श्री गणेश हृदय...
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि. ०२.०९.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांन गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला श्रीगणेशाच्याच आज्ञेने श्रीगणेशाची एक अशी उपासना सांगणार आहे, जी उपासना तुम्ही नित्य नेमाने केलीत तर तुम्हाला उभ्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही असा मला दृढ विश्वास आहे. श्रीगणेश ही विद्येची, बुद्धीची तसेच सर्व मंगल कार्यांची देवता आहे. कुठल्याही कार्याआधी श्रीगणेशाची पूजा सर्वप्रथम केली जाते त्यानंतरच कुठल्याही कार्याचा शुभारंभ केला जातो आणि त्यामुळे त्या कार्यात येणाऱ्या सर्व विघ्नांचा नाश होत असतो. पुराणांत सांगितल्या प्रमाणे सर्व देवी देवतांनीही प्रथम पूजेचा मान हा श्रीगणेशालाच दिलेला आहे. मी आजवर ज्योतिषच्या अनुषंगाने शेकडो पत्रिका तपासल्या आहेत, त्यामध्ये काही पाप ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा, विदीशा जातकाला लागतात त्यावेळी त्याची खूपच वाताहत होत असते, त्यात काही ग्रह जसे राहू, मंगळ, शनी ह्या ग्रहांच्या महादशा खूपच त्रासदायक असतात. परंतु माझ्या प्रयोगांवरून आणि अनुभवावरून मला असे निदर्शनास आले की त्या कालावधीत जातकाचे श्रीगणेशाची उपासना नित्यनेमाने केली तर त्याला त्या सर्वांची झळ कमी प्रमाणात पोहोचते. त्यासाठी मी आवर्जून सर्वांना श्रीगणेश अथर्वशीर्ष म्हणायला सांगतो ज्या स्तोत्राला स्तोत्रराज म्हटलेले आहे ह्या स्तोत्रा सारखेच अजून एक श्री गणेशाचे स्तोत्र पुराणांत उपलब्ध आहे जे दिसायला खूप साधे वाटत असले तरी परिणामांणी खूपच अद्वितीय असे असून त्याची उपासना केली तर कुंडलीतील सर्व घरे हळूहळू स्वच्छ होऊन जातकाच्या आयुष्यत आश्चर्यकारक अशा घटना घडू लागतात. हे मला माझ्या सद्गुरूंकडून मिळालेले असून त्याचा प्रभावीपणा मी स्वतः अनुभवलेला आहे आणि म्हणूनच तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या ग्रुपवर सादर करीत आहे. परवाच मी श्रीगणेश मुगदल पुराण हा पूर्णतः श्रीगणेशावर आधारित असलेला ग्रंथराज घरी आणला, हा श्रीगणेश भक्तांचा अत्यंत आवडता असा ग्रंथ आहेत्याच ग्रंथाच्या पुराणोपनिषदाच्या आठव्या खंडातील ४९ व्या अध्यायात हे श्रीगणेश हृदय स्तोत्र आलेले आहे. श्रीगणेशाच्या २१ नामांपासून बनलेले हे एक अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आज मी तुम्हा सर्वांसमोर सादर करत असताना मला खूपच आनंद होत आहे.
श्री गणेश हृदय
श्रीगणेश हृदय म्हणायला सुरुवात करण्याआधी मनोमन श्रीगणेशाचे ध्यान करत वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ, निर्विघम् कुरुमे देव, सर्वकार्येशु सर्वदा हा मंत्र म्हणावा आणि मनोमानच श्रीगणेशाची प्रार्थना करत म्हणावे, की हे देवाधिदेवा तू सर्व विघ्नांचा हरणकर्ता आणि सर्व सुखकर्ता आहेस, तुझे आगमन माझ्या जीवनात होऊन त्यायोगे माझ्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश व्हावा आणि माझे संपूर्ण जीवन श्रीगणेशमय व्हावे. अशी प्रार्थना म्हणून झाल्यावर श्रीगणेशाचे श्रीनारदमुनी कृत सङ्कष्टनाशन गणेश स्तोत्रम् म्हणावे.
नारद उवाच।
प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायाकम्।
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतर्थकम्॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम्॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्।
तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः॥ ८॥
॥इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्॥
हे स्तोत्र एकदा म्हणावे आणि तदनंतर संकल्प घेऊन श्रीगणेश हृदय म्हणायला सुरवात करावी.
संकल्प:-
ओं अस्य श्री गणेशहृदय उपासना। भगवान श्री शंभु ऋषीः। नाना छंदः। श्री गणेश देवता। गं बीजम्। ज्ञानात्मिक शक्तीः। श्री गजानन कृपा प्रसाद प्रित्यर्थे मम तथा मम कुटुंबस्य सर्वाभिष्ट सिद्धर्थे जपे विनियोगः।
ध्यान:-
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः ।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
अथ मंत्रः
तद्नंतर ओं गं गणपतये नमः। हा मंत्र १०८ वेळा म्हणून खाली दिलेली श्रीगणेशाची २१ नावे १ ते २१ अशाप्रकारे २१ वेळा म्हणावीत. रोज २१ वेळा अशी २१ दिवस म्हणजे एक मंडल पूर्ण होते. २१ दिवसाचे एक मंडल ह्याप्रमाणे २१ मंडले पूर्ण करावीत. यात खंड करू नये. काही करणास्थव खंड झालाच तर खंडित संख्या पूर्ण करावी.
अथ श्री गणेशहृदय स्तोत्र।
१. श्री गणेशाय नमः।
२. श्री एकदंताय नमः।
३. श्री चिंतामणये नमः।
४. श्री विनायकाय नमः।
५. श्री ढुंडीराजाय नमः।
६. श्री मयुरेशाय नमः।
७. श्री लंबोदराय नमः।
८. श्री गजाननाय नमः।
९. श्री हेरंभाय नमः।
१०. श्री वक्रतुंडाय नमः।
११. श्री ज्येष्ठराजाय नमः।
१२. श्री स्वानंदनाथय नमः।
१३. श्री आशापुरकाय नमः।
१४. श्री वरदाय नमः।
१५. श्री सर्वपुज्याय नमः।
१६. श्री विकटाय नमः।
१७. श्री धरणीधराय नमः।
१८. श्री सिद्धीबुद्धिपतये नमः।
१९. श्री ब्रम्हणस्पतये नमः।
२०. श्री विघ्ननायकाय नमः।
२१. श्री मांगलेशाय नमः।
अशाप्रकारे एकवीस नावे म्हणून झाल्यावर एकदा "एकदंताय विदमहें वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। (कीबोर्ड मुळे मंत्र नीट टाइप झाले नसल्यास इतर पुस्तकातून घ्यावा) हा गणेश गायत्री मंत्र म्हणावा आणि परत दुसरे आवर्तन सुरू करावे, अशी रोज २१ आवर्तने करावी म्हणजे एक मंडल पूर्ण होते, अशी कमीत कमी २१ मंडले करावीत. ही साधना करायला एकदा सराव झाल्यावर फक्त १० ते १५ मिनिटे लागतात. ही साधना आज किंवा कुठल्याही मंगळवार पासून सुरुवात करून रोज केली तर अति उत्तम. तर सर्वांनी ह्याचा लाभ घेऊन आपले जीवन सुखमय करून घ्यावे. पुढच्या लेखात ह्याने आलेले अनुभव पोस्ट करीन, तो पर्यंत.... गणपती बाप्पा मोरया।
अॅड. अंकुश सू. नवघरे.
(ज्योतिष विशारद)