ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक संकेत....
नवस....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि. २०.०९.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रानो....
कधी कधी ज्योतिष मार्गदर्शन करताना असे आढळून येते की समस्या ही ग्रहांच्या संबंधातील नसून काहीतरी वेगळी किंवा बाहेरची आहे, अशावेळी मग अध्यात्माचा विचार करावा लागतो. मी ह्या पोस्ट च्या माध्यमातून कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ह्या पोस्ट मध्ये मी मला स्वतःला आलेला परानॉर्मल अनुभव कथन करत आहे आणि ही पोस्ट फक्त करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
लहान असताना आई बरोबर देवळात गेलो की आई मला सांगायची की देवबाप्पाला पाया पड आणि सांग की देव बाप्पा मला सुखी ठेव, चांगली बुद्धी दे, मग मी तस करायचो. कालांतराने मी मोठा झालो आणि एकटाच देवळात जाऊ लागलो. तेव्हा मी पाहिले की काही लोक देवासाठी नारळ, केळी, पेढे इत्यादी घेऊन यायचे. लहानपणी एकदा पुण्याला श्रीमंत दगडूशेठच्या गणपतीच्या वेळी नारळांच्या तसेच पैशाच्या नोटांच्या तोरणांचा खच पडलेला पाहिला. मी कोणालातरी विचारले तर ते बोलले की हे सर्व नावसचे नारळ आहेत. मी विचारले की नवस म्हणजे काय असते, त्यावर ते म्हणाले की जेव्हा आपले एखादे काम काही केल्या होत नसेल, किंवा लवकरात लवकर व्हावे असे वाटत असेल तर लोक जागृत देवस्थानाला नवस करतात की, देवा जर माझे हे काम झाले तर तुला नारळ, पेढे इत्यादी वाहीन. जशी माणसाची आर्थिक परिस्थिती असते तसे तो नवस बोलतो, त्यावर मी त्यांना विचारले की सर्व म्हणतात की हे सर्व जग ह्या देवानेच बनवले आहे तर मग आपण त्यानेच बनवलेल्या ह्या सर्व वस्तू त्याला देऊन त्याचे काय भागणार आहे, माझ्या ह्या प्रश्नाने ते शांत बसले, म्हणून मी परत विचारले की समजा देवाने तुमचे काम केलेच आणि तुम्ही त्याला कबुल केलेली वस्तू नाही दिली तर तो काय करतो, माझ्या प्रश्नांची सरबत्ती ऐकून त्यांनी विषय बदलला आणि ते म्हणाले की जाउदे तू अजून लहान आहेस मोठा झालास की कळेल तुला सर्व. ह्या प्रसंगानंतर मी ह्या सर्वांच्या बाबात खूप जणांकडे विचारपूस केल्यावर मला कळले की जगात कोंबडे बकरे कापणे ह्यांसारखे नवस पण घेतले जातात. मग मीपण कॉलेजला असताना हनुमंतरायाला एकदा संगीतलेले आठवले की हनुमंतराया मी जेव्हढा अभ्यास केला असे तेवढीतरी परीक्षेत आठवू दे. त्यानंतर मी ज्योतिष शास्त्र, तंत्र मंत्र, साधना ह्यांचा खूप अभ्यास केल्यानंतर मला त्या काकांनी सांगितल्या प्रमाणे काही गोष्टींचा उलगडा झाला, की नवस न फेडल्याचे काय आणि किती मोठे परिणाम होऊ शकतात, आणि त्या होणाऱ्या परिणामांपासून तुम्हाला तुमचे आराध्य दैवत ही वाचवू शकत नाही जो पर्यंत तुम्ही तो नवस फेडत नाहीत.
साधारणतः सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आपल्याच ग्रुपवरिल पुण्याच्या एक सदस्याने मला ज्योतिष सल्ला विचारण्यासाठी कॉल केला होता. त्यापूर्वी मी त्या व्यक्तीला कधीच पाहिले नव्हते. त्यांचे असे म्हणणे होते की २०१४ पासून चांगले शिक्षण घेतलेले असून देखील त्यांना चांगला जॉब लागत नव्हता. त्यांच्यामते ते सर्वकाही उपासना इत्यादी करत असत, त्यांचे वडिल उत्तम ज्योतिष होते पण आजारपणामुळे त्यांनी ते पाहणं सोडून दिलेले होते, त्यांच्या घरात स्वामी समर्थांचे अधिष्ठान होते, त्यांची नित्य सेवा होत होती. असे असून देखील त्यांना ह्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यांच्याशी कॉलवर बोलत असताना मी मध्येच ध्यान लावून पाहण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक काळ्या पाषाणात बनलेली देवीची मूर्ती आज्ञाचक्राच्या ठिकाणी दिसून येत होती. असे खुपवेळा झाल्याने मला सतत वाटू लागले की त्या मूर्तीचा आणि ह्यांच्या समस्येचा काहीतरी संबंध आहे. ती देवीची मूर्ती दिसत असताना मला तुळजापूर हे शब्द दिसले म्हणून मी त्यांना विचारले की तुमचा आणि तुळजापूरच्या देवीचा काही संबंध आहे का, त्यावर ते म्हणाले की ती त्यांची कुलस्वामिनी आहे. त्यावर मी त्यांना विचारले की तुमचा काही नवस राहिला आहे का. त्यावर ते म्हणाले की थांबा मी माझ्या आईला विचारतो, त्यांनी आईला विचारले, पण त्यांनाही काही आठवत नव्हते. नंतर खूप जोर दिल्यावर त्यांना आठवले की त्यांचे यजमान आजारी असताना त्यांनी तुळजापूरच्या देवीला नवस केला होता की, देवीचा गाभारा केळी आणि श्रीखंड (तो नवस असाच काही असतो मला जास्त माहीत नाही) ह्यांनी भरून टाकीन. त्यानंतर त्यांच्या यजमानांना बरे वाटले, परंतु काळाच्या ओघात ते तो नवस पूर्ण न करता विसरून गेले.
मला आता प्रकर्षाने जाणवू लागले होते की हा सर्व त्या न फेडलेल्या नवसाचा परिणाम आहे. आता काही लगेच जाऊन नवस फेडणे शक्य नव्हते, म्हणून मी त्यांना एक विधी सांगितला आणि देवीला नवस फेडायला येईन असे सांगण्यास सांगितले. मी त्यांची पत्रिका देखील पाहिली पण त्यात मला इतकं काही आढळून आले नाही. ही गोष्ट मी नंतर विसरून गेलो. एक दिवस अचानक मला त्यांचा फोन आला, ते खूपच आनंदित वाटत होते, हर्षभरीत होत ते मला म्हणाले की, "आज पर्यंत मी इतक्या ज्योतिषांना पत्रिका दाखवली, माझे वडील स्वतः चांगले ज्योतिष आहेत परंतु कोणीही मला सांगितले नाही जे तुम्ही मला सांगितले", तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ती विधी केली आणि देवीला नवस फेडायचे वचन दिले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला दोन ठिकाणाहून चांगल्या जॉबच्या ऑफर आल्या, आणि एकीकडून कॉन्फरमेशन आले. त्यावर मी त्यांचे अभिनंदन करून लवकरात लवकर त्यांना तो नवस फेडायला सांगितला. ह्या घटनेनंतर मी मे महिन्यात ज्योतिष मार्गदर्शनाच्या निमित्ताने पुण्यात गेलो असताना ते मला भेटायला आले होते, त्यांनी सोबत पेढ्यांचा बॉक्स आणला होता. त्यांची अध्यात्मिक बैठक खूप चांगली आहे, स्वामींचे घराण्याला पाठबळ आहे, खूप लोक मला म्हणतात की आम्ही स्वामींच खूप करतो पण आम्हाला त्रास का होतो, त्यावर माझं एकच म्हणणे आहे की कुठलाही देव दुसऱ्या देवाच्या अखत्यारीत येत नसावा, त्यांची पण हीच इच्छा असावी की आधी कुलदेवतेला दिलेले किंवा दुसऱ्या कुठल्या देवाला दिलेले वचन जातकाने पूर्ण केले तरच मी ह्याची मदत करीन, शेवटी वचन हे पाळायलाच हवे मग ते कोणालाही का दिलेले असेना आणि असेही नाही की हे नवस फक्त त्याच माणसाने घेतलेले असावेत, अशाप्रकारे घराण्यात कोणीही घेतलेला नवस, किंवा दरवर्षी दिले जाणारे देणे (हा पण एक प्रकारचे वचन किंवा नवस झाले) देणे फेडले गेले नाही तर त्याचा परिणाम होऊ शकतो.
हा विषय निघण्याचे कारण की ह्या वेळच्या जुलैच्या पुण्याच्या दौऱ्यात त्यांचा मला परत कॉल आला होता, त्यांना मी मस्करीत म्हणालो की ह्यावेळी परत पेढ्यांचा बॉक्स घेऊन येणार का, त्यावर ते म्हणाले की ह्यावेळी मोठा बॉक्स असणार आहे, कारण त्यांना एक खूप चांगल्या कंपनीत जॉब लागला असून 4 ऑगस्ट ला दिल्लीला जॉइनिंग आहे, फ्लाईट, हॉटेल, ट्रॅव्हल इत्यादी सर्व खर्च कंपनी करणार आहे, म्हणजेच कंपनी चांगली आहे. त्यांचे नाव मला इथे प्रकट करायचे नाहीय पण, ते मला भेटायला आलेले असताना आपल्या ग्रुप वरच्या एक ताई देखील तेव्हाच मला भेटायला आल्या होत्या, आणि त्यांच्या समक्ष आमचा संवाद घडला होता म्हणून त्याही ह्या सर्वांच्या साक्षी आहेत, त्यांना जर वाटले तर त्यांनी इथे त्यांचे नाव मेंशन करावे.
मित्रांनो ह्या निसर्गात कुठलीही गोष्ट परिणामशिवाय फुकट जात नाही, जे पेराल ते उगवते, म्हणून कधीही नवस करू नका, आणि केलाच तर तो लिहून ठेवा, लक्षात ठेवा, आणि वेळेत फेडा. नाहीतर त्याचा परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या पुढच्या पिढीवर होत असतो. कधीकधी आपण सहजच देवाला अमुक एक करीन असे सांगूंन जातो, परंतु कालांतराने विसरतो पण त्याचा परिणाम खूप वाईट ही होऊ शकतो, कारण तो देव किंवा ती शक्ती त्या गोष्टीला एक लाभ म्हणूंन घेत नसते, कारण देवाला ह्या गोष्टींचे अप्रूप ते काय, तीला फक्त तुम्ही दिलेल्या वचनाशी देणेघेणे असते. काही लोक बोलतात की देवाला ह्या सर्व गोष्टीशी काय देणघेणे, देव काय पेढे नारळ खातो का? तर ते बरोबरच आहे, देवाला त्यासर्वांशी काहीच देणेघेणे नसते, ते फक्त वचनाला बांधील असतात, आणि ते पूर्ण होईल अशी अपेक्षा करतात. तर मित्रांनो नवस घेताना, किंवा थोडंकाही देवाला सांगताना सावधान कारण प्रत्येक वेळी कोणी ज्योतिषी तुम्हाला असे काही सांगेलंच असेही नाही, कारण त्यासाठी अध्यात्माची बैठक असावी लागते, तसेच संकेत यावे लागतात. तर नवस घ्या पण जरा जपून... धन्यवाद...
अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)