बाल्कनी...
शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे ग्रुपमध्ये पार्टीचा दिवस. शनिवार रविवार सगळ्यांना सुट्टी असल्याने सगळ्यांनी हा जणू नियमच ठेवला होता. त्यानिमित्ताने सगळ्यांचा भेटीगाठी होत. अशीच ह्या शुक्रवारची पार्टी साकेत कडे होती. त्यासोबत एक निमित्त ही होत ते म्हणजे त्याने घेतलेला हा नवीन फ्लॅट. सगळे त्याच घरं बघून खुश होते. मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये 12व्या मजल्यावर. हवेशीर, मोठा, मिनी टेरेस फ्लॅट. सगळे गप्पा मारण्यात रमले होते पण त्या सगळ्यात मधुरा कुठे दिसत नव्हती. साकेत तिला शोधत होता. ती टेरेसवर भिंतीला टेकून रेलिंग वर हात ठेवून बाहेर बघत होती. तिला तिथे बघून साकेत तिच्या दिशेने गेला तिच्या समोर उभा राहून म्हणाला.
“काय ग, इथे का उभी आहेस अशी?”
“काय मस्त हवा आहे इथे. छान वाटलं. पण काय रे एवढया वर का घेतलस घर?”
“मला आवडत उंचावर राहायला. अस समज की हे घर म्हणजे आमचं स्वप्न. माझं आणि ऋचाच. बहीण माझी तू भेटलीस ना तिला.
“हम्म... पण एवढ्या उंचीवरून पडायची भीती नाही वाटत? इथून पडल्यावर कस होत असेल ना...”
“ए बाई! चल तू आत चल. काय विचार तुझ्या मनात? एवढी छान जागा आहे. तर तुझं काहीतरी वेगळच.”
“अरे! सहज विचार आला डोक्यात. आणि तू एवढ्या उंचीवर घेतलास खरा, पावसाळ्यात काय होईल विचार केला आहेस का?”
“केलाय की. नीट बघ सगळीकडे म्हणजे समजेल तुला.”
त्याच्या बोलण्यावर तिने ती जागा नीट बघितली. खरच, पाऊस आला तर फोल्डिंगच छत होत आणि फ्लोवर आलेले पाणी जाण्यासाठी जागा केली होती त्याने जास्त पाणी साचणार नाही.
“वा! छानच केलीस की अरेंजमेंट.”
“हो तर, पुढे जी कोणी येईल तिला कसलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे मी.”
त्याच्या वाक्याने मधुराने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या नजरेने ती ओशाळाली, म्हणाली.
“आत जाऊयात का? उगाच सगळेच इथे येतील आणि इथली शांत गायब करतील.”
मधुराच्या आवाजातला लाजरा स्वर साकेतला मनात गुदगुल्या करून गेला. तो तिथेच मधुराला त्याच्या मनातलं सांगणार होता. पण तिथे सगळे होते परत मस्करीला त्यांना बहाणा नको म्हणून तो दोन पावलं मागे झाला. मधुरा तिथून निघाली आणि...
“अरेरे!... अरे देवा...”
“काय ग काय झालं तुला एकदम.”
“काय काय विचारतोस? हे बघ, माझा ड्रेस फाटला. तुझ्या ह्या खिळ्यात अडकुन.”
तिच्या ड्रेसकडे बघत साकेतने डोक्याला हात मारला.
“आता...?”
तेवढ्यात ऋचा त्यांचा आवाज ऐकून तिथे आली.
“काय रे काय झालं?”
“अग, हे बघ ना. हिचा ड्रेस...”
ऋचा पुढे आली आणि तिने फाटलेल्या ड्रेसकडे आणि हसली.
“एवढं काय करत होतात तुम्ही की ड्रेस फाटला?”
“ए बावळट...”
साकेतने तिच्या दंडावर हात मारत म्हणलं. तिच्या वाक्याने मधुरा अजून ओशाळाली.
“बर, बर... असू देत. मधुरा चल तू आत माझ्या बरोबर मी तुला देते काहीतरी बदलायला.”
“अग, पण तुझे कपडे तिला कसे...?
“तू गप आता. मी बघते काय ते.”
अस म्हणून ऋचा मधुराला तिच्या खोलीत घेऊन गेली. त्या दोघी आत गेल्यावर साकेतने त्या खिळ्याकडे पाहिलं तिथे तिच्या ड्रेसचा फाटलेला तुकडा अडकला होता.
“असा कसा अडकला हिचा ड्रेस?”
असा विचार करत साकेत तो कपडा उचलायला खाली वाकणार तोच त्याला बाहेरून मित्राने हाक मारली. तो कपडा तिथेच सोडून साकेत आत गेला.
थोड्यावेळाने कपडे बदलून मधुरा बाहेर आली. हलक्या क्रीम कलरचा टॉप आणि येल्लो कलरचा स्कर्ट तिने घातला होता. ऋचाची उंची तिच्यापेक्षा कमी असल्याने तिचा स्कर्ट तिला घोट्याच्या थोडा वरपर्यंतच झाला. पण त्यातही ती खूप सुंदर दिसत होती आणि तिने केस वर घेऊन त्यांचा एक पोनी बांधला होता. तिला बघून साकेत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला
“सुंदर दिसत आहेस..”
मधुराने लाजून नजर झुकवली.
“पण हे केस मोकळे जास्त छान दिसतात.”
अस तिच्या कानात सांगून तो पटकन तिथून निघून गेला. त्याला तिथून जाताना बघत तिचा हात पोनिवर फिरला आणि झटक्यात ते केस त्या रबराच्या निविळख्यातून आजाद झाले. बराचवेळ झाला आता हळू हळू सगळे आपापल्या घराकडे जायला निघाले. मधुराही निघाली तिला सोडायला मात्र साकेत लिफ्ट पर्यंत गेला खरंतर त्याला मधुराला घरापर्यंत सोडायच होत. पण ती तिची मोपेड घेऊन आली होती त्यामुळे नाईलाजाने त्याला तिथेच निरोप द्यावा लागला.
साकेत घरात आला. दोघा बहीण-भावा नी मिळून सगळी आवरा आवर केली आणि झोपी गेले. सकाळी साकेतला लवकरच जाग आली. जाग येताच तो टेरेसमध्ये आला ज्या ठिकाणी त्याने काल मधुराच्या ड्रेस चा फाटलेला तुकडा पहिला होता तिथे तो शोधू लागला. ज्याठिकाणी काल त्याने ते कापड पाहिलं होत ते तिथे नव्हतंच. त्याने आजूबाजूला पाहिलं पण ते त्याला कुठेच दिसलं नाही. त्याची शोधा शोध चालू असताना तिथे ऋचा येते.
“काय रे सकाळी सकाळी काय हरवलं तुझं?”
“माझं नाही ग, मधुराच.”
“मधुराच..?”
“हा ते तिच्या ड्रेसच ते फाटलेल कापड. ते शोधतोय.”
“का? फ्रेम करायची आहे त्याची?”
आपलं हसणं दाबत ऋचाने विचारलं. तिच्या अश्या वाक्याने आपण उगाच काहीतरी वेड्यासारख वागतो आहोत ह्याचा अंदाज साकेतला आला.
“बावळट, लाजतोस काय? माहितीये मला तुला आवडते ती. उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस.”
साकेत डोकं खाजवत गालातल्या गालात हसला.
“पण मग अस आहे तर काल टायमिंग चांगलं होत की, बोलायचं होतंस.”
“अग, बोलणारच होतो. तेवढ्यात तो ड्रेसचा प्रकार झाला आणि सगळं तिथेच थांबलं. आता तेच कापड तर शोधतोय. दिसत नाहिए कुठे, काल इथेच पाहिलं होतं.”
“हम्म... पावसाचं पाणी जाण्यासाठी जे पाइपच होल बनवलं आहेस त्यावर जाळी आहे का? वाऱ्याने उडून तिथून खाली गेलं असेल.”
त्याच ठिकाणी थोडं पुढे असलेल्या पाइप होल मध्ये डोकावत, ‘असेल कदाचित’ म्हणत साकेतने त्या कापडाचा नाद सोडून दिला.
सोमवारी सकाळी साकेत अगदी उत्साहात ऑफिस ला निघाला. दोन दिवसांच्या गॅप नंतर आज त्याला मधुरा भेटणार होती. त्यात दोन दिवसांच्या सुट्टीत त्याने मुद्दामूनच तिला कॉल केला नाही. आपल्या फोन न करण्याने तिला काय फरक पडतो हे त्याला पडताळून पहायचे होते. त्याचा प्रयोग सफल झाला. ऑफिसमध्ये जाऊन 10 मिनिटे होत नाहीत तर मधुरा त्याच्या डेस्क समोर येऊन उभी राहिली.
“कुठे होतास 2 दिवस?”
“कुठे जाणार? इथेच होता. जर घर लावत होतो. का ग?”
“नाही, काही विशेष नाही. झालं का मग घर लावून?”
मधुराच्या आवाजात तिला फोन न केल्याची नाराजी साकेतला अगदी स्पष्ट कळत होती. तो मनातल्या मनात खुश होत होता.
“हो, झालं बाबा. अगदी मोठं काम हलकं झाल्यासारखं वाटतय.”
“छान! मग ठीक आहे, आज जाऊयात आपण तुमच्या घरी.”
“माझ्या घरी...?”
मधुराच्या बोलण्यावर साकेतचा विश्वास बसत नव्हता.
“हो, का? मी आलेतर चालणार नाही का तुला?”
“तस नाही. चालेल की. का नाही.”
“गुड, मग ऑफिक सुटल्यावर भेटू. येते मी.”
साकेत ला आकाश दोन बोटांवर होत. आजच्या दिवसाची सुरवात एवढि सुंदर होईल असं त्याला अजिबातच वाटलं नव्हतं. संध्याकाळी तो आणि मधुरा दोघे त्याच्या घरी गेले. मधुरा आत आली ती थेट टेरेसच दार उघडून बाहेर गेली.
“डायरेक्ट इथेच...काय पाणी वगैरे पिणार की नाही?”
“नको मला पाणी.”
ती रेलिंगकडे तोंड करून बाहेर बघू लागली. साकेत कॉफी बनवण्यासाठी किचन मध्ये आला. त्याने दोघांसाठी गरमागरम कॉफी बनवली. आणि ती घेऊन येता येता ‘मधुरा बाहेर आली आहे आणि मला तिच्याशी बोलायचं आहे सो अजिबात बाहेर येऊ नकोस’. अशी ताकदही तो ऋचाला देऊन आला.
साकेत कॉफी घेउन आला. मधुरा तशीच एकटक लावून खाली बघत होती. साकेत ने तिला आवाज दिला. तिचा काहीच रिप्लाय नाही. असे दोनदा झाले. साकेतला आश्चर्य वाटलं. तो अजून जवळ गेला.
“मधुरा...”
“हा...”
मधुरा तंद्रीतून बाहेर आली. तिच्याकडे बघत साकेत म्हणाला.
“काय ग, कसला एवढा विचार करत होतीस. मी तीन चार वेळा हाक मारली तुला. तुझं लक्ष नाहिए.
“हो का? सॉरी हा माझं खरच लक्ष नव्हतं. तुझी ही जागा अजबच वाटते मला. मी जणू हरवते इथे.”
“बर हे घे coffee.”
तिच्या हातात कॉफीचा मग देत, ‘हीच चांगली संधी आहे मधुराला प्रपोज करायची’ हा विचार साकेतच्या मनात वेग घेऊ लागला. त्या विचारासोबत त्याच्या हृदयाची धडधड ही वाढू लागली.
“मधू, तुला एक विचारू?”
गरमागरम कॉफीचा छोटा घोट घेत मधुरा म्हणाली.
“अं.... विचार की.”
“मधुरा,..... मला तू खूप आवडतेस. अगदी खूप मनापासून माझं प्रेम आहे तुझ्यावर.”
कुठेतरी मधुरालाही त्याच्या भावना माहिती होत्या. करण तिच्या मनातही त्याच्या बद्दल असाच काहीस होत.
“बोल ना काहीतरी. तुला पण आवडतो ना मी?”
मधुरा काहीच बोलत नव्हती. लाजेने तिचे सगळे शब्द ओठावर थांबत होते.
“मधुरा, तू बोलत नसलीस तरी तुझा अबोला काहीतरी सांगत आहे मला.”
मधुराने एकदम साकेतकडे पाहिलं दोघांची नजरानजर झाली. दोघांच्या नजरेने जणू एकमेकांच्या नजरेला जखडून ठेवले.
“तुझा अबोल जे सांगतोय ते खर आहे हे तरी सांग मला.”
आता साकेत हळुहळु तिच्या जवळ येऊ लागला. तशी ती लाजत मागे मागे जाऊ लागली. तो अजून पुढे येऊ लागला. त्याने मधुराच्या हातातील कप घेऊन तो बाजूच्या टीपॉयवर त्याच्या कपाशेजारी ठेवला. त्याचे हात त्याने मधुराच्या हाताच्या दिशेने नेत, तिच्या बोटात आपली बोटे गुंतवली. तशी ती अजून शहारली, अजून थोडी मागे झाली. पण आता मागे जाण्यासाठी जागा उरली नाही. ती भिंतीशी टेकली, तरीही साकेत अजून पुढे आला, तो अगदी तिच्या जवळ आला होता. दोघांचेही श्वास एकमेकांना जाणवत होते. काही क्षणात दोघांमधील अंतर संपणार होत, इतक्यात मधुरा ओरडली.
“आ.. आई ग!”
“काय ग काय झालं तुला एकदम? अशी का ओरडलीस?”
“अरे, माझा पाय...”
“काय झालं पायाला?”
साकेत झटक्यात खाली बसला.
“कसला तरी चटका बसला बहुतेक खूप झोबतय.”
“चटका? चटका कसा बसेल? इथे काहीच तर नाहिए गरम.”
“हो... पण मला खूप त्रास होतोय आग आग होतीए खूप”
“चल तू , आत चल. मला धर सावकाश चाल.”
साकेत तिला घेऊन आता आला. तिला बसवताना त्याने रुचला हाक मारली. तशी ऋचा तातडीने बाहेर आली. साकेतने मधुराला बसवलं. तिची लेगीन वर करत नेमकं काय झालं ते बघू लागला.
“अग हे तर...”
“काळ नीळ पडला की ग पाय तुझा.”
तिच्या पायाकडे बघून खाली बसत ऋचा म्हणाली.
“मला खुप आग होत आहे.”
“थांब, मी मलम आणते आतून. ते लावू बर वाटेल तुला. थांब आलेच.”
अस म्हणुन ऋचा आत गेली. साकेत एकदा मधुराकडे एकदा तिच्या पायाकडे पाहत होता. तिची होणारी यातना त्याला पाहवत नव्हती. एकदा ना राहून त्याने रुचलाही जोरात हाक मारली.
“हो, हो आले. जरा थांब.”
ऋचा मलम घेऊन आली. अगदी हलक्या हाताने तिने ते मधुराच्या पायाला लावले.
“आता जरा थंड वाटेल बघ तुला.”
मधुरा मागे सरकून टेकून बसली.
“कसं वाटतंय आता.”
साकेतने विचारलं
“थोडं बरंय. आग जरा कमी झाली आहे.”
“पण तुला एकझ्याकटली झालं काय?”
रुचने विचारलं.
“काही कळलं नाही, म्हणजे आम्ही बोलत होतो. बोलत बोलत मी मागे भिंतीला टेकले तर एकदम पायाला कोणीतरी गरम गरम सळई लावावी असा चटका बसला.”
“पण तिथे अस काहीच गरम नाहिए.”
“मला नाही माहिती. साकेत, मी निघते आता.”
“अग, पण तू अशी कशी जाणार?”
“जाईन मी. डोन्ट वरी. चल बाय.”
“थांब, मी सोडतो तुला.”
“नको अरे, जाईन मी नीट. खरच.”
“बर, मी रात्री फोन करतो. आपलं बोलणं राहील आहे.”
मधुरा गालातल्या गालात हसत मानेने होकार देत तिथुन निघाली.”
रात्रीची जेवण आटपली. सगळी आवरा आवर करून साकेत ने घड्याळ बघितलं. १०:३० वाजले होते.
“ही वेळ योग्य आहे मधुराला फोन करायला. आता मे बी ती तिच्या खोलीत असेल.”
साकेतने मधुराला फोन लावला.
“हॅलो... मधुरा.”
“बोल.”
“कशी आहेस? आय मिन बराय का पाय तुझा आता?”
“हो.”
“ओके. जेवलीस?”
“हो.”
“अस का बोलते आहेस? काही झालाय का?”
“पुन्हा माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस.”
“काय? मधुरा अग, अस का.... हॅलो, हॅलो, हॅलो मधू.”
दुसऱ्या बाजूने फोन कट झाला होता.
“अस का बोलली ही? हे काय मधेच? जेव्हा हे घडत होतं तेव्हा तर बरी होती.”
साकेतची सगळी रात्र ह्याच विचारात गेली. कधी सकाळ होते आणि मधुराला भेटतो आहे असं झालं होत त्याला.
सकाळी लवकर उठून भराभर आवरून साकेत ऑफिसला निघाला. ऑफिसला पोहचल्यावर सगळ्यात पाहिले त्याने मधुराला शोधलं. ती आली नव्हती. त्याच्यात थांबण्याचा पेशंश नव्हता. त्याने ताबडतोब तिला फोन लावला.
“गुड मॉर्निंग. अस म्हणावं का मी तुला?”
फोन उचलल्या उचलल्या पलीकडून मधुरा म्हणाली.
“हाय, कशी आहेस?”
“छान! आता विचारतो आहेस? आणि काय रे तुमच्याकडे रात्रीचा अर्थ सकाळ असतो का?”
“म्हणजे...?”
“हे पण मीच सांगू? तू काल रात्री फोन करणार होतास मला.”
“अग, मी केलाच होता ना.”
“हो का मग मी उचलला नाही का? जाऊ दे. आता का फोन केलास ते सांग.”
मधुरा अस का बोलते आहे. काल तीच बोलली ना माझ्याशी मग आता अस का बोलते ही.
“हॅलो??? अरे बोल ना काहीतरी.”
“आ... हा, नाही ते, तू कधी येत आहेस ऑफिसमध्ये?”
“निघेन थोड्यावेळात. का?”
“काही नाही तू ये आपण आल्यावर बोलू . बाय.”
साकेतने फोन ठेवला. मधुराच्या बोलण्याने तो पूर्ण पणे गोंधळून गेला होता. काल मी हिच्याशी बोललो तर माझ्याशी तुटकपणे बोलली आणि आता म्हणते मी फोनच केला नाही. त्याच्या प्रश्नांची उत्तरं मधुरा आल्याशिवाय मिळणार नव्हती. तो तीची वाट पाहू लागला.
थोड्यावेळात मधुरा आली. ऑफिसमध्ये येताच तिने साकेतच डेस्क गाठलं. साकेत कामात होता, त्याच लक्ष नव्हतं. त्याच्या समोर उभ राहून ती म्हणाली.
“आय एम सॉरी.”
साकेतने वर पाहिलं. मधुरा पडलेला चेहरा घेऊन त्याच्यासमोर उभी होती. तो चटकन उठून उभा राहिला.
“सॉरी कशाबद्दल?”
“मला तुझ्याशी अस बोलायला नको होतं.”
“अरे, कमाल झाली. मला तर वाटलं होतं की तू मलाच माफी मागायला लावणार.”
“हम्म... मी फोन बघितला नसता ना तर तुला मागायला लावली असती.”
तिचा तो लाडिक राग साकेतला गुदगुल्या करून गेला.
“पण खरंच सॉरी. तुझ्या रागात मी सकाळ पासून फोन बघीतलाच नव्हता. पण तू म्हणालास ना की तू कॉल केला होतास, तेव्हा मी चेक केला फोन आणि तुझा मिस कॉल दिसला. काल घरी गेले तर एवढं डोकं दुखत होत माझं. जेवण झाल्यावर तुझ्या फोनची वाट बघत कधी झोप लागली कळलच नाही मला.”
मधुराच्या बोलण्यामुळे साकेत संभ्रमात पडला.
‘अग पण आपण बोललो काल’ अस तो पुढे बोलणार तोच तिचा मोबाईल वाजला. तो कॉल घेत नंतर भेटू असा इशारा करून ती तिथून निघून गेली.मधुराच वागणं काहीतरी वेगळंच वाटलं साकेतला. काल रात्री माझ्याशी बोलुनही आपण बोललोच नाही अस का म्हणते ही? की आपली टेर खेचत आहे त्याला कळात नव्हतं. लंचमध्ये दोघे पुन्हा भेटले. त्यावेळी मात्र कालच्या प्रकारावर बोलणं साकेतने प्रकर्षाने टाळलं. संध्याकाळी फिरायला जाऊयात का अस त्याने विचारल्यावर मधुरा लगेच हो म्हणाली. त्याने तो खुश झाला. ‘काल झालं ते झालं, पण आज जे होणार आहे त्याबद्दल तो खुप एक्साइट होता. ऑफिस सुटल्यावर दोघे सोबतच बाहेर पडले. तिला गेटशी थांबायला सांगून तो बाईक आणायला गेला. बाईक काढून येईपर्यंत कुठे कुठे जाता येईल ह्याच प्लॅनिंग त्याच्या डोक्यात चालू होत. तो बाईक घेऊन गेटवर आला तर त्याला मधुरा कुठे दिसली नाही.
“अरे, गेली कुठे ही?”
त्याने तिला फोन लावला पण तो लागला नाही. बराचवेळ तो तिथेच तिची वाट पाहत थांबला. मग मात्र वैतागून थेट तीच घर गाठलं.आता जे होईल ते होईल. कमाल वागणूक झाली ही तर. असा विचार करत त्याने दाराची बेल वाजवली. मधुराच्या आईने दार उघडलं.
“अरे, साकेत ये ना बाळा.”
“नमस्कार काकू, मधुरा...?”
“हो आहेना, आताच आली ती 10-15 मिनिटापूर्वी. बस हा मी बोलावते तिला. तूला पाणी आणू?”
“ नको काकू. थँक्स.”
“बर.”
अस म्ह्णून त्या मधुराला बोलवायला आत गेल्या आणि थोड्यावेळाने एकट्याच बाहेर आल्या. त्यांचा चेहरा ही बदलला होता.
“बाळ, ती येत नाही म्हणते. तुलाच आत बोलवत आहे. तू...?”
“हो, हो, काकू मी जातो आत.”
साकेत मधुराच्या खोलीत डोकावला. ती बेडवर गुडघ्यात डोकं घालून बसली होती. साकेत आत आला.
“मधुरा, ए मधुरा... अशी का बसली आहेस? आणि मी येईपर्यंत का नाही थांबलीस? अशी अचानक न सांगता का निघून आलीस तिथून?”
मधुरा काहीच बोलत नव्हती. साकेतने तिच्या पायाला हात लावून तिला हलवलं.
“मधुरा....?”
तिने वर पाहिलं.
“अरे, तू कधी आलास? आणि इथे आत कसा आलास? कोणी नाही का घरात?”
आता मात्र तिच्या वागण्याचा त्याला शौशय यायला लागला. तिची आई तिला सांगायला आली होती आणि तिनेच मला आत बोलावलं आणि आता हे अस.
“तुला काहीच आठवत नाहीए मधुरा?”
“काय?”
“आपण आज बाहेर जाणार होतो. फिरायला.”
“अच्छा! म्हणजे मला घ्यायला आला आहेस. बर मग बाहेर तरी बस मी आलेच आवरून.”
अस म्हणून ती बेड वरून उतरली आणि कपाटाच्या दिशेने जाऊ लागली. ती जाता जाताच साकेतने तिचा हात धरून तिला थांबवलं.
“आपण ऑफिसमधून डायरेक्ट जाणार होतो.”
“हो का?”
मधुरा गोंधळी आहे हे तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. तिला आपल्या जवळ ओढत साकेतने विचारलं.
“काय होतंय तुला मधुरा?”
“मला नाही समजते. मला फक्त एवढंच आठवतंय कि, मी तुझी वाट बघत आणि पुढे काय झालं मला काही आठवत नाहिए. मला आईने आवाज दिला तेव्हा मला समजलं की मी घरी आहे. साकेत मला खूप भीती वाटते आहे. तू प्लीज माझ्या बद्दल कोणत्याही गैरसमज करून घेऊ नकोस. मी अशी नाहिए.”
“हो मधुरा, तू शांत हो आधी. मला कुठलाही गैरसमज झाला नाही. तू ठीक आहे मला माहिती आहे. आपण एक काम करू आपण लवकरात लवकर एक मानसोपचार तज्ज्ञांना भेटू, ते आपला प्रॉब्लेम सोलव्ह करतील.”
“म्हणजे मला वेड लागलं अस म्हणायचंय तुला?”
“अग नाही राणी, अस कस म्हणेन मी. फक्त वेडी माणसाचं तिथे जातात का? आपण जाऊन तर येऊ.”
“नाही मला कुठेही जायचं नाही. तू जा इथून या पुढे मला भेटायला यायची काही गरज नाही. जा इथून.”
अस म्हणत ती साकेतला ढकलू लागली.अखेरीस तिने साकेतला खोली बाहेर काढून तिच्या खोलीचे दार लावून घेतल.
“मधुरा, मधुरा ऐक जरा माझं, प्लीज दार उघड. मधुरा...”
काहीच उपयोग झाला नाही तो बराच वेळ दार ठोठावत राहिला पण मधुराने दार उघडलं नाही. नाईलाजाने तो तिथुन निघाला. निघताना तो मधुराच्या आई वडिलांशी बोलला. त्यांच्या मते हे सगळं गेले ३-४ दिवसांपासून चालू आहे. पाहिले ती अस कधीच वागली नाही. हल्लीच तिला अस होतंय. साधारण गेल्या शनिवार पासून. त्यांचं बोलणं ऐकून साकेतने तिला ह्यातून बाहेर काढण्याचा निश्चयच केला मग ते तिला पटो अगर न पटो
मनाशी ठरवल्याप्रमाणे साकेतने लगेच हालचाली सुरू केल्या. शहरातल्या एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची त्याने भेट घेतली. त्याला आलेल्या अनुभवावरून आणि मधुराच्या आईबाबांनी दिलेल्या माहिती वरून त्याला जे समजल ते ते त्याने डॉक्टरला सांगितलं. सोबत ती हे सगळं मान्य करायला तयार नाही हे ही सांगितलं. त्यामुळे जे काही करायचं आहे ते तिच्या नकळत करावं लागणार होतं.
एके दिवशी सकाळी साकेत त्या डॉक्टरांन सोबत मधुराच्या घरी आला. मधुरा तिच्या खोलीतच होती. साकेत आता गेला. ती खिडकीत बसून कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होती. साकेत तिच्या समोर जाऊन बसला. मधुराने त्याच्याकडे पाहिलं. मोबाईल मधली गाणी बंद करून तिने कानातून हेडफोन काढले आणि पाय खाली सोडून बसली.
“रागावलीस माझ्यावर?”
“नाही. मी कोण तुझ्यावर रागावणारी?”
“अस का बोलतेस मधू?”
“मग काय म्हणू? तुला तर मी वेडी वाटते. मग अश्या वेड्या मुलीशी कशाला संबंध ठेवशील तू?”
“अस नको ना बोलू प्लीज. आय एम सॉरी. मला त्या दिवशी तस बोलायला नको होतं. खरच सॉरी.”
साकेतने मधुराचे दोन्ही हात त्याच्या हातात घेतले. तेवढ्यात रूमच्या दारावर टकटक झाली. दोघांनी त्या दिशेने पाहिलं आणि गडबडून जागीच उभे राहिले.
“मी आत येऊ का?”
“अरे, अविनाश... सॉरी यार तुला एवढा वेळ वाट बघायला लावली. ये ना आत ये.”
डॉ. अविनाश आता आले.
“मी ओळख करून देतो. ही मधुरा माझी खास... आणि हा अविनाश माझा मित्र. बाहेर गावी असतो. कालच आला . म्हणाला तुला भेटायचं आहे म्हणून घेऊन आलो.”
“नमस्कार वहिनी.”
अविनाशला बघता क्षणी. मधुराचा जीव कासावीस होऊ लागला. तिला श्वास घेतला त्रास होऊ लागला. अचानक ती चिडायल लागली. ‘तू जा इथून निघून जा, मला तुझं थोण्ड बघायची देखील इच्छा नाही. चालता हो इथून.’अस काही तरी बोलू लागली. कोणाला काहीच कळेना हे अस काय झालं अचानक? अविनाश आणि माधुराची ही पहिलीच भेट आणि ही अशी का वागते. त्याला जायला का सांगते. तिचा एकूण व्यवहार बघता आता तिथे थांबणं त्या दोघांनाही योग्य वाटल नाही. मधुराच्या आई बाबांचा निरोप घेऊन दोघेही निघाले.
“सॉरी, डॉक्टर. मला कळत नाही की ती अस का वागली अचानक?”
“ईट्स ओके. मला सवय आहे या सगळ्याची. पण मला एक समजलं नाही आम्ही आधी कधी भेटलो आणि कधी पाहिलं नाही तरी त्या अश्या का रिऍक्ट झाल्या? मी कोण आहे ते त्यांना आधी कोणी सांगितलं होतं का?”
“नाही अजिबातच नाही. मी तुम्हाला घेऊन येत आहे हे ही मी कोणाला सांगितल नव्हतं. आपण तिथे गेल्यावर मी सांगितलं. आणि त्यावेळेस मधुरा आत गाणी ऐकत होती.”
“हम्म... ईट्स क्वाईट इंटरेस्टिंग. ह्याच्या शेवटा पर्यंत जायलाच हवं. आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. मला मधुराबद्दल अजून काही माहिती मिळेल?”
“हो, नक्कीच. तुम्हाला हवी ती माहिती मी तुम्हाला देईन. माझी मधू बरी व्हायला हवी.”
साकेतचे डोळे पाणावले. अविनाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला. साकेतने डोळे पुसले.
“सॉरी, ते जरा. चला आपण माझ्या घरी जाऊन बोलू. आता घरात कोणीच नाहिए. सविस्तर बोलता येईल.”
अविनाश ला त्याची कल्पना पटली. दोघेही साकेतच्या घराकडे निघाले. जस जस साकेतच घर जवळ येत होत अविनाशची ही अस्वस्थता वाढली होती. आपण ज्या ठिकाणी जात आहोत तिथे आपण कधी येऊ असे त्याला वाटले नव्हते. ते दोघे साकेतच्या घराजवळ आले. साकेत दात उघडतच होता की अविनाशने त्याला विचारल.
“तुम्ही इथे राहता?”
“हो. का? तुम्ही आला आहात का इथे आधी?”
“हा... न.. नाही नाही. असच विचारलं.”
साकेत ने दार उघडलं. दार उघडताच थंड वाऱ्याची झुळूक दोघांना कापून पार झाली.
“अरे यार! ही ऋचा ना, आजपण टेरेसच दार लावायला विसरली.”
अस म्हणत साकेत घाई घाईने आत गेला. मागोमाग अविनाशही आत आला. सगळं घर तो अगदी निरखून पाहत होता. जणू ती जागा त्याच्या ओळखीची होती. तितक्यात त्याची नजर टेरेसकडे गेली. तो त्या दिशेने जाऊ लागला पण तिथे जाताना त्याची पावलं जड होत होती. तो टेरेस च्या दारापाशी गेला. दारातून एक पाऊल पुढे टाकणार तोच मागून साकेतचा आवाज आला.
“डॉक्टर, पाणी?”
साकेत हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभा होता. अविनाशने त्याच्या हातून ग्लास घेतला आणि अगदी घटघट पाणी पिऊ लागला. जणू त्याच्या घश्याला कोरड पडली होती.
“तुम्ही इथे कधी पासून राहता?”
“महिनाच झालाय”
“ही बिल्डिंग उभं राहायला खुप प्रोब्लेम्स झाले होते म्हणे.”
“हो. आम्ही ही ऐकल होत, पण ते काय चालायचंच. अखेरीस सगळं सुरळीत होऊन घर मिळाल, अजून काय हवं.”
“मी ह्या टेरेसमध्ये...?”
“हो, हो. शुअर. या ना.”
अविनाश साकेत सोबत टेरेसमध्ये आला. अलगद पावलांनी चालत तो रेलिंगकडे गेला. रेलिंगला हात घालून तो तसाच उभा होता. तिथुन खाली बघायची त्याला हिंमत होईना. तो तसाच बाजूला बाजूला सरकत होता आणि अचानक त्याला साकेतचा आवाज आला.
“डॉक्टर सांभाळून, तिथे भिंतीत खिळा आहे.”
अविनाशची नजर खिळ्याकडे गेली. तो एकदम मागे सरसावला. खूप मागे. तो एकदम विरुद्ध बाजूस फिरला. दोन क्षण त्याला काही सुचेना. गडबडीतच तो साकेतला म्हणाला.
“मला एक काम आठवलं. मी येतो आपण नंतर भेटू.”
“अहो, पण आपण मधुरा विषयी बोलणार होतो.”
“मधुराविषयी...? ओ हा, तुमची मधुरा. बोलूयात पण आता नको मला खरच खूप महत्त्वाच काम आठवलं. मला गेलं पाहिजे. आपण भेटू नंतर.”
अस म्हणून अविनाश तिथून तडकाफडकी निघून गेला. त्याच्या असल्या विक्षिप्त वागण्याने साकेत अजूनच कोड्यात सापडला.
दुसऱ्या दिवशी साकेतने अविनाशला कॉल केला.
“हॅलो, अविनाश?”
पलीकडून सरदटलेला आवाज आला.
“बोला, साकेत.”
“तुम्ही आज येताय ना? आपण पुढे काही बोललोच नाही”
“हो, खरंय. सॉरी हा ते मी काल अगदी तडकाफडकी निघून गेलो. मला एक अर्जेट काम आठवलं, सो मला थांबता नाही आलं. आणखी एक ऍक्टचुली मला जरा बर वाटत नाहिए. तर मला वाटतं नाही की मी कॉन्टिनू करू शकतो पण माझा मित्र आहे, तोही खूप चांगला मानसोपचार तज्ञ आहे. मी त्याचा नंबर देतो तुम्हाला.”
“ओके, यु टेक केअर.”
म्हणत साकेतने फोन ठेऊन दिला. त्याच्या चेहरा पडलेला पाहून रुचने कारण विचारलं. त्याने सगळी राम कहाणी तिला सांगितली.
“आता रे?”
“आता काय नवीन डॉक्टर.त्यांचा मित्रच आहे म्हणे बघुयात. हा बघ नंबर पाठवलाच त्यांनी.”
दोघे बोलत असतात आणि दारावरची बेल वाजते. साकेत दार उघडतो.
“आई! तू इथे अशी अचानक?”
“का, येऊ नये का मी?”
“अग, तस नाही. पण अशी अचानक न सांगताच आलीस म्हणून जरा नवल वाटलं इतकाच.”
आईच्या हातून बॅग घेत साकेत म्हणाला. त्याची आई घराकडे निरखून बघत होती. साकेत आईची बॅग आता ठेवायला जात असताना रुचने त्याला कोपर मारले आणि नजरेने आईकडे पहायला सांगितले. साकेतने वळून पाहिले. आई डोळे मिटून काही तरी म्हणत होती. हाच प्रकार तिचा गावाकडे चाले म्हणूनच साकेत आणि ऋचा दोघे वैतागून तिथून निघून आले. त्या दोघांनाही असल्या भाकड कथांवर विश्वास नव्हता.
“इथे कोण कोण येऊन गेलं?”
“बरेच जण आले होते. का?”
साकेतने विचारलं.
“नाही कोणी खास व्यक्ती? जिचा ह्या जागेशी संबंध आला आहे.”
“तू काय बोलते आहेस? आम्हाला कळत नाहिए. कोणाचा खास संबंध असेल ह्या जागेशी आमचा सोडून?”
“बर, सध्या कोणाला काही आघात वगैरे ह्या घरात. तुम्हाला दोघांना?”
“आम्हाला कोणाला नाही. पण दादाची एक मैत्रीण आहे तिच्या पायाला लागलं होतं मागे.”
साकेत तिला गप्प बस म्हणून इशारा करत होता. आईने साकेतकडे पाहिल.
“मैत्रीण? कशी आहे ती आता?”
“बरी आहे. काही विशेष नाही.”
“नाहिए ती बरी. मला घेऊन चल तिच्या कडे.”
“कशाला? होईल ती बरी. काही विशेष झालं नाही तिला.”
“मग ते मला बघू देत. आपण थोड्या वेळात निघू मी फ्रेश होऊन येते.”
अस म्हणत आई आत जायला निघाली. निघताना मधेच थांबून ती दोघांकडे आळीपाळीने बघत म्हणाली.
“फक्त तुमचा विश्वास नाही किव्हा तुम्हाला आवडत नाही म्हणून जगातल्या काही गोष्टी बदलत नाहीत. जे आहे ते आहे. लक्षात घ्या.”
अस म्हणून आई आत निघून जाते.
साकेत दाराची बेल वाजवतो. मधुराची आई दार उघडते. साकेतला बघून हसते तशीच सोबत आलेल्या स्त्रीला पाहून आश्चर्य चकित होते.
“काकू, आई माझी. मधुराला भेटायला आली आहे.”
“अरे देवा, हो का? सॉरी हा या ना तुम्ही.”
दोघेही आत येतात. आई, मधुरा च्या घराकडे नीट निरखून बघते. तिच्या आईकडे पाहत विचारते.
“मधुरा कुठे आहे?”
“तिच्या खोलीत आहे. तिथेच असते ती गेले कित्येक दिवस झाले. कुठे जात नाही की कोणाशी बोलत नाही. जॉबला जायची तोही सोडून दिला. काही बोलत नाही हो. एकदम अचानकच गप्प झाली पोर.”
मधुराची आई भरभरून बोलू लागल्या. त्यांचे डोळे पाणावले. तिचे बाबाही उदास दिसत होते.
“तुमची हरकत नसेल तर मी तिला बघू शकते.”
“हो, का नाही. ह्या दिशेला.”
आई, साकेत आणि ते दोघे सगळे मधुराच्या खोलीत गेले. खोलीचं दार ओलांडुन आत जाताच. आईने सगळ्यांना शांत राहण्याचा इशारा केला. मधुरा तिच्या बेडवर गुडघ्यावर हनुवटी ठेऊन बाहेरच्या दिशेला बघत बसली होती.
आई तिच्याजवळ जाऊन बसली. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.
“बाळ..”
तिने चेहरा आईकडे फिरवला.
“नाव काय तुझं?”
“मधुरा....”
आईने तिच्या पाकिटातून एक पुडी काढली. त्यात लाल रंगाच कुंकवा सारख काहीतरी होत त्याने अंगठा भरून तिने तो मधूराच्या कपाळी लावला. तो लावताच ती झटका लागल्यासारखी हादरली.
“काय नाव तुझं?”
आईचा आवाज जरा कडक झाला.
“मधुरा...”
तिच्याही आवाजात जोर आला.
“मधुरा काय?”
“मधुरा कामत.”
“अग, काय सांगतेस हे?”
मधुराची आई दोन पावलं पुढे येत म्हणाली. साकेतच्या आईने त्यांना हाताच्या इशाऱ्याने थांबवलं मधुराचे डोळेही झटक्यात त्यांच्या दिशेने फिरले. ते लाल झाले होते. कसला तरी राग होता त्यात. ते डोळे मधुराचे नव्हते, की त्यांच्या मधुराचे नव्हते.
आईने तिच्या कपाळा वरून अंगठा काढला. ते लाल कुंकू काळ झालं होतं. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत केलं. ती पुन्हा आधीच्या स्थितीत बसली. सगळे तिथून बाहेर पडले.
“काय झालंय हो माझ्या लेकीला? ही मधुरा कामत कोण आहे?”
“कदाचित ती शक्ती जिने तुमच्या लेकीच्या डोक्याचा ताबा घेतला आहे.”
“आई अग, काय बोलतेस हे?”
“तुला मी आधीही म्हंटल आहे साकेत तुला पटत नाही म्हणून काही गोष्टी नसतात अस होत नाही.”
“पण मग आता काय करायचं आपण.”
मधुराच्या आईने प्रश्न केला. त्यांच्याकडे बघत आई म्हणाली.
“मला दोन दिवस द्या. आपण पुन्हा भेटू.”
“का दोन दिवस? आजच कर की काय करायचं ते.”
“प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मी येते आता आपण दोन दिवस दिवसांनी भेटू.”
साकेत आणि आई मधुराच्या घरून निघाले. माधुराची आई आणि बाबा त्यांना लिफ्ट पर्यंत सोडायला गेले. पण ह्या सगळ्यात कोणी मागे वळून पाहिले नाही. मधुरा तिच्या खोलीच्या दाराआडून सगळं ऐकत होती.
पहाटे 4 च्या सुमारास साकेतच्या मोबाईल वाजला. त्या आवाजाने साकेत खडबडून जागा झाला. त्याने नाव बघितलं. मधुराच्या आईचा फोन होता.
“हा, बोला काकू.”
“काय? कधी झालं हे? हो मी आलो लगेच आलो.”
साकेतने कसेबसे कपडे चढवले आणि रूमच्या बाहेर आला. धडधडुन त्याने रुचाच्या रूमचा दरवाजा वाजवला. ऋचा आणि आई दोघीही घाबरून बाहेर आल्या.
“काय रे काय झालं? आणि अश्या अवेळी कुठे निघालस?”
“ऋचा, ऋचा.... मधुराने त्यांच्या घराच्या बाल्कनीतून उडी मारली.”
“काय सांगतोस काय?”
“हो, तिच्या आईचा आता फोन आला होता. मी जाऊन येतो तिथे.”
“संपलं आहे सगळं. आता जाऊन काय उपयोग?”
“अग, आई काहीही काय बोलतेस तू?”
ऋचा आईवर वैतागली.
“सहाव्या मजल्यावरून पडल्यावर अजून काय होणार अशी अपेक्षा आहे तुझी?”
दोघीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून साकेत निघाला. वेळ निघून गेली हे त्यालाही माहिती होत. पण अखेरचं तीला बघायचं तर होतच.
मधुराला जाऊन बरेच दिवस झाले. साकेतही सगळं मनाच्या एक कोपऱ्यात बंद करून त्याच्या रुटीनला लागला. एक दिवस असाच तो आणि ऋचा मॉलमधून सामान घेऊन बाहेर पडले. रस्त्याच्या �