माझी पहिलीच पोस्ट चुकभुल द्यावी घ्यावी
💐स्वप्नवत जोडीदार💐
सकाळ उजाडली ती दगदगगिनेच कारण पण तसच होत, शुभदा ला खूप घाई होती काम आवरायची कारण सारंग ला लवकर जायचा होत ड्युटी ला.
"सकाळचे 7.30 वाजले आवरला की नाही मला 8 वाजता रिपोर्ट करायचा आहे चौकी ला" इति सारंग
"अरे हो रे झाल सगळं. नास्ता लावला आहे टेबलवर तो खाऊन घे तो पर्यंत डब्बा होईल" किचन मधून शुभदा बोलली.
सारंग ने झटपट नास्ता संपवला आणि घड्याळाकडे नजर टाकत बोलला, डब्बा दे निघायला हवं, corona मुळे वेळेत पोहोचण बंधनकारक केलय
या corona च्या मुळे तर ना माझा नवरा मला भेटेना मनातल्या मनात शुभदा बोलली आणि सारंगला डब्बा दिला आणि बोलली "काळजी घ्या आणि जमलं तर लवकर या".
सारंग ला तिची तगमग काळात होती पण ड्युटी पुढे ही बंधनं तोडावीच लागतात. "सॉरी शुभदा नक्की नाही सांगत पण प्रयत्न करीन लवकर येण्याचा वाट बघू नकोस". असा बोलून झपाझप निघून पण गेला
शुभदा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्याला बाय करत होती. सगळी कामे आता तिची उरकली होती त्यामुळे एकटीने वेळ कसा घालवायचा हे तिला रोज पडणार कोड होतं. तिने नास्ता करायला घेतला आणि विचार केला की आज मस्त संध्याकाळच्या मेनूची तयारी करूया कारणही तसंच होत आज त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस पण सारंग ला ड्युटी मुळे त्याचा विसर झाला असावा त्यामुळे त्याला surprise द्यायचा तिने विचार केला.
शुभदाने नास्ता केला आणि संध्याकाळच्या मेनूच्या सामानाची जुळवाजुळव सुरू केली. हे करत असतानाच दाराची बेल वाजली.
आता कोण आलं? Corona मुळे सगळीकडे lockdown असल्याने कोणी कोणाकडे येणे शक्यच नाही. मग आता कोण आलं असेल? असा विचार करतचं शुभदाने दार उघडलं आणि आहो आश्चर्याम साक्षात सारंग समोर उभा! Surprise सारंग बोलला आणि घरात आला सुद्धा शुभदा statue होऊन त्याला बघताच राहिली.
अगं अशी काय पुतळ्या सारखी उभी आहेस? स्वप्नात नाही मी खरोखर आलोय, surprise काय फक्त तुलाच नाही देता येत, बघतोय मी सगळी तयारी कालपासून". लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अस म्हणत सारंग ने लाल गुलाबाचा सुंदर गुच्छ शुभदाच्या हातात दिला.
शुभदाला हा सुखद धक्का होता कारण त्यांचं होतं arrange marriage आणि सारंग कधीच इतका रोमँटिक वागला नव्हता वर्षभर, मग आज काय special? "जाऊ देतं म्हणतात ना जिभेवर सरस्वती असते म्हणून तेव्हा जे मी सकाळी बोलले ते खरं ठरल शेवटी माझा नवरा मला भेटला". असं मनातल्या मनात शुभदा बोलली आणि सारंग ला तिने विचारलं" काय मग आज या कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याला या गरीब बायकोसाठी वेळ कसा मिळाला?".
"बहोत प्लांनिंग प्लॉटिंग करावी लागते मेमसाब तुम नही समझोगी". अस म्हणत सारंगने पिशवीतून आणलेल सगळं सामान काढलं.
"बहोत प्लांनिंग प्लॉटिंग करावी लागते मेमसाब तुम नही समझोगी". अस म्हणत सारंगने पिशवीतून आणलेल सगळं सामान काढलं.
"हे काय आणलाय सगळं?" शुभदाने विचारलं. "आजच्या लंचच्या मेनूची सामग्री. आज लंच मध्ये तवा पुलाव आणि पाव भाजी बनवणार आहे मी”. सारंग बोलला आणि फ्रेश होण्यासाठी गेला.
तो येईपर्यंत शुभदाने आलं लसूण पेस्ट करायला घेतली आणि एकीकडे भाज्या धुवून उकडायला ठेवल्या. सारंग झटपट आवरून किचन मध्ये आला आणि बघता बघता दोघांनी मिळून मस्त लंच बनवला.
“सारंग जा तू टीव्ही बघ मी पान घेते”, अस म्हणत शुभदाने बळेच सारंग ला किचन मधून हॉल मध्ये पाठवले. सारंग ने मग त्यांचा नुकताच घेतलेला स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लावला व त्यावरचा पंगा चित्रपट सुरू केला कारण खूप दिवसांनी अस मनापासुन जगायला मिळालं होतं. “शुभदा लवकर ये हा बघ नवीन मूवी तुला आवडेल खूप”, सारंग बोलला.
मग दोघांनी मूवी सोबत लंच सुद्धा एन्जॉय केला. मूवी संपल्यावर सारंग बोलला “मॅडम अजून काही फर्माईश असेल तर सांगा बाहेर जायच सोडून”. आजचा दिवसच जणू स्वप्नवत गेला शुभदाला. इतके सुखद धक्के दिलेत ना सारंगने की हा वाढदिवस संपूच नये असे तिला वाटले.
थोडी वामकुक्षी घेतल्यावर दोघांनी मिळून घर छान सजवले आणि सोबत केक बेक करण्यासाठी ठेवला. दोघांनी मिळून चहा घेत खूप गप्पा मारल्या जेवढ्या या लग्नाच्या वर्षभरात मारल्या नसतील. या सगळ्या कामात शुभदाला लक्षातच आल नाही की मघापासून फोन सारखा वाजतोय तिने फोन घेतला पलीकडून तिची आई बोलत होती “हॅलो शुभदा अग किती फोन केले तुला सकाळपासून कुठे होतीस? बरं ते जाऊदेत तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. ” सॉरी आई जरा कामात होते” आणि मग तिने सकाळपासूनच इतिवृतांत आईला सांगितला आणि बोलली “इतके दिवस उगाच मी आपली कुढत बसायचे की मलाच का असा अरसिक पोलीस नवरा शोधुन दिला तुम्ही?” हे बोलण चालू असतानाच सारंग तिथून बोलला “हा पण देर आये दुरुस्त आये हे लक्षात घेत नाही तू. चला केक कापायला आईला सांग नंतर बोलते. या दिवसाचा क्षण न क्षण मला अविस्मरणीय करायचा आहे”.
मग दोघांनी मिळून छान केक कापला आणि एकमेकांना भरवत वाढदिवस साजरा केला.
चला आता राणीसाहेब तुम्ही आराम करा रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करतो. तू तोपर्यंत तुझं आवडीच पुस्तक वाच.
चला आता राणीसाहेब तुम्ही आराम करा रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करतो. तू तोपर्यंत तुझं आवडीच पुस्तक वाच.
सारंग ने तिच्या आवडीचा मसालेभात आणि भाताची खीर बनवली. “जेवण रेडी आहे चला या जेवायला” सारंग ने शुभदाला बोलावले. शुभदा अवाक झाली मेनू बघून चहा पिताना मी याला सहज बोलले की मला मसालेभात आणि भाताची खीर आवडते म्हणून आणि याने हे सगळं अगदी सराईतपणे सगळं बनवलं सुद्धा. हा सुद्धा एक मोठा धक्का होता कारण तिने सारंग ला एकट्यानेच स्वयंपाक करताना कधीच पहिल किंवा सासूबाई कडून ऐकलं नव्हता. हा धक्का पचवून शुभदाने सारंगचा खूप कौतुक केलं आणि दोघांनी जेवणाचा छान आस्वाद घेतला.
जेवल्यावर सारंग ने शुभदाला एक ग्रीटिंग कार्ड आणि एक चिट्ठी दिली शुभदा ती वाचणार तेवढ्यात सारंग बोलला,” नाही, आता नाही नंतर फुरसत मध्ये वाच खूप काही बोलयाच राहिलय ते मी यामध्ये लिहलं आहे”. प्लीज वाचू दे ना लाडिक स्वरात शुभदा बोलली. “अग दिला असतं वाचायला तुला आता, पण तू आहेस वाचन वेडी एकदा बसलीस वाचायला की उठणार नाहीस जागेवरून मग ही सगळी भांडी आणि बाकीची आवरा आवर मला एकट्याला करावी लागेल” सारंग बोलला. त्यावर हसून शुभदाने चला कामाला लागा असा इशारा दिला.
मग दोघांनी मिळून सगळी आवराआवर केली आणि सारंग ने घड्याळाकडे बघितले 10 वाजले होते. आता निघायला हव असं मनातल्या मनात सारंग पुटपुटला आणि त्याने शुभदाला हाक मारत सांगितलं “अग मला चौकीतून मेसेज आलाय अर्जंट बोलावलं आहे मी निघतो”, अस म्हणत पटापट कपडे चढवत सारंग घरातून बाहेर पडला.
“अरे असा कसा पळालास”, अस शुभदाने म्हणेपर्यंत सारंग ची पाठमोरी आकृती अंधारात जणू दिसेनाशी झाली.
काय आहे हे? हा येतो काय, वाढदिवस साजरा करतो काय, मला इतका मोठं surprise देतो काय आणि आता या निवांत क्षणी अंधारात गुडूप होतो काय. काय खर आणि काय खोट समजेनासे झाले शुभदाला.
असा विचार करत असतानाच दाराची बेल पुन्हा वाजली. शुभदाची तंद्री भंग तर झाली पण आता इतक्या रात्री कोण आलं असेल याची भीती पण वाटली. तिने आतून ओरडूनच विचारलं “कोण आहे बाहेर?”. “अग मी आहे सारंग” बाहेरून उत्तर आलं. आता तर गेला ना हा urgent कॉल आला म्हणून आणि परत पण आला इतक्या लवकर या विचारांच्या तिमिरीतच शुभदाने दार उघडले आणि खरच सारंग उभा होता चेहऱ्यावरचा घाम पुसत.
“अग जरा हातापायावर पाणी घाल आणि ते sanitiser आण” सारंग त्रासिक स्वरात बोलला शुभदाने लगेच पाणी आणि sanitiser आणून दिलं आणि मनात बोलली “काय पण माणूस आहे, किती रंग रे तुझे दाखवशील आज मला”.
सारंग लगबगीने हातपाय धुवून आत आला आणि फर्मनाच सोडलं “शुभदा अग जेवायला दे, खूप भूक लागली आहे. मी फ्रेश होऊन येतो तोपर्यन्त वाढून ठेव.”
आता मात्र शुभदा मनातून चरकली हे काय भलतंच आता तर जेवून बाहेर गेला ना हा पण तरीही तिने घाबरत सारंग ला विचारलं “इतक्या लवकर घरी आलास ड्युटी लवकर संपली का?”.
आता मात्र शुभदा मनातून चरकली हे काय भलतंच आता तर जेवून बाहेर गेला ना हा पण तरीही तिने घाबरत सारंग ला विचारलं “इतक्या लवकर घरी आलास ड्युटी लवकर संपली का?”.
आतून सारंग बोलला,” स्वप्नात आहेस का? 12 तासाच्या वर ड्युटी करून आलोय, तुझ्यासमोर गेलो ना सकाळी 8 वाजता आणि तू बोलतेस इतक्या लवकर घरी कसा आलास? कमाल आहे बाई तुझी”.
आता शुभदा थरथर कापायला लागली,” मग सकाळपासून माझ्याबरोबर कोण होतं की मी स्वप्नात होते? छे नाही ही सजावट, हे जेवण, हा केक हे सगळं खरं आहे, मग सारंग अस का बोलतोय जसा तो माझ्याबरोबर दिवसभर नव्हताच मुळी”. तिची विचारचक्र थांबतच नव्हती तेवढ्यात सारंग बाहेर आला आणि जेवणाला सुरुवात पण केली.
“नशीब माझं, जेवण उरलं म्हणून फेकून नाही दिलं नाहीतर आता माझी काही सारंग ने खैर केली नसती”, शुभदा मनातल्या मनात बोलली.
“काय आज काय special? म्हणजे मेनू मस्त केलाय, घर सजवलंय, केक पण छान जमलाय तुला”, सारंग ने शुभदाला विचारलं.
“म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाही”, शुभदा बोलली.
”काय आठवायचं होता मला? ओके सॉरी, आज तुझा वाढदिवस आहे का ? छे नसेल तो तर 2 महिन्यापूर्वीच झाला, मग काय आहे आज? सांग ना तूच शुभदा” सारंग बोलला.
शुभदाला आता वेड लागायची पाळी आली हा माणूस खरच विसरलाय, की जे सकाळपासून घडलंय ते एक दिवास्वप्न होतं. तिच्या डोक्याचा भुगा होत होता पण तरीही चेहऱ्यावर तसं न दाखवता ती बोलली “अरे आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस ना, विसरलास काय?”.
सारंग ओशाळला आणि शुभदाला बोलला “सॉरी ग, या ड्युटी मुळे सगळ्या गोष्टींचा विसर पडतोय पण अगदी मनापासून तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आज मी काहीच आणला नाही तुझ्यासाठी पण उद्या नक्की आणेन”, अस बोलुन तो हात धुण्यासाठी सिंक कडे गेला. “जेवण खूप छान बनवलं होतस ग, thanks दिवसभराचा थकवा गेला. ही सजावट, जेवण, केक मन अगदी तृप्त झालंय आणि मला झोपपण खूप येतेय, तेव्हा मी झोपतो उद्या सकाळी जरा उशिरा जाईन 10 वाजता, साहेबांना बोलून आलोय तस. गुड night.” एवढा मोठा मोनोलॉग बोलून सारंग झोपायला निघून पण गेला.
शुभदाच डोकं सुन्न झालं,” हे काय चाललंय? आज सकाळपासून हा माणुस माझ्याबरोबर होता, आम्हीं दोघांनी मिळून जेवण केलं, केक केला, रात्रीच एकत्र जेवलो आणि हा म्हणतो मी दिवसभर ड्युटी करत होतो. मी वेडी झाली आहे की हा? आणि सकाळपासून इतका रोमँटिक वागला आणि आता परत येरे माझ्या मागल्या करत अरसिक झाला? मला भास होत आहेत की एकटेपणा मुळे मी स्वतःचेच आभासी जग बनवले आहे. पण तस असत तर ही सजावट, हे जेवण, हे ग्रिटींग आणि…………. हो ती चिट्ठी. शुभदाने धावत जाऊन ड्रॉवर मधली चिठ्ठी वाचायला घेतली.
प्रिय शुभदा,
या चिठ्ठी ला कशी सुरवात करू समजत नाही पण आतापर्यंत तुला हे तर समजलेच असेल की सकाळपासून तुझ्याबरोबर असणारा सारंग हा सारंग नव्हताच कारण तो मी होतो सारंगच रूप घेऊन आलेला एक अनाहूत पाहुणा.आता तुला उत्सूकता असेलच की मी कोण? का आलो? कशाला आलो? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चिट्ठी मध्ये आहेत.
या चिठ्ठी ला कशी सुरवात करू समजत नाही पण आतापर्यंत तुला हे तर समजलेच असेल की सकाळपासून तुझ्याबरोबर असणारा सारंग हा सारंग नव्हताच कारण तो मी होतो सारंगच रूप घेऊन आलेला एक अनाहूत पाहुणा.आता तुला उत्सूकता असेलच की मी कोण? का आलो? कशाला आलो? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चिट्ठी मध्ये आहेत.
तुला आठवतंय शुभदा तुझी एक आत्या होती तिचही नाव शुभदा होतं मी तिचा नवरा कै विट्ठल पाठारे. हो बरोबर वाचलस तू मी सुद्धा या जगात नाही आहे आत्ता. तुला कदाचित माहीतही नसेल तुझ्या आत्याने आत्महत्या केली होती. या आत्महत्येचं कारण तिने स्पष्ट केलं नव्हतं पण मला माहित होतं की याला कारणीभूत मीच होतो.
एक नवरा म्हणून माझ्याकडून तिच्या काही अपेक्षा होत्या, ज्याला मी कधीच खरा उतरलो नाही ही खंत आयुष्यभर माझ्या मनात राहिली म्हणून मरून सुद्धा माझ्या आत्म्याला गती मिळाली नाही आणि मी इथेच घुटमळत राहिलो.
एक नवरा म्हणून माझ्याकडून तिच्या काही अपेक्षा होत्या, ज्याला मी कधीच खरा उतरलो नाही ही खंत आयुष्यभर माझ्या मनात राहिली म्हणून मरून सुद्धा माझ्या आत्म्याला गती मिळाली नाही आणि मी इथेच घुटमळत राहिलो.
आता तू म्हणशील या सर्व गोष्टींचा तुझ्याशी काय संबंध आणि मी तुला सारंग रूपात दर्शन देऊन काय साध्य केलं? तर ऐक तुझा जन्म हा माझ्या शुभदाचा पुनर्जन्म आहे. ती गेल्यानंतर बरोब्बर 9 महिन्यांनी तुझा जन्म झाला. तुझा चेहरा, तुझी देहवाणी ही हुबेहूब तिच्यासारखीच.
गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही दोघं या पोलीस क्वार्टर मध्ये शिफ्ट झालात तेव्हा मी तुला बघून क्षणभर अचंबित झालो आणि एक क्षणी वाटलं की, माझी शुभदाच परत आली.
मी सतत तुम्हा दोघांवरती लक्ष ठेऊन होतो आणि तुम्हा दोघांना बघताना सतत मला आमचा संसार प्रवास आठवत होता. आणि खरं सांगू मला हे बघताना मला आमच्या आणि तुमच्या संसारात तसूभरही फरक जाणवला नाही.
तुझ्या डोळ्यात सुद्धा मला तीच प्रेमाची भूक दिसली जी मी माझ्या शुभदाच्या डोळ्यात मरताना पहिली होती. . मरताना माझी शुभदा मला बोलली होती की,” तुम्ही माझ्यावर कधी प्रेम केलच नाही मग अश्या जगण्याचा काय उपयोग ते संपवलेलच बरं”.
तुझी शुभदा आत्या आणि मी याच पोलीस क्वार्टर मध्ये तुम्ही राहत असलेल्या रूम मध्ये राहत होतो. माझही रुटीन तुझ्या सारंगपेक्षा वेगळ नव्हतं आणि कामाच्या व्यस्तपणामुळे माझ्यातलाही भावनिक ओलावा हा जणू संपलेलाच होता. घर म्हणजे माझ्यासाठी तुझ्या नवऱ्यासारख लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग झाले होते.
तुझ्यासारख्याच तुझ्या आत्याच्या काही माफक प्रेमाच्या अपेक्षा होत्या ज्या माझ्याकडून नकळतपणे कधी पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळेच की काय तिला नैराश्याने ग्रासले आणि लग्नाच्या वर्षभरातच तिने स्वतःला संपवले. कारण जरी क्षुल्लक असल तरी मी माझा पतीधर्म निभावू शकलो नाही याची रुखरुख आयुष्यभर राहिली म्हणून मी दुसरा विवाहही केला नाही कारण मला पुन्हा दुसऱ्या शुभदाचा भ्रमनिरास करायचा नव्हता.
हे सगळं जेव्हा मी विचार करत बसलो, तेव्हा मला वाटलं की पुनर्जन्म घेऊन सुद्धा हिच्या नशिबी पुन्हा तेच भोग का?, असा प्रश्न पडल्यावर मला माझ्या मुक्तीचा मार्ग सापडला. मी मग तुझ्या बाबतीत जास्तच हळवा झालो आणि तुमच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेऊ लागलो.मला अजून एक शुभदा गमवायची नव्हती त्यामुळे मी संधीच्या शोधत होतो की कधी तुला एकदा भेटतो.
जेव्हा पहिल्यांदा मी तुला पहिल तेव्हाच ठरवलं की या शुभदाला मी नेहमी हसत खेळत राहताना पाहणार. म्हणून मी परमात्म्याला पार्थना केली की मला एक दिवस माझ्या शुभदा सोबत तिच्या अपेक्षित स्वप्नवत जोडीदाराप्रमाणे जगू दे. तिला एक दिवसापुरता का होईना सांसारिक आणि पती प्रेम मिळू दे जो प्रत्येक विवाहित स्त्री चा हक्क आहे. त्यामुळे मी जे काही तुझ्याशी वागलो बोललो ते याच एक भावनेने की तुला तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक छान आनंद मिळू दे जो तुला तुझ्या आयुष्यभर पुरेल.
आम्ही पोलीस दिवसभर कुठल्या आणि कसल्या मानसिक अवस्थेतून जात असतो हे कदाचित वर्णनही करू शकणार नाही. मी स्वतः पोलीस असल्या कारणाने तुझ्या सारंगची अवस्था समजू शकतो पण पोरी एक सांगेन की नात्याला वेळ दे. घरसंसार तुम्ही बायका सांभाळता म्हणून तर आम्ही पुरुष बाहेर जाऊन काम करू शकतो जर तुम्हीच डळमळीत झालात तर घराची पडती बाजू सांभाळणे आम्हा पुरुषांना आजन्म जमणार नाही.
म्हणुन सांगतो समजून घे सारंगला तो अरसिक नाही आहे ग पण त्याची पोलिसाची नोकरी त्याला शाररिक आणि मानसिक दृष्ट्या इतकी थकवते की बाकीच्या गोष्टीसाठी त्याच्याकडे वेळच उरत नाही.
तुझ्या बरोबर घालवलेल्या या एका दिवसामुळे माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला आणि मी आता अनंतात विरून जाण्यासाठी मोकळा झालो. त्या परमेश्वराचे आणि तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर कारण तुमच्यामुळेच माझी स्वप्नवत जोडीदार होण्याची अंतिम इच्छा पूर्ण झाली आणि मला मोक्षप्राप्ती झाली.
शेवटचा निरोप पोरी, सुखी राहा, चांगला संसार कर. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहतील.
अनेक आशीर्वाद,
कै. विठ्ठल पाठारे
कै. विठ्ठल पाठारे
हे सर्व वाचल्यावर शुभदाला तिथेच भोवळ आली आणि ती जमिनीवर कोसळली. तो आवाज ऐकुन सारंग बाहेर आला आणि शुभदाला त्याने पाणी मारून शुद्धीवर आणले. तिला त्याने तिथून आणून सोफ्यावर बसवले आणि धावत जाऊन तिच्यासाठी पाणी घेऊन आला. मग तिला हळूहळू पाणी पाजले आणि तो बोलला “किती काम केलस आज दिवसभर एकटीने मग हे असा होणारच. चल उठ आणि झोपून जा जे काही राहिलंय ते मी आवरून ठेवतो. आणि हा सकाळी डब्बा करायला उठू नकोस, मी दुपारी कॅन्टीन मधून डब्बा पाठवायला सांगेन तुझ्यासाठी. चांगला आराम कर मग संध्याकाळी लवकर येईन मी जेवणाचं पार्सल घेऊन, तेव्हा उद्या सगळ्या कामांना सुट्टी द्यायची आणि आराम करायचा”.
शुभदा सारंग कडे बघताच राहिली आणि तिला ते पत्रातील वाक्य आठवलं “नात्याला थोडा वेळ दे” “उगाच वायफळ अपेक्षा करणारी मी, या सारंगला वर्षभरात ओळखुच शकले नाही माझा स्वनावत जोडीदार समोर असूनही मी उगाचच स्वतःला कोसत बसली” असा विचार करतच शुभदाला झोप कधी लागली ते कळालच नाही.
अशा रीतीने एका अतृप्त आत्म्याने या दोघांच्या नात्याची वीण अजून घट्ट केली होती आणि त्याच्या सांसारिक जिवनाची नव्याने सुरुवात करून दिली होती……
समाप्त