian institute of science education and research) संस्थेच्या काॅलेजला B.S.,M.S. हा पाच वर्षाचा ड्युल कोर्स जाॅईन केला होता. संशोधन क्षेत्रात भरीव कार्य करत शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून होता.
एका खाजगी वाहिनीनं 'संगीत-अंतरीच्या कळा' नावाचा गायनावर आधारीत एक रिअॅलिटी शो सुरू केला.वेगवेगळ्या शहरातील संगीत महाविद्यालयात आॅडीशन्स सुरू झाल्या. संगीत काॅलेजकडून शिल्पा, पवन नकाशे व इतर पाच सहा जणांनी आॅडीशन साठी तयारी केली. आॅडीशन ही जोडीनं द्यायची होती. पमननं काॅलेजमधल्या एका मुलीसोबत नाव फिक्स केलं.पण मध्येच काय झालं त्याला कळेना. त्याची जोडी शिल्पा सोबत ठरवली गेली.
सुलभा मॅडमचा भाऊ सुबोध राणे हा एका नामांकित संगीत निर्देशकाकडं होता. सरगम रस्तोगी यानं अनेक डाक्युमेंटरी , शार्ट फिल्म, व चार पाच चित्रपटातही संगीत निर्देशन केलं होतं. यानीच महाराष्ट्रातील विविध लोकसंगीत व लोकगीतावर आधारीत ही स्पर्धा आयोजीत करावयास लावत पहिल्या दोन क्रमांकाच्या जोड्यांना आगामी चित्रपटात गायनाची संधी मिळणार होती. सरगम रस्तोगीच्या वतीनं सारं काम सुबोध राणेच पाही. सुलभा मॅडमनंच शिल्पा व पवनला आॅडीशन मध्ये भाग घ्यायला सांगितलं होतं.बहुतेक मॅडम करवीच शिल्पानं काही तरी गोल माल करत पमनशी जोडी लावली होती. ऐनवेळी शिल्पाशी जोडीनं गायचंय समजताच त्यानं माघार घेत परतू लागला. पण काॅलेजच्या सरांनी व मित्रांनी अशी सुवर्णसंधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नसते, सांगत त्याला समजावलं.
पाच सहा दिवसावर आॅडीशन आली. नाईलाजानं पमननं शिल्पाशी गायनास होकार देत तयारीस लागला. महाराष्ट्रातील परंपरावर आधारीत लोकगीत दोन मिनीटात सादर करायचं होतं.काॅलेजकडून त्यांना कोळीगीत, भोंडला वा एखाद्या सणावर आधारीत गाणं घ्यायला सुचवलं.पण पमननं सरांना एक आदिवासी संस्कृतीवर आधारित गीत घेण्याबाबत विचारणा करत शिल्पास होळी सणात गायलं जाणारं एक आदिवासी गीत तयार करवून घेतलं.
आॅडीशनला पुणे विभागापासून सुरूवात होणार होती व आॅडीशन यांच्याच काॅलेजला असल्यानं तोबा गर्दी उसळली. विशेष आॅडीशन कशी चाललीय पाहण्यासाठी स्वत: रस्तोगी पुणे आॅडीशनला हजर राहिले. नऊ पासून सुरू झालेली आॅडीशन बारा वाजले तरी रस्तोगी बसलेलेच. ठराविक पुढच्या राऊंडला निवडत बाकी सरळ परत फिरत होते. पमन व शिल्पानं दोन मिनीटात होळीवर आधारीत आदिवासी गीत गायलं. पमनचा आवाजात पमन साथीत शिल्पाचा ही आवाज बहरला. साऱ्या जजेस नी उठून दाद दिली. पण रस्तोगीच्या डोक्यात तो आवाज इतका ठसला की पुढच्या साऱ्या आॅडीशन्स व फेऱ्यांसाठी त्यांनी कार्यक्रमाचं थीम साॅंग बदलवायला लावत दोन दिवसात यांचं गाणं रिशूट करायला लावत तेच गाणं थीम साॅंग घ्यायला सुचंवलं. सुबोध राणेनं दोघांना घेत स्टुडिओत सातपुड्याचं सीन क्रिएट करत आदिवासी पेहरावात हे गाणं शूट केलं. शूटींग झालं. पमननं आदिवासी पेहरावातील शिल्पाकडं पाहिलं. त्याला प्रथमच शिल्पाचं वेगळंच रूप दिसत होतं,जे मूळ रुपास वेगळीच झिंग,झिलई आणत सौंदर्य खुलवत होतं.
" काय बघतोस!" शिल्पानं एकटक पाहणाऱ्या पमनला रागानं(लटक्या) विचारलं.
" एखादी स्त्री आमच्या सातपुड्यातील महान संस्कृतीच्या पेहरावातही उठून का दिसत नाही! हे न्याहाळत होतो."
" बस्स रे! थापा नको मारू!"
ती पेहराव उतरवू लागली.
आॅडीशनचा प्रोग्राम झळकला व आदिवासी पेहरावातील पमन शिल्पाची जोडी व त्यांच्या आवाजानं महाराष्ट्रात धूम मचवली. निव्वळ थीम साॅंग ऐकण्यासाठी जो तो कार्यक्रम ची सुरुवात व शेवट केव्हा होईल याची वाट पाहू लागला. तीसेक सेकंदाचं चित्रण व एका मिनीटाच्या थीम साॅंग नं या जोडीस घराघरात पोहोचवलं.
शिल्पा व त्यानं नंतर तीन चार गाण्याचे व्हिडीओ यु ट्युबवर अपलोड केले. त्या गाण्यांनी तर धम्माल उडवली. लाखो व्युवर्स मिळाले. पद्मानं स्वत: लिहीलेल्या गाण्याची वही शिल्पानं त्याच्या हातातून हिसकावून घेतली होती. तेच गाणे त्यांनी दोघांनी गायिली होती.
काॅलेजमध्ये त्यांच्या आवाजानं जादू केली. पमनला शिल्पाचा आवाज आता खूपच निखरतोय याची जाणीव होत होती. त्यालाच काय पण तिला ही हे जाणवलं. आपण एकटं गात होतो तर यांच्या गाण्यापुढं आपलं गाणं कुठंच टिकत नव्हतं. पण याच्या साथीत आपलं गाणं खूपच बहारदार होतंय.का असं व्हावं? तिला त्याचं कारण उमगलं होतं. म्हणून याच्याच साथीत आपण यशस्वी होऊ हे तिला कळून चुकलं होतं.पण मैना? मैना उठायला तयार नाही. वहीवर नाव पाहताच आपण हिसकावली त्याच्या हातातून वही. काय लिहीते पमी भन्नाट. पण बहुतेक त्यानं अजुन ती वाचलीच नसावी वही. कारण आपण यु ट्यूबवर त्या वहीतलीच कविता घेतल्यात तर तोच 'गाण्याचे गीतकार कोण?' विचारत होता . आपण ही दिलं ठोकून मीच लिहील्या म्हणून.नंतर सांगू त्याला,' मूर्खा तुझ्याकडं असलेल्या वहीतल्या पद्मानं लिहीलेल्या आहेत म्हणून!'
पमनलाही एक बाब खटकू लागली. यू ट्यूबवर व्हिडीओ गाजायला लागले व तिकडं साऱ्या आॅडीशन्स पार पडत आता पुढचे राऊंड सुरू होतील यात आपण जोडीनं का गातोय? जिच्या साऱ्या घरांनी मिळून आपल्या काकाचं आयुष्य उध्वस्त केलं. तिच्यासोबतच आपण आपली कारकीर्द का सुरू करतोय? आपणास या साऱ्यांची किती चिड होती! शिल्पा तर समोर दिसताच किती मजा घेत डिवचत होतो आपण! मग हल्ली आपण उलट तिच्या साथीनं गाणं का म्हणतोय? कानबाई वा गणपतीत साथीनं गाणं म्हणण्यामागं हिला हारवणं हेच आपलं उद्दिष्ट असायचं. पण हल्ली आपण नाहक हिच्या साथीत वावरतोय, हे आपण टाळूयाच!
नंतर ज्यावेळेस पुन्हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गायनाचं शिल्पानं सांगितलं त्यावेळेस त्यानं शिल्पास स्पष्ट खणखावलं. त्यानं सायंकाळी तिला सारस बागेत बोलवतलं.
" शिल्पा, 'अंतरीच्या कळा' या कार्यक्रमात तुझी माझी कशी जोडी झाली माहीत नाही मला.पण तो कार्यक्रम वगळता इतर कोणत्याही कार्यक्रमात मी तुझ्यासोबत गाणार नाही. कारण तुला ही माहित आहे,मी सांगायची गरज नाही. म्हणून या पुढे साथीनं गाणंच काय पण जवळही फिरकायचं नाही माझ्या!"
" का? काय झालं?" ती विरूद्ध बाजूस तोंड करत लाली पसरलेल्या चेहऱ्यानं विचारू लागली.
" माहितेय तुला कारण! आपल्या घरातले खूपचे सौहार्दपूण संबंध!" उपहासानं त्यानं सुनावलं.
" संबंध कसे ही असोत! मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही! साथीत मला तू हवा आहेस!" त्यानं त्याक्षणी डोळे विस्फारले.
" घरातील आपसी संबंधाचं तुला नसेल देणंघेणं.पण मला आहे.माझ्या देवासमानं काकाचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांना मी कधीच माफ करू शकत नाही!" आता त्याच्या ही कानाच्या पाळ्या व नजरेची खडी एकच रक्तीम वर्णात रंगू लागली होती.
" पम्या कोणी कुणाचं आयुष्य उध्वस्त केलंय ते गेलेल्या काळालाच समर्पीत.पण माझं आयुष्य मी ज्यावर उधळतेय त्या आड येणाऱ्यांना मी सोडणार नाही!"
" आयुष्य उधळायला कोणी सांगितलं तुला? हे रिकामे उद्योग बंद कर ,हे सांगण्यासाठीच मी बोलवलंय तुला.आणि हे जर सुरुच ठेवले तर मग आधी तुला तुझ्या घरच्यांनाच उध्वस्त करावं लागेल!"
" त्यासाठी तो ही मी विचार करणार नाही!" शिल्पा आता एकदम क्रुद्ध होत होती.
" तरी माझ्या आबाचं काय!"
" आबा! ज्यांनी सारं आयुष्य ज्यासाठी खपवलं ते मला विरोध करूच शकणार नाही! त्यांना तर मी यु विरघळवणार!"
" शिल्पे, तुला काय करायचं ते तू कर, पण अंतरीच्या कळा' या व्यतिरिक्त मी तुला कोठेच साथ देणार नाही!"
पमन उठू लागला.तोच शिल्पानं उठत त्याच्या बेसावधपणाचा फायदा घेत क्षणात.....
पमनला हे अनपेक्षित होतं त्यानं हातानं गाल पुसत तिच्या गालावर छपाकदिशी बोटं उमटवली. ती मात्र सुजत लाल होणाऱ्या गालाकडं दुर्लक्ष करत ओठावर जीभ फिरवत हसत होती. तो संतापात बागेतून बाहेर पडला.
फायनल वर्ष संपलं नी 'महाराष्ट्र संगीत-अंतरीच्या कळा' या कार्यक्रमाचे शेवटचे राऊंड सुरू झाले.
कार्यक्रम जबरदस्त गर्दी खेचत टीआरपी वाढवू लागला.
पमाचं शेतकी संपलं. तोच जि. प. ची जाहिरात निघाली. घुमाने सर व शेतकी काॅलेजमधल्या सरांनी पद्माचा फाॅर्म भरला.
" पमी, बघ आता तू लवकरच ग्रामसेविका होशील. मग छानसं स्थळ शोधुन लग्न कर!" माया तिला चिडवू लागली.
" माया, पमनचे यु ट्यूब वरचे व्हिडीओ पाहिले का गं? किती किती गाजत आहेत!" पमी आपल्याच विश्वात गुंग होत मायाला सांगू लागली.
" पमी पण ते गाणं तर तूच लिहीलं होतं ना! मग गीतकार म्हणून त्या शिल्पीचं नाव कसं येतं गं?"
मायानं विचारलं नी पमाच्या उरात काटा टोचला. तिला ही कळत नव्हतं की आपली वही पमनने नेली मग तिचं नाव का टाकलं या पमननं?
" ते जाऊ दे गं पण पमन किती मस्त गायला!" पमीनं विषय बदलला.
" अगं पमे 'अंतरीच्या कळात' तर किती धमाल गातोय तो!" माया.
" खरच माया, आवाजात कातरता आहे पमनच्या! पण पमन सोबत ती शिल्पी नको हवी होती त्या कार्यक्रमात!" पमी बोलली नी तिनं जीभ चावली.
" का गं पमे? तिला पाहून तुझ्या अंतरात का कळ येते!" माया आता तिच्या डोळ्यात खोल खोल उतरू लागली.
" माया, आपल्या पमन सोबत कोणी दुसरं उभं नाही सहन होत गं!"
मायाची मनात खात्री होऊ लागली.
" पमे उद्या उठून त्याचं लग्न होईल मग!त्याची नवरी तर उभी राहिलच ना!" माया विचारत तिचा भाय काढू लागली.
" शक्यच नाही!"
पमा बोलून गेली नी माया जोरजोरात हसू लागली.
पमीला आपली चूक लक्षात आली.
" पमे, किती भित्री गं तू! बहिणीपेक्षा जास्त मानते मला! नी माझ्या पासुनही लपवू पाहतेस!"
" मायडे..ततततत सससस न्नाही ...क्का..!" पमी घाबरत ततफफ करू लागली.
" पमे ! खो खो मध्ये तो जिंकला नी त्यास भर मैदानात मला ढकलत तू मारलेली मिठी पाहिली नी मला जाणवलं, बांधावर काच काढतांना वेदनेत त्यानं तुला धरलं पण काच निघून ही तो सोडत असतांना तुझी घट्ट होत जाणारी पकड पाहिली नी जाणवलं, विसर्जनात शिल्पी वर चढत गाऊ लागली नी पमनवर आख्खी आर्डी असतांना ढोल बडवतांना उधळलेला गुलाल पाहिला नी जाणवलं...की पमनवर पमीपेक्षा कोणीच जास्त मरू शकत नाही"
माया बोलली नी पमीनं मायास घट्ट धरलं.
" पमे, मी आता तो आला की त्याला आधी विचारते नी मग आई बाबांना विचारते." मायानं तिला आश्वासन दिलं.
पमी खूश होत तिच्याजवळ किती किती तरी वेळ गप्पा मारत राहिली.माया तिला आज आपली मोठी बहिणच भासू लागली.
फायनल पमन व शिल्पानं जिंकली. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या गाण्यानं तृप्त झाला. सरगम रस्तोगीनं त्यांना लगेच चित्रपटातील पाच सहा गाण्यासाठी साईन करण्याचं पेपरवर्क तयार करायला लावलं. शिल्पा तर त्या रात्री इतकी खुश होती की तिनं त्याला गच्च आलिंगन दिलं.पण त्यानं गर्दीत ही नम्रपणे तिला बाजुला केलं. त्याला पुढ आणखी चित्रपटात गायन नको होतं. कारण मागे तो आर्डीत गेला तेव्हा मळ्यात तो आणि आबा बसत गप्पा मारत होते ते सारं आठवलं.
" पवन्या, माझ्या मदनाचं नाव गाजवलं पोरा तू ! तुला टिव्हीत गातांना पाहिलं नी मला माझा मदन आठवला.जबाबदारीचं ओझं पेलतांना पोरांना वाचवत जीव देणारा मदन! नी मला माझ्या ही आयुष्यात खाल्लेल्या झटा विसरायला झालं. माझ्या झटांमध्ये तुझ्या रूपात चांदणं फुललं असंच वाटत होतं.पण एक सांगू?"
" आबा, सांगा ना!" पमन डोळ्यातले आनंदाश्रू आवरत विचारू लागला.कारण आपला बाप माणूस खुश या शिवाय त्याला दुसरं काहीच लागणार नव्हतं.या जगात त्याला सर्वात आधी तारा माय व सदा आबा हेच दिसत. काही ही करतांना यांना नजरेसमोर ठेवूनच तो करे!
" पोरा ,तू कोणासोबत ही गा! पण त्या..... त्या अंजीच्या भाचीसोबत नको रे पोरा! त्या पोरीचा दोष नाही पण तिला पाहिलं की मला उगाच सडलेलं वांगं आठवत राहतं! शक्य असेल तर टाळ!"
हेच त्याला आॅडीशनला जोडीमध्ये ती आहे कळल्यावर वाटलं होतं की सदा आबास काय वाटेल? पण मोठा प्लॅटफाॅर्मवर गायची संधी चालून आली ती वाया जाऊ नये म्हणून त्यानं सरांच्या सांगण्यावरून होकार दिला होता.
हे सारं त्याला आठवलं नी मग तडक निर्णय घेत तो सुबोध राणे कडं जात नम्रपणे हात जोडत " सरजी सद्या माझे कौटुंबिक प्राॅब्लेम्स असल्यानं आगामी चित्रपटात मी आपणासोबत काम करू शकत नाही.कृपया शिल्पा व नंतरच्या विनरचा विचार करा!"
सुबोध राणे जागेवर उखळला.
" पवन ! तु काय बोलतोय कळतंय का तुला? आयुष्याला कलाटणी देणारी व रातोरात सुपर स्टार बनवणारी ही संधी आहे. या संधीसाठी हजारो कलाकार आयुष्यभर झटतात तरी मिळत नाही नी तू रस्तोगी सरांच्या ..." राणे प्रमाणेच जवळ उभी शिल्पा ही खाडकन उभी राहत जागेवर थरथरू लागली. तिला आता आपली आत्या कानमंत्र देतांना काय म्हणत होती ते आठवलं. हा आपल्यासाठी एवढी मोठी संधी लाथाडतोय! ती राणेकडं गेली.
" शिल्पा, तू तरी समजव याला! हे त्या रस्तोगी सरांना कळलं तर त्याचा इगो हर्ट होईल व याला हाकलून लावतील ते याला.कारण भारतात गाजलेले गायक त्यांच्याकडं काम मागायला येतात नी हा ....घरच्या सामान्य प्राॅब्लेमसाठी संधी सोडतोय!"
" सर प्लिज मी त्याला समजावते व तयार करते पण आपण रस्तोगी सरांना सांगू नका प्लीज" शिल्पा हात जोडत म्हणाली.
" शिल्पा, सुलभा ताई मुळं मी तुम्हास चांस दिला.तुमचा दोघांचा आवाजानं त्याचं सोनं झालं हा भाग वेगळा. अजुन महिना आहे तुमच्याकडं! विचार करा व याला समजव!"
" राणे सर ,माझं फायनल आहे मी चित्रपट सोडतोय. हवं तर एक करू शकतो फक्त मेल सिंगर असलेली गाणी करू शकतो बस!" पमन शांतपणे म्हणाला.
" पमन कॅरीअरला सुरुवात नाही नी तू अटी ठेवतोय? व्वा! पण ड्युअल साॅंग का नाही?" सुबोध ने चिडून विचारलं.
" ..........." पमन स्तब्ध.
" सर मी याला घेऊनच दिलेल्या तारखांआधी येईन. पण कृपया याचं ऐकू नका!"
" ठिक आहे, पण समजव याला!"
शिल्पानं पमनचा हात धरत बाहेर नेऊ लागली.पमननं तिचा हात झिडकारला.पण शिल्पानं त्याचा हात पुन्हा संतापानं धरत त्याला बाहेर आणलं.बाहेर फायनल साठी गावाहून आणलेली तिची कार उभी होतीच तिनं त्याला जबरीनं आत बसवत गाडी पुण्याकडं काढली.
" शिल्पे मी येतो वेगळ्या गाडीनं!मला उतरव खाली!"
" शांत बस पम्या! नाही तर अशीच गाडी पुढच्या गाड्यांना ठोकत दोघांना संपवेन!" ती रागानं थरथरत ओरडली.पमन शांत बसला.
गाडी किती तरी वेळ धावत होती. आता रात्रीचे बारा वाजायला आले. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वे वर गाडी घाटात आली. दोघांपैंकी कुणीच बोलेना. शिल्पानं अंधारात घाटात आडोसा मिळताच गाडी साईडला उभी केली. रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनाचा प्रकाश तिरकस इकडं येत होता. बाकी जिकडे तिकडे अंधार. भुर भुर वारा व पाऊस पडत होता. गाडीचा दरवाजा खोलत ती खाली उतरली. पुढून वळसा घेत तिनं पमनकडचा दरवाजा उघडत
" उतर खाली!" जरबेनं म्हणाली.
" खाली उतरुन काय करू! अंधार व पाऊस आहे शिवाय घाट. इथं गाडी का थांबवतेय!"
पमन उतरत नाही पाहताच तिनंच त्याचं छाताड धरत बाहेर खेचलं.
" अंधार, पाऊस घाट यांना केव्हापासून घाबरायला लागलास? उतर आधी!" ती गरजली.
" पण उतरून काय होणार?"
" बोल आता! तुला चित्रपटात तुझ्यासोबत मी का नको? बोल आता!" ती संतापत विचारू लागली.
" शिल्पे पुण्याला चल.तिथं निवांत बोलू! इथं अंधारात अवेळी थांबणं उचित नाही!" पमन समजावणीच्या स्वरात बोलला.
" पम्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी ! नाहीतर बैस गाडीत आज गाडीच घालते दरीत वा एखाद्या कंटेनरमध्ये!" शिल्पा सणाssन संतापत बोलत होती.
पमन काहीच बोलेना...
" पम्या साल्या...बोल!"
साल्या ऐकलं नी घाम फोडणाऱ्या जिवघेण्या स्थितीतही त्याला हसू आलं. हिचा ताबा सुटतोय हे त्यानं ओळखलं. त्यानं तिचा हात धरत गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.
" हात सोड.मला आधी माझी साथ का नको ते सांग आधी!"
" पाऊस पडतोय, गाडीत बस सगळं सांगतोय!" म्हणत त्यानं तिला जबरीनं गाडीत बसवलं व तो ही बसला.
" बोल!"
" शिल्पे, तुला मी आधीच सारस बागेत सांगितलं होतं की अंतरीच्या कळा या कार्यक्रमापुरतंच मी तुझ्या साथीनं गायन करेन!"
" पम्या ,पुढे बोल! माझ्या साथीनं गायन का करणार नाही?"
" सांगितलं ना मी आपल्या दोघांच्या घरी आपण साथीनं काम करणं हे न रूचणारं आहे. अख्खा महाराष्ट्र अंतरीच्या कळा हा कार्यक्रम पाहत असतांना दोघांच्या घरी या कार्यक्रमाच्या वेळी बहुतेक वेळी टि.व्ही बंद असायचा. चंद्यानं तर टि.व्ही फोडला."
" त्यांनी काय केलं ते चुलीत घाल.पण तू काय ठरवलंय ते सांग!"
" शिल्पे, यापुढे दोघांनी वेगवेगळं गाणं यातच दोन्ही घरांचं हित आहे!"
" आणि आपलं काय?" शिल्पा त्याकडं त्वेषानं पाहत विचारू लागली.
" आपलं काय म्हणजे? काय म्हणायचंय तुला?" पमन डोळ्याला डोळा भिडवत खोदू लागला.
" पम्या, रणछोड कुठला! गाण्यात साथ सोडशील रे तू! पण मी तुला आयुष्यभर साथ सोडणार नाही त्याचं काय? "
" शिल्पे काही ही बरळू नकोस.ते कदापि शक्य नाही! ज्या अंजाबाईनं माझ्या काकाची उभी हयात जाळली; तिच्याच भाचीला मी स्विकारणं हे स्वप्नातही शक्य नाही.दोन्ही घरं एकमेकांना पेटवतील!"
" आत्यानं काय केलं व का केलं हे तिचं तिलाच माहीत. पण आत्यानं केलं म्हणुन तिची शिक्षा तिच्या भाचीला का?पेटतील घरं तर पेटू दे! मला त्याच्याशी काही देणघेणं नाही.मला फक्त तू हवाय!"
" शिल्पा ,मी तुला त्या दृष्टीनं कधीच पाहिलं नाही व पाहणार नाही!"
" पम्या भालाफेकीच्या वेळेस पळत येऊन खांदे थोपटत हातात हात घेणं काय होतं मग? का सुखद शहारा उठत रोम रोम पुलकीत व्हावं माझं? पायातली काच काढतांना पमीनं जखडलेली पकड पाहून तिला उचलत फेकावं असं का वाटावं मला! विसर्जनात ढोल पथकात पमी आहे म्हणुन का थांबली मी! भर गर्दीत सर्वस्व झोकत गुलाल का उधळावा? हे सहज होणारं नाही पम्या!"
" शिल्पे तुला काय होतं वा काय वाटतं याच्याची मला काही सोयर सुतक नाही. पण मला दोन्ही घरांतलं वैर समोर दिसतेय.जाळपोळ नी रक्तपात या शिवाय काहीही हशील होणार नाही!"
" ते पाहते मी ! त्याचं काय करायचं ते!"
" शिल्पा या गोष्टी इतक्या सहजासहजी नाही स्विकारल्या जात गं!" तो कळवळून बोलला नी शिल्पा त्याला बिलगली. इतकं कळवळून
' *शिल्पा* ' बोलणंच तिला खूप होतं. पण पमननं तरी तिला दूर केलं.
" पम्या तू तुझ्या सदा काकाचा विचार करतोय ! बघ तुझे सदाकाकाच तुला विनवत मला स्विकारायला लावतील!"
" दिवास्वप्न पाहू नको!"
" चॅलेंज देतेय ही शिल्पा! बघ मी काय करतेय!" म्हणत तिनं गाडी स्टार्ट केली.
रात्रीचा दिड दोन वाजला.
" शिल्पे गाडी हळू चालव!"
दुसऱ्या दिवशी आराम करत शिल्पा थेट आर्डीस निघाली.
पमनला शिल्पा अचानक आर्डीस गेल्याच कळताच तो घाबरला. न जाणो ही घरी गेली व काही उलटसुलट बरळली तर? त्यानंही लगेच सायंकाळी ट्रॅव्हल्स पकडत आर्डी गाठलं. पमन व शिल्पा आल्याचं कळताच ग्रामपंचायतीनं दोघांचा सत्कार ठेवला. गावाचं नाव महाराष्ट्रात उजागर केल्याचं साऱ्यांनाच समाधान होतं.
कार्यक्रम संपला व शिल्पा तडक पमनच्या घरीच निघाली.
पद्माच्या गावी वडीलांची तब्येत खूपच ढासळली होती. त्यांनी मारोती शालकला भेटत पद्माचं उरकायचं ठरवलं.त्यांच्याच भावकीतली बहिण बोदवडला दिली होती. तिचा मुलगा गडचिरोलीत वनखात्यात होता. या विधवा बहिणीनं राबत मुलास शिकवलं होतं. मुलगा चांगल्या हुद्द्यावर म्हणून पद्माचे वडील शालक मारोतीस घाई करत होते.
" मारत्या, आता माझा भरवसा नाही! या मव्हळ्याच्या दारूनं आतून पोखरलंय मला! माझीच चूक मला नडली. पण आता जे झालं ते . पण मी आहे तोवर पद्मास उजवत माझ्या कपाळाला तांदुळ लागले की सुखानं मरेन मी!"
मारोतीसही मेव्हण्याची हालत पाहून त्याचं म्हणनं पटत होतं. पण पद्मा आता लवकरच नोकरीला लागेल, मग गडचिरोली पेक्षा जवळचाच चांगला मुलगा पाहू असा विचार तो करत होता. तर पद्मा घाबरलीच होती व ती नेमकी मायाला सांगण्यासाठी वडील परतताच आली होती. नेमकी त्याच वेळी शिल्पा आली.
शिल्पाला पाहताच मायाला आश्चर्य वाटलं. ताराबाई तर थरथर करायला लागली. ही बया का आली असावी?
तोच ग्रामपंचायतीतून प्रतापराव परतले.त्यांनी अंगणात उभी गाडी पाहिली.
घरी मंगा पोवाराच्या पोरीस पाहताच ते रागानं उद्गारले.
" पोरी का आलीस तू? तू आल्याचं घरी कळलं तर नाहक भांडणं होतील?"
" काका, ऐका. मला आबांना व तुम्हास भेटायचं होतं म्हणून आले मी!"
" भेटायचं ? का? " आश्चर्यानं प्रतापराव विचारू लागले.
" काका, पमन माझ्या सोबत चित्रपटात गायला नाही म्हणतोय!"
" तेच योग्य पोरी! दोघांनी वेगवेगळं आपापलं काम करत पुढे जा! घराघरात उगाच वाद नको म्हणून तो नाही म्हणाला असेल !"
" नाही त्या साठी नाही; नाही म्हणत तो."
" मग?"
" आधी त्याच्याशी मी लग्न करावं मग सोबत गाईन असं त्याचं म्हणनं आहे!"
प्रतापराव, ताराबाई, माया, पद्मा जागेवरच बाॅम्बगोळा पडल्यागत उडाल्या.
" पोरी तू काय बोलतेस कळतंय का तुला?"
" पमन जे बोलला तेच मी सांगतेय! व मी पण लग्नास तयार आहे.फक्त आपली परवानगी घेण्यासाठी आलीय मी!" शिल्पा पद्माकडं तिरपा रौद्र कटाक्ष टाकत बोलली.
" पोरी पमन काय बोलला हे इथंच विसर! त्या मुर्खास चमकवतो मी! पण तुझ्या घरी हे कळू देऊ नकोस! आग लागेल दोन्ही गावात!" प्रतापराव समजावणीच्या स्वरात बोलले.पण आग तर पद्माच्या उरात उठली व ती जळत जळत मायाकडं भकासपणे पाहू लागली.
" पप्पा, ही साफ खोटं बोलतेय नी तुम्हीपण तिच्यावर विश्वास ठेवताय! आपला पमन हिला काडीनं पेटवेन लग्नाचा तर विषयच नाही.ही काही तरी बनाव करतेय!" माया रागानं बोलत पद्माला धीर देत आधार देऊ लागली.पण पद्मा खाली ढासळलीच.
" काका, पमनचा होकार असेल तर?"
शिल्पानं मायास डिवचलं.
" पमन लाख होकार देईन,पण आमचे आबा त्याला उभा फाडतील!" प्रतापराव निक्षून म्हणाले.
" आबांना मी सांगते!"
" पोरी शहाणी होशील तर मुकाट्यानं घरी जा!" ताराबाई हात जोडत तिला विनवू लागली.
" काकी मी मळ्यात चाललीय आबांकडं.पमनला ही मळ्यातच पाठवा!" गल्लीतनं पमन येतोय हे पाहताच ती सटकली.
गाडी रिव्हर्स घेतांना पमन आलाच ती त्याच्याकडं गालात हसत पाहत त्याला खुणावू लागली. त्यानं संतापानं हातातला बुके जोरात गाडीवर भिरकावला.
प्रतापरावानं पमन घरात येताच त्याचं छाताड हातानं धरत जोरात मुस्काटात एक लगावत " निदान जो काका उभी हयात बदल्याच्या आगीत जळतोय त्याचा ही विचार नाही केलास!, जी मामी तुझी माय बनत तुझ्यासाठी स्वत:स दुसरं मुल होऊ दिलं नाही त्याचा तरी विचार करायचा होता!" नी त्याला हातानं मुस्काटात देत राहिले.
ताराबाईनं त्यांचा हात धरत " माझ्या पम्यास हात लावला तर याद राखा! निदान त्याला आधी विचारा तरी! माझा त्याच्यावर भरोसा आहे.त्या सटवीचं काय ऐकता?"
" तारे, गाव पेटेल गं! देव करो न तुझं खरं ठरो!" प्रतापराव हात भिंतीवर आपटत आक्रंदले.
" मामा, काय बोलली ती?" पमन शांतपणे विचारू लागला.
" पमा ,ती काय बोलली या पेक्षा ती मळ्यात गेलीय आबांना भे�