शनी अमावस्या विशेष....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि. २८.०९.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रानो....
नमस्कार मित्रांनो अमावस्या हा दिवस म्हणजे एक पर्व असतो. मढि किंवा इतर नाथपंथीय मठांमध्ये दर अमावास्येला हवन केले जाते आणि येणाऱ्या भाविकांची दुःखे दूर केली जातात. कोणावर मारण प्रयोग केलेला असेल किंवा मूठ मारलेली असेल तरीही जर तो अमावस्ये पर्यंत तग धरू शकला तर त्याला वाचवता येते. अशी ही अमावस्या खरतर खूप महत्वाची असते परंतु काही लोक ह्या दिवसाला वाईट मानतात. थोडं विषयांतर करतो की अमावास्येला चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येत असल्याने समुद्रला भरती येते त्यामुळे काही लोकांना उच्च रक्तदाब, किंवा फिट्स किंवा मानसिक संतुलन बिघडल्यासरखे वाटते कारण ज्योतिषीय नियमानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने त्याच्या परिणाम मानसिकतेवर होतो आणि वैज्ञानिक परिभाषेत मानवाच्या शरीरात ७५% पेक्षा जास्त पाणी असल्याने त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम जसा समुद्राच्या पाण्यावर होतो तसाच तो मानवी शरीरावरही होत असतो. अमावस्या आणि पौर्णिमेला म्हणूनच शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत कारण तेव्हा रक्त जास्त प्रवाहित होत असते. चंद्राचा परिणाम खरच पृथ्वीच्या पाण्यावर पडतो की नाही हे पाहण्याकरिता भरतीच्या वेळी एक मोठ्या परातीत पाणी ठेवले असता त्या पाण्यातही सूक्ष्म लाटा निर्माण होत असल्यासारख्या तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर मित्रांनो अशी ही अमावस्या आपल्याला जर योग्य प्रकारात उपयोगात आणता आली तर आपल्याला खूप काही देऊ शकते, त्यातही शनिवारी आणि सोमवारी येणाऱ्या अमवास्येना खूप महत्वाचे म्हणजेच पर्व कालासारखे मानले जाते, आणि म्हणूनच आज दिनांक २८ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री लागणारी शनी अमावस्या ही खूपच विलक्षण आहे कारण ती शुभ योगावर आलेली आहे. ह्या अमावस्येचे वैशिष्टय म्हणजे विश्वात निर्माण झालेल्या काही विशिष्ट योगांमुळे ही अमावस्या ह्या पूर्ण शतकातील महत्वपूर्ण अशी अमावस्या ठरणार आहे. ह्या अमावस्येच्या काळात असे काही विशिष्ट शुभ मुहूर्त निर्माण होत आहेत, ज्या मुहूर्तावर केलेले जप, ध्यान, पूजा, श्राद्ध, तीर्थस्नाने त्यांचे कित्येक पट अधिक फळ मिळणार आहे. ह्या योगामध्ये तीर्थयात्रा, गंगास्नान, तीर्थस्थान, दान ह्यांना जसे महत्व आहे तसेच महत्व हे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या काळी हळद, हातजोडी, वैजयंती माळ, इंद्रजाल, शंख, काळी गुंजा, कवड्या, शनीची काळ्या घोड्याच्या नाळे पासून बनलेली अंगठी, रुद्राक्ष ह्या सारख्या तांत्रिक वस्तूंना सिद्ध करण्याला आहे.
त्याच बरोबर आजच्या ह्या शुभ पर्वात आपल्या सर्वांच्या काही ना काही इच्छा विशिष्ट उपासना करण्याने सिद्ध होऊ शकतात, जसे कोणाला स्वतःचे घर हवय, कोणाला लग्न करायचे आहे, कोणाचे कर्ज फीटायचे आहे, कोणाची दिलेली उधारी परत मिळवायची आहे, कोणाला त्याचे प्रेम मिळवायचे आहे, नातेसंबंध चांगले करायचे आहेत, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवायचे आहे, जॉब मध्ये प्रोमोशम किंवा नवीन जॉब मिळवायचा आहे, कोणावर बाहेरची बाधा घालवायची आहे, ह्या सर्व इच्छाही उद्याच्या अमावस्येच्या शुभ पर्वात मनापासून उपासना केल्याने कायमचा संपू शकतात. त्यासाठी शनी महाराजांची पूजा उद्या प्रदोष मुहूर्तावर केल्याने त्वरित फळ मिळेल. उद्याच्या दिवशी एखादे व्रत ठेवले तरीही ते त्वरित फलदायी ठरू शकते.
आजच्या ह्या दिवशी चंद्राचे गुरुत्वाकर्षण शून्य असल्याने पृथ्वीवर काही विशिष्ट दैवी ऊर्जेचे चलन होऊन चुंबकीय तरंग तयार होऊन एक वेगळीच आभा आणि ऊर्जा निर्माण होऊन त्यांचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या शरीरांतर्गत चक्रांवर आणि त्यांच्या आभा मंडलावर पडणार असून ह्यावेळी इच्छित वस्तूची सिद्धी केल्याने त्याच्या परिणाम स्वरूप निर्माण होणारे तरंग वातावरणात परावर्तित होऊन कित्येक पटीने परत त्या विशिष्ट वस्तूत प्रविष्ट होणार असल्याने त्या वस्तूचे दैवी गुण आणि त्यायोगे पूर्ण होणाऱ्या आपल्या इच्छापूर्ती ची शक्यता कित्येक पटीने वाढणार आहे. म्हणूंन खाली दिलेले उपाय करून आपली भरभराट करून घ्या.
१. वर दिलेली कुठलीही वस्तू सिद्ध करणे किंवा तुमच्या कडे असलेल्या वस्तूची माहिती प्रमाणे पूजा करणे.
२. पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा मातीचा दिवा पश्चिमेकडे लावणे (त्याआधी त्यात आपला चेहरा पाहून घ्या),
३. दिवा लावून झाल्यावर ३ वेळ शनी चाळीसा वाचणे किंवा १०८ वेळा ओं शं शनेश्चराय नमः। मंत्राचा जाप करणे.
४. एक काळा दोरा पिंपळाच्या झाडाच्या फांदीला ३ गाठी मारून बांधल्याने तुमचे सर्व त्रास कमी होतील.
५. काळ्या गाईला ८ मोतीचुर लाडू खाऊ घालणे.
६. काळा सुरमा सुनसान जागेवर खड्डा खणून त्यात गाढणे.
७. काळ्या कुत्र्याला तूप लावून पोळी खाऊ घालणे
८. शनीची काळ्या घोड्याच्या नाळेपासून बनलेली लोखंडाची अंगठी मधल्या बोटांत धारण करा.
९. घोड्याची नाळ दरवाजावर लावा.
१०. एक ७ मुखी रुद्राक्ष सिद्ध करून काळ्यादोऱ्यात बांधून गळ्यात धारण करा.
उद्याच्या शनी अमावस्येच्या तसेच सर्वपित्री अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर ज्यांना कोणाला शनीची साडेसाती, शनी महादशा आहे त्यांनी वरील सर्व उपाय करून शनी महाराजांची आणि तुमच्या पितरांची कृपा प्राप्त करून स्वतःचे कल्याण करून घ्या.
कृपया कोणीही वरील गोष्टी कशा सिद्ध कराव्यात ह्याची विचारणा करू नये, ह्या सर्व माहितीसाठी देवधर्माचे गूढ आणि विज्ञान (अधिकृत) ह्या ग्रुपवरील माझ्या सर्व पोस्ट find मध्ये जाऊन ankush navaghare असे type करून पहाव्यात.
शुभम् भवतू।
अंकुश सू. नवघरे...