🌰 कतरी सुपारी🌰
🔖 भाग ::-- पहिला
आषाढानं खान्देशाला चांगलंच झोपडल्यानं तापीला उधाण आलं होतं. हतनूर धरण व सर्व बॅरेजचे दरवाजे उघडल्याने उकाई धरणाची विसर्ग होऊनही काठोकाठ भरत पातळी वाढतच होती.आज अमावास्या उगवली ती धुवाधार पावसानं व झडीनंच.दिवसभर पावसानं क्षणाची ही उसंत घेतली नव्हती. जिकडे तिकडे शेतात पाणीच पाणी व त्यात उकाईचं बॅकवाटर उसासा भरत चालून येत असल्यानं माणसाची धडकी भरत होती. सुरत -नागपूर हाय वे ही आज संथ झाला होता.मधेच चुकारल्यागत एक दोन ट्रक अंधार व पाऊस चिरत जातांना दिसे. जातांना मात्र पाण्याच्या चिरकांड्यांचा आवाज चिरके. नवजीत सरदार गिऱ्हाईक नसल्यानं अकरा वाजताच आवर सावर करत ढाब्याची भट्टी पेटवत शेकत बसला. त्यानं माणसांना आज लवकर घरी पाठवून दिलं होतं.फक्त अन्वर व दगडू थांबले होते. दगडूनं त्यांना चहा देत दोन पलंग भट्टीजवळ ओढून आणत अंथरूण टाकलं. ढाब्याच्या मागच्या बाजूनं बांधकाम होत असलेल्या
'साई डायमंड'- हिरा कारखानापर्यंत उकाई धरणाचं पाणी वाढत होतं. रातकिडे मात्र पडत्या पावसात ही तारस्वरात किरकिरत होते. त्यात बेडकांचं डरावणं, धाराचा आवाज अंधारात भयानकता आणत होता.अन्वर व नवजीत सरदारानं चहा मारत पलंगावर पाठ टेकवली.
" सरदारा, आज तो कयामत की रात दिख रहेली.अल्ला के दिल मे आज क्या चल रहा मालूम नही!"
" वाहे गुरू की फतेह! इतनी बरसात तो मैनै पंजाब मे भी नही देखी! फिर भी सबकुछ ठिक ही होंगा तू सो जा अभी" सरदारानं आपल्या माणसांना धीर दिला.
एक कार आली ढाब्याजवळ थांबली.जोडपं उतरलं.भट्टीजवळ उबेला थांबत चहा मागवला.दगडू मागे भांडी घासायला गेल्यानं अन्वरनं किटलीतला चहा दिला. चहा मारत धुळ्याकडं रवाना झाले. आता अन्वर व सरदारानं पांघरूण ओढत ताणून दिलं. पण दगडू मागून अजुन परतलाच नाही. धरणाकडंनं ' टिटिव टिव, टिटि टिटिव टिव!' सर्द आवाज घुमला.पावसाचा आवाज साऱ्या आवाजाला दडपत असतांना टिटवीच्या आवाजातील कर्कशता व भेसुरता मात्र मात करत होती. दगडू मात्र अजुनही झपाटल्यागत धुंदीत भांडीच घासत होता. झोप येऊ पाहणाऱ्या सरदारा त्या आवाजानं चाळवला.' ये शैतान क्यू चिल्ला रही' मनातल्या मनात तो अर्धवट झोपेत बडबडला. पुरात अनेकदा वाहून येत धरणात प्रेतं तरंगतात.ते पाहून टिटवी ओरडत असावी. टिटवी आता ढाब्याच्या आसपासच ओरडत होती. तिच्या आवाजात सारे आवाज क्षीण झाले. दगडूची नजर भांडी घासता घासता महाकाय धरणाच्या जलाशयाकडं गेली.अंधारात काहीच दिसत नसतांनाही त्याला पाणी कितपत वाढलंय याचा अंदाज येत होता. तोच लांब ऊसाच्या शेतातून कोल्ह्यानं हुकी दिली. आकाशातील कृष्णमेघात विजेची काकरी उमटताच दगडूला पाण्याच्या काठावर हालचाल दिसली.त्याचे हात आपोआप थांबले.त्यानं बादलीत हात बुडवत धुतले व तो खाडकन उभा राहिला. आता टिटवी गिल्ला करत परत माघारी फिरली व काठाकडं निघाली.पुन्हा विजेचा प्रकाश चमकला.दगडू सावधच होता ,त्यानं हालचाल टिपली.पण त्याचा विश्वास बसेना.पुन्हा एकवेळ खात्री करावी,या बेतानं तो अंधारात डोळे खुपसू लागला. ऊसाच्या फडातली कोल्हेकुई आता जवळ येत वाढत होती.मध्येच टुकारल्यागत ढगांचा गडगडाट झाला नी आता विजेचा चमचमाट तीव्र व दिर्घ टिकला. दगडू हबकलाच.धरणाच्या काठावर बाई अंघोळ करतांना दिसल्याची त्याची पुरेपुर खात्री झाली. बाई नी अंघोळ? या अवेळी? पडत्या पावसात? गाळाचा व पाण्याचा अंदाज नसलेल्या धरणात? टिटवीच्या आवाजागतच दगडूच्या मनात प्रश्नाची राड उठली. तो दाराजवळच उभा राहत पुन्हा विज चमकण्याची वाट पाहू लागला. तोच लख्ख प्रकाश पडला नी आता स्पष्ट कुणी तरी बाई भिजत्या साडीनं अंघोळ उरकत ढाब्याकडं सरकत असतांना त्यानं भर नदरी पाहिलं नी तसाच धाडकन दार बंद करत तो सरदारा व अन्वरमध्ये भट्टीजवळ येऊन गोधडी ओढत पडला.पण मनात उठणारे प्रश्न त्याला झोपू देईनात.सरदाराला सांगावं का? सरदार व अन्वर घोरू लागलेले. पाहू काय होतंय ते! निवांत पडलेलंच बरं, असा विचार करत तो पडला.बराच वेळ शांततेत गेला.पडत्या धारात दोघांचं घोरणं लय पकडत होतं. टिटवीचा आवाज शांत झाला. दगडूस झोप येईच ना. तोच पावसानं दिशा बदलली. दक्षिणेकडून पाण्याची वरसाड भट्टी व अंथरूण ओलं करू लागली. पण दगडू जागा असूनही उठण्यास धजेना. तो गोधडी हलकेच उचकावत अंधारात सासूल घेऊ लागला. पण काहीच दिसेना. तोच सरदार उठला. त्यानं दोघांना हलवत उठवलं व पलंग मधल्या भागात ओढले. अन्वरने भट्टीत पाणी जातंय पाहताच पत्रा आणत अर्धा झाकला. दगडू मात्र सांगावं की नको याच बेतात विचारात गडत त्यानं बॅटरी लावली. सकाळपासून पावसानं लाईट नव्हतीच. सरदार व अन्वर जागे आहेत तोवर त्यानं बॅटरी घेत मागचं दार हळूच उघडत कानोसा घेतला. काहीच दिसेना. काठाकडं बॅटरीचा झोत टाकला.पाण्याच्या लाटा उठतांना दिसत होत्या धारा बरसतांना दिसत होत्या. त्यानं चहूबाजूस पाहिलं पण कुणीच दिसेना.असेल एखादी बाई अंघोळीला आलेली व निघून गेली असावी.असा विचार करत तो येऊन झोपला. पण आजुबाजुला तीन चार किमीपर्यंत गाव नाही.हिरा कारखान्याचं काम पंधरा दिवसापासुन बंद असल्यानं मजुरही कोणी नाही.मग या वेळेस बाई? तो बावरलाच तरी.पण हाय वे जवळ.ट्रकवाले कधी काय घेऊन येतील नेम नाही.आणली असावी एखाद्यानं सोबत.जाऊ द्या.म्हणत तो झोपू लागला. झोप तरळली.सरदारा ही झोपला.पण आता अन्वरला झोप येईना. भट्टी झाकून परतलेला अन्वर डासाची भुणभुण व पाण्याच्या धारांची सरसर ऐकत अंधारात पडला. रस्त्यावरून भर्रर्र, सर्रर्र sssss करत वाहन गेलं.अन्वरचे कान आता साऱ्या आवाजाला सरावले.त्याला आता त्या आवाजातही निरवता जाणवू लागली. नी अचानक दोनेक कुत्री जोरजोरानं भुंकत जवळ येत असल्याचा आवाज त्याच्या कानावर घुमू लागला. कुत्री मध्येच भुंकत होती तर मध्येच विव्हळत आक्रोश करत होती. अन्वर पडल्या पडल्या आवाज ऐकत होता. आवाज आता ढाब्याच्या जवळ येत होता. कुत्री तर कुणाचा तरी पाठलाग करत असल्यासारखी भुंकतच,विव्हळतच होती. अन्वर आता आवाजाच्या दिशेने कानी झाला. सरदार व दगडू निवांत घाटावर गाडी फुल्ल मोसममध्ये चढावी तसे घोरत होते. कुत्रे अचानक कुणी तरी दगड भिरकावला असावा तसल्या धोऱ्यात क्यांऊ क्यांऊ करत शेपटी खाली टाकत माघार घेत असावेत. अन्वरचे छातीचे ठोके जोर धरू लागले. त्याचे कान, चित्त आवाजाच्या दिशेने पडल्या पडल्या फिरू लागले. मागच्या भिंतीला कुणीतरी सायकल उभी करत असल्याचं त्यानं अंधारातही ओळखलं. आता आवाज थोडा शांत झाला. अन्वरचे वाढलेले ठोके कमी नाही पण आहे त्या गतीवर
स्थिरावले व केव्हाही वाढतील या बेतात मन तयारी करू लागलं. तोच कुत्रे दूर जात पुन्हा पवित्रा घेत भुंकू लागले.मात्र आवाज आता पुढच्या बाजूला सरकू लागला.
" कोण आहे का?"
पुढच्या उघड्या दारासमोर आवाज घुमला.अन्वरला वाटलं सरदार वा दगडूनं आता उठावं.पण ते निवांत घोरत होते. अन्वर ने धडधडत्या छातीनं हिम्मत जुटवली. दगडूच्या उशाशी ठेवलेली बॅटरी उचलत सुरू करत समोर चमकवली. तोच त्या माणसानं तोंडावर हात आणत तोंड फिरवलं.
" कोण? कोण हवंय?" अन्वरनं समोर बनियनवर पुरा ओला असलेल्या व दोन्ही खांद्यावर काही तरी अडकवलेल्या माणसास विचारलं.
" मी चमन चव्हाण! "
" तो फिर? क्या चाहिए?" अन्वर पलंगावर उठत बसला.
" मालक मासे पकडून आणलेत! तुमचा ढाबा आहे,तुम्हास लागतातच ना!"
या वेळेस? नी इतक्या पुरात कुठून मासे मिळालेत तुला? अन्वर पुढे भट्टीकडं येत म्हणाला.
एका खांद्यावर मासे पकडण्याचं जाळं तर दुसऱ्या खाद्यावरील जाळ्यात पाच सहा किलोचा एक नग भरेल असे चार नग बॅटरीच्या उजेडात दिसत होते.मासे अजुनही जिवंत होते.ते जाळ्यात उड्या मारत तडफड करत होते. अन्वरला मात्र त्याच्याकडं पाहतांना काही तरी खटकत होतं.पण काय ते समजेना.
" मालक ! जिवंत आहेत,घ्या ना?"
" अरे भाई इतनी बरसात मे यहा मच्छी खाने को कोण आ रहा है,वो भी इतनी रात मे?"
" तसं नाही मालक, आता घेऊन ठेवा, हवं तर मागं धरणाच्या पाण्यात मी खुंटी मारून बांधून देतो, उद्या दिवसभर केव्हाही ताजी मिळतील! "
" नही भाई, बरसात मे कोई रूकता नही ,तेरी मच्छी लेके क्या करना! पर एक बात समज मे नही आयी मुझे? "
" क्या मालक?"
" इतनी बरसात मे, इतने सैतानी मौसम मे तुझे मच्छी मिली किधर?"
" मालक, पोट नी इज्जत माणसाला बरोबर उठवते!"
" मतलब? मै समजा नही?"
" मालक माझी चांदणी उपाशी होती! मग काय टाकली उडी पडत्या पावसात धरणात उडी! नी मिळाले मासे!"
" तोहबा, तोहबा! तू आदमी है या शैतान? इतने खतरे मे जान डालके मच्छी पकडी!
'"शैतान को आदमी ही समज लो साहब पर लेलो! सस्ता बेच दुंगा!"
सस्ताच्या गडबडीत तो काय बोलला हे अन्वरला समजलंच नाही"
"क्या भाव लगायेगा?"
" मालक असं तर शंभर रूपये किलोनं व्यापारी नेतात पण तुम्हास पन्नास रूपये लावतो!"
भाव व ताजा माल पाहत , नाही ढाब्यावर तर धुळ्याला ट्रकवर पाठवून देऊ असा विचार करत अन्वर तयार झाला.
" चल रख दे! कल सुबह मे आकर हिसाब लेके जाना "
" मालक पंचविस किलो येणारच, दोऱ्या द्या मी धरणात बांधून येतो पण पैसे लगेच मिळाले तर बरं होईल! नाहक उद्या लांबून पुन्हा येण्यापेक्षा!"
"मालिक अभी सोया है,कल सुबह आके ले जाना!" म्हणत अन्वरनं दोऱ्या दिल्या. चमननं ढाब्याच्या मागं जातं धरणात गुडघाभर पाण्यात खुट्या गाडत माशांना नाथन घालत पाण्यात सोडलं. लांबून बॅटरी दाखवत अन्वर उभा राहिला.
" मालक सकाळी येतो!" म्हणत सायकलीवर टांग टाकत तो निघून गेला.अन्वर पलंगावर येत खुशीत झोपला. पण त्याच्या गडबडीचा आवाजानं सरदार उठला.लघुशंका करून येत खाकरत " अन्वर कौन आया था?" विचारू लागला.
" कोई नही मालिक सो जावो कल देखेंगे!" म्हणत अन्वरनं विषय टाळत झोपणं पसंद केलं.आता अन्वरही लगेच दगडूलासाथ देत घोरणार होता.
सरदारनं चिलम काढली पलंगावर बसवून शिलगावली.अदमास ला्वत दोन वाजल्याचा त्यानं अंदाज बांधला. चिलीम ओढत तो विचार करू लागला. आपल्या सरदारणीला भेटून जवळपास एक वर्ष होत आलं.आपण सोनगीरचा ढाबा सोडला व हा चालवायला घेतला. तसं घराकडं गेलोच नाही. त्याला आता आपली सरदारणी चिलमीच्या वलयात दिसतेय असा भास होऊ लागला.
तो समोरच्या हाय वे कडं अंधारात पाहू लागला. पावसाची झड व तुफानी वारा या शिवाय रस्त्यावर काहीच नव्हतं. तोच त्याला साखळ्यांचा नाजूक किनरा आवाज ऐकू येऊ लागला. तो दचकला.पण लगेच सरदारणीच्या यादेनं आपणास भास होतोय हे त्यानं ओळखलं व चिलीम मालवत तो पलंगावर आडवा होऊ लागला. तोच समोर डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन कुणीतरी येत असल्याचं त्यानं पाहिलं. एवढ्या
रात्री सन्नाट्यात बाई! त्याला अचरज वाटलं. बाईनं अंगणात मोळी फेकत भट्टीजवळ येत कपाळावरील व केसातील पाणी झटकू लागली.सरदार पलंगावर उठून बसला. त्यानं मुद्दाम खाकरत बॅटरीचा फोकस तिरकस भिंतीवर करत चालू केला. फोकसच्या तिरप्या छटेत पांढऱ्या साडीतील बाईनं डोक्यावरील पदर हातानं निपटला. जोरानं झटकत तो पुन्हा डोक्यावर घेतला. सरदार हुरहुरला विचारता झाला.
" कोण? "
" मालक, मी चमन चव्हाणाची चांदणी! मोळी विकायचीय, घेता का?"
" बाई तुला सकाळ उगवणारच नव्हती का? एवढ्या रातीची मोळी घेऊन फिरतेय?" सरदारला खानदेशात बरीच वर्ष झाल्यानं तो गिऱ्हाईक पाहून मराठी, हिन्दी, पंजाबी बोले.
" तसं नाही पण दिवसा बाहेर निघणं नाही जमत ना!" ती आता खोल पाहू लागली. सरदारानं उठत तिला मागे मोळी टाकायला लावली.
" मालक पैसे काढा, तोवर मी पाणी पिऊन येतेय, घसा ओढला जातोय हो....! या हरामींनी काहीतरी कालवलंय हो! पाणी....पाणी....."
पडत्या मरणाच्या पावसात हिला तहान लागलीय यानं सरदार बावचळला.
" तो समोर किचनमध्ये माठ आहे बघ , घे तिथून पाणी!"
त्या बाईला काय वाटलं पण ती मागच्या दारानं पळतच पाणीssss,पाणीsssss करत धरणाकडं पळाली.
सरदार मागून " अगं थांब हे पाणी घे! तिकडे एवढ्या रात्री धरणावर कशाला जातेस?" म्हणत ओरडू लागला.पण तोच त्याला मनात आपण रात्रीचं तिला एकटीला किचन मध्ये पाणी प्यायला पाठवत होतो म्हणून ती घाबरून पळत असेल.पण आपल्या मनात तर तसं नव्हतं काही.
त्यानं गल्ल्यातून मोळीचे पैसे काढले व तो तिची वाट पाहू लागला. बराच उशीर झाला तरी येत नाही म्हटल्यावर तो गल्ल्यावरून उठला व बॅटरी घेत धरणाकडं निघालं.धरणाच्या पाण्यात पहाटपर्यंत फिरत राहिला. उजेड पडताच दगडू व अन्वर उठला. दगडू रात्री धरणात बाई अंघोळ करत होती त्या जागेकडं पाहू लागला. तर अन्वरनं त्यास आपण रात्री चमनकडंनं मासे घेतलेत व धरणात बांधून ठेवल्याचं सांगितलं.दगडू व तो उठत तिकडे निघाले तर सरदार तिथेच छातीएवढ्या पाण्यात उभा असलेला दिसला.त्याचे पाय गळात रुतून बसलेले. दोघांनी त्याला बाहेर काढलं.
" अरे रात्री कुणी तरी चांदणी नावाची बाई मोळी विकायला आली व पाणी प्यायला इकडे आली.तिलाच शोधतोय मी!" सरदार म्हणाला.
" मालिक उसका मर्द चमन चव्हाण भी रातको आया था, उसके पास से मैने भी मच्छी लेकर इधरच बांध के रखी है!" अन्वर म्हणाला. दगडू गारठला त्यानं ओळखलं. सावध होत त्यानं त्याला " कुठं बांधली दाखव?" विचारलं.अन्वर त्याला तेथेच घेऊन चालला होता जिथं रात्री बाई अंघोळ करत होती. अन्वरनं खुटींना बांधलेल्या दोऱ्या ओढल्या......
प्रत्येक दोरीस सापळे बांधलेले.एक ही मासा नाही,चारही मानवी सापळे, सांगाडे.....
दगडू ,अन्वर, सरदार बिथरले. पाण्यात पिवळ्या गरम पाण्याच्या धारा मिसळल्या व तिघेही वेगवेळ्या इस्पितळात दाखल झाले.
.
.
.
क्रमश:....

✒ वासुदेव पाटील.