अमानवीय जग ( शोध )
मानवीय जग हे अमानवीय शक्तींनी भरलेलं असतं ते काही खोट नाही. लहानपणी आई बोलायची " जेव नाही तर बुवा येईल"," झोप नाही तर बुवा येईल". बुवा बघण्यासाठी एक दिवस मी उपाशीपोटी झोपलो होतो... आईने खुप मनवुन सुद्धा मी जेवलो नाही. लहान होतो पण इच्छाशक्ती प्रचंड होती बुवा बघायची . रात्र झाली आणि किचन मधुन आवाज येऊ लागले. बुवा बघायला भेटणार म्हणुन धावतच किचन मध्ये गेलो आणि पाठमोरी एक बाई किचन मध्ये ऊभी होती, माझी चाहूल तिला लागताच ती माझ्याकडे वळली आणि तिला पाहताच मी पळत सुटलो. मोकळे केस , हातात जेवणाच ताट ते सुद्धा किडे पडत होते त्यातुन, चेहर्यावरील डोळ्यांची खोबणी, लांब लांब केस तशी ती मला शोधत एक एक पाऊल माझ्या रूम मध्ये आली, मला ती जेवण भरवणार तोच स्वप्नात असलेला मी, ओरडत घाबरत जागा झालो होतो.
आता रात्रीचे किती वाजलेत माहित नाही पण मी रोज रात्रीचा असाच फिरत असतो... सामसुम रस्ता, जिवघेणा अंधार, मध्येच कुठेतरी कुत्र्यांच भेसुर रडणं आणि वि्हवळण. भुतांना घाबरत असतो तर एव्ढया रात्री माझ्या कार मध्ये " गुमनाम है कोई, बदनाम है कोई" , हे गाण लावुन प्रवास नसता केला. रात्री अपरात्री जंगलात फिरत असतो म्हणून माझे मित्र मला चिडवत किंवा वेळप्रसंगी ओरडत असत. आता त्यांना काय सांगु काही प्रश्नांची उत्तरे ही रात्रीच्या त्या गडद काळोखात मी शोधत असतो , एक अस अमानवीय जग शोधत असतो तिथे जाण्याचा मार्ग फक्त अणि फक्त मानवी अतृप्त मृत्यु आहे.
अमानवीय जग हे अंधारात कुठेतरी लपलेले असते तिथे जाण्याचा मार्ग हा एखाद्या चिन्हा प्रमाणे म्हणजेच आत्म्यांनी त्यांचं अस्तित्व जाणवण्यासाठी एखाद्या गोष्टीचा आधार घेतलेला असतो तेच चिन्ह मला शोधायच होत. डोक्यात हे सगळे विचार चालु असताना समोर असलेल्या जंगलातुन एक किंचाळी कानावर ऐकु आली. कोणीतरी मदतीसाठी ओरडत होतं. गाडी तिथेच थांबवत मी आवाजाच्या दिशेने जात होतो. चालत चालत मी जंगलाच्या खुप आत आलो होतो. एव्हना तो आवाज ही बंद झाला होता. खीशातला मोबाईल काढून त्याच्या उजेडात मी एखाद चिन्ह सापडत का ते पाहत होतो आणि तेव्हड्यात माझ्या बरोबर समोर एक माणुस ऊभा होता. सफेद पडलेल्या त्याच्या अंगावर एकहि कपडा नाव्हता, डोळे तर काळे बुबुळ, हात व पाय जमिनीच्या आत रूतलेले... झाडासारखे पण अमानवीय....ते पाहताच मी त्याच्या जवळ गेलो , त्याच्या श्र्वास च्या गरम गरम वाफा माझ्या अंगावर येत होत्या. जणुकाही मला जाळुनंच टाकतील त्या.
तेव्हढ्यात त्याने डोळे उघडले आणि मी तिथुन पळणारच होतो की असंख्य हात माझ्या दिशेने येऊ लागले. माझे हात, पाय व तोंड पुर्ण पणे झाकुन गेले . श्वास घेणे आता कठीण वाटु लागले आणि मी जोर जोरातच ओरडून ऊठुन बसलो. स्वप्न पाहिले होते मी... अमानवीय शक्ती जास्त करुन स्वप्नात त्यांच्या असण्याची जाणीव करुन देत असते. त्यात माझा मित्र म्हणाला,'' फिरत राह अजुन जंगलात," आणि असा झोपेतुन घाबरून ओरडत ऊठत बस सारखा," . बेड वरच होतो पण रुम च्या बाहेर जाणार्या मित्राच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत बसलो होतोच की, अचानक लक्ष त्याच्या पायावर गेले आणि डोकच सून्न झालं. त्याचे पाय उलटे होते, तसा तो कुत्सुकपणे मागे वळुन हसतच तिथुन निघुन गेला.
काय रे काय बघतोयस असा बाहेर....भुत पाहिल्यासारखा.....रूम मधुन माझा तोच मित्र मला बोलला आणि मी भानावर आलो...
अरे तु आताच बाहेर गेलास ना?
झोपेत आहेस का अजुन? जस्ट आलोय आताच मी ...
काय होतय काहीच समजत नव्हत...भास झाला का मला, की मनातली अमानवीय व्यक्ती या मानवीय जगात आली होती. मनी वसे ते स्वप्नी दिसे हे खरं असेल का?
आवरून लवकरात लवकर कॉलेज ला पोहचायच होतं. बाईक स्टार्ट केली आणि माझी नजर रूम च्या खिडकीत गेली.. मगासचा माझा मित्र खिडकीतून मला पहात हसत होता. त्याची कुत्सुक नजर एकटक मलाच बघत होती. तशी मी बाईक पळवलीच. कॉलेज यायच्या आधी एक मोठी नदी लागते....माझ्या डोक्यात नुसते अमानवीय जगातले आणि येत असलेल्या अनुभवाचे विचार चालले होते, तेव्हड्यात समोरून जाणार्या ट्रक चे ब्रेक फेल झाल्याने ट्रक माझ्या बाईक ला आदळला आणि क्षणात मी नदीत फेकला गेलो. नदीत एका दगडावर पडल्याने डोक्याला जबर मार लागुन मी बेहोश झालो.
डोक खुप जड झाले होते, का ते माहित नाही.. आणि हे मी कुठे आलो या घरात....हो ...नदीवरुन मी या घरात कसा आलो..कोणाच आहे हे घर..शेणांन मातीने सारवलेल घर..लाकडाच्या खिडक्या व दरवाजे.. श्वास घेता येत न्वहता म्हणून खिडकी खोलली पण, तिथुन अंगाला बोचणारा गार वारा येत होता...तशीच खिडकी बंद केली आणि दरवाज्याच्या बाहेरून कुत्र्यांच्या भुकण्याचे आवाज येऊ लागले... म्हणुन दरवाजा उघडुन बाहेर आलो तर घराच्या चारी बाजुला दाट जंगल आणि एका झाडाखाली तोच माझा मित्र ओरडत होता...खुप सारे कुत्रे त्याच्या अंगावर भुंकत होती...मी धावतच त्याला वाचवायला गेलो , कुत्र्यांना दगडी मारून हाकलत होतो आणि तेवढ्यात माझ्या मित्राने माझा हात पकडला आणि बोलला की , नको मारु त्यांना..... आणि तेव्हड्यात त्याचं रुपांतर विद्रूप चेहर्यात झाले.. डोळे तेही खोल खोबणी आसलेले..सडके ओठ... त्यातुन ओघळणारा घाण वास...त्याचा पांढराफटक चेहरा...आणि त्याच बोलण...
." स्वागत आहे तुझं...आमच्या या आत्म्यांच्या अमानवीय जगात..."
." स्वागत आहे तुझं...आमच्या या आत्म्यांच्या अमानवीय जगात..."
नदीच्या बाहेर क्रेन ने माझ शव काढण्यात आलं होतं...मी ते बघत तिथेच ऊभा होतो... अमानवीय जग शोधता शोधता मीच या अमानवीय जगात अडकुन पडलो.... कदाचित या जगाचा एक भाग झालो....
समाप्त
✒️_ ऋचा हाडवळे
ठाणे.
✒️_ ऋचा हाडवळे
ठाणे.