झटेतलं चांदणं
🔖 भाग ::-- तिसरा
दहावीचा निकाल लागला नी दुपारी सोमा पोवाराच्या घरचा टि व्ही फुटला.माया प्रताप पोवार ९२% मिळवत तालुक्यात पहिली आली तर शिल्पा पोवारला केवळ ८७% टक्यावर शाळेत दुसरा क्रमांक आल्याने राग टि.व्ही.वर निघाला. तिला पम्याचं शास्त्री सरांना ' सर शिल्पाच पहिली येणार' हे खोचक बोलणं आठवलं म्हणूनच हातातल्या गडव्यानं तिनं टि. व्ही. च फोडला.
उन्हाळी सुट्टी शिल्पा सुरेश व चंदूनं नाशिकला अंजना आत्याकडेच घालवली होती. अडिच महिने त्यांनी प्रशांत सोबत क्लबमध्ये खो खो तयारी केली. अडकमोल मॅडमांना शिल्पाचा खेळ माहित होताच पण सुरेश व चंदूला ही जास्त शिकवायची गरज पडली नाही. १७ वर्षांखालील खो खो स्पर्धा नजरेसमोर ठेवत अडकमोल मॅडमांनी ज्युनी. काॅलेजचे चिंतामण कदमांना कानात काही सांगितलं. त्यांनी डोळे विस्फारले. शास्त्री आव्हान देऊन आर्डीत गेलाय .त्यानं दिलेलं आव्हान दोघांच्या जिव्हारी लागलंच होतं. शास्त्रीच्या कामापुढं अडकमोलच काय पण संस्थेतल्या इतर लोकांचंही काम खुजं वाटे. त्यांचं विविध स्पर्धेतील दैदिप्यमान यश इतरांना खटके. या राजकारणाला कंटाळूनच त्यांनी आर्डीत बदली केली होती. त्यांना तोंडघशी पाडण्यासाठी अडकमोल मॅडम व कदमांनी शिल्पा बरोबर चंदू सुरेशची जबर तयारी करून घेतली. शिल्पा अकरावीला नाशिकलाच येणार होती.पण तिला कदमांनी तू अकरावी आर्डीतच कर.मग बारावीला ये असं सुचवत तिला मनवलं. तिला ते कळलं नाही. अडीच तीन महिने प्रशांत चंदू सुरेश व शिल्पा यांचा खो खो बहरला.
शाळा उघडली. शिल्पा ज्युनी. काॅलेजला गेली तरी शास्त्री सरांना युनीटशी देणं घेणं नव्हतं. कुमार गटासाठी त्यांनी मुलीचा कप्तान तिला करत कुमार गटासाठी संघ बांधण्याची तयारी केली. माया, दहावीत आलेली पमा, शिल्पा यांना घेत त्यांनी मुलीची तयारी सुरू केली. सुट्टी नंतर चंदू सुरेश च्या खेळातील बदल लक्षात आला व त्यांना धक्काच बसला. त्यांनी त्या दोघांकरवी मुलांचा ही संघ बांधला. मागच्या वर्षी वैयक्तिक स्पर्धेत भालाफेक, गोळाफेक ,थाळी फेक, लांब उडी, उंच उडी धावणे या प्रकारात त्याची मुलं जिल्ह्यापर्यंत चमकलीच होती. पण या वर्षी त्यांनी त्यात भर घालत खो खो या सामुदायिक प्रकारात लक्ष द्यायचं ठरवलं. शिल्पानं मायाचा प्रथम क्रमांक आला नी आता आपण नाशिकला जायचंच नाही. बारावीला प्रथम क्रमांक आणून बदला घ्यायचाच ठरवलं.
सरांनी संध्याकाळी पाच नंतर व सकाळी सहालाच सरावाला बोलवत तयारी सुरू केली. चंदू बरोबर पमनला घेतलं पण पमन भटकता राम .कधी पेरू तोडायला तर कधी केळीची पील पत्ती करायला तर कधी दूध काढणं यासारख्या कामात तर कधी दंगा मस्ती करण्यात. मात्र संगिताच्या सुलभा मॅडमकडं तो कायम जाई. कारण गाणं ही त्याची पहिली आवड होती. सुलभा मॅडमकडं विविध संगीत प्रकार शिकण्यासाठी तो जाई. त्यात आठवी पासुनच पद्मा कविता कथालेखन करत होती. तिच्या कवितांना चाली बसवत सुलभा मॅडम याच्याकडून गाई. तेव्हा सुलभा मॅडम पद्माला ही बोलवे. मग हा सुलभा मॅडमकडेच जास्त थांबे. अकरावीपासुन तर शिल्पा ही गाणं शिकण्यासाठी येऊ लागली. शिल्पाचा आवाज त्याला देहभान विसरायला लावे. पद्मा खो खो साठी जाऊ लागताच तिचं सुलभा मॅडमकडे येणं थांबलं. पण शिल्पा येऊ लागताच तो सुलभा मॅडमकडंच थांबू लागला.
" केसा! वरच्या आर्डीतले लोक कोणत्या चक्कीचं पिठ खातात रे! अभ्यासात हुशार, खेळात हुशार, गायनात हुशार! प्रत्येक बाबीत तेच पुढं राहणार तर आमचं काय?" शिल्पा सुलभा मॅडमकडं जात असतांना तिला ऐकू जाईल अशा आवाजात तो बोलला.
शिल्पानं त्याकडं रागानं पाहत मनातल्या मनात ' आपण याला जेवढं मूर्ख समजत होतो त्याच्या कैक पटीनं हे कलागुणी आहे,पण याची सारी एनर्जी हे गाढव नको त्या फालतूपणात घालवतोय' म्हणत ती निघाली.
शास्त्री सरांनी शिल्पा कप्तान असून सरावाला येत नाही हे पाहून तिला झापत सरावाला का येत नाही याबाबत विचारणा केली.
" सर, इथल्या मुलींना अजुन चांगलं खेळता येत नाही.माझी तयारी तर झाली आहे. मग त्याच्यात सराव करून मी माझा वेळ का वाया घालवू? या मुलींची तयारी झाली की मी खेळायला येईन."
" शिल्पे! स्वत:ला शहाजोग व शहाणी समजू नकोस! तू कप्तान आहे.तु मैदानावर थांबत सर्वांना शिकवलं पाहिजे. त्यांना येत नसेल पण तुला येतं. तुझा खेळ पाहून तर त्या शिकतील! आणि लक्षात ठेव तुला ही कुणीतरी आधी शिकवलं असेलच ना?"
" सर तसं नाही म्हणायचं मला.पण दहावीतला प्रथम क्रमांक हुकला म्हणून मला अभ्यास ही..."
" शिल्पे संगिताच्या क्लासला जातेच ना? तिथं जाऊ नको असं म्हणणार नाही मी पण सकाळी तिथं गेलीस तर सायंकाळी मैदानावर ये किंवा सायंकाळी गेलीस तर सकाळी मैदानावर ये.अन्यथा मी तुला कप्तानच काय पण कुमार गटात सुद्धा खेळवणार नाही!" शास्त्री सरांनी तडक तंबीच दिली.
शिल्पा घाबरली व तिनं सायंकाळी सरावाला यायचं कबुल केलं.
शास्त्री सरांना जिल्ह्याला विभागाला किती जिवघेणी स्पर्धा असते हे माहीत होतं आणि जो पावेतो शिल्पाचा गेम इतर मुली पाहणार नाहीत, खेळणार नाहीत तो पावेतो मुलीचा संघ बांधला जाणारच नाही व मुलींचा खेळ पाहूनच मुलांनाही खेळात हूक मिळेल.
सायंकाळी स्पोर्ट ड्रेसवर शिल्पा मैदानात उतरली. आता पावेतो ती खेळत होती ती शाळेच्या गणवेशातच व ती ही अंगास तोशीस लागू न देता. ती फक्त खेळायचं म्हणून खेळत होती. पण काल सरांनी तंबी दिली नी वरच्या स्तरावर खेळणारी शिल्पा आज मैदानावर प्रकटली.तिला शास्त्री सरांचा रागच आला होता व सरांना आपण काय आहोत हे नव्यानं दाखवू या इराद्यानं ती उतरली. पमन सायंकाळी पाच दहा मिनिटे मैदानावर फेर फटका मारत सुलभा मॅडमकडे किंवा घराकडं परते. आजही सहज फेरी मारण्यासाठी तो आला.
शास्त्री सरांनी मुलांसोबत व मुलींचा सामना सुरू केला. स्पोर्ट ड्रेसवर पमी शिल्पा व दहावीतली लिना उतरली. चंदू सुरेश नं लिनाला आऊट केलं शिल्पा आऊट होणार नाही म्हणून त्यांनी पमीला टारगेट केलं. पण पमीही कधी नागमोडी पळत तर कधी हूल देत त्यांचा घाम काढू लागली. चंदूनं तिला पोलजवळ गाठत आऊट केलंच. मग शिल्पाचा पाठलाग सुरू झाला. मैदानावर हरणीगत धावणारी, मोरणीगत नाचणारी तर नागिणीगत मुलांमध्ये नागमोडी धावणाऱ्या शिल्पाला पाहुन साऱ्यांनी आपापलं साहित्य ठेवत खो खोच्या मैदानाकडं धाव घेतली. आज जिल्हा स्तरावर खेळणारी शिल्पा त्यांना दिसत होती. सहज फेरफटका मारण्यासाठी आलेल्या पमनचं लक्ष पमीवर जाताच तो ही थांबला होता. पण स्पोर्ट ड्रेसवर शिल्पाला त्यानं पाहिलं. मांडी खाली घालत बसून
" केसा पकड पकड, पमे पळ पळ,!" आरोळ्या मारत शिल्पास डिवचू लागला. त्याच्या टिवल्या बावल्यावर सरांची तिरपी नजर होतीच. शिल्पा तर खेळास लागली. हा बावळट केव्हा उतरेल हे महत्वाचं.
आता पमन शिल्पा, पमीचा खेळ पहायला दररोज येऊ लागला.
त्यांना खेळतांना पाहून आतली उर्मी जागून एक दिवस शास्त्री सरांना तो भेटला.
" सर मला पण खो खो संघात खेळायचंय! मला संघात घ्या!"
शास्त्री सरांनी त्यावर कटाक्ष टाकला व पुढे निघाले.
"सर , सांगा ना!"
" पवन, तू आपला दंगा मस्ती करतांनाच बरा दिसतोस! खेळात तुझं काम नाही!" भाला फेकणाऱ्या मुलाकडं जात शास्त्री सर बोलले.
" सर मी जे ठरवतो त्यात प्रभुत्व मिळवतोच. मला खेळायचं म्हणजे खेळायचंच! घ्या ना संघात!"
" पवन,उर्फ पमन! तुला कशासाठी उर्मी दाटलीय मला माहितीय! शिल्पा, पद्मा या खेळतात म्हणुन ना? खो खो खेळ असला तरी त्याचा खेळ खंडोबा करू नकोस! तु काय समजलास? संघात घेतलं म्हणजे या मुलींसोबत खेळता येईल, दंगा करता येईल,मस्ती करता येईल? मुळीच नाही.तुझ्या सारख्या मस्तीखोर मुलास माझ्या संघात जागा नाही.चल सटक इथून!" सर संतापात बोलले.
पमनचा पारा चढला. त्यानं भाला फेकणाऱ्या मुलाकडून रागात भाला हिसकावला.मागे जात दौड घेतली नी भाला फिरकावला.
" सर या गावात मदन नकाशे नावाच्या अवलियानं खेळाची ज्योत पेटवली होती. तोच तो अवलिया ज्यानं जबाबदारी पार पाडण्यासाठी जल समाधी घेतली. त्यांचाच मी मुलगा.संघात तर येणारच आणि केवळ खेळणार नाही तर ......!" पमन रागातच निघून गेला. सरांनी भाला फेकणाऱ्या पोरास पमनने फेकलेल्या भाल्याचं अंतर मोजावयास लावलं. ८५मीटर. जे त्या वर्षाच्या राष्ट्रीय विक्रमाच्या आसपास होतं. त्यांना आपला मित्र मदन आठवला. नी डोळ्यात आसवे तरळली.
" मित्रा तुझ्यातलीच रग पोरात आहे! पण पोरगं भरकटलंय! त्याला वठणीवर आणण्यासाठी थोडी त्याला हूल भरणं आवश्यक होतं. तो संघात येणारच पण अजुन वेळ आली नाही."
सरांनी नकार दिला नी पमन आठ दहा दिवस मैदानाकडं फिरकलाच नाही.
आषाढ अधिक मास पडला म्हणून श्रावण सप्टेबरात आला. आर्डीत कानुमाता (कानबाई)उत्सव आला. दोन्ही आर्डी मिळून सत्तरच्या आसपास कानुमाता बसत. विसर्जनात मोठ्या आर्डीतल्या गांधी चौकातून मिरवणूक निघत डिजेच्या तालावर व भजनीमंडळाच्या साथीत वाजत गाजत नदीकडं येत. लहान आर्डीतल्या कानबायाही शिवाजी चौकातून येत नदीकाठावर येत. नदी ओलांडून दोन्ही मिरवणूका एकत्र होत धरणाकडं निघत. नदीपासुन दोन्ही डिजेच्या गाड्या, भजनीमंडळची दोन्ही ट्रॅक्टरं एकत्र होत साऱ्या आर्डीतले लोक बेभान नाचत. एक गाणं मोठ्या आर्डीच्या डिजेचं होई मग लहान आर्डीच्या डिजेचं गाणं. मध्येच दोन्ही भजनी मंडळाचं गाणंही होई. नाचणाऱ्यात हायस्कुलाचं लेझिम पथक असेच असे. नदीकाठी मिरवणूक एक झाली. मोठ्या आर्डीच्या डिजेच्या गाडीवर शिल्पा व गावातील काही मुली गाणं म्हणत होत्या. सुलभा मॅडम लोकगिते, कानबाईची गिते ही कधी कधी म्हणावयास लावत.
शिल्पा मुलींसोबत
' रथ काय चालना, चालना, वनी ना गडले!
इभाक बलाई ल्या, बलाई ल्या शिरपूर गाव ले' हे गाणं आक्टोपॅडच्या साथीवर म्हणू लागली नी सारे नाचत बेभान होऊ लागले. पमन लेझीम पथकातून निसटला व मोठ्या आर्डीच्या डिजेच्या गाडीवर चढू लागला.तोच चंदू वरच होता. त्यानं वरुनच लाथ दाखवत त्याला हाकलू लागला.
" चंद्या शहानपण करू नको मला ही गाणं म्हणायचंय!"
पण चंदू त्याला वरूनच लाथ मारत हाकलू लागला. तसं पमननं त्याचा पाय पकडत खाली खेचला. सोमा, मंगा पोवार धावत आले.त्यांनी पमनला पकडत हाकलंल. प्रतापरावांनी पमनला धरून आणत लहान आर्डीच्या डिजेच्या गाडीवर चढवलं.
मोठ्या आर्डीचं गाणं संपलं नी पमननं माईक घेतला.
त्यानं गाणं सुरू केलं.
" लख लख सोनानी, सोनानी नगरी
लख लख सोनानी ,सोनानी नगरी!
कन्हेर कानबाईनी,जोडी भलती भारी!!
लख लख सोनानी सोनानी नगरी..
कानबाई चालनी ,चालनी गिरणा थयी!!"
दोन्ही आर्डीतली बाया माणसं आपापल्या कानबाई धरत बेभान होत त्याच्या गाण्यावर नाचू लागली. नव विवाहीत जोडपे ही फुगड्या घालत पाण्यात ओलीचिंब होत नाचू लागली. तिकडं शिल्पा पमनच्या गाण्यात रंगत खाली उतरत फेर धरू लागली.
पमनचं ' लख लख सोनानी सोनानी नगरी..' चालूच होतं. कानबाई धरणात विसर्जीत झाली तो पावेतो मोठ्या आर्डीचा डिजे वाजलाच नाही. मिरवणूकीत शास्त्री सरही होते. त्यांना पाहून तर पमन अधिक चिडत गाणं म्हणत होता. पण शास्त्री सरांना मनातून आनंद होत होता.
सप्टेबर संपत नाही तोच चिंतामण कदम आले . सोमा व मंगा पोवाराला शाळेत पाठवत चंदू, सुरेश व शिल्पाचे दाखले घेऊन गेले. तिघांचं अॅडमिशन नाशिकला घेतलं. शिल्पा,सुरेश व चंदू नाशिकला गेले. तालुकास्तरीय स्पर्धा तर पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या.
कुमार गट मुला-मुलींच्या खो खो संघाचे कप्तानच गेले. प्रश्न कप्तानाचा ही नव्हता तर संघातील रीढ की हड्डी म्हणता येईल असे खेळाडूच गेले म्हटल्यावर शास्त्री सरांची हिम्मतच खचली. त्यांनी सोमा पोवार व मंगा पोवारांना भेटत हात जोडत
"पोरांना निदान एवढं वर्ष तरी इथं ठेवा.एवढी स्पर्धा आटोपली की भले कुठं ही टाका!" विनवलं. पण सोमा पोवार व मंगा पोवारांनी साफ नकार दिला.
" शास्त्री सर खेळात काय ठेवलंय! पोरांचा अभ्यास महत्वाचा! अभ्यासासाठीच त्यांना इथून काढलं!" सांगत शास्त्री सरांची बोळवण केली. सरांनी ज्या अर्थी कदमांनी सुटीत चंदू व सुरेशची तयारी करून घेतली व आता दाखले नेले म्हणजे त्यांना जून ते सप्टेंबर पर्यंत आपली तालीम हवी होती.आता ते नाशीकच्या संस्थेकडून खेळतील.म्हणजे अडकमोल व कदम यांनी मिळून आपणाशी मोठा गेम केला व आपण फसलो. पण आता तरी नाही खो खो पण वैयक्तिक खेळात तर आपली तयारी आहेच म्हणून खो खो संघ विसरत वैयक्तिक प्रकारावरच लक्ष देण्याचं ठरवलं.
अचानक शिल्पा ,चंदू सुरेश गेल्याचं पमनला कळलं. खो खो चा सरावच बंद झाला.शाळेतल्या इतर सरांकडून व मुलांकडून हळूहळू सारं सर्वांना समजलं.
पमन शास्त्री सरांना भेटला. तो कळवळून बोलला.
" सर कृपा करून चंदू गेलाय तर त्या जागेवर मला घ्या ना!"
" पमन, आता उपयोग नाही. चंद्या, सुरेश व शिल्पा शिवाय आपला संघ तालुक्याला ही खेळायचा लायकीचा नाही. उगचं हसं करून घ्यायचं नाही मला! या वर्षी आपली शाळा खो खो चा संघ पाठवणार नाही!" शास्त्री सर शांतपणे बोलले.
" सर अजुन दहा बारा दिवस आहेत तालुका स्तरीय स्पर्धांना! तो पर्यंत तरी मला शिकवा ! निदान तालुक्याला तरी खेळू द्या!"
" पम्या,राज्याला टक्कर देणारे माझे संघ तालुक्याला हरलेले मला नाही पाहायचे! त्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची -न खेळलेलं बरं!
" सर एक संधी तर देऊन पहा! निदान दहा बारा दिवस सराव तर घ्या! आपणास समाधान वाटलं नाही तर तालुक्याला नाही पाठवायचा संघ!" पमन शिल्पा नसतांना खेळायचं म्हणतोय म्हणजे मनापासून खेळायचं म्हणतोय हे शास्त्रींनी ओळखलं. आपणास यानं खेळावं हे तर हवं होतं. शिवाय या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तर संघ पाठवायचाच.मग काय हरकत आहे सराव सुरू ठेवायला?" शास्त्रींनी विचार केला.
" पम्या रात्री सराव करशील?"
" सर चोविस तास सांगा.तयार आहे मी!"
"ये रात्री! साऱ्या पोरांना जमव,ती तुझी जबाबदारी!"
सरांनी रात्री आणखी लाईट वाढवले. नऊ च्या आसपास माया, पद्मा, लिना व मुलांच्या संघातील खेळाडू ही जमले. शिल्पा, चंदू व सुरेशनं सरांना फसवलं व ऐन वेळी शाळा बदलली म्हणून सारे संतापात होते. सरावाला सुरूवात झाली. आठ दिवस रात्री दोन-दोन दोन वाजेपर्यंत सराव चालू लागला. बाकी मुला मुलींचा सराव होताच. फक्त चंदू व शिल्पा सारखी कौशल्ये संघातल्या इतर दोन तीन मुलात येणं महत्वाचं होतं. सरांनी दिवसा वैयक्तिक खेळ प्रकारावर लक्ष देत रात्री सारं लक्ष खो खो वर केंद्रीत केलं. पमनला जास्त शिकवण्याची गरजच भासत नव्हती. पद्मा सोबत त्याची जुगलबंदी रंगू लागली. बचाव करतांना माया व पद्मा सात सात मिनीटे खेळून काढू लागल्या. तर आक्रमणात त्या पोरांना यू आऊट करू लागल्या. पण पाच सहा दिवसात पमन त्यांना सूर मारत तर कधी पोलजवळ बेल मारत आऊट करत इतरांना मुलं लगेच आऊट करू लागली. शास्त्री सरांनी पमन, केसा व बाल्यास सात मिनीटे कशी खेळून काढत नाबाद रहायचं हे कौशल्ये जिवतोड करून शिकवलं. तुम्ही तीन आऊट झाले तर पुढची सहा चटणी होतील पण तुम्ही सात मिनीटे खेळलात तर इतरांचं सरंक्षण होईल. आक्रमणात पाच सहा पोरांना सूर मारणं, बेल मारणं, खो वर खो देणं, केसा, पमन बाल्यालाच जास्त खो देणं हे पक्कं ठसवलं. पमनला खेळता येत होतंच. फक्त सूर मारणं, बेल मारणं ही कौशल्ये सरांनी शिकवली. बाकी ज्याच्या रक्तात जबाबदारीचं ओझं भिनलं होतं त्याला शिकवायची गरजच काय होती. कुमार गटाची तालुका स्तरीय स्पर्धा चाळीसगावी झाली. शास्त्री सरांनी घुमाने व ज्युनीअर काॅलेजचे पटोले यांनाच पाठवलं.
शास्त्री इतक्या वर्षाच्या सेवेत कधीच साशंक नसत पण या वर्षी तयारी करवूनही ते साशंक होते. कारण घरच्या मैदानावरील आडाखे स्पर्धेत पत्त्याच्या बंगल्याप्रमाने कोसळतात हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून तालुक्यालाच नामुष्की नको म्हणून ते गेले नाहीत. पण मागच्या बारा दिवसात त्यांनी पोरांचा रात्र रात्र भर घाम काढत सराव घेतला होता.
तालुक्याला मुलीच्या संघातील माया व पमी दोन्ही डावात सात सात मिनीटे नाबाद राहत केवळ लिनाच आऊट झाली. तर आक्रमनात पद्माचा सूर, मायाची बेल यांनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू अलगद टिपले जाऊ लागले. मुलात केसा, बाल्यानं अपेक्षेपेक्षा चांगला खेळ केला. पमनच्या पहिल्या डावात सूर मारत खेळाडूचे पाय पकडत माती चाटणाऱ्या खेळाडूंनी दुसऱ्या डावात धास्तीच खाली. छातीवर बसणारी बेल पोलजवळ जायला धडकी भरवू लागली. तालुक्यावर दोन्ही संघ जिंकत जिल्ह्यावर निवड झाली. शास्त्रींना थोडी हिम्मत आली. जिल्ह्यावर पंधरा तालुक्यातील कोणत्या तालुक्याशी खेळावं लागेल शाश्वती नव्हती. त्यांनी आता आणखी काही खास कौशल्ये शिकवण्यास सुरुवात केली. पमन केसाची बेल समजून आली तर पोरं पोलजवळून दूर अंतर ठेवत पळतील वा लाॅबीतून दिशा बदलवत माघारी दौडतील ही शक्यता लक्षात घेत पाय मागे ठेवत पोल जवळील विद्यार्थ्यास खो देणं किंवा बेलची हूल देत विरूद्ध बाजूस लाॅबीत सूर मारणे यावर त्यांनी पमन केसा बाल्या यांचा सराव घेतला. तसेच यांच्या सारखंच पुढच्या तीन खेळाडू नी बेल मारणं , सूर मारणं वा बचाव करतांना हे आऊट झाले तर सात मिनीटापर्यंत अधिक पडजड होऊ न देणे. पळतांना हूल भरत प्रतिस्पर्ध्यांना फाऊल करण्यास भाग पाडणे अशा बारीक सारीक बाबी ते समजावून सराव घेऊ लागले.
जिल्हास्तरीय स्पर्धा अमळनेरला होत्या. या वेळेस स्वत: शास्त्री गेले.कारण कधीच न चमकणारी शाळा जिल्ह्याला पोहोचली हे ही कमी नव्हतं. म्हणजे आता जिल्ह्यावर हारलो तरी एवढी नामुष्की नव्हती. पण त्यांना आता ती नामुष्की घ्यायची नव्हती.म्हणून वाढत्या चुरशीत आपण समोर असणं महत्वाचं होतं.
आधीच्या फेरी सरळ दोन्ही संघांनी जिंकत मुलांची फायनल यावल व चाळीसगाव मध्ये तर मुलींची जामनेरसोबत लागली.
पमीनं हरणीची चपळता,मोरणीचं नृत्य दाखवत डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ केला. माया लिना आऊट झाल्या. सहा मिनीटे पद्मा दम फुटेपर्यंत धावत राहिली. नी अखेर आऊट झाली. पुढच्या एका मिनीटात पुढच्या तीन मुली आऊट होत सहा गुण जामनेरनं मिळवले. आक्रमणात पद्मा माया व साऱ्यांनीच जंग जंग पछाडलं तरी जामनेरच्या दोनच मुली आऊट झाल्या चार गुणाच्या फरकानं जामनेर तालुकातील आश्रमशाळेतील मुलींनी लीड घेतला. मधल्या अंतराळात शास्त्री सर व पमननं माया लिनास समजावलं. नंतर मात्र माया तीन मिनीटं खेळली नंतर लिनानं दोन मिनीटं खेळून काढली नंतर पमीनं त्यांचा घामोटा काढत सतावलं. एकुण सहा गुणाची लीड. आक्रमणात सूर मारत तर कधी बेल मारत लिना पद्मा माया यांनी धुव्वा उडवत फरक तर भरून काढलाच पण लीड ही घेतला. व विभागावर निवड झाली. तसा पमन धावला व त्यानं मायास उचललं व मैदानावर फेरी मारली. नंतर मायाला उतरवणार तोच पद्मा जवळ आली नी नजरेत त्याला काही तरी जाणवलं. बस! काही एक विचार न करता त्यानं पद्मास ही उचललं.नी मैदानात फेरी मारली. उतरतांना " पम्या मला तू उचललं नाही तरी चालेल पण यापेक्षा आपणास सोडून गेले त्यांचा धुव्वा उडवला तर मला अधिक आनंद होईल!" पमन काय ते समजला.
फायनलला पमनचा खेळ बघून शास्त्री सरांना मदन सरच आठवत राहिले व ते डोळ्यात आसवं आणत खेळ व पमनला न्याहाळत राहिले.
यावलच्या सातपुड्यातील बलदंड आदिवासी मुलांना हारवत पमन शड्डू ठोकत दहाडला व पद्मा माया साऱ्या पळत मैदानावरच त्याच्यावर सारे पडले. शास्त्रींनी आसवे दिसू नयेत म्हणून चेहरा लपवत मैदान सोडलं
"मदन्या ! तू लावलेली खेळाची ज्योत, व्यायामाची ज्योत तुझ्या पम्यानं सावरलीय आज! तू आज हवा होतास मित्रा!" म्हणत ते आडोशाला नळाजवळ तोंड धुऊ लागले. ते परत मैदानात येताच जल्लोषात पोरं त्यांना बिलगली.
" सर, चलो नाशिक!"
नाशिक जिल्ह्यात ही शिल्पाच्या संघानं व प्रशांत चंदूच्या संघानं विभागावर प्रवेश मिळवला.
विभागावर अडकमोल व कदम सरांच्या संघाशी गाठ पडेलच. जर आपली पोरं चांगली खेळली तर फायनलला तेच समोर असतील.
शास्त्री सरांनी आता सरावात अधिक शिकवण्यापेक्षा त्यांचा त्यांचा सराव करू दिला. एके संध्याकाळी त्यांनी पद्मा माया केसा व पमनला धरणाकडं फिरायला नेलं.धरणाच्या काठी फतकल मांडत ते बसले. धरण नुकत्याच संपलेल्या पावसानं तुडूंब भरत ओसंडत होतं. काही पाणकोंबड्या पाण्यावर पोहत होत्या.मासे खाऊन कंटाळलेले बगळे झाडाकडं झेपावत होती.
" पोरांनो ! विभागावर तुम्ही पहिल्या फेऱ्यात चांगलं खेळलात तर तुमची गाठ फायनलला नाशीकमधील आपल्याच संस्थेशी नक्कीच पडेल. कारण आता पावेतो सात आठ वेळा तेच विभागावरून राज्यावर जातात. तेथे मी अनेक वर्ष राहिलोय. ते खेळात पारंगत आहेतच पण त्याचबरोबर ते प्रतिस्पर्ध्यांशी माईंड गेम खेळण्यात ही पारंगत आहेत. त्यांनी तो खेळ खेळण्यास सुरुवात ही कधीची करून दिली. आपल्या संघातील महत्वाचे खेळाडू त्यांनी पळवलेत. म्हणून तुम्हास या गोष्टीचा बदला घेण्यासाठीच खेळायचंय. सोडून गेलेल्यांना अद्दल घडविण्यासाठी तुम्हाला जिंकायचंय हे पक्क लक्षात ठेवा. खेड्यातली मुलं काय असतात हे दाखवायचच आपणास!" शास्त्री सर भरल्या गळ्यानं म्हणाले.
" पमन! माझा मित्र याच्याच राजकारणाला बळी पडत याच धरणात....पण तुला...!नुसतं खेळायचं नाही तर यांच्या चाली ही लक्षात घ्यायच्याय! दलपत पोवार, अंजना बाई, सोमा, मंगा पोवार नी आता शिल्पा चंदू या साऱ्यांशी लढायचंय तुला! लढशील ना?"
" सर, जबाबदारी साठी माझ्या बापानं जीव दिला मी जबाबदारीसाठी यांचा जीव तुटेपर्यंत जीव घेईन!"
शास्त्री सर उठले.
नाशिकला स्पर्धा सुरू झाल्या. अप्पा सरदेसायांच्याच संस्थेनं आयोजकपद स्विकारलं. प्रशांत, चंदू, सुरेश व शिल्पा यांची दहशत पहिल्याच फेरीत दिसू लागली. शिल्पाचा तुफानी तर्रार खेळानं मुली धास्ती घेऊ लागल्या.मैदानावर नाचतच ती आक्रमण करू लागली. तिचा रौब, आब, धमक यानं धडकीच भरू लागली. तर प्रशांत व चंदू मुलांमध्ये. त्यात प्रेक्षक म्हणून स्वत:च्याच शाळेतली मुलं त्यांना प्रोत्साहन देऊ लागली. पहिल्या फेऱ्यात शास्त्री सरांनी रिस्क घेतली व पमनला राखीव खेळाडूत बसवलं .पमनला बसून खेळ पाहणं जिवावर येऊ लागलं. पहिल्या फेरीचे सारे सामने अडकमोल बाई व कदम पाहत शास्त्रीच्या संघासोबत कसं खेळायचे याचे आडाखे बांधू लागले.गेमप्लान करू लागले.
शिल्पाचा खेळ पाहत हात चोळत बसण्यात पमनची जीवावर येऊ लागली.पमनला न खेळवण्याची रिस्क घेऊनही आर्डीचा संघ फायनलला पोहोचलाच.
मुला-मुलींची फायनल अपेक्षेप्रमाणे जळगाव व नाशीकमध्येच लागली. शास्त्रींनी पमनला बसत फेरीतल्या सामन्यातील प्रशांत चंदू सुरेशचा खेळच पहायला लावला. तिकडे अडकमोल बाईही मुलांना आर्डीच्या मुलांचा गेम पहायला लावत होत्या. पण पमन नुसता सोबत मुला मुलींना पाणी पाजायलाच आलाय याचं शिल्पा व चंदूस हसू येत होतं. त्यांना हा गाढव खेळणार नाही हीच अपेक्षा होती. कारण तो खेळतोय हे माहीत होतं पण नुसतं शाळेपुरतं मर्यादित एवढचं त्यांना माहीत होतं पण या दिड दोन महिन्यात तो कसा खेळतो याची त्यांना कल्पनाच नव्हती ते फक्त राखीव खेळाडू म्हणूनच त्याची गणना करत होते.शास्त्री सरांनी मोठी रिस्क घेत गेमप्लान इथेच आखला.
मुलींचा सामना सुरू झाला. पद्मा माया आणि शिल्पा यांच्यात जुगलबंदी रंगली. पद्मानं शिल्पाला सोडत दुसऱ्या मुलींना आऊट करण्याचा प्रयत्न केला. पण शहरातल्या मुली सेंटर लाईनमध्येच नागमोडी धावत खो वर खो देऊनही टाईमपास करू लागल्या. तीन मिनीटे या दोन मुलीनींच घाम काढावयास लावला. शिल्पा तर एका कोपऱ्यातच शांत उभी. पमन खवळला.
" पमी काय करतेस! वर नको चढू! फांदी मोडेल! कच्च्या पेरूनच पिकला पेरू पाड!" तो बोलला नी पमी व माया समजली. शिल्पा हे गाढव काय बोलतंय,कच्चा पेरू,पक्का पेरू! विचार करू लागली नी त्याच वेळी खो वर खो देत धावणाऱ्या पोरींना मायानं शिल्पा समोर आणत पमीला खो दिला नी पमीनं हूल पोरीकडं भरली पण सूर शिल्पावर मारला.शिल्पाला काही कळायच्या आत आऊट झाली .
पमीनं कच्च्या पेरूनं मारत पिकलेला पेरू घेतला नी मग धक्क्यानं धावणाऱ्या पोरीही आऊट झाल्या. पुढच्या साडेतीन मिनीटात पमी लिना मायानं नऊ गडी बाद केले.शिल्पा पमनला शिव्या देत राहिली. शास्त्रीसर पमनच्या गेमप्लाननं सुखावले.बचावात माया व लिना आऊट झाल्या पण पमीनं नाशीकच्या मुलींना गिरणेचं पाणी दाखवलं. पहिल्या डावातील सात गुणाची लीड नाशीकच्या मुलींना तोडताच आली नाही व शिल्पा मैदानातच ढसा ढसा रडली.
पमीला गच्च मिठी मारत पमननं मैदानात तुफानी नाच केला.
" पम्या मी वर वर चढत फांदीच तोडत होते पण तू कच्चा पेरूनं वरचा पेरू तोडायचं बोलला नी... "पमा माया हसू लागल्या.
मुलांची फायनल सुरू झाली.
फायनलला पमन उतरला. चंदू व सुरेशला हसू आलं. बचाव करण्यासाठी प्रशांत सुरेश व चंदू उतरला. पमननं आक्रमण केलं. खेळाच्या पहिल्या तीन मिनीटातच पमनचे अफलातून अंतर कव्हर करणारे सूर व पोलजवळील छाताडावर छपाकदिशी बसणारी बेल यांनं तिघांना माघारी परतवलं. अडकमोल व कदमचे सारे प्लान कागदावरच राहिले. हे नविन राखीव खेळाडू फेरीत खेळलंच नव्हतं नी हाच तुफानी खेळतोय यानं सारेच बावरले. या धक्क्यातून पमननं सावरण्याची संधी न देता पुढच्या पोरांना सपासप आऊट केलं . परत शेवटच्या मिनीटाला प्रशांत चंदू सुरेश उठले. पमनच्या एका अप्रतिम डायवर सुरेशची जमिनीवरील तंगडी उचलली तर हवेतली वरच अल्लर पेलली. सुरेश खालची माती चाटायला लागला.ओठात दात फसले व आक्रमणात त्याची जागा राखीव खेळाडूला घ्यावी लागली.
बचावात मात्र त्यांनी ही सुरेख खेळ करत प्रशांतने बाजी मारत नऊ खेळाडू बाद करत फरक एका गुणावर सिमीत केला. ज्याला आपण पाणी पाजणारं राखीव गाढव समजत होतो ते तर मागची आघाडी सांभाळणारं नव्या दमाचं अरबी घोडं निघालं यानं शिल्पाच काय पण अडकमोल मॅडमांनाही शास्त्रीकडं पाहून बाप बाप होता है याची खात्री पटली.
दुसऱ्या डावात चार मिनीटे चंदू व प्रशांते खेळली. तरी पमनने माघार घेत केसाला खो देत पळवलं. केसानंही विश्वास सार्थ ठरवत प्रशांतला टिपलं.नी मग लांब हात करत पोलला बिलगत मारलेली पमनची बेल चंदूला सपकन बसली. मग पुढचे गडी पटापट टिपले गेले. एकूण सात गुणाची लीड झाली. बचावात केसा बाल्या दोन मिनीटात आऊट झाले. पण ...पण पमन पाच मिनीटे गाळात रुतत असतांनाही हात वर वर करत पोरांना वाचवणारा आपला बाप! दम तोडत पोरांचा दम शाबूत ठेवणारा आपला बाप आठवत धावतच राहिला.ना नागमोडी,ना हूल, सरळ हा खांब ते तो खांब. चंदू प्रशांत पाठलागच करत राहिले!
" पम्या दम फुटला तरी चालेल पण दमच फोड यांचा! गिरणा मायचं पाणी दाखव भगोड्यांना!" पमी बेंबीच्या देठापासून ओरडत होती. टाईम किपरची वाॅच थांबली, विसल झाली नी पमननं दम घेण्याऐवजी शिल्पीकडं,पाहत मांडी व शड्डू ठोकला.तसंच कदम सरांकडं पाहत जोरानं आरोळी ठोकत जल्लोष केला नी मायानं मागून त्याला खेचलं.
" मायडे सोड! तुला नाही कळायचं माझ्या सदा काकाचं रात्रीचं हळहळणं, कळकळणं!" म्हणत पमन रडू लागला.मायानं त्याला मिठी मारली . तोच पमी व सारे येत त्यांच्या अंगावर खुदली.
साऱ्यांनी शास्त्री सरांना वर उचललं.शास्त्री सर आभाळाकडं पाहत " मदना तुझ्या रक्तानं आज तु सुलगावलेली ज्योत प्रज्वलीत केली रे! आता मला कुणाशीच कुठलीच स्पर्धा नाही. धरणातून तुला काढतांनाच मी घेतलेल्या प्रतिज्ञेतून मुक्त झालो मित्रा!"
.
.
क्रमशः

✒ वा...पा...