सोनमूस
🔖 भाग::-- तिसरा
दोन दिवसानंतर रामा दवाखान्यात गेल्यावर त्याला आई- वडिल न दिसताच चौकशी केल्यावर त्यास डिस्चार्ज दिल्याचं कळालं.त्यानं कृष्णास आधी फोन केला.पण कृष्णानही माझ्याकडं आई- वडिल आले नाहीत सांगताच रामाला सुराची शंका आली व त्यानं मोबाईल काढत संपर्क केला.
" सुरेश! अप्पा माई गावाला आलेत का?"
" होय दादा."
" कोणी आणलं त्यांना गावास?"
" दादा ,मी व शेवंता गेलो होतो."
" सुऱ्या ,तुला अक्कल नावाची चीज आहे का? निदान कळवता नाही येत का मग? आम्ही किती परेशान झालोत?"
" दादा.....!"
" तोंड बंद कर तुझं! उद्या येतो आम्ही तिथं!" म्हणत संतापात रामानं फोन कट केला.
सुराला काही सांगताच आलं नाही.

दुसऱ्या दिवशी रामा, कृष्णा,प्रेमा व सुमा चारही आमोनीस आले.
आल्या आल्या अप्पा व माईला त्यांनी झापायला सुरूवात केली.तोच सुरा व शेवंता आली.
" अप्पा ,निदान तुम्हाला तरी मॅनर्स कळायला हवेत!" रामा रागानं लाल होत फणाणला.
" पोरा! आम्ही गावरान माणसं! ते आम्हास कसं कळणार! आयुष्यात शिकवणारं तुमच्यासारखं कुणी मिळालंच नाही." अप्पा कडवटपणे हळूवार बोलले.
" सुऱ्या! निदान तुझी तरी अक्कल शाबूत होती ना! का तुझी पण गेली होती चारावयास! एवढं पेशंट आणलं तर घरच्यांना एका शब्दानं कळवावं तरी!"
" दादा मी......"
" सुरा , काही गरज नाही स्पष्टीकरण द्यायची!"
अप्पानं सुरास मध्येच थांबवलं. कारण त्यांनी दवाखान्यातून निघतांना घरी सुराला काॅल करायला लावला होता.तो नेमका सुमाच्या वडिलांनी उचलला होता. मी सांगतो म्हणून त्यांनी कळवलं होतं. तरी पुन्हा सकाळी आमोनीला आल्या आल्या त्यांनी पुन्हा सुराला फोन करावयास लावला.तेव्हाही त्यांनीच उचलला
' असो अप्पा,किती वेळा कळवणार! पोहोचले ना! सांगितलं मी सुमाला!' सांगत फोन कट केला होता.
सुमीनं ओळखलं आता प्रकरण आपल्या च अंगलट येईल.म्हणून ती लगेच मध्ये टपकली.
" अहो! जाऊ द्या ना! का उगाच त्रागा करता! घरच्यांनाच कदर नाही म्हटल्यावर का आटापिटा करताहेत! नी यांनीच इतरांना डोक्यावर चढवलंय म्हणून तर दुसरे शेफारून फूस लावता!" सुमी सुराकडं तिरकस पाहत बोलताच सुराच्या काळजात कळ उठली. पण त्याला अप्पाचे उपकार माहित असल्यानं त्यानं दुर्लक्ष केलं.
" दादा, जाऊ द्या.मी ही आणलं तर काय परका आहे का? आपणास त्रास झाला माझ्या एका चुकीनं.पण आता मस्त रहा एक दोन दिवस मी करतो सारी व्यवस्था!" त्यानं वादास कलाटणी देण्याचा प्रयत्न केला.
" अप्पा, तुम्हास आम्ही प्रेमानं आमच्याकडं नेतो तर सुखानं राहायचं सोडून उठसूट केव्हाही न कळवता लहान पोरांसारखं निघून येतात,हे शोभतं का!" आता कृष्णा तावानं बोलू लागला.
" मला काय शोभतं हे आता तू मला शिकवणार का? अरे तुमच्या दारात आम्हास किती किती बिरूदावल्या मुक्तकंठानं प्रदान केल्या जातात.......जाऊ दे! "
" अहो भावजी ,आता यांच्याकडून होतंय म्हणून हे असं वागता.पण यांना कळायला हवं शेवटी पाणी द्यायला, बाल द्यायला, यांचं दु:खं धरायला तर आपणच येणार ना! या गोष्टी गाववाले थोडे करणार! आपल्या शिवाय यांना सद्गती तरी मिळेल का!! तिथं परके काय कामाचे!" सुमा कृष्णाच्या साथीनं वर्मावर वार करू लागली.
" पहा ना हो ,पडत्या काळात यांची बडदास्त दुसरं कोण पाहणार हो! यांना कळायला हवं!" प्रेमाही टपकली.
" सुरा! जेव्हा तुझा मी हात धरला व घरी आणलं,तो दिवस आठव! तुला त्या दिवसाची आण आहे. मी मेलो तर पाया ला दोर बांधून हवं तर मसणात ओढत ने! पण यांची सावलीही माझ्या प्रेतावर पडू देऊ नकोस! तुला तुझ्या या दत्तक बापाची आण आहे!" अप्पा जवळच्या भिंती च्या आधारानं उभे राहत थरथर करत संतापू लागले. त्याच्या डोळ्यातल्या आगीनं कानाच्या पाळ्याही लाल झाल्या!
गोजरबाईनं रामा व कृष्णापुढं हात जोडत विषय थांबवायला लावला.
" रामा व कृष्णानं गावात फिरून घर विकण्याबाबत कळवलं.
गावातील काही नी अप्पा व गोजरमाई कुठं राहणार म्हणून पृच्छा केल्यावर त्यांना आम्ही सोबत नेणार असल्याचं सांगितलं व निघून गेले.
अप्पाचं घर ऐन चौकात दगड चुन्याच्या भिंतीचं दिमाखदार असं होतं.
जाता जाता रामा व कृष्णानं अप्पांना घर विक्रीबाबत सांगितलं. त्यांना वाटलं अप्पा आरडाओरडा करतील.पण अप्पा काहीच बोलले नाहीत. फक्त " विका ! आमचं काय आम्ही खळ्यात चाललं जाऊ!" एवढंच विषण्णतेनं बोलले. पण सुरास कळताच त्याला खूप वाईट वाटलं. आताची परिस्थिती पाहता ते आपणास विकणार नाहीत व मागेच शेताचा सौदा केल्यानं तो ही अडचणीतच होता.
अप्पाचं घर जाणं त्याच्या काळजाला चरे पाडत होतं अप्पाला त्यानं त्याच्या भाड्याच्या घरात रहायला बोलवलं. पण अप्पा व माईनं न ऐकता खळ्यातला गोठाच जवळ केला. सुराला माहित होतं अप्पा ऐकणार नाही.म्हणून त्यानं व शेवंतानं स्वत: माणसं लावून गोठा साफ केला.
अप्पा व माईचं अजिबात न ऐकता शेवंता घरूनच त्यांना दोन्ही वेळचं जेवण पोहोचवू लागली. रात्रीचं जेवण तर सुरा शेवंताही खळ्यातच अप्पासोबत करत.
अप्पा सकाळी दररोज मळ्यातल्या दिड दोन एकर मरत भाग काढलेल्या शेतात जाऊन काहीना काही करत. सुरानं तिथं विविध फुलांची शेती करून दिलेली. अप्पा फुलझाडांची छाटणी, फुलांची तोडणी, पाणी देणं असली कामं लखासोबत हौसेनं करत. ज्याचं सारं आयुष्य राबण्यात गेलं त्याला आराम कसा सहन होईल.
दुपारी सुरा शेतात आला.
" सुरा! हा मधला बांध काढ बाबा आता! आठ एकराचं एक सलग रान मस्त वाटेल!"
" अप्पा तुम्ही नाही काढला कधी तर मी का उगाच काढू!"
" पोरा तसं नाही रे पण काढ त्याला!"
सुरानं अप्पानं सांगितलं म्हणून बरंच शेत अडकवून बसलेला शेतातला चवडा बांध काढायचं मनावर घेतलं. फोन करत ड्रायव्हरला नांगर जोडून ट्रॅक्टर आणावयास लावलं.
पिढ्यान पिढ्याचा बांध ट्रॅक्टर नांगरानं काढू लागलं. अप्पाचं चार एकर गट व पाच सहा एकराचा गट यामधला तो बांध होता. सुरानं चार एकर व नंतर चार एकर घेऊनही तो तसाच ठेवलेला होता.
अप्पा धावेवर बसले होते. ट्रक्टर टरार टर..टर. करत बांध काढत होतं. बांधाच्या मधोमध एक खैराचं खुट होतं.ते ड्रायव्हर नं तसंच सोडलं. अप्पानं धावेच्या झोपडीतून कुऱ्हाड आणत सुराकडं देत खुट काढायला लावलं व ते घराकडं निघाले.
सुरानं घावटी धरत खुट तोडलं. नंतर खोड काढण्यासाठी तो नांगरलेली माती बाजुला करू लागला. तोच त्याला माती कोरता कोरता खड्ड्यात धपाढ्यात काहीतरी चमकलं. त्यानं टिकाव कुऱ्हाडकडं फेकत काडी घेत माती कोरली नी चमकलाच. कोरता कोरता त्यानं भली मोठी तम्हाण (ताट) बाहेर काढली. त्यानं चमकणारा ताट कुणाला दिसणार नाही असा रूमालात गुंढाळला व घराकडं निघाला.
अप्पांनी बांध काढावयास लावल्याचं गमक त्यास कळालं.
अप्पाचं रान पूर्वी सुलतानाची गढी होती त्याच भागात असल्याचं तो ही लहानपणापासून ऐकत आला होता व पावसाळ्यात पावसानं वरची माती वाहू लागल्यावर काहीना काही किडूकमिडूक सापडतं हे त्यानं पाहिलंही होतं. पण आज तर त्याला.....
सुरानं रात्री शेवंताला घेत जेवणाचा डबा घेत खळं गाठलं.
अप्पापुढं ती सोन्याची तीन शेर - किलो वजनाची सोन्याची तम्हाण ठेवली.
" अप्पा ही तुमचीच अमानत!"
" सुरा काय हे? कुठं सापडली?" ताटासारखी पण उभ्या काठाच्या पिवळ्या तम्हाणीकडं पाहत अप्पांनी विचारलं.
" अप्पा, तुम्ही बांध काढायला लावला नी त्या खैराच्या झाडाचं खोड तोडायला लावलं.त्याखालीच सापडली. घ्या ती!"
" अरे व्वा! नशीबवान आहेस पोरा! देव पावला बघ तुला!"
" अप्पा! शेत तुमचं होतं! तुम्हीच बांध काढायला लावला! त्यावर तुमचाच हक्क. ती मी घेणार नाही!"
अप्पाच्या डोळ्यातून आसवे गळायला लागली.
" सुरा! शेत होतं माझं! पण आता ते तुझं आहे ! त्यामुळं त्यावर तुझाच हक्क आहे!"
" पण अप्पा बांध काढायला लावला नसता तुम्ही तर मला कशाला सापडली असती! म्हणून ठेवा ती!"
" सुरा, देवानं मला भरपूर दिलं रे! पोटच्या पोरांना स्वार्थामुळं ते दिसत नाही तो भाग अलविदा.पण मला नको ते.कारण माझी आख्खी हयात तिथं राबण्यात गेली.पण तो बांध काढावा असं कधीच वाटलं नाही.कारण ते माझ्या नशीबात नव्हतंच. आणि नशीबानं जे दिलं ते माणसानं आनंदानं घ्यावं.ते पचतं ही. ते तुझ्याच नशीबी होतं"
" अप्पा, तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही.मला माहितीय. पण रामा व कृष्णा दादाला देईन मी!"
" सुरा! त्यांना स्वर्ग दिला तरी त्यांना कमीच पडेल.कारण हाव माणसाला तृप्ती मिळू देत नाही! म्हणून त्यांच्याकडं हा विषय ही काढू नकोस! कारण शेत विकलं विषय संपला."
अप्पा तुमच्या कृपेनं मला भरपूर मिळालं नी आता याचं काय करू?"
" माझं ऐक! त्यांनी घर विक्रीला काढलं पण गिऱ्हाईक मिळत नाही! तू त्यांना भेट व या पैशातून घर घेच! ते लालची आहेत.त्यांना चार पैसे जास्त मिळाले की ते विकतील कुणालाही!"
" अप्पा, घरं तुमच्या हयातीत दुसऱ्याकडं जावं हे मलाही वाटत नाही. म्हणून मी घर घेतो पण त्या घरात तुम्ही राहणार तरच! अन्यथा हे ताटही नको मला नी घर ही नको!"
सुराची मात्रा लागू होत अप्पांनी होकार दिला.
सुरानं नाशिकला ताट मोडत पुणं गाठलं व घराचा सौदा केला.
घराची खरेदी होताच अप्पा व माईला घेत तो स्वत:च्या घरात रहायला आला.
बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा पूर्ण कुटुंब एक झालं म्हणून सुरा व शेवंतास आनंद झाला. ते अप्पा व माईची मनापासून सेवा करत होते. पण मनात दु:खाच्या डागण्या असल्यानं अप्पांना समाधान लाभत नव्हतं.त्यांना 'गेटजवळचं कुत्रं, पेकाटात काठी घाल', 'परी फुग्यातली हवा निघाली की फुगा खाली येतोच, हवा पडली की पतंग मातीत मिसळतो' या डागण्या आठवल्या की हा देह नकोच असं वाटे. पण हा देह पडला की मग पुन्हा त्यांचे हात पडतीलच. ते बाल देतीलच, नाटकी दु:खं धरतीलच. सुराची कितीही इच्छा असेल तरी ते वा गाव सुरास पाणी देऊच देणार नाहीत. यातून मार्ग कसा काढावा. गोजरची तब्येत ही हल्ली बरी नाहीच. त्यात आधी गोजरनं राम म्हणावा म्हणजे आपण मोकळे. पण आपण जर आधी गेलो तर मग गोजरचं काय! सुरा वागेल पण तरी.....
त्यांना आतून वाळवी खाऊ लागली.
" अप्पा! काही चुकतंय का आमच्याकडून?" सुरानं काळजीत राहणाऱ्या अप्पानं विचारलंच.
" पोरा! तू तर सोन्याची मूस आहेस बाळा आमची!"
" मग का चिंतेत असता?" सुरानं जेवण झाल्यावर अप्पाचे पाय चेपत विचारलं.
"......" अप्पानी निरव वाटावा असा भावानं ओथंबलेला सुस्कारा सोडला.
" अप्पा, एक विचारू का? "
" विचार!"
" काही करायचं बाकी असेल, कुठं फिरावंसं वाटत असेल, इच्छा असतील तर बिनघोर सांगा!"
" पोरा इच्छा, आकांक्षा ,लिप्सा, पिपासा या माणसास शेवटपर्यंत गोचिडसारख्या चिकटून असतातच.पण मला एक सांग आपलं माणूस कुणाला म्हणावं?"
"अप्पा रक्ताच्या नात्यानं बांधलेली, आपल्या दु:खानं धाय मोकलत रडत येणारी जिवाभावाची सारी ही आपलीच माणसं असतात!"
" सुरा ,नातं रक्ताचं असो,प्रेमाचं असो.त्यातली सारीच माणसं मरणावर कोगाट करत रडतात रे.पण यातली बरीच स्वार्थी असतात. रक्तातली लेक ही बापाच्या मरणावर येतांना छाती पिटत रडत येतांना जेव्हा पायातली चप्पल हळुच ओळखीचं घर पाहुन फेकते ना तेव्हा स्वार्थ लोभ काय असतो तर बापास वाट लावून चप्पल लगेच सापडावी.असा नाटकी कोगाट करणारी हजार लाखो नको.पण माणूस गेला हे समजताच न रडता ही अंतरातल्या कळेनं डोळ्यात टचकन पाणी येणारा एक तरी असावा! तोच आपला माणुस! आणि असा आपला माणुस माझ्याजवळ असल्यावर या गयभूस आणखी काय हवंय!".
सुरा ऐकून सुन्न झाला.
" सुरा आम्ही गेलो, त्यांनी नाही पाणी देऊ दिलं तरी नाराज होऊ नको. फक्त माझ्या मळ्यातच अत्यं विधी कर!"
अप्पा रात्रीच्या शांत वातावरणात धीर गंभीरतेनं बोलले नी शेवंता व सुरा बिलगून हमसून हमसून रडू लागले.
" अप्पा आम्हाला सोडून कुठं जायची भाषा करता! आम्ही नाही जाऊ देणार तुम्हास!"
" अरे पोरांनो आम्ही कुठं आता निघालो? नी मरण काय कुणाच्या हातात असतं का!" अप्पा नाटकी हसत आतला कोलाहल दाबू पाहत होते.
सकाळी सुरानं गोजर माय व अप्पाला नाशीकला नेलं अप्पा विरोध करत असतांनाही त्यानं ऐकलंच नाही. गोजर मायबाबत डाॅक्टरांनी काळजी घ्यायला लावली. अप्पांनी झोप लागत नाही सांगत झोपेच्या गोळ्या लिहावयास लावल्या.
" गरज असेल तरच गोळी घेत जा. सहसा टाळाच.कारण सवय लागली तर..."
रामाच्या कंपनीनं काही अधिकाऱ्यांना नविन प्रशिक्षणासाठी डिसेंबर मध्ये सहा महिन्यासाठी कंपनीकडून फ्रांसला पाठवलं. रामराव आपल्या कुटुंबासहीत रवाना झाला. तो महिनाभर तेथे राहिल्यानंतर त्यानं सासु सासरे कृष्णा व प्रेमासही पर्यटनासाठी बोलावून घेतलं. कृष्णानं आपली फर्म सोपवत दोन महिन्यासाठी पोरांनाही घेत निघाला. सर्वजण युरोप घुमत ,राहत आनंद लुटू लागले.
सुरानं अप्पास दादा व इतर सारे युरोप टूरवर गेल्याचं कळवलं. हल्ली गोजर बाई खालावतच चालल्या होत्या. अप्पा झोपेच्या गोळ्या आणतच होते. पण सहसा घेतच नव्हते.
मार्च उजाळला नी भारतात कोरोना वाढतोय पाहून सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली. रामा कृष्णा सारी तेथेच अडकली. टिव्हीत साऱ्या बातम्या झळकू लागल्या. लाॅकडाऊन, चीन ,इराण ,अमेरिका वाढता कोरोना, अडकलेले मजूर, परदेशातील पर्यटक.....साऱ्या बातम्या अप्पा ऐकत होते. त्यांनी मनात गणित मांडलं. सुटू न पाहणारं गणित अचानक भराभर सुटलं. त्यांनी सायंकाळी हसत बोलत भरपूर जेवण केलं. आज सुरास थोडं काम असल्यानं तो बाहेर गावात गेला. अप्पानं गोजरबाईस जवळ बसवलं.
" गोजर! तुझी मोहनमाळ काय म्हणतेय गं!"
" काही नाही हो! पण आता काहीच नको असं वाटतंय. शेवंता जवळ, सुरा जवळ मग काय हवंय आणखी! म्हणून ती गळ्यातच राहत झोपावं बस्स इतकंच!"
" बरं ठिक दूध घे थोडं, बरं वाटेल!"
अप्पानं शेवंतास दोन ग्लास दूध ठेवायला लावलं. शेवंतानं दूध गरम करत अप्पाच्या खोलीत ठेवलं.
" शेवंता लवकर ये गं आज! डोक धरलंय जरा चेपून दे जरा!"
" माई आलेच मी,थोडं थांबा."
तेवढ्यात बाहेर सुरा गल्लीतून येऊ लागला. अप्पांनी ओळखलं आता सुरा पाय चेपण्यासाठी येईलच.त्या आधी त्यांनी झोपेच्या गोळ्यांची पाकीटं काढली चुरा गोजरच्या दुधाच्या ग्लासात टाकला.व स्वत:ही शक्य तेवढ्या गोळ्या दुधासोबत गिळल्या.लगेच दुधाचा ग्लास गोजरला पाजला.
शेवंता आली.गोजरमाईनं तिच्या मांडीवर डोकं ठेवताच शेवंता डोकं चेपू लागली. तोच सुरा
ही आला. तो अप्पांचे पाय चेपणार तोच अप्पानं त्यास डोकं चेपायला लावलं.
" पोरा, सुरा ! आज मला तुला ओट्यावरून हात धरत घरी आणलं तो दिवस आठवतो रे! जिवनात काही निर्णय माणुस सहज घेतो.पण त्या निर्णयाची गोड फळं आयुष्यभर चाखतो!"
सुरा अप्पाचं डोकं चेपत लाला व शामा भावास आठवू लागला. जर अप्पा राहिले नसते तर आपलं काय झालं असतं यानं त्याला अश्रू अनावर झाले. तोच माई व अप्पा बोलता बोलताच झोपल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांना व्यवस्थीत झोपवत बाहेर आले.
त्यांना कुठं माहित होतं की ही झोप इतकी गाढ होती की ते पुन्हा उठणारच नाहीत.
गाढ झोपेत अप्पांना सुरा पोरास सख्ख्या आई- बापास पाणी देता आलं नाही हे दु:खं सलत होतं पण त्याला संधी दिली आपण याचं चेहऱ्यावर समाधान विलसवत ते गाढ गाढ गाढ निद्रादेवीच्या कुशीत विसावले.त्या आधीच मोहनमाळ हातात घट्ट धरत गोजर बाई शेवंता लेकीच्या मांडीवर झोपल्या होत्या.
उन्हाळ्यात चारलाच सुराची पहाट सुरू होई. पाच वाजले तरी रोज उठणारे अप्पा उठले नाही म्हणून तो पहायला गेला तर हसऱ्या मुद्रेनं दोघे गाढ झोपलेले. त्यानं हलवून उठवलं नी पलंगावरचा हात सरळ खाली आला. सुरा थरथरत तिथं खाली बसला नी त्याच्या डोळ्यात टचकन......आसवे तराळली.....
शेवंताsssss.... तो आक्रंदला.
माझा बाप माणूस गेला गं! माझ्यावर शेवटचा उपकार करण्यासाठी...त्याला काल संध्याकाळी अप्पा पुन्हा पुन्हा फ्रांसहून लगेच येण्याचे कुठलेच मार्ग नाहीत का सुरा? खोदून खोदून विचारत का खात्री करत होते ते आठवलं. शेवंता ही माईस बिलगत वह्या गाऊ लागली.
सारी आमोनी अप्पाच्या, आताशी सुराचं असलेल्या घरासमोर जमली.
" दादा! अप्पा व माई......गेले रे आपल्याला सोडून..,..ssss" सुरा फोनवर रामास सांगत होता.
पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या व कोरोनाच्या पाशानं गर्भगळीत झालेला राम काळजीनं सुरास सुचना देत होता
" सुरेश, मी काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐक! कुणालाच कळवू नको! सरळ सिव्हील ला कळव! गाडी येईलनी दोघांना घेऊन जाईल.परिस्थीती गंभीर आहे! रिस्क घेऊ नको!...."
पण सुराचं कशा कशावरच लक्ष नव्हतं! त्याला माहीत होतं तरी त्यानं शासनाच्या सूचनाचं पालन करत गर्दी गोळा केली नाही.अप्पांनाही कोघाट करणारी नकोच होती! फक्त टचकन डोळ्यात आसवं येणारी जिवाची माणसं! पण ....पण .... सिव्हील..... अम्ब्युलंस....यानं तो संतापला..
.
. त्यानं अप्पा व माईस स्वत:चं पाणी देत मळ्यात अंत्यविधी केला.कुठलीही गर्दी न करता सारं सारं यथासांग पार पाडलं. आपल्या बाप माणसानं आपल्या मानस मुलास हक्क मिळावा म्हणून माईस ही साथीला घेत कोरोनाच्या परिस्थीतीत मुलं बाहेर अडकल्याचा मुहूर्त साधला.
अप्पानं घरच्यांचा हातच काय पण सावली ही पडू दिली नाही.
ना मांडी, ना पाणी,ना कोगाट करणारे नाटकी आसू,ना मुंडन....
फक्त जिवाचा माणुस सुरा व लेक शेवंताच्या डोळ्यात टचकन येणारे पाणी...
.
.
सुरानं मळ्यातच अप्पा व माईचं मोठं स्मारक उभारत सतत दिव्याचं फुलं पेटतं ठेवलं.

समाप्त!
✒ वासुदेव पाटील.